लोकशाही पद्धतीत निवडणुका ह्या निधर्मी आणि निःस्वार्थी पद्धतीने होणे तसेच त्या विषमतेपासून अस्पर्श असणे व त्यात स्पर्धा असली, तरी ती निखळ असणे अपेक्षित असते. तसे ते याखेपेस झालेले नाही. उलट, यावेळेच्या निवडणुकांत विविध पक्षाच्या शीर्ष व इतर नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान एकमेकांवरील गरळ ओकण्याचा नीचांक गाठल्याचे उघड-उघड दिसते. तसेही प्रत्येक निवडणुकीत प्रचाराचा स्तर हा आधीच्या निवडणुकीतील प्रचाराच्या तुलनेत खालावत चालला असल्याचे जाणवते.
नुकत्याच संपलेल्या ह्या निवडणुकांत भारतीय जनतेने म्हणजे आपणच ‘भारतीय जनता पक्षा’ला बहुमताने निवडून आणले आहे. मत कोणत्याही पक्षाला दिले असले तरी निव्वळ मतदान करून आपली जवाबदारी संपत नाही.