मासिक संग्रह: ऑक्टोबर , २०२०

मनोगत

‘आजचा सुधारक’च्या माध्यमातून वेगवेगेळे सामाजिक विषय आपण हाताळत असतो. ह्या सर्वांच्या मुळाशी तर्क आणि विवेकवाद असावा अशी ‘सुधारक’ची आग्रही मागणी असते. एप्रिल २०१० मध्ये ‘आजचा सुधारक’चा ‘अंधश्रद्धा विशेषांक’ प्रकाशित झाला होता. आज तब्बल १० वर्षांनी साधारण त्याच अंगाने जाणारा विषय आपण घेतो आहोत, हे खरेतर मरगळलेल्या समाजाचे लक्षण आहे. तरी असे विषय घेतल्यानेच वाद-संवाद घडतात, विचारचक्र सुरू राहते. अंकाचा मूळ विषय जरी नास्तिकेशी जोडलेला असला तरी त्या अनुषंगाने काही इतर आजूबाजूचे विषय आणि काही वेगळ्या बाजूच्या मतांनासुद्धा ह्यात समाविष्ट केले आहे.

पुढे वाचा

नास्तिक्य, हिंदू संस्कृती आणि नैतिकता

नास्तिक्य हा काही या लेखाच्या वाचक मंडळीस नवा विषय नसेल याची खात्री आहे. बुद्धिप्रामाण्यवादाच्या निरंतर प्रवासात सापडणारा एक टप्पा म्हणून आपल्याला नास्तिक्य ओळखीचे आहे. माणूस जन्मल्यापासून ते तो स्वतंत्र विचार करू लागेपर्यंत त्याच्यावर जे संस्कार होतात ते बरेचदा तर्कशुद्ध विचारांच्या प्रवाहाने नंतरच्या आयुष्यात धुतले न गेल्याने आपल्याला धार्मिकांची संख्या लक्षणीय दिसत असते. जसजसे तर्कशुद्ध विचारप्रवाह माणसाच्या मनातील कोपऱ्यांना स्पर्श करू लागतात तसतशी ही जळमटे दूर होतात आणि माणूस अधार्मिक, अश्रद्ध आणि मग नास्तिक असा प्रवास करतो. हे घडत असताना सदर बुद्धिप्रामाण्यवादी माणसाला दैनंदिन वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात मात्र नास्तिक नसलेल्या, बुद्धिप्रामाण्यवादी नसलेल्या धर्माचे संमिश्र असलेल्या सांस्कृतिक प्रभावाला आणि काही नैतिक कोड्यांना सामोरे जावे लागते.

पुढे वाचा

‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’: संकल्पनात्मक ऊहापोह

तत्त्वज्ञानाचे धडे गिरवताना संकल्पनांशी बौद्धिक कबड्डी खेळावी लागते. अनेक संकल्पना बुद्धीच्या कचाट्यात आरामात सापडतात. काही संकल्पना मात्र अश्या असतात की त्या काही केल्या सापडत नाहीत. याची दोन कारणे असू शकतात. पहिले म्हणजे, प्रथमदर्शनी अस्तित्वात आहे असे वाटणारी एखादी संकल्पना जवळून ऊहापोह केल्यावर मृगजळाप्रमाणे नाहीशी होऊ शकते. दुसरे म्हणजे, त्या संकल्पनेचे अस्तित्व आपल्याला नाकारता येऊ शकत नाही, पण तिच्या एकसंधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ शकते. म्हणजे एक नव्हे तर अनेक संकल्पना तेथे असू शकतात. अश्या संकल्पना एवढ्या एकसंध नसतील की त्या ‘एक संकल्पना’ म्हणून हातात सापडाव्या, किंवा त्या जरी एकसंध असल्या तरी इतक्या लवचिक असतात की सहजपणे निसटून जाव्यात.

पुढे वाचा

बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : विचार आणि संघटन

बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : जगाला प्रभावित करू शकणाऱ्या अलौकिक शक्तीचे, व्यक्तीचे वा वस्तूचे अस्तित्व बुद्धिगम्य नाही म्हणून ते स्पष्टपणे नाकारणे. परंतु ज्यावेळी आपण ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ ठळकपणे उद्धृत करत आहोत त्यावेळी अलौकिक शक्तीसहीत धर्म/पंथ/धम्म/दीन/रिलिजन (religion) अशा धर्माधीष्ठित जीवनपद्धतीसुद्धा नाकारत आहोत आणि म्हणूनच हिंदू-नास्तिक, मुस्लिम-नास्तिक, बौद्ध-नास्तिक, ख्रिश्चन-नास्तिक इत्यादी संभ्रमात टाकणारे शब्द आणि ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ ही संज्ञा यातील फरक स्पष्ट करता येईल. धर्माचे अस्तित्व स्वीकारून फक्त ईश्वर नाकारणे हे अपुरे आहे. ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ हे अलौकिक शक्तीपुरते मर्यादित नसून मानवी जीवनातील इतर घटकांनासुद्धा लागू होते अशी पूर्ण आणि स्पष्ट मांडणी बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्यात अपेक्षित आहे.

पुढे वाचा

बुद्धी, विवेक आणि वास्तव (भाग १)

आपण ‘कुणापासून’ तरी निर्माण झालो, आपण आहोत त्याअर्थी आपल्याला आई-वडील आहेत हे सरळ आहे हे गृहीत धरणं जीवउत्पत्तीच्या सध्याच्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर योग्यच आहे. बहुतांश सजीव जन्माला यायला आई-वडील लागतात त्याचप्रमाणे माणूस आणि इतर सजीव पृथ्वीवर यायलादेखील कुणीतरी लागत असणार – अन्यथा आपण कुठून आलो याचं उत्तरच सापडत नाही – हा विचार ‘या सृष्टीचा निर्माता कुणीतरी असणार’ या दृढ झालेल्या धारणेमागे होता/आहे. आपले आई-वडील कोण हे निश्चित करता येतं, त्यांना समोर दाखवता येतं. (अर्थात आई-वडील ही निश्चिती, विशेषतः ‘वडील’ ही निश्चिती, एका टप्प्यावर करता येऊ लागली). सृष्टीनिर्मात्याबाबत हे शक्य नाही. परंतु ती धारणा अत्यंत बळकट झाली असल्याने ‘निर्माता दिसला नाही तरी आहे’ याबाबत बहुसंख्यांच्या मनात संदेह नसतो.

पुढे वाचा

बुद्धी, विवेक आणि वास्तव (भाग २)

‘बुद्धिप्रामाण्यवाद हा समस्त सृष्टीसाठी हितकारक आहे’ ही या विशेषांकाची मध्यवर्ती कल्पना आहे. ‘बुद्धिप्रामाण्य’ या संज्ञेविषयी पहिल्या लेखात मे. पुं. रेगे यांच्या मांडणीच्या संदर्भाने आपण चर्चा केली. ‘बुद्धिप्रामाण्य’ या शब्दाऐवजी ‘विवेक’ हा शब्द मला अधिक योग्य वाटतो हे मी तिथे मांडलं आहे.

समस्त सृष्टीमध्ये मानव, मानवेतर असंख्य सजीव आणि अर्थातच निर्जीव जग यांचा समावेश होतो. ‘बुद्धिप्रामाण्यवाद हा समस्त सृष्टीसाठी हितकारक आहे’ या विधानाचा अर्थ ‘माणसाने बुद्धिप्रामाण्य स्वीकारणं समस्त सृष्टीसाठी हितकारक आहे’ असा अभिप्रेत आहे. (मानवासह मानवेतर सजीवांनीही बुद्धिप्रामाण्य स्वीकारावं असा एक दुसरा मजेशीर अर्थ या विधानातून निघू शकण्याची शक्यता आहे; पण तो अर्थ अर्थातच गैरलागू आहे.)

पुढे वाचा

बुद्धी, विवेक आणि वास्तव (भाग ३)

मागील दोन लेखांमध्ये बुद्धिप्रामाण्य, नास्तिक्य, विवेक, वास्तवाचं आव्हान या संदर्भाने आपण काही बोललो. या लेखात आपण विवेकवादाची मूळ मांडणी, विवेक-अविवेक हा निर्णय करण्याच्या कसोट्या याबाबत बोलूया. तत्पूर्वी एक नोंद –

माणसाविषयी बोलताना सहसा ‘तो’ हे पुल्लिंगी संबोधन वापरलं जातं. वास्तविक ‘माणूस’ म्हणजे स्त्री, पुरुष यांच्यासह आज अस्तित्वात असलेले अनेक इतर लिंगभेद आणि लिंगभावदेखील. सवयीचा, सोयीचा भाग म्हणून ‘तो’ वापरलं जातं. पण संबोधने लिंगसापेक्ष असल्याने ती वाचल्यावर मनात विशिष्ट लिंगाच्या मनुष्याची आकृती तयार होतेच. वस्तूंच्या बाबतीतही हे होतं. ‘पुस्तक’ म्हटलं की लिंगनिरपेक्ष प्रतिमा डोळ्यांपुढे येते.

पुढे वाचा

वर्जितांची संस्कृती

संस्कृती या शब्दाचे अनेक अर्थ प्रचलित आहेत. पण मला सगळ्यांत जास्त भावलेला अर्थ, म्हणजे ‘समाजात रूढ असलेला सामायिक मूल्यांचा संच.’ समाजात असलेल्या अनेक घटकांना एका धाग्यात विणण्याचे महत्त्वपूर्ण काम संस्कृती पार पाडते. त्या अर्थाने, संस्कृती ही सामाजिक वस्त्रांची शिवण समजली जावी. एखाद्या समाजाची संस्कृती जितकी कालसुसंगत असते, तितकी त्या समाजाची वैचारिक प्रगतीसुद्धा वाढत जाते. आणि उलट दिशेने, ज्या समाजाची हीच शिवण कालबाह्य होते, तो समाज मागे पडतो, काळाच्या पडद्याआड जातो. याची अनेक उदाहरणे देता येतील. पण जेव्हा याचे प्रत्यय व्यक्तिगत पातळीवर येतात, तेव्हा ते प्रकर्षाने जाणवतात.

पुढे वाचा

हिंदू धर्म आणि संस्कृती यांवर हिंदुत्वाचा घाला

(एका हिंदू नास्तिकाचे धर्माच्या रक्षणाकरिता पुढे येण्यासाठी बुद्धिप्रामाण्यवाद्यांना आवाहन)

“कां हो…? देवाचे अस्तित्व तुम्ही नाकारता असे म्हणता… पण तुमच्या घरात देवघर आहे; तुमच्या लग्नाच्या वेळी होम हवन केले होते, मुलाची मौंज केली, मरण पावलेल्यांचे श्राद्ध केले, दसरा दिवाळी तुम्ही साजरी करता, एकादशी,चतुर्थीला लक्षात ठेवून उपासाच्या नावाखाली वेगवेगळे पदार्थ करता. एवढेच कशाला, भक्ती पंथातील अभंगाच्या भावनांमध्ये तुम्ही सुद्धा (अभंग / गाण्यांच्या गुणवत्तेप्रमाणे) चिंब होता; नागपुरातल्या सगळ्या ऐतिहासिक देवळांमध्ये लोकांना घेऊन जाता आणि हा आपला वारसा कसा आहे, हे सांगत फिरता. मग हे नास्तिक असल्याचे नाटक कशासाठी…?”

पुढे वाचा

तुह्या धर्म कोंचा?

तुह्या धर्म कोंचा?” या शीर्षकाचा एक मराठी चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता. आपल्या देशात जाती-धर्माचे महत्त्व किती आहे हे काही नव्याने सांगायची गरज नाही. आंतरधर्मीय-आंतरजातीय विवाहांमुळे होणारे तंटे, खाप-पंचायतीचे निर्णय, ऑनर किलिंग, धार्मिक भावना-अस्मिता दुखावल्याचे सांगत होणारे दंगे, या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाचा एक निर्णय काही वर्षांपूर्वी आला होता. त्या निर्णयामुळे परिस्थितीत कितपत फरक पडला किंवा पडेल हा भाग अलाहिदा. परंतु असा निर्णय आवश्यक होता. शासनाकडे भरून द्यावयाच्या कुठल्याही अर्जात/घोषणापत्रात ‘धर्माबाबत माहिती देणे सक्तीचे नाही’ हा तो निर्णय……

डॉ.

पुढे वाचा