मासिक संग्रह: एप्रिल, २०१६

दुखऱ्या मूळांपर्यंत

सकाळ झालीय
फुलझाडांच्या झुंजूमुंजू उजेडात एक
हिंस्र जनावर काठीने
फुलांवर हल्ले करीत आहे.

बघता बघता
सगळ्या झाडांचे विविध आविष्कार
परडीत जमा होतील आणि
जनावर देवपूजेला बसेल तेव्हा
इथल्या झाडांना
फुलेच येत नाहीत अशी वदंता
झाडांच्या
दुखऱ्या मूळांपर्यंत पोहचली असेल
***

अकल्पित, गजबंधन सोसायटी
सी के पी हॉलसमोर, राम गणेश गडकरी पथ

अनुभव: कलमा

आंतरधर्मीय विवाह, मानवी नातेसंबंध, कलमा
________________________________________________________
मुस्लीम मुलगा व ख्रिश्चन मुलगी ह्यांचा विवाह, तोही आजच्या ३५ वर्षांपूर्वी.सुनबाई तर हवीशी आहे, पण तिचा धर्म न बदलता तिला स्वीकारले, तर लोक काय म्हणतील ह्या पेचात सापडलेले सासरे व प्रेमाने माने जिंकण्यावर विश्वास असणारी सून ह्यांच्या नात्याची हृद्य कहाणी, मुलाच्या दृष्टीकोनातून —
________________________________________________________
आमच्या लग्नाला कोणाचा विरोध नव्हता. आशाबद्दल तक्रार नव्हती. आमचे वडील तिच्या गुणांचे कौतुक करायचे. परंतु तिने मुसलमान व्हावे एवढीच त्यांची अट होती. आम्ही एकमेकाला व्यक्ती म्हणून पसंत केले होते. धर्मांतराचा विषयच नव्हता.

पुढे वाचा

माहितीपट -परीक्षण अ पिंच ऑफ स्किन: ती बोलते तेव्हा

अ पिंच ऑफ स्किन, प्रिया गोस्वामी, शिश्निकाविच्छेदन
—————————————————————————–
भारतातील एका संपन्न, सुशिक्षित समाजात कित्येक पिढ्या चालत असलेल्या एका रानटी, स्त्री-विरोधी प्रथेबद्दल असणारे मौन तोडून अस्वस्थ करणारे अनेक प्रश्न सामोरे आणणाऱ्या माहितीपटाचा एका संवेदनशील तरुण मनाने घेतलेला वेध
———————————————————————-
“मी सहा वर्षांची होते. अम्मी म्हणाली – तुला वाढदिवसालाबोलावलंय. मी छान कपडे घातले, केस विंचरले. अम्मीसोबत निघाले. पण जिथे गेलेतिथे ना फुगे होते ना केक. मला एका अंधाऱ्या खोलीत नेलं. तिथे एक बाईहोत्या. मला कपडे काढायला लावले. त्या बाईंच्या हाती ब्लेड होतं. मला काहीकळायच्या आत दोन पायांमधल्या जागी त्यांनी कापलं.

पुढे वाचा

सुरांचा धर्म (१)

भारतीय संगीतपरंपरा, सूफी, हिंदू-मुस्लीम संबंध
—————————————————————————–
धार्मिक उन्मादाच्या आजच्या वातावरणात भारताची ‘गंगा-जमनी’ संस्कृती, सर्व धर्मियांचा सामायिक वारसा म्हणजे काय हे नीट उलगडून दाखविणारा हा लेख. भारतीय संगीताला मुस्लीम संगीतकारांनी व राज्यकर्त्यांनी नेमके काय योगदान दिले व सूफी परंपरेने भक्ती संप्रदायाशी नाते जोडीत कर्मठ धर्मपरंपरेविरुद्ध कसे बंड पुकारले हा इतिहास विषद करणाऱ्या लेखाचा हा पूर्वार्ध –
—————————————————————————–

गुजरातमधल्या हिंसाचाराच्या गोंधळात एका गोष्टीकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नाही. बडोद्यात मुस्लिमविरोधी हिंसाचारादरम्यान उस्ताद फैयाज खानांच्याकबरीची मोडतोड झाली. अहमदाबादेत अनेक दंगे या धर्मपिसाटांनीभुईसपाट केले. त्यापूर्वी अनेक वर्षांपासून कधी गुलामअलीच्या गाण्याच्या कार्यक्रमात गोंधळ, मेंहदी हसनला कार्यक्रम करण्यापासून रोखणे असे अनेक प्रकार झाले.

पुढे वाचा

धर्म: परंपरा आणि परिवर्तन (भाग १)

धर्म, मूलतत्त्ववाद, जागतिकीकरण
प्रत्येक धर्मात गेली अनेक शतके कट्टरपंथी वि. सुधारणावादी हा संघर्ष सुरु आहे. हा संघर्ष समजावून घेणे हे आपला भूतकाळाचा अन्वयार्थ लावण्यासाठी, वर्तमानातील कृती ठरविण्यासाठी, तसेच भविष्याचा वेध घेण्यासाठी आवश्यक आहे. हिंदू, ख्रिश्चन व मुस्लीम धर्मात ह्या संघर्षाचे स्वरूप कसकसे बदलत गेले, ह्याचा मागोवा घेणाऱ्या लेखमालेचा हा पहिला भाग
—————————————————————————–
मानवी इतिहासात विसाव्या शतकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गेल्या अनेक शतकांपासून साठलेल्या असंख्य उच्चारित-अनुच्चारित प्रश्नांची उत्तरे ह्या शतकाने शोधली. विज्ञान-तंत्रज्ञानातील अद्भुत प्रगतीमुळे रोगराई व अभावग्रस्ततेच्या प्रश्नांची उकल होऊन मानवी आयुष्य विलक्षण सोयी-सुविधा व संपन्नता ह्यांनी गजबजून गेले.

पुढे वाचा

आपण विद्यापीठे घडवतो, विश्वविद्यालये नाही!

जे एन यु, उच्च शिक्षण, विचारस्वातंत्र्य
—————————————————————————–
प्रचंड राजकीय मरगळ असण्याच्या ह्या काळात एखादा कन्हैया कुमार कसा तयार होतो, ह्याचा माग घेतल्यास आपण थेट जेएनयुच्या प्रपाती, घुसळणशील वातावरणापर्यंत जाऊन पोहचतो. तिथल्यासारखे विद्रोही, प्रश्न विचारण्यास शिकविणारे वातावरण उच्च शिक्षणाच्या सर्वच केंद्रांत असणे का आवश्यक आहे, हे सांगणारा हा लेख.
—————————————————————————–
“रस्त्याने चालताना किंवा बागेतल्या बाकांवर बसून जर दोन माणसे वाद घालत असतील तर त्यांपैकी विद्यार्थी कोण, डॉन (= प्राध्यापक) कोण, हे ओळखणे सोपे आहे. जास्त आक्रमक तो विद्यार्थी आणि पडेल, मवाळ तो डॉन.”

पुढे वाचा

गोष्ट विचारांच्या प्रवासाची

माहिती जनुके, सेल्फिश जीन , रिचर्ड डॉकिन्स, इन्टरनेट
—————————————————————————–
सामाजिक माध्यमांद्वारे कसलाही आधार नसलेले समाजविघातक विचार कसे वेगाने पसरविले जात आहेत, हे आपण अनुभवीत आहोत. त्यामागील शास्त्रीय कारणपरंपरा उलगडून दाखविणारा हा उद्बोधक लेख
—————————————————————————–

अलिकडच्या काळात लोक इंटरनेटचा वापर  प्रामुख्याने आपले राजकीय अथवा धार्मिक विचार पसरविण्यासाठी करतात असे दिसून येते आहे. अशा विचारांची बीजे memes या नावाने ओळखली जातात. त्याला मराठीत माहिती जनुके असे म्हणूया. हे विचार कसे पसरतात ती प्रक्रिया समजावून देण्याचा प्रयत्न मी ह्या लेखातून केला आहे.

माहिती जनुकांची संकल्पना ही सर्वप्रथम प्रसिद्ध उत्क्रांतिवादी जीवशास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स ह्यांनी त्यांच्या सेल्फिश जी  ह्या प्रसिद्ध पुस्तकातील शेवटच्या प्रकरणात मांडलीविज्ञानविश्वात प्रभावी ठरलेल्या पुस्तकांच्या यादीत त्याचा अनेकदा उल्लेख होतो.

पुढे वाचा

ऱ्होड्सचे पतन होताना

ऱ्होड्स, इतिहासाचे पुनर्लेखन, द. आफ्रिका , वर्णद्वेष
—————————————————————————–

राष्ट्रवाद ही सतत प्रगमनशील संकल्पना आहे. प्रत्येक राष्ट्राच्या, राष्ट्रवादाचे कल्पनाविश्व वेगवेगळे असते व प्रत्येक राष्ट्रामध्ये यासंदर्भात स्थित्यंतरेही  होत असतात. इतिहासाच्या पुनर्लेखनाच्या काळात एकेकाळी आदरस्थानी असणाऱ्या पण आता व्यापक समुदायाच्या रागद्वेषाचे लक्ष्य बनलेल्या प्रतीकांचे काय करायचे? ह्या प्रश्नाकडे डोळसपणे बघायला शिकविणारा हा लेख ..

—————————————————————————–

अद्भुतरम्य इतिहास

19 वे आणि 20 वे शतक राजकीय नेत्यांच्या आणि महापुरुषांच्या (Heroes) पुतळ्यांच्या उभारणीचा सुवर्णकाळ म्हटला पाहिजे. विशेषत: 19 व्या शतकात उदयास आलेल्या अद्भुतरम्य (Romanticist)  इतिहासलेखन-परंपरेमुळे या प्रक्रियेला गती मिळाली.

पुढे वाचा

संपादकीय

आज देशभरात सर्वच प्रश्नांवर ध्रुवीकरणाची भूमिका घेतली जाते आहे असे आपल्याला दिसते. तुम्ही एकतर देशप्रेमी आहात किंवा देशद्रोही (देशप्रेमाची व्याख्या आम्ही करू ती!) त्याविरोधात जे आवाज उठत आहेत तेही बव्हंशी प्रतिक्रियेच्या स्वरूपाचे आहेत, किंवा तेही वेगळ्या अर्थाने ध्रुवीकरणाचीच कास धरणारे आहेत. त्यामुळे भारतात एकतर हिंदुराष्ट्राचे समर्थक आहेत किंवा आंबेडकरवाद व मार्क्सवादाच्या समन्वयाचे समर्थक, असे चित्र माध्यमांतून उभे केले जात आहे. मुळात ह्या दोन्ही विचारधारांच्या मध्ये भलाथोरला वैचारिक पैस आहे व भारतातील बहुसंख्य जनता त्या जागेवर उभी आहे. भारतातील आजच्या वैचारिक संघर्षात ह्या ‘सुटलेल्या’ मधल्या जागेला योग्य स्थान मिळावे, असा आमचा प्रयत्न राहील.

पुढे वाचा