मासिक संग्रह: फेब्रुवारी, २०१७

निरक्षर ईश्वर

जितक्या काही भाषा मी जाणतो
त्या सर्व मी आजमावून पाहिल्यात
ईश्वराला त्यातली एकही समजली नाही अद्याप

तो ना मान हलवत ना हुंकार भरत
वाटलं कदाचित देवदूतांकरवी तरी तो वाचून घेईल
चंद्राच्या पाटीवर कधी गालिबचा शेर लिहून ठेवला मी
तो धुवून टाकतो किंवा कुरतडून खाऊन तरी टाकतो 

शिकला सवरला असता जर आपला ईश्वर 
प्रेमाच्या गप्पागोष्टी नाही तरी  किमान
पत्रांची देवाण घेवाण तरी शक्य झाली असती

(हिंदीतूनअनुवादित)

आगळी सर्वान्या

लिंगबदल, तृतीयपंथी, लिंगसंवेदनशीलता
—————————————————————————–
आज एकविसाव्या शतकातही आपण तृतीयपंथींना व अस्पष्टलिंगींना स्वतंत्र ओळख देऊ शकत नाही?…. हा लेख वाचल्यावर तरी आपली लिंगसंवेदनशीलता वाढेल अशी आशा आहे.
—————————————————————————–
ज्याच्याशी तुम्ही मित्र म्हणून गप्पागोष्टी केलेल्या असतात, अगदी कालच त्याच्याकडून एका टेक्निकल टॉपिकवर मत मागितलेलं असतं, जो इतके दिवस अत्यंत सौम्य, सौजन्यशील संवाद साधणारा असतो, तो अचानक तुम्हाला आत्यंतिक रागाने लिहितो – “तुमने मेरा अपमान किया है… तू मला सर म्हणून संबोधलंस?” क्षणभर माझ्या मनात धस्संच. मी ते वाक्य “सर नाही संबोधलंस’‘ असंच वाचलं नि तीनतीनदा खात्री करून घेतली की मी सर असंच संबोधलं आहे.

पुढे वाचा

भारतीय शेती:समस्या आणि धोरणे

भारतीय शेती, कृषिधोरण, रासायनिक शेती
——————————————————————————

भारतीय शेतीवरील अरिष्टाशी संबंधित विविध पैलूंचा सम्यक वेध घेत अन्नसुरक्षा, जमिनीचे पोत, पर्यावरण सुरक्षा, अन्न स्वावलंबन, नापिकी, सरकारी धोरणे  अशा सर्व बाबींचा परस्परसंबंध जोडून दाखवित आज शेतीचा प्रश्न सोडविण्यासाठी नेमके काय केले पाहिजे ह्याची एका प्रयोगशील शेतकऱ्याने अनुभवाच्या आधारे केलेली ही मांडणी

——————————————————————————

कृषिरसायनांच्या घातक परिणामांच्या बाबतीत आमच्या देशात जनता आणि शासन दोन्ही स्तरांवर प्रचंड उदासीनता आहे. जगात अन्यत्र बंदी असलेली ६६ कीटकनाशके देशात वापरात आहेत. कृषिमंत्रालयाद्वारे केल्या गेलेल्या पाहणीत १२.५ टक्के नमुन्यांमध्ये मान्यता नसलेल्या कीटकनाशकांचे अंश आढळले (सप्टें.

पुढे वाचा

रा.स्व.संघात हिंदूंना प्रवेश मिळेल का?

रा स्व संघ, हिंदुधर्म, धर्मविचारभेद,
—————————————————————————–

जुन्या धर्मामधून त्यातील एखादा पंथ फुटून बाहेर पडतो तेव्हा तो कालांतराने व काही निकष पूर्ण केल्यावर स्वतंत्र ‘धर्म’ झाला आहे. परंतु सहिष्णुता आणि समावेशकत्व ह्या हिंदुधर्मातील दोन मोठ्या दोन गुणांची तेथे काय स्थिती आहे?
—————————————————————————–

हिंदुधर्म सहिष्णु असल्याचे वारंवार सांगितले जाते. हे पूर्ण सत्य नसले, तरी हिंदू धर्मामध्ये जी काही थोडीबहुत सहिष्णुता होती, तीही रा.स्व.संघ इ. संघटनांमध्ये आता उरलेली नाही. आमच्या विचारसरणीशी सहमत नसलेल्या हिंदूंचीही टवाळी व हेटाळणी करून त्यांना तुच्छ लेखण्याची वृत्ती या संघटनांमधून मोठ्या प्रमाणात आढळते.

पुढे वाचा

कल्लूळाचं पाणी कशाला ढवळीलं?

स्त्री, अत्याचार, नकोशी, स्त्री-पुरुष नाते, हिंसा
—————————————————————————–

स्त्री आणि हिंसा हे नाते अतिशय गुंतागुंतीचे आहे. काही प्रकारच्या स्त्रियांना, उदा. संतानहीन, विधवा, कुरूप –त्या‘तशा’ असल्यामुळे हिंसा भोगावी लागते. पण ‘तशा नसणाऱ्या’ स्त्रियांनाही कुठे सुटका आहे हिंसेपासून? आणि हिंसा करणारा पुरुष तरी ती करून सुखी, समाधानी असतो का? इत्यादी प्रश्नांचा वेध घेणारा लेख.
——————————————————————————

आमच्या गावाकडं सुगीचा हंगाम चालला होता. अशा वेळी बाया उडदामुगाच्या शेंगा तोडताना एकमेकींची फिरकी घेत राहतात. एका मैतरणीचा काळानिळा पडलेला ओठ पाहून बाजूची म्हणली, “काय गं, हे असं झालं ते प्रेमाचं म्हणावं की रागाचं?’‘

पुढे वाचा

मला मी पाकिस्तानी असल्याची शरम वाटतेय

भारत, पाकिस्तान, जीना, मूलतत्त्ववाद


मोठ्यांच्या राजकारणात बळी जातो, तो लहानांचा…. आपल्याला आणि आपल्या मुलांना एका भीषण भविष्याला तोंड द्यावे लागणार ह्या कल्पनेने शोकाकूल झालेल्या एका पाकिस्तानी महिलेचे मनोगत


जो कुणी परदेशात प्रवास करून आलेला आहे अशी कुणीही व्यक्ती हे सांगेल की तुम्ही कुठल्याही देशात जा, तुम्ही गेलेला देश कितीही विकसित असो.. जर तुम्ही ब्रिटिश असाल किंवा गोरे अमेरिकन असाल, देशाची दारं तुमच्याकरता सहज उघडी होतात. सुरक्षा काहीशी कमी जाचक होते, व्हिसा क्यूज् लहान होतात आणि नियम आणि पद्धती साध्या सरळ होतात.

पुढे वाचा

भारतीय चर्चापद्धती (भाग ६)

वादपद्धती: उच्च, उदात्त पण वर्णग्रस्त, पक्षपाती!

कौटिल्यीय अर्थशास्त्र, चरकसंहिता, वादविद्या, चातुर्वर्ण्य

——————————————————————————–

         भारतीय चर्चापद्धतीचा इतिहास सांगणाऱ्या ह्या लेखमालेच्या ह्यापूर्वीच्या भागांमध्ये आपण आन्वीक्षिकीचा परिचय करून घेतला. ह्या पद्धतीचे उपयोजन तज्ज्ञ मंडळींमध्ये मानवी आरोग्यविषयक चर्चा घडविताना प्रभावी पद्धतीने कसे केले जात होते ह्याचे दाखले चरकसंहितेत अनेक ठिकाणी मिळतात. त्यांतील वादांचे स्वरूप व परिभाषा ह्यांचा परिचय ह्या अंतिम लेखात करून दिला आहे.

——————————————————————————–

         “तत्त्वज्ञानाचा निष्कर्ष म्हणून आणि सुफल परिणाम म्हणून विज्ञानाचा जन्म होतो; तात्त्विक अधिष्ठानाअभावी विज्ञान जिवंत राहू शकत नाही.

पुढे वाचा

नोटाबंदी आणि जनतेचा आनंदोत्सव

नोटाबंदी, स्वपीडन, नरेंद्र मोदी
—————————————————————————–
नोटाबंदीमुळे अनेकांचे हाल होऊनही देशातील जनतेला त्याचा अभिमान व आनंद का वाटावा ह्याचे इतिहासाच्या आधारे मानसशास्त्रीय विश्लेषण करणारा लेख.
—————————————————————————–
नोटाबंदीमुळे किती काळा पैसा नष्ट झाला? किती खोटा पैसा नष्ट झाला? अतिरेक्यांना मिळणारा पैसा किती बंद झाला? याबद्दल मोदीसमर्थक आणि मोदीविरोधकयांच्यात नक्कीच मतभेद आहेत. पण भारतातल्या जनतेला, निदान पन्नास दिवस तरी, हाल भोगावे लागले याबद्दल कोणाचेच दुमत नाही, अगदी मोदींचे स्वतःचेसुद्धा दुमत नाही. या काळात गरिबांचे रोजगार बुडाले, किराणा घ्यायला पैसे नाहीत म्हणून उपासमार झाली, अंगणवाडीत मुलांना खायला मिळाले नाही, बियाणे घ्यायला पैसे नाहीत म्हणून पेरणी करता आली नाही, बॅकांच्या रांगेत उभे असताना जीव गेले, इत्यादी, इत्यादी.

पुढे वाचा