जानेवारी २०२१ च्या ह्या अंकाबरोबर ‘आजचा सुधारक’ने आपल्या नव्या स्वरूपातील दोन वर्षे पूर्ण केली आहेत. ‘आजचा सुधारक’च्या सर्व वाचकांना आणि शुभचिंतकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
जानेवारीचा शेतीविषयक अंक विशेषतः नव्याने घोषित केलेल्या तीन कायद्यांविषयी आणि त्याविरोधात शेतकर्यांनी उभारलेल्या आंदोलनाविषयी आहे. कोणताही कायदा बनवताना त्याचा थेट परिणाम ज्यांच्यावर होणार त्या समुहाला विश्वासात घेणे हे सुदृढ सहभागी लोकशाहीचे लक्षण असते. सद्य सरकार तेथे कमी पडले आणि त्यामुळे जनमानसात नवीन कायद्यांविषयी शंका निर्माण झाल्या.
‘आजचा सुधारक’च्या शेतीविषयक अंकासाठी आवाहन करताना शेती हा ‘सतत’ लाभ देणारा व्यवसाय नाही असे विधान आम्ही केले होते.