दोन डोळ्यांसाठी दोन चष्मे असतात सताड उघडे
अंतर्वक्र आणि बहिर्वक्र
डोळे शाबूत असले तरीही
डोळसपणाची पैदास सोडत नाही रंगाच्या भिंती
घराला माझ्या कुठलाच रंग शोभत नसला तरीही
मी चोरतो आभाळाची निळाई
निसर्गाची हिरवाई
मातीला घट्ट पकडून असलेला काळसरपणा
बेरंगी पाणेरीही वाटतो अगदी जवळचा
बाजारात दाखल झाल्यावर रंग धरतात आपापल्या वाटा
आणि चालू पाहतात सोडून महावृक्षाच्या मुळ्या
अजून तरी आभाळाने, निसर्गाने, मातीने, पाण्याने
सोडले नाहीत आपापले रंग
म्हणून
कणा मोडू पाहणाऱ्या जमातींनो
थांबा, पुढे गतिरोधक आहे…!
7875173828