कुठल्याही शैक्षणिक संस्थेत एखादा विषय अभ्यासक्रमाच्या स्वरूपात घेतला जातो, तेव्हा त्या विषयावर लिहिलेल्या साहित्याकडे प्रमाणित साहित्य म्हणूनच बघितले जाते. तेव्हा ज्योतिषकलेत येणाऱ्या कुंडली, पत्रिका, ग्रह-ताऱ्यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम या साऱ्यांविषयीची माहिती प्रमाणित होऊन सामान्य माणसाच्या मानसिकतेवर तिचा गंभीर परिणाम होण्याचा धोका संभवतो. ज्योतिष हे शास्त्र नाही हे सिद्ध करणारे अनेक प्रयोग झालेत, परंतु ते शास्त्र आहे असे आजवर तरी सिद्ध झालेले नाही या पार्श्वभूमीवर आम्ही ज्योतिषाला ‘कला’ असे संबोधले आहे.
ज्योतिषाची गरज माणसाला का पडते? याची मानसशास्त्राला माहीत असलेली अनेक कारणे आहेत.