हल्ली तू बोलत नाहीस मोकळेपणानं
शब्दांतूनही व्यक्त होणं टाळतोयस
तुझ्या मनातलं खदखदणारं
लाव्हारसाचं वादळ
तुझ्या चेहऱ्यावर अंकित झालंय
एरव्ही
तुझ्या वाणीची धार
सपासप वार करते
हिणकस, बिभत्स, अविवेकी
कोशांना फाडत राहते
यार .. मग आता तू का
एवढा शांत आणि लालबुंद?
हिरवं गवत जळू नये
आभाळानं छळू नये
अशावेळी खरं तर
कुणीच मूग गिळू नये
ही वेळ मौन धारणाची नाही
यार..बोल, काहीतरी लिही
दशा बदलणं गरजेचं आहे
आणि दिशाही!!
ssachinkumartayade@gmail.com