IGNOU चे हिंदीतील MA (ज्योतिष) आणि त्यासंबंधीच्या प्रतिक्रिया
असे म्हणतात की भारतीय भविष्य (ज्योतिष) व्यवसाय हा ७०००० कोटींचा आहे. (https://www.exchange4media.com/marketing-news/shemaroo-enters-astrology-market-with-50-stake-in-dominiche-productions-96104.html) म्हणजे साधारण २० लाख ज्योतिषी. माझ्या मते हा आकडा अतिशयोक्त आहे. ज्योतिषी संघ असतात, त्यांच्या सभासदांची संख्या बघून नीट अंदाज बांधता येईल. कदाचित या आकड्यात प्रसिद्धीमाध्यमांचा समावेश असावा. त्यामुळे पुस्तके, वर्तमानपत्रे, चित्रवाहिन्या यांतील पैसा (त्याप्रमाणात) त्यात धरला गेला असेल. याशिवाय नारायण नागबळी, शांत अशा खर्चिक प्रकारांचा समावेश असणार.
माझ्या परिचयातील लोक साधारणपणे लग्न (पत्रिका जुळविणे) पत्रिका मांडणे आणि अडीअडचणीत सल्ला घेणे यापलीकडे ज्योतिषाकडे जात नाहीत.