मे २०१४ मधील सत्तांतरानंतर सार्वजनिक चर्चाविश्वात जोमाने सुरू झालेल्या सहिष्णुता-असहिष्णुता, पुरोगामी-प्रतिगामी या वादांच्या पार्श्वभूमीवर डाव्या ’लिबरल्स’चं परखड मूल्यमापन करणारा लेख.
——————————————————————————–
‘ब्रेक्झिट’नंतर त्यावर टीका करणार्या टीकाकारांची जगभर लाटच पसरली आहे. ही टीका करण्यामध्ये सर्व रंगांच्या ‘लिबरल्स’चा समावेश आहे. ‘लिबरल्स’ याला ‘उदारमतवादी’ असा मराठी प्रतिशब्द आहे, आणि तो मी जाणूनबुजून वापरत नाही. याचे कारण उदारमतवाद या शब्दातच विचारांचे औदार्य व दुसर्याचे विचार जाणून घेण्याची प्रवृत्ती अंगभूत आहे. परंतु आजच्या ‘लिबरल्स’ची स्थिती तशी नाही. त्यांनी स्वत:चे असे विचारविश्व तयार केले आहे व ते त्यांच्या दृष्टीने स्वयंघोषित सत्य असते.
मासिक संग्रह: ऑगस्ट, २०१६
सोशल मीडिया : एक विस्कटलेलं जग
मुलाखत : श्राबोंती बागची
——————————————————————————–
रामचंद्र गुहा यांची ’सोशल मीडिया’ या विषयाला धरून घेतलेली मे २०१६ मध्ये factordaily.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली मुलाखत सोशल मीडियाआणि विचारभिन्नता या विषयासंदर्भात महत्त्वाची आहे. मूळ इंग्रजीमधील मुलाखतीचा हा संपादित अनुवाद.
——————————————————————————–
प्रश्न– इतिहासाचे विकृतीकरण करणे, ऐतिहासिक गोष्टींचा विपर्यास करणे आणि सोयीस्करपणे इतिहासाकडे बघणे या सध्या घडत असलेल्या गोष्टींसाठी सोशल मीडिया कारणीभूत आहे का?
उत्तर- सोशल मीडियावरील भारतीय तरुण इतिहासाकडे काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांचे राजकारण असल्यासारखे बघत आहेत. प्रामाणिकपणे सांगायचे तर यासाठी सर्वप्रथम काँग्रेस दोषी आहे कारण राजीव-सोनिया-राहुल यांच्या काँग्रेसने आधुनिक भारतीय इतिहासाचे जे चित्र उभे केले आहे त्यातील महात्मा गांधी वगळता इतर सर्व महनीय व्यक्ती या एकाच कुटुंबातील आहेत.