“स्वातंत्र्य म्हणजे काय? ते इतके मोलाचे का वाटते? स्वातंत्र्याची ओढ मानवी स्वभावांत उपजतच आहे, कीं विशेष परिस्थितीमुळे घडणारा तो एक संस्कार आहे? स्वातंत्र्य हे अंतिम साध्य आहे कीं दुसरे काही संपादन करण्याचे ते एक साधन आहे – स्वातंत्र्याबरोबरच काही जबाबदाऱ्या अपरिहार्य ठरतात काय? आणि अधिक स्वास्थ्य मिळविण्यासाठी एकादा समाजचा समाज स्वातंत्र्यावर पाणी सोडायला सहज राजी व्हावा इतक्या त्या जबाबदाऱ्या अवजड असतात काय? स्वातंत्र्यसंपादन आणि स्वातंत्र्यरक्षण यासाठी करावयाचे प्रयत्न टाळण्याकडे बहुसंख्य माणसांचा कल सहज व्हावा, इतके स्वातंत्र्यासाठी झगडणे हे सायासाचे असते काय – अन्न, वस्त्र, निवारा अथवा चैनही, यांचे म्हणजेच चरितार्थाच्या हमीचे जितके महत्व वाटते तितकेच स्वातंत्र्याचे आणि त्याच्या अनुषंगाने लाभणाऱ्या गोष्टींचे महत्त्व वाटते काय ?….
मासिक संग्रह: सप्टेंबर, २०१५
आमच्या देशाची स्थिती
असा सार्वत्रिक समज आहे की, आपल्या देशातल्या ब्राह्मणांनी अन्य जातीयांना शिक्षणापासून वंचित ठेवले. आणि हे कार्य त्यांनी हेतुपुरस्सर केले ते अशासाठी, की त्यांना (ब्राह्मणांना) समाजातील विषमता कायम ठेवायची होती, आणि त्यायोगे त्यांना अन्य जातीयांचे शोषण करायचे होते. उच्चवर्णीयांवरचा हा आरोप कितपत खरा आहे, हे तटस्थपणे तपासण्यासाठी आपल्याला आपल्या देशाची तत्कालीन स्थिती समजून घ्यावी लागेल व अंदाजे दोनशे वर्षे मागे जावे लागेल. इंग्रजांचे राज्य भारतात येण्यापूर्वीची समाजस्थिती आपल्याला तपासावी लागेल. प्रतिपादनाच्या सोयीसाठी काही जुन्या, स्त्री-शूद्र अशा संज्ञांचा वापर करण्याची देखील गरज पडेल.
निधर्मीपणा – धर्मनिरपेक्षता – सर्वधर्मसमभाव – इहवाद (पूर्वार्ध)
आज काल सेक्युलॅरिझम व सेक्युलर बद्दल बरेच बोलले जाते. जेष्ठांच्या बैठकित यावर चर्चा होणे स्वाभाविक होते. ज्याना जशी माहिती तशी त्यानी सांगितली. यांतून कांही गोष्टी जाणवल्या त्या अशा.
• सेक्युलर हा भारतीय शब्द नसून पाश्चात्य देशाकडून आपल्याकडे आला आहे. व हा शब्द जीवनशैली बरोबरच राज्यशासन व्यवस्थेशी जोडला गेला आहे.
• या शब्दाला बरेच अर्थ आहेत जसे इहवाद येथपासून ते कांही सामाजिक तुष्टीकरणा बरोबर याच संबंध जोडला जातो.
• पाश्चात्य व भारतीय विचारसरणी सेक्युलरबाबत भिन्न आहे. पण आपल्याला भारतीय संविधानाने यासाठी मान्य केलेला सर्वधर्मसमभाव हा शब्दच मान्य करावा लागतो.
मेंदू प्रदूषण….
“दूषित करणे” म्हणजे बिघडविणे, वापरण्यास अयोग्य बनविणे. “प्र” उपसर्ग प्रकर्ष, आधिक्य (अधिक प्रमाण) दर्शवितो. यावरून प्रदूषण म्हणजे मोठ्या प्रमाणात बिघडविण्याची क्रिया. जलप्रदूषण, वायुप्रदूषण, नदीप्रदूषण, भूमीप्रदूषण इत्यादि शब्द सुपरिचित आहेत.”मेंदुप्रदूषण” हा शब्द तसा प्रचलित झालेला नाही. पण त्याचा अर्थ स्वयंस्पष्ट आहे. इंग्रजीत ब्रेन वॉशिंग असा शब्द आहे. त्याचे मराठीकरण मेंदूची धुलाई असे करतात. परंतु धुतल्यामुळे वस्तू स्वच्छ होते. तो अर्थ इथे अभिप्रत नाही. मेंदुप्रदूषण हा शब्द मला अधिक समर्पक वाटतो. तुम्ही म्हणाल हे मेंदुप्रदूषण करणारे कोण ? ते कोणाच्या मेंदूचे प्रदूषण करतात ?
सूफी परंपरा
वर्तमान काळात धार्मिक समूहभानाचा उपयोग राजकीय उद्देश साध्य करण्यासाठी केला जात आहे. मग मुद्दा दहशतवादी हिंसेचा असो वा संकीर्ण राष्ट्रवादाचा, जगाच्या सर्व भागांमध्ये धर्माच्या मुखवट्यांआडून राजकारण केले जाते. काही वर्षांपूर्वीपर्यंत धर्माला राजकारणापासून वेगळे करण्याच्या, ठेवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला जात होता. पण आता अगदी उलट झाले आहे. धर्म आणि राजकारणाची सरमिसळ वाढतच गेली. या संदर्भात दक्षिण आशियात फार गंभीर स्थिती आहे. एप्रिल 2015 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षांनी अजमेरच्या गरीब नवाझ ख्वाजा मोइनुद्दिन चिश्तीच्या दर्ग्यावर ठेवण्यासाठी चादर पाठविली. गेल्या 22 एप्रिलच्या वर्तमानपत्रांतील वृत्तानुसार सोनिया गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदींनीही दर्ग्यावर चादर चढविली आहे.
विकास साधू या विवेकानं!
विकास आज देशाच्या राजकारणात, अर्थकारणात, समाजकारणात विकास हा कळीचा मुद्दा बनला आहे. भरघोस बहुमतानं निवडून आल्यावर घेतलेल्या पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते: ‘सरकार विकासाचं जनांदोलन उभारेल.’ खूष झालो. विचार केला की, आधीच्या सरकारनं विपर्यास केलेल्या आमच्या पश्चिम घाट परिसरतज्ज्ञ गटाच्या शिफारशींना आता न्याय दिला जाईल, कारण हा अहवाल म्हणजे सर्व सह्यप्रदेशात विकासाचं जनांदोलन कसं उभारावं, याचा उत्तम आरखडा आहे. मात्र, जरी विकासाच्या जनांदोलनाबद्दल बोललं गेलं, तरी ते प्रत्यक्षात आणणं हे मर्यादित हितसंबंधांना जपण्यासाठी झटणाऱ्यांना बोचतं आणि म्हणून गेली साडेतीन वर्षं या अहवालाविरुद्ध आधी दडपादडपी आणि मग ‘आमच्या अहवालानुसार कोकणात एका विटेवर दुसरी वीटही ठेवता येणार नाही,’ अशा पठडीचा धादांत अपप्रचार यांचा गदारोळ चालला आहे.
‘शेती हटाव’ अभियान
‘कुठल्याही पद्धतीची शेती करणे हे आरोग्यास अतिशय घातक आहे. त्यामुळे असंख्य प्रकारचे शारीरिक व मानसिक विकार जडतात. कर्करोगापेक्षा कैकपटीने अधिक वेदना सहन कराव्या लागतात. अखेरीस प्राणास मुकावे लागते..’ सर्व प्रकारची सरकारे, सर्व जाती-धर्माचे, स्तरांतील लोकप्रतिनिधी आणि शाही नोकर हा (अवैधानिक) इशारा वर्षांनुवर्षे देत आले आहेत. या व्यसनामुळे वाढत जाणाऱ्या यातनांतून मुक्त होण्यासाठी कित्येकांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. 1995 ते 2014 या काळात महाराष्ट्रात 60,365 तर देशात 2,96,438 जणांनी हा मार्ग पत्करला. 2015 साल उगवल्यापासून राज्यात सुमारे 601 जण या वाटेने गेले आहेत.
इकॉलॉजी आणि इकॉनॉमी
(जवळजवळचे वाटणारे आणि असणारे इकॉलॉजी आणि इकॉनॉमी (इंग्रजी) हे शब्द परस्परांपासून दुरावल्याची ‘आपत्ती’ )
इकॉनॉमी हा शब्द दोन ग्रीक शब्दांपासून बनला आहे. eco म्हणजे घर, परिसर आणि nomy म्हणजे व्यवस्थापन. या पार्श्वभूमीवर पृथ्वीचे, निसर्गाचे ज्ञान म्हणजे इकॉलॉजी आणि निसर्गाचे व्यवस्थापनशास्त्र म्हणजे इकॉनॉमी. या दोन्ही शब्दांचे जवळचे नाते ग्रीक भाषेत सहजपणो मांडले गेले आहे.
इतकेच नाही तर भारतामध्ये दोन हजार वर्षांपूर्वी कौटिल्याने लिहिलेले अर्थशात्रही हेच सांगते. कौटिल्य म्हणतो, ‘अर्थशास्त्र म्हणजे भूमीचे किंवा पृथ्वीचे अर्जन, पालन आणि अभिवर्धन कसे करावे हे शिकविणारे शास्त्र’.
आंबेडकर नावाची एवढी भीती का?
आयआयटी मद्रासमधील ‘आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल’ला केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याकडून मिळालेल्या पत्रानंतर ‘आयआयटी-मद्रास’ने तडकाफडकी त्याची मान्यता काढून घेतली. शैक्षणिक आणि वैचारिक चळवळ चालवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासगटावर केंद्रसरकारने हस्तक्षेप करून अशा प्रकारची बंदी आणणं, हे सकस लोकशाहीचे संकेत नाहीत. आंबेडकरांच्या नावाने समरसतेचा घाट घालणाऱ्या सरकारची दुटप्पी भूमिकाच यातून उघड होत आहे.
आंबेडकर आणि पेरियार ही दोन नावं भारतीय जातसंस्थेच्या उच्चाटन चळवळीतील मोठी नावं. या देशातील व्यवस्थेने पावलोपावली नाकारल्यानंतरही त्या देशाला जगातील सर्वात मोठी लोकशाही बनवणारी राज्यघटना प्रदान करणारे बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतका द्रष्टा माणूस अन्य कोणी नाही.
नवे जग नवी तगमगः एक ज्ञानज्योत
कुमार शिराळकर यांनी त्यांच्या चाळीस वर्षांच्या राजकीय वाटचालीत वेळोवेळी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रश्नांबद्दल लिहिलेल्या निवडक लेखांचा संग्रह `मनोविकास प्रकाशना’ने `नवे जग, नवी तगमग’ या शिर्षकाखाली देखण्या स्वरूपात प्रकाशित केला आहे. शिवाय स्वत:बद्दलबढाईखोर सोडाच पण प्रसंगानुरूपसुध्दा न बोलणाऱ्या कुमार शिराळकर यांनी या संग्रहात स्वत:बद्दल दोन लेख लिहिले आहेत. त्यातून त्यांच्या एकंदरच जडण घडणीची कल्पना येते आणि त्यामुळे हा माणूस अधिकओळखीचा आणि आपला होत जातो. धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील जनतेने त्यांना `कुमारभाऊ’ ही दिलेली पदवी अधिकच सार्थ वाटू लागते. त्यातून जनतेशी असणारे त्यांचे जैव नाते प्रकर्षाने पुढे येते.