मासिक संग्रह: जून, २०१६

वात्सल्याचे तपशील

एकदा पाणभिजला ऋतु येऊन गेला म्हणजे
शिवारावर श्वासांची लागवड सुरू होते
पाखरे
ओठांच्या काठांवर झाडांची हिरवी पाने ठेवतात
पाखरांकडून
खुलेपणाने
कोरसपमध्ये
सूर्याचे गाणे गायिले जाते
सगळा आसमंत गणगोत होऊन
माणसांच्या भेटीला येतो
वासरांच्या वात्सल्याचे तपशील
गायींच्या डोळ्यांत; डोळाभर झालेले असतात
एवढेच
शील :
झाडांचे, शिवारांचे, पाखरांचे.

साक्षात्कारांमागील वैज्ञानिक सत्य (भाग १)

कोट्यावधी माणसे शेकडो वर्षांपासून देवाची उपासना, तसेच विविध प्रकारची आध्यात्मिक साधना करीत आले आहेत व त्यातून त्यांना ‘बरे वाटते’ असा दावा करीत आली आहेत. ही अनुभूती, तसेच साक्षात्कार ह्या संकल्पनेमागील वैज्ञानिक सत्य प्रतिपादन करणारा हा लेख तुमच्या विचारांना चालना देईल.
——————————————————————————–
मी स्वतःवर केलेल्या प्रयोगातून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. ती म्हणजे, एखाद्या कल्पनेवर, किंवा विचारावर आपण सातत्याने, मनापासून, गंभीरपणे दिवसेंदिवस लक्ष केंद्रित केले, त्याचेच ध्यान केले, तर ज्याला आध्यात्मिक भाषेत साक्षात्कार म्हणतात तसा अनुभव काही व्यक्तींना येऊ शकतो. हा साक्षात्कार कोणता आणि कसा असावा हे त्या व्यक्तीची जडणघडण, तिच्यावर झालेले संस्कार, संगोपन, अध्यापन आणि प्रामुख्याने त्यावेळची सामाजिक परिस्थिती, अशा अनेक बाबींवर अवलंबून असते.

पुढे वाचा

अनुभव- लाल सवाल

नक्षलवाद, विकास, हिंसा-अहिंसा
—————————————————————————-
छत्तीसगढमध्ये फिरताना तेथील आदिवासी जीवनाचे दाहक दर्शन लेखकाला झाले. ते जगणे आपल्यासमोर मांडताना हिंसा-अहिंसा, विकास-विस्थापन ह्यांविषयी आपल्या सुरक्षित मध्यमवर्गीय दृष्टीने पाहणे किती अपूर्ण व अन्यायकारी आहे ह्याचे भान जागविणारा व तत्त्वज्ञानाच्या व विचारधारांच्या प्रश्नावर होय- नाहीच्या मधला व्यापक पण अंधुक अवकाश दाखविणारा हा अनुभव.
—————————————————————————-
हा प्रदेश आपल्या ओळखीचा नाही. हे रस्ते, दोन्ही बाजूचं जंगल, मधूनच विरळ जंगलात जमिनीवरचं काही वेचणारे लोक, रस्त्यालगतची ही लाल ‘शहीद स्मारकं’, गस्त घालणारे जवान आणि इथल्या वातावरणात जाणवणारा ताण– हे सगळं आपल्याला नवीन आहे.

पुढे वाचा

‘हाजी अली सर्वांसाठी’: एक अनावृत्त पत्र

स्त्रीहक्क, हाजी अली, सुफी पंथ

दि. १३ मे २०१६
प्रति,
विश्वस्त,
हाजी अली दर्गा विश्वस्त मंडळ,
वरळी, मुंबई

हाजी अली दर्ग्याच्या विश्वस्तांनी ह्या प्रश्नांना उत्तरे दिलीच पाहिजेत.

महोदय,
सर्वांना आमचा सलाम व शुभेच्छा.
‘हाजी अली सब के लिये’ ह्या आमच्या गटाच्या प्रतिनिधींनी विश्वस्तमंडळ सदस्यांना भेटून हाजी अली साहेबांच्या दर्ग्यात प्रवेश करून त्यांना मजार पर्यंत जाण्याचा स्त्रियांनाही पुरुषांइतकाच हक्क असला पाहिजे ह्या मुद्द्यावर चर्चा करून त्यावर सर्वमान्य तोडगा काढण्याचा खूप प्रयत्न केला आहे. आमच्या गटाचे सदस्य नसलेले काही शुभेच्छुक मुस्लिमही विश्वस्तांच्या संपर्कात असून त्यांच्याबरोबर बैठक घेण्याची आमची विनंती त्यांनाही मान्य आहे.

पुढे वाचा

मूठभर माती

शालेय विज्ञान, आयआयटी, उच्च शिक्षण
—————————————————————————–
आयआयटी म्हणजे अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपन्यांना तंत्रज्ञ-व्यवस्थापक पुरविणाऱ्या शिक्षणसंस्था हे गृहितक तितकेसे बरोबर नाही. आयआयटीच्या खुल्या वातावरणातून स्वतंत्र विचार करण्यास शिकलेल्या व गरीब वंचित मुलांना विज्ञान शिकविण्यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या एका सच्च्या वैज्ञानिकाची जडणघडण व कार्य उलगडून दाखविणारे हे प्रांजळ आत्मकथन …
—————————————————————————–

“आणि कुठेतरी असे अभियंते आहेत,
जे इतरांना ध्वनीहून अधिक वेगाने उडायला मदत करतात.
पण जमिनीवर राहणे भाग असणाऱ्यांना साह्य करणारे
अभियंते कुठे आहेत?”
(ऑक्सफॅम संस्थेचे एक पोस्टर)

माझे आईवडील कधी शाळेत गेले नाहीत.

पुढे वाचा

जनुकांतरित (जीएमओ) पिकांच्या विरोधात युरोपातील जनमत

बियाणे, जनुकबदल, बीटी, यूरोप, मोन्टॅन्सो
——————————————————————————–
जनुकीय संस्कारित पिके म्हणजे तंत्रज्ञानाचे पुढचे पाऊल. त्याला विरोध म्हणजे विज्ञान-तंत्रज्ञान –विकास ह्या सर्वाना विरोध, असे अनेक माध्यमांतून वारंवार सांगितले जाते. युरोपमधील ग्राहक, शेतकरी व शास्त्रज्ञ मात्र प्राणपणाने ह्या तंत्रज्ञानाला विरोध करीत आहेत. त्या विरोधाची मीमांसा करणारा हा लेख मोन्सॅन्टोसाठी महाप्रचंड ‘सीड हब’ उभारण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नक्कीच महत्त्वाचा आहे.
——————————————————————————–

युरोपातील व त्यातही पश्चिम युरोपातील देशांमध्ये राहणाऱ्या बहुसंख्य लोकांचे मत जनुकीय संस्कारित पिकांच्या लागवडीच्या व अशा पिकांपासून निर्मिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या सेवनाच्या विरोधात आहे.

पुढे वाचा

धर्म: परंपरा आणि परिवर्तन (भाग २)

ख्रिश्चन धर्म, रोमन कॅथॉलिक, पोप फ्रान्सिस
—————————————————————————-
प्रत्येक धर्मातील परंपरा व परिवर्तन ह्यांच्यातील संघर्षाचा वेध घेणाऱ्या लेखमालेतील कॅथॉलिक पंथातील ह्या प्रक्रियेचे चित्रण करणारा व त्यातील पोप फ्रान्सिस ह्यांचे कर्तृत्व अधोरेखित करणारा हा लेख..
—————————————————————————–

हिंदू धर्माच्या मोकळ्याढाकळ्या रचनेमुळे, अनेकेश्वरी उपासनापद्धतींमुळे व सर्वसमावेशक लवचिकतेमुळे त्यात परंपरा आणि परिवर्तन ह्यांमधला लढा दीर्घकाळ चालत राहू शकला. इंग्रजी राजवट आल्यावर येथील सामाजिक-राजकीय -आर्थिक संरचनांना मुळापासून हादरे बसले व त्यातूनच हिंदू धर्मीयांनी आपल्या धर्माच्या चिकित्सेला प्रारंभ केला. भक्तिसंप्रदायाचा वारसा मानणारे गांधी-विनोबा-साने गुरुजी, अन्य पुरोगामी परंपरांतून आलेल्या अरविंद –विवेकानंद-कृष्णमूर्ती प्रभृतींनी हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाची व आचाराची पुनर्मांडणी केली.

पुढे वाचा

प्रतिसाद

( 1)
मे 2016 च्या संपादकीयात आपण वाचकांच्या संवादहीनतेबद्दल चिंता प्रकट केली आहे, ती शंका रास्त असली तरी तिला दुसरी बाजूही आहे. कोणत्याही नियतकालिकाचा वाचक हा त्या नियकालिकाचा फक्त शिष्य असावा/व्हावा, त्याचे (वाचकाचे) मित्रत्व मान्य होणार नाही, ही विचारधारा बहुतेक नियतकालिक चालकांची असते. शिष्यत्व म्हणजे जुन्या परिभाषेत एक पायरी खाली व मित्रत्व म्हणजे समपायरीवरील, असा हा प्रकार आहे. काही वाचकांना, किंबहुना बहुतेक वाचकांना शिष्यत्व मान्य नसून ते मित्रत्वाची अपेक्षा करतात, परंतु त्यांची ती अपेक्षा म्हणजे नियकालिकाच्या ध्येय धोरणाला, विचारधारेला विरोध अशी भावना संचालकांच्या मनात सुप्तरूपाने का होईना अवतरित झालेली असते.

पुढे वाचा