मला दंड द्या!

देशावर, समाजावर अशी घोर आपत्ती व पतन पाहून –
या कठिण संकटकाळातून सुटकेसाठी –
पुनः पुन्हा व आवश्यक चिंतन–मननानंतर-
मला एखादा विचार मार्ग पटला आहे.
पण
अशा विचारमार्गावर आचरणासाठी
माझे हातपाय गळत असतील
आणि
अशा विचारांनुसार जीवन जगण्यासाठी
मी प्रगतीशील व प्रयत्नशील नसेल;
तर
हे माझ्या देशा, माझ्या समाजा –
मला दंड द्या.
माझ्या नाकर्तेपणाचा धिक्कार करा भर चौकात.
हे मला जगवणाऱ्या माती;
माझ्या फुफ्फुसात भरलेली हवा;
माझे सिंचन करणारे जल;
ह्या कठिण काळातही
जगण्याच्या माझ्या तटस्थतेवर थुंका.
हे माझ्या मुक्त आकाशा, माझ्या विनम्र झाडांनो,
आणि धडधडून पेटलेल्या अग्नीशिखांनो;
माझ्या सोई-सुविधालोलूप दिशाहीनतेसाठी
मला दंड द्या.
फाशीहून कमी तर नक्कीच नाही.
माझ्या बनेल मौनासाठी मला दंड द्या.
माझ्या जिभेवर झालेल्या फोडांसाठी –
माझ्या प्रेतालाही दंड द्या.
आपल्या आठवणीत
मानवी जीवन व्यर्थ घालवणाऱ्या
माझ्या अळीसारख्या आणि पशुतुल्य जगण्याला
रात्रंदिवस चाबकाने फटके मारा.
आयुष्यभर.
(प्रेरणाः बाबुशा कोहली ह्यांची हिंदीतून अनुवादित केलेली व आजचा सुधारक नोह्वेंबर 2014 च्या अंकात प्रसिद्ध झालेली दंड ही कविता)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.