मासिक संग्रह: जानेवारी, २०२२

मनोगत

‘आजचा सुधारक’चा लेखकवर्ग आणि वाचकवर्ग यांचे प्रतिसाद सुधारकच्या टीमसाठी एकंदरीतच अतिशय उत्साहपूर्ण ठरत आहेत. ऑनलाईन स्वरूपात सुरू केला तेव्हा सुधारकचा आवाका विस्तारावा अशी इच्छा असली तर ते इतक्या अल्प वेळात साध्य होईल अशी कल्पना नव्हती. आज सुधारकच्या लेखांवर येणारे प्रतिसाद नवनव्या विषयांवर साधकबाधक चर्चा होत आहे याचेच द्योतक आहेत.

वैचारिक चर्चेमध्ये सर्वांत आवश्यक घटक असतो, तो प्रश्न उपस्थित करण्याचा असे आम्ही मानतो. सुधारकच्या लेखांच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण तर होत आहेच; सोबतच वाचकांच्या मनात प्रश्न उपस्थित करण्यातही सुधारक यशस्वी ठरत आहे.

असे प्रश्न विचारांना चालना देतात. नवे

पुढे वाचा

मॉबी डिक

लढाई ही जशी माणसा-माणसातील असते तशीच ती माणूस आणि प्राणी अशीही असते. तरबेज लेखक अशी गोष्ट सांगता सांगता ‘माणूस’ समजावून सांगतो. ‘मला ईशमाइल म्हणा’ या तीन शब्दांनी सुरू होणारी मॉबी डिक ही अशीच एक गाजलेली आणि गाजणारी जुनी (१८५१) इंग्लिश कादंबरी. लेखक: हरमन मेलव्हिल.

एका व्हेल-मारी जहाजावर, ‘पेक्वोड’वर, घडणारी ही गोष्ट. अहाब हा तिचा कप्तान. एका पायाने लंगडा. त्याचा तो पाय मॉबी डिक नावाच्या व्हेलनेच तोडला आहे. हा मॉबी डिक खुनशी, पिसळलेला आणि डूख धरणारा म्हणून साऱ्या दर्यावर्दींना माहीत आहे. या असल्या मॉबी डिकचा सूड घेण्याच्या इराद्याने अहाब उभा पेटला आहे.

पुढे वाचा

बहुमूल्यी विश्व

“इंडिया विरुद्ध भारत हा झगडा नवा नाही. कित्येक वर्षांपासून तो सुरू आहे. शहरी विरुद्ध ग्रामीण, आहे-रे विरुद्ध नाही-रे, संधी असणारे विरुद्ध संधी नसणारे, उच्चवर्गीय/वर्णीय विरुद्ध इतर असा सगळा हा झगडा आहे. वेगवेगळ्या जाती, समूह, त्यांचे प्रयोजन, त्यांचे परस्परसंबंध, त्यांची गरज, त्यांतील तरल किंवा स्पष्ट भेद या सगळ्यांविषयी आपल्याला बोलावे लागणार आहे.”
‘आजचा सुधारक’च्या अंकाची ही थीम हातात पडली त्यावेळी नुकतेच २०२१ चे अ.भा.मराठी साहित्यसंमेलनाचे सूप वाजले होते नि त्यामुळे अध्यक्षीय भाषणाचा हॅंगओव्हर होता. म्हटलं, त्यावर लिहू का? आणि संपादकांनी “हो, तोही महत्त्वाचा विषय आहेच” असा प्रतिसाद दिला. मात्र लिहायला घेतल्यावर अंकाची थीम डोक्यात घोळायला लागली नि मनातल्या त्या विचाराची हीच बाजू जास्त प्रकर्षाने दिसायला लागली. अर्थात

पुढे वाचा

मानवी प्राण्यातील जाणीव भान (उत्तरार्ध)

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जाणीव

वैज्ञानिक कथा-कादंबऱ्यावरून तयार केलेल्या चित्रपटात, टीव्ही मालिकेत एखादा स्मार्ट रोबो कचरा गोळा करताना, शहाण्यासारखा वागताना दिसतो. तेव्हा आपण टाळ्या वाजवून त्याचे स्वागत करतो. कदाचित प्रत्येकाच्या मनात माणूस बुद्धिमान रोबो बनवू शकतो अशी एक अतृप्त आशा घर करून बसलेली असावी. जाणिवेचा अभ्यास करताना कृत्रिम बुद्धिमत्तेवरील आतापर्यंतच्या संशोधनाचा नक्कीच उपयोग होईल असे तज्ज्ञांना वाटते. जाणीव समजून घ्यायची असल्यास जाणीव असलेले मशीन तयार करा असे विधान एका तज्ज्ञाने केले आहे. हे विधान गंमतीचे वाटत असले तरी ७०च्या दशकात मशीन्सना भाषा शिकवण्याची शिकस्त केली गेली हे आपण विसरू शकत नाही. ध्वनीचे

पुढे वाचा

शून्याला समजून घेताना

परंपरांचे ओझे 

ससा आणि कासव ह्यांच्या शर्यतीची गोष्ट सगळ्यांनीच ऐकलेली असावी. ससा वेगाने पळतो. कासव हळूहळू चालत जाते. ससा वाटेत झोपतो. कासव त्याला ओलांडून पुढे जाते आणि शर्यत जिंकते. गोष्टीवरून घ्यायचा बोध असा की वेगापेक्षा सातत्य महत्त्वाचे. बोध अगदी खरा आहे; पण मुळात असमान क्षमता असलेल्यांना एकाच स्पर्धेत उतरवणे कितपत न्याय्य आहे? तर तसे नाही; आणि म्हणूनच कथेतल्या कासवाला जिंकवण्यासाठी सश्याला झोपवावे लागते.

आयुष्यात कितीदातरी अश्या अतार्किक स्पर्धांचे आपण बळी पडतो किंवा पाडले जातो. येथूनच गरज पडते ती प्रत्येकाच्या शून्याला किंवा आरंभबिंदूला समजून घेण्याची.

सहज भेटायला म्हणून आलेल्या त्या दोघा-तिघा तरूणांपैकी एक जण अंध होता. ऑफिसच्या

पुढे वाचा

हिंदू, हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही

आज हिंदुधर्म अनेक कारणांसाठी चर्चेत आहे. नुकतेच भारताच्या एका प्रमुख राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्याने इसिस (दाएश) आणि बोकोहराम या दहशतवादी संघटनांशी हिंदुत्वाची तुलना केली आहे. महिन्याभरापूर्वी अमेरिकेत हिंदुत्वाच्या उच्चाटनावर विचार करण्यासाठी एक जागतिक परिषदही आयोजित केली होती. त्यामध्ये हिंदुधर्म आणि हिंदुत्व वेगळे करता येणार नाहीत या मुद्द्यावर आम-सहमती झाली होती. उलटपक्षी सर्वसामान्य सुशिक्षित हिंदूला त्याच्या धर्मासंबंधी अथवा संस्कृतीसंबंधी जुजबी माहितीही नसते असा वरचेवर अनुभव येतो. आय.आय.टी. कानपूरमध्ये असताना एका एम.टेक. करणाऱ्या विद्यार्थ्याने एकदा मला रावणाचा भाऊ भीमसेन होता असे छातीठोकपणे सांगितले होते. Bibhishan आणि Bhimsen यात अनेक अक्षरे समान असल्याने कॉन्व्हेंट-स्कूलमध्ये शिकणाऱ्याचा असा घोटाळा होणे स्वाभाविक होते. बरे

पुढे वाचा

महाकवी पीयूष मिश्रा आणि एक रविवार

एकाच दिवशीच्या वृत्तपत्री थळ्यांनी इतकं अस्वस्थ व्हावं? लढाईचे दिवस नाहीत, बॉम्बवर्षाव नाही, त्सुनामी, महापूर, ज्वालामुखीचा उद्रेक नाही……सारं कसं शांत शांत! मग नेहेमीच्या मध्यमवर्गी स्वस्थतेचा आज मागमूसही का नाही? गुरु लोक म्हणतात तसा आपल्यात मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट तर नाही? असेल बाबा!

माझ्या गावाजवळचं, माझ्या ओळखीतलं गाव अमरावती. भारत स्वतंत्र व्हायच्या सत्तावीस वर्षे आधी ऑलिम्पिकला प्रतिनिधी पाठवणाऱ्या हनुमान आखाड्याचं गाव. श्रीकृष्णरुक्मिणीच्या प्रेमकथेचं गाव. दादासाहेब खापर्डे, सुदामकाका देशमुख, मोरोपंत जोशी, के.

पुढे वाचा

गांधीजींची जमीन, बाबासाहेबांचा किल्ला!

भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठेपणा याबद्दल वाद असण्याचं कारण नाही. बाबासाहेब आणि गांधीजी यांच्यात काही मतभेद जरूर होते. मात्र त्यामागे त्यांचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नव्हता. देशाचं आणि समाजाचं कल्याण हाच दोघांचाही ध्यास होता! दोघांनाही एकमेकांच्या असण्याची किंमत आणि महत्त्व माहीत होतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी दोघांनाही दोन पावलं मागं यावं लागलं असेल, तर ते त्यांनी मान्य केलं. पुणेकरार हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. दोघंही आपापल्या ठिकाणी बरोबर होते.

पुढे वाचा

इंडिया विरुद्ध भारत

डिसेंबर १९७७ मध्ये जी.आर.भटकळ स्मृती व्याख्यानमालेत ‘भारतीय समाजातील वर्ग संघर्षाचे स्वरूप’ या विषयावर प्राध्यापक वि.म.दांडेकर यांनी आपले विचार मांडले. त्यांच्या या भाषणाची पार्श्वभूमी जाणून घेणे गरजेचे आहे. १९७५ साली जून महिन्यात श्रीमती इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जारी करून देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि कामगारांच्या पुढाऱ्यांना तुरुंगात डांबले. यामुळे स्वाभाविकपणे लोकांचे व खास करून कामगारांचे लढे थंडावले. त्यामुळे आणीबाणी संपून विरोधी पक्षाचे नेते व कामगाराचे पुढारी मुक्त होताच देशात अस्वस्थ लोक आणि कामगार यांचे लढे सुरू झाले. याच काळात डॉक्टर दत्ता सामंत याचे लढाऊ नेतृत्व मुंबई व ठाणे परिसरच नव्हे तर थेट औरंगाबादपर्यंत बंडाचे निशाण फडकावू लागले. याच

पुढे वाचा

जीवनव्यवहारातील स्त्रीवाद

आजकाल आपले आयुष्य इतके समस्याप्रधान झालेले आहे व कितीतरी प्रश्न आपल्यासमोर ‘आ’ वासून उभे आहेत. त्यातलाच एक फार गंभीर प्रश्न म्हणजे ‘लैंगिक विषमता’. ह्या प्रश्नावरचा अगदी रामबाण उपाय म्हणजे सर्वांनी आपल्या जीवनव्यवहारात स्त्रीवादाचा अवलंब करणे.

कोणतीही विचारसरणी अंगीकारायची झाल्यास आपल्याला त्या विचारसरणीच्या अगदी मुळापर्यंत जावे लागते. म्हणजेच ‘काय’, ‘का’ आणि ‘कसे’ ह्या तीन प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधावी लागतात. तेव्हाच आपण त्या विचारसरणीचा अवलंब करू शकतो. स्त्रीवादाच्या मुळापर्यंत जाण्यासाठीदेखील तीन प्रश्नांची उत्तरे सर्वात आधी आपल्याला शोधावी लागतात.

पुढे वाचा