विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.
“हां, तर कुठे होतो आपण राजन्?”
“तू त्या झाडाच्या फांदीवर उलटा लोम्बकळत होतास; मी तिकडून, काट्याकुटयांनी भरलेल्या पायवाटेने येऊन तुला फांदीवरून कसंबसं उतरवून खांद्यावर घेतलं आणि आता स्मशानाच्या दिशेने निघालो आहे.”
“तसं नाही रे बाबा, मी म्हणत होतो की गेल्या खेपेस, दुःख निवारण करण्याचा आणि भविष्यातील अनिश्चितता कमी करण्याचा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात आपण कुठवर आलो होतो?”
“ओह्ह…. विसरला असशील तर बरंच आहे.”