समाजवादी
धर्मनिरपेक्ष–लोकशाहीच्या पार्श्वभूमीवर
भेदाभेदाचा उत्कलनांक जाळून टाकतो कित्येकांना
कुणाही सौंदर्यवतीच्या
गालावरचा तीळ
महत्त्वाचा नाहीये
उपयुक्त आहे
आरक्षणाचा बिंदू
प्रेमीजनांचा होकार किंवा नकार,
एकत्रीकरण किंवा अलगीकरण
यापेक्षा खळबळजनक आहे
वाढत जाणारं खाजगीकरण
अर्थात,
संधीच्या समानतेचं विस्थापन
एक स्वप्न पेरू
लोकशाहीच्या छातीवर
मग होईल या मातीवर
मानवतेच्या उदारीकरणाचं उद्घाटन,
धर्मांध आणि जातींचं उच्चाटन
समानतेची व न्यायाची उजळून वात
नव्याने करून घेऊ स्वातंत्र्याचा उपोद्घात
स.शिक्षक, शिव विद्यालय,चतारी, ता.पातूर जि.अकोला
(‘इंदु‘ कपिलवस्तु नगर,अकोला )