प्रसंग पहिला
एक व्यक्ती एका कार्यालयात कामाला लागली. कधी? १ एप्रिल २०१९, सकाळी नऊ वाजता. नऊ वाजल्यापासून कार्यालय सुरू झाले. व्यक्तीच्या टेबलसमोरची जी खिडकी आहे, त्या खिडकीतून साधारण एक किलोमीटर अंतरावर ट्रॅक आहे आणि तिथून साधारण दिवसातून दोन वेळा ट्रेन पास होताना दिसते. त्या ट्रॅकपलीकडे अडीच ते तीन किलोमीटरवर एक मोठा डोंगर दिसतो. अर्थात डोंगराच्या पार्श्वभूमीवर ट्रेन पास होताना कार्यालयातून दिसते.
दोन वर्षांनी या व्यक्तीला प्रमोशन मिळाल्याचे पत्र मिळाले. हे पत्र मिळाले तेव्हा समोरून ट्रेन पास होत होती. त्यावेळेस तिथे कार्यालयात श्री संस्कारे नावाची व्यक्ती कामासाठी आलेली होती.