एरवी तीन महिन्यांतून एकदा प्रकाशित होणार्या सुधारकसाठी कोरोनाचे वादळ घोंगावत असताना विराम घेणे न मानवणारेच होते. परिणामी सुधारकचा हा कोरोना विशेषांक.
ह्या अंकात इतरत्र प्रसिद्ध झालेले वाचनीय, अभ्यासपूर्ण तसेच काही नवे विचार पोहोचवणारे निवडक लेख प्रकाशित करतो आहोत. सोबतच काही लिंक्सही जोडल्या आहेत. चांगले लेख वाचकांपर्यंत पोहोचावेत एवढीच इच्छा.
आम्ही फक्त वाहक आहोत.
रेखाटन : हेमंत अभ्यंकर