‘आसु’मधील दिवाकर मोहनी ह्यांचा ‘आमच्या देशाची स्थिती’ हा लेख वाचला. आमचे स्नेही प्रमोद सहस्रबुद्धे यांनी या लेखावर मोकळेपणाने चर्चा व्हावी आणि त्याबद्दलची प्रतिक्रिया पाठवावी असे आवाहन केले होते. अनेकवेळेला हा विषय वैचारिक चर्चेपेक्षा भावनिक अंगाने अधिक मांडला जातो म्हणून सर्वप्रथम श्री. मोहनी ह्यांनी केलेल्या ‘वैचारिक विवेचनाचे’मन:पूर्वक स्वागत. मी दोन टप्यांमध्ये या लेखावर प्रतिक्रिया देऊ इच्छितो. पहिल्या टप्प्यात लेखातील काही मुद्द्यांवर माझे मत आणि दुसऱ्या टप्प्यात सद्यःपरिस्थितीतील व्यवहारातील अनुभव.
जातीच्या उतरंडीवरून असे लक्षात येते की उच्चवर्णीयांनी – शूद्रातिशूद्रांवर जसे अन्याय केले आहेत, तसेच या सर्वांनी मिळून स्त्रियांवर अन्याय केले आहेत, अजून करत आहेत.