आपल्या नोव्हेंबर २०१४ च्या अंकात अरुण फाळके ह्यांचे पत्र प्रकाशित झाले आहे. त्यांचे पत्र वाचून असे वाटले की, त्यांनी माझे धर्म-धर्मनिरपेक्षता वगैरे विषयावरील तीन लेख वाचले नाहीत; त्यांनी केवळ शेवटचा लेख वाचला आहे.
त्यांचा लेखकाच्या शीर्षकावर आहे. धर्म आणि धर्मनिरपेक्षता ह्यातील ‘धर्म’ ह्या शब्दाच्या ऐवजी ‘हिन्दुधर्म’ म्हणायला हवे होते असे ते म्हणतात. त्याबद्दल माझा खुलासा असा की, हे शीर्षक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एके काळचे बौद्धिकप्रमुख श्री. मा.गो. वैद्य ह्यांच्या एका पुस्तकाच्या वाचनानंतर मी घेतले आहे. त्यांनी हिन्दु-धर्माची व्याख्या करताना ती कशा प्रकारे केली आहे की ‘ह्या जगात धर्म ह्या संज्ञेला पात्र अशी एकच विचारप्रणाली आहे आणि ती हिन्दुधर्माची होय आणि त्यामुळे धर्म आणि हिन्दुधर्म ह्यांत काही फरक नाही.