मन मेलं आहे…
आता दुःख करणंही सोडलं आहे,
सुन्न होणं दूरच
आता हळहळ करणंही सोडून दिलं आहे.
निर्भया बलात्कारानंतर वाटलेला
क्रोध, आक्रोश आटला आहे.
कशासाठी कोणासाठी मेणबत्त्या लावायच्या?
अन्याय होतो, पण न्यायासाठी व्यक्ती मात्र या जगातही नाही.
दगडाला सुद्धा जिथे पाझर फुटतो असं म्हणतात,
तिथे आता हृदयाला पाझर फुटणं कठीण झालं आहे.
मुद्दामच, कळूनही, माणसाने स्वत:तील माणुसकी
कुठे तरी संपवून टाकली आहे.
जिथे असे नरभक्षक, वासनांध जन्माला येतात, निर्माण होतात,
ज्यांना कोणाचं भान रहात नाही,
तिथे आता स्वतःची कीव करावीशी वाटते.
जिथे स्त्रीला पुजलं जातं,
तिथे तिची लक्तरं ओढली जातात.
त्या समाजातील चित्र अजून काय वेगळं असावं?
आणि काय अपेक्षा करावी?
आज अश्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या अनेक घटनांनी
वाईट वाटेनासे झाले आहे.
बोलण्यासाठी तिथे काहीच उरलं नाही
तिथे स्वतःची सुरक्षा तरी कशी मागायची?
मन केंव्हाच मेलं आहे…
मन केंव्हाच मेलं आहे.
आई, बहीण, सून, सासू
आता नातीसुद्धा संपली जिथे
मन केंव्हाच मेलं आहे
मेणबत्त्या पेटवून, न्याय मागून
अन्याय संपत नाही तिथे,
मन केंव्हाच मेलं आहे.
कलिका… तिचे हरण, शोषण करिती
नराधम तिथे,
मन केंव्हाच मेलं आहे.
हातावरच्या रेषा….
हातावरच्या रेषांनीच
ठरवले असते जर
सर्व काही त्यांनी बदलले
तर
कोणीच काम केले नसते.
म्हणतात रेषा, नशीब घडवतात.
हातावरच्या रेषा;
खरंतर कष्ट करताना
पुसल्याही जातात.
कष्टकरी लोकांना
एकदा विचारून तर बघा,
त्यांनी त्यांच्या रेषा
हात न दाखवताच बदलेल्या आहेत.
आयुष्यभर काम
करता करता.…
समर्पक शब्दात उत्तम सादरीकरण…. खूप सुंदर… मनीषा तुझं खूप खूप कौतुक मनापासून शुभेच्छा!!!!!!
तुझी लाडकी मैत्रीण सपना….
Khup chan aahet kavita, मन मेलंआहे hi khupch chan aahet aatachi ashich condition aahe ti thumhi khup cha shabdhat madli aahe
सध्याच्या काळात जी परिस्तिथी आहे अश्या विषयावर चिंतन मांडले आहे. एक स्त्रीचं आयुष्या आणि आपले भवितव्य या दोन्ही ठिकाणी छान संकल्पना प्रत्यक्षात साकार केलेलं आहे
खूप छान मनिषा.तुझे विचार तर छान आहेतच आणि ते विचार तू तुझ्या लेखणीतून खूप छान प्रकारे शब्दबद्ध केलेस.असेच लिहित रहा.
💐💐
भीषण समाज वास्तवाचे संवेदनशील मनावर पडलेले ओरखडे अतिशय तरलपणे रेखाटले आहेत. मन मेल आहे या कवितेत संवेदनशील वाचक मन अंतर्मुख होतं.
हात न दाखवताच बदलेल्या आहेत. या एकाच होळीमध्ये संपूर्ण कवितेचे सकारात्मक सार दडले आहे.
खूप खूप अभिनंदन ma’am. ते दिवस आठवले ,लेक्चर्स मध्येही तुमचे विचार दिसायचे. अतिशय समर्पक शब्दात मांडायच्या.खूप सुंदर कविता आहेत.त्या ऋदया पर्यंत पोहचल्या.असाच कायम लिहीत जा.
खूप छान लेखन समर्पक शब्दात उत्तम सादरीकरण…खूप खूप शुभेच्छा…
खूप छान लेखन समर्पक शब्दात सुंदर सादरीकरण…खूप खूप शुभेच्छा…
सध्याच्या काळात जी परिस्तिथी आहे अश्या विषयावर चिंतन मांडले आहे. एक स्त्रीचं आयुष्या आणि आपले भवितव्य या दोन्ही ठिकाणी छान संकल्पना प्रत्यक्षात साकार केलेलं आहे
खूप खूप सुंदर सादरीकरण मॅडम, तुमचे विचार सध्याची खरी परिस्थिती दर्शवते. खूप खूप शुभेच्छा मॅडम तुम्हाला. असेच छान लेखन करत रहा. 💐💐
कविता आणि त्यांचे सादरीकरणही खूप सुंदर
खूप खूप शुभेच्छा मॅडम💐💐
Very nicely written. It is not everyday you come across such heartfelt messages. Very nice 💐💐