आपण एका राष्ट्राचे, समाजाचे, एका समूहाचे एक घटक या दृष्टीने स्वत:कडे पाहावे हा संस्कार आमच्या मनावर नाही. या दृष्टीने आम्ही स्वत:कडे पाहात नाही. एक स्वतंत्र, स्वयंपूर्ण व्यक्ती अशा दृष्टीने आपण स्वत:चा विचार करतो. आपली स्वत:ची उन्नती, परिणती, पूर्णता, मोक्ष ही गोष्ट सर्वस्वी समाजनिरपेक्ष आहे, अशी आमची बाल्यापासून वार्धक्यापर्यंत भावना असते व तद्नुसार आपले वर्तन असते.. आज शेकडो वर्षे आमच्या जीविताचे वळणच असे आहे; त्याची घडणच तशी झालेली आहे. आम्ही स्वकेंद्रित आहो. समाज हा आमच्या अवलोकनाचे केंद्र नाही. त्यामुळे समाज म्हणून जगण्याची विद्या आम्हांला हस्तगत करता येत नाही.
मासिक संग्रह: फेब्रुवारी, २०१५
मन केले ग्वाही (भाग ३)
पिठामिठाचे दिवस
एकोणीसशे पासष्ट-सहासष्टमध्ये अनेक भारतीय लोक एक सेक्युलर उपास करू लागले. तृणधान्यांची गरज आणि उत्पादन यांत साताठ टक्के तूट दिसत होती. पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनी सुचवले, की सर्वांनी जर आठवड्यात एक जेवण तृणधान्यरहित केले तर तृणधान्ये आयात करावी लागणार नाहीत. हे म्हणणे बहुतांश भारतीयांना पटले, आणि ‘शास्त्री सोमवारा’चे व्रत सुरू झाले. आजही अनेक जण करतात, म्हणे.
त्याकाळी, आणि अगदी १९८० पर्यंत भारतीय अन्नोत्पादनावर बराच जाहीर खल केला जात असे. टीका, त्रागा, विनोद, अनेक अंगांनी चर्चा होत असे; उदा. ‘पावसाळा बरा आहे.
‘त्यांच्या’ बायका, ‘त्यांची’ इभ्रत!
बायकांसंबंधीचे लेख सहसा 8 मार्चच्या निमित्ताने लिहिण्याची आपली प्रथा आहे. कारण त्या दिवशी (हल्लीच्या) भारतात बायकांचा बैलपोळा साजरा केला जातो. त्या दिवशी स्त्रियांच्या सक्षमीकरणाची, त्यांच्या आत्मनिर्भरतेची, त्यागाची, हक्कांची, मातृहृदयाची, जिद्दीची, समंजसपणाची इतकी चर्चा केली जाते की त्या उमाळ्यांनी आपले सामुदायिक सांस्कृतिक रांजण भरून वाहायला लागते. आपल्या एकंदर सार्वजनिक-सांस्कृतिक जीवनाचे उथळ व्यापारीकरण आणि माध्यमीकरण झाल्याने अलीकडे तर स्त्रियांना 8 मार्चचा दिवस म्हणजे ‘नको त्या जाहिराती आणि सवलती’ असे वाटले नाही तरच नवल! परंतु 8 मार्चचे हे उमाळे अजून एप्रिलही सरत नाही तोच पुरते आटून आता स्त्रियांचे सक्षमीकरण तर सोडाच, पण त्यांना सार्वजनिक जीवनातून देखील हद्दपार करण्याची तयारी आपण चालवली आहे आणि त्या हद्दपारीचे नाना परीने गौरवीकरणही घडते आहे.
स्त्रीच्या दुःखाचा शोध घेणाऱ्या समाजव्यवस्थेची मीमांसा
‘संदर्भासहित स्त्रीवाद’ हा सुमारे ५८० पृष्ठांचा बृहत् -ग्रंथ प्रकाशित होणे ही एक अत्यंत स्वागतार्ह घटना आहे. हा ग्रंथ ‘विद्या बाळ कार्यगौरव ग्रंथ’ आहे आणि याची आखणी, यात समाविष्ट लेखांची मौलिकता आणि दर्जा, याने कवेत घेतलेले चर्चाविश्व यासाठी प्रथम या ग्रंथाच्या संपादकत्रयींचे मन:पूर्वक अभिनंदन केले पाहिजे. ‘मिळून साऱ्याजणी’च्या संस्थापक आणि स्त्रीप्रश्नांचा सार्वत्रिक वेध घेत चळवळीला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सर्वदूर घेऊन जात व्यापक दिशा देणाऱ्या विद्याताईंच्या कार्याचा हा नुसता गौरवच नाही, तर स्त्रीप्रश्नांची सर्वागीण मांडणी, त्यासंबंधी सुरू असणारे अनेक पातळ्यांवरील काम यासंबंधीची माहिती यांचे तपशीलवार दस्तावेजीकरण या ग्रंथात झालेले असल्यामुळे एखाद्या मूल्यवान संदर्भग्रंथाचे स्वरूप या ग्रंथाला प्राप्त झालेले आहे.
`हैदर’ आणि `डॉ. प्रकाश बाबा आमटे’
सुप्रसिध्द दिग्दर्शक विशाल भारव्दाज यांचा `हैदर’ आणि `समृद्धी’ पोरे यांचा `डॉ. प्रकाश बाबा आमटे’ हे चित्रपट आपल्या समाजापुढील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पुढे आणतात. जरी या चित्रपटांचा हेतू वेगळा असला तरी या चित्रपटांतून या विषयांची मांडणी अतिशय समर्थपणे पुढे येते. एक विषय काश्मीरमधील दहशतवादाचा, जो हैदरमध्ये हाताळला आहे. तर दुसरा नक्षलवादाचा, जो डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात हाताळला आहे. वर म्हटल्याप्रमाणे हे विषय या चित्रपटांचे मूळ विषय नाहीत. पण चित्रपटाच्या मुख्य विषयांच्या अनुषंगाने हे विषय अपरिहार्यपणे या चित्रपटात दाखल झाले आहेत आणि या प्रश्नांमुळेच या चित्रपटांना गांभीर्य आणि खोली प्राप्त झालेली आहे.
प्रश्न शिक्षणाच्या गुणवत्तेचा!
शालेय शिक्षणाची गुणवत्ता म्हणजे नेमके काय या बाबत बरीच मतमतांतरे असली तरी, सध्या ती फारशी बरी नाही, याबाबत तज्ज्ञ आणि सामान्य या दोघांतही एकवाक्यता असल्याचे दिसते. गेल्या काही दशकांत राज्यातली शाळांची यंत्रणा फार वेगाने विस्तारली आहे. काही अतिदुर्गम भागांचा अपवाद वगळला तर जवळ शाळा नाही म्हणून शिक्षण मिळत नाही अशी स्थिती नक्कीच नाही. ग्रामीण भागात शिक्षक आणि विद्यार्थी यांचे गुणोत्तरही बऱ्याच वेळा एका शिक्षकामागे तीस पस्तीस मुले, म्हणजे आदर्श म्हणावे, असे असते. एकूणच शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आपण बरीच मजल मारली आहे.
भोंदू ‘भगवान’, भोळे भक्त!
‘त्यांच्या’ चेहऱ्यावर एक निरागस बाल्य विलसत असते. डोळ्यांत मायेचा अपार सागर दडलेला दिसतो. त्यांनी हात उचलताच तेजस्वी प्रकाशकिरणांनी आसमंत उजळून निघाल्याचा भास होतो आणि त्यांच्या हास्यातून प्रेमाचे झरे ओसंडू लागतात. तोच विश्वाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारक आहे असे भासू लागते. त्याच्या चमत्कारांनी असंख्य आजार बरे होतात, त्याच्या कृपाप्रसादाने निपुत्रिकांना संतानप्राप्ती होते, निर्धनांना धनलाभ होतो. भौतिक समस्यांचे सारे डोंगर भुईसपाट होतात. त्याच्या दैवी शक्तीचा सर्वत्र बोलबाला सुरू होतो आणि संसारतापाने पोळलेल्यांची त्यांच्या दारी मुक्तीसाठी रीघ लागते. त्यांचा एक कृपाकटाक्ष व्हावा, यासाठी ताटकळण्याचीही त्यांची तयारी असते.
पुरुष: एक वाट चुकलेला मित्र
स्त्री मुक्ती चळवळ, स्त्रीवाद याकडे सुजाण पुरुष नेहमीच आपुलकीनं आणि मैत्रीपूर्ण नजरेनं पाहात आला आहे. पण असं मी म्हणालो, की माझ्या स्त्रीवादी मैत्रिणी म्हणतात ”आहे कोठे तो सुजाण पुरुष?”
हा काय तुमच्या समोर उभा आहे, असं गंमतीत त्यांना सांगावसं वाटतं. पण त्यांचा हा प्रश्न हसण्यावारी नेण्यासारखा नाही, त्यामागे त्याचं अनुभवसिद्ध निरीक्षण आहे याची मला जाणीव आहे. सुजाण पुरुषांची संख्या अजाण पुरुषाच्या तुलनेनं कमी आहे हे त्यांना यातून सुचवायचं होतं हे उघड आहे. आणि त्याचं निरीक्षण चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही.
सांस्कृतिक राष्ट्रवादाची दुधारी तलवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर आहेत. इतक्या उंच, की त्यांच्या जवळपासदेखील आज कोणताही भारतीय नेता नाही आणि यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कमालीचा आत्मविश्वास, जनतेशी थेट संवाद साधण्याचे कौशल्य आणि लोकांमध्ये आश्वासकता जागवण्याचे सामथ्र्य या गोष्टी लोकप्रियतेचा पाया आहेत. या अफाट लोकप्रियतेमध्ये प्रचंड आशादायी घडण्याची क्षमता अर्थातच आहे; पण या लोकप्रियतेचा एक तोटादेखील आहे. तो असा की, माध्यमे पंतप्रधानांकडून घडणाऱ्या चुकांबाबत अतिउदार वागू शकतात. विशेषत: या चुका उघड उघड राजकीय स्वरूपाच्या नसतील, तर ही शक्यता जास्तच असते. अलीकडेच असे एक उदाहरण महाराष्ट्रात घडले.
भारतातलं राजकारण पाकिस्तानच्या दिशेनं?
गणपती गेले. आता देव्या येतील.
गणपती आले होते तेव्हां प्रत्येक गणपती मंडळाच्या बाहेर राजकीय पक्षांचे फलक होते. गणेश भक्तांचं स्वागत करणारे. बहुतेक फलकांवर त्या त्या पक्षाच्या गल्लीनिहाय पुढाऱ्यांचे फोटो होते. गणपतीचं विसर्जन झालं तेव्हां गणपतींना निरोप देणारे फलक लागले.
नवरात्रात असे किती फलक लागतात ते पहावं लागेल. कारण नवरात्र असेल तेव्हां महाराष्ट्रात निवडणुका असल्यानं आचार संहिता असेल. फलकांवर झालेला खर्च उमेदवाराच्या खर्चात सामिल होईल.
गणपती उत्सव सुरू झाला तोच मुळी राजकीय कारणांसाठी. टिळकाना जनजागृती करायची होती. स्वातंत्र्यासाठी. टिळकांच्या काळात उत्सवाचा खर्च कमी असे.