एकोणविसाव्या शतकात युरोपातील स्थिती अत्यंत दयनीय झाली होती. नेपोलियनसोबत नुकत्याच झालेल्या युद्धाची झळ सर्वदूर पोहोचली होती. सामान्य नागरिक अत्यंत हलाखीचे दिवस जगत होते. त्यातच माल्थसने भाकीत केलेली जागतिक आर्थिक मंदी खरोखरच सुरू झाली. बेरोजगारी प्रचंड वाढली आणि त्यासोबत हिंसाचाराच्या घटनासुद्धा. औद्योगिक क्रांतीची नुकतीच सुरुवात झाली होती. त्यादरम्यानच भांडवलदारांनी स्वतःचा फायदा वाढविण्याकरिता नवनवे कायदे आणले ज्यामुळे कामगारांचे जगणे अधिकच दयनीय बनले. अगदी १० वर्षांची लहान मुले- मुली सुद्धा या कामात गुंतवली जात होती. आणि मग अशांवर मानसिक, शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराचे कधीही न संपणारे सत्र सुरू व्हायचे.
मासिक संग्रह: सप्टेंबर, २०१४
महाभारत आणि कॉस्मॉस
माझी अगदी लहानपणाची टीव्ही पाहायची पहिलीवहिली आठवण म्हणजे महाभारतमालिका. त्याकाळात रंगीत टीव्ही खूप कमी असायचे. आमच्या घरी रंगीत टीव्ही असल्यामुळे शेजारीपण महाभारत पाहायला घरी यायचे. आमची बैठकखोली लोकांनी भरून जायची. महाभारतमालिकेच्या आधी आलेली रामायणमालिका मला फारशी आठवत नाही तेव्ही मी वयाने फार लहान होतो पण महाभारत मात्र मी आवर्जून पाहात असे. नवरससंपूर्ण पौराणिक कथा, अप्रतिम अभिनय आणि त्याच्या जोडीस असलेले भव्यदिव्य सादरीकरण, लोकांना टीव्हीला खिळवून ठेवायला लागणारे सगळेच पैलू त्यामध्ये होते. साहजिकच रामायण आणि महाभारत ह्या दोन्ही मालिका अत्यंत लोकप्रिय झाल्या आणि नकळत लोकांच्या आयुष्याच्या अविभाज्य घटक बनल्या.
पाचवा धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यामधून उद्भवणारे काही प्रश्न
प्रस्तुत लेखाच्या प्रारंभी हिन्दू कोण नाही असा प्रश्न मी उपस्थित केला आहे. कारण हिन्दू कोण नाही हे नक्की ठरल्याशिवाय अल्पसंख्याक कोण व बहुसंख्याक कोण ह्याचा, त्याचप्रमाणे कोण कोणाचा अपमान करीत आहे ह्याही प्रश्नांचा उलगडा होत नाही. माझ्या मते कोणीच बहुसंख्याक नाहीत व त्यांचा अपमानही होत नाही. ‘तुमचा, तुम्ही बहुसंख्याक असून अपमान होत आहे’ अशी एक हूल उठवून गेली आहे व त्या आवईला आमचे भाबडे देशबान्धव बळी पडत आहेत.
हिन्दू कोण नाही हिन्दू कोण नाही असा मला पडलेला प्रश्न मी पुढे एका पद्धतीने सोडवून अशी दाखवीत आहे.
डाव्या पुरोगाम्यांचे इतिहासदत्त कर्तव्य
मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच्या अभूतपूर्व निर्णायक बहुमताच्या विजयाने आता देशात काय होईल याची रास्त चिंता पुरोगामी वर्तुळात व्यक्त होत आहे. ती समजून घेण्यासाठी व त्यातून मार्ग काढण्यासाठी देशाच्या आधुनिक इतिहासातील ३ प्रमुख प्रवाहांची प्रथम नोंद घ्यावी लागेल.
एक, स्वातंत्र्य चळवळीतून उदयाला आलेल्या व्यक्तिस्वातंत्र्य, सर्वधर्मसमभाव, लोकशाही मूल्यांना मानणारा, वंचितांना झुकते माप देणारा, मध्यममार्गी परंतु, निश्चितपणे भांडवली विकासाच्या दिशेने जाणारा प्रवाह. आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी सामाजिक सुधारणा हे द्वंद्व स्वातंत्र्य मिळाल्यावर निमाले व संविधानात या दोहोंतून आलेल्या मूल्यांचा समावेश झाला. या प्रवाहाचे प्रतिनिधित्व काँग्रेस परिवार (यात काँग्रेसमधून फुटून निघालेल्या गटांचाही समावेश आहे) करतो.
झाली जीत इंग्रजीची
काही वर्षांपूर्वीची गोष्ट. एका नामांकित भारतीय बुद्धिवादी महिलेशी माझी गाठ पडली. सहज संभाषण सुरू झाले. मी तिला सांगत होतो की मी हिंदी व इंग्रजीतूनही लिहितो. शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने हिंदी आवश्यक असल्याचे तिने मान्य केले. परंतु मी माझे काही लेख मुळातूनच हिंदीत लिहितो हे ऐकून मात्र तिला धक्का बसला. हिंदी वा तमिळसारख्या भाषा ह्या रस्त्यावरचे संभाषण करायला बऱ्या असतात. परंतु इंग्रजी किंवा फ्रेंचप्रमाणे त्यांच्यामध्ये संकल्पनांचा विचार करणे शक्य नाही असे तिचे म्हणणे होते.
हे संभाषण कायम माझ्या मनात रुतून बसले आहे. कारण आपण सर्वजण जे काही गृहीत धरतो, त्याचे ते निदर्शक आहे.
अनश्व-रथ, पुष्पक विमान आणि आपण सर्व – लेखांक पहिला
नव्या केन्द्र सरकारचे शंभर दिवस उलटून गेले आहेत. ह्या शंभर दिवसांत कोणताही चमत्कार घडून आलेला नाही. स्विस बँकेत लपवलेला काळा पैसा भारतात येईल व त्यामुळे भारताची आर्थिक विवंचना संपेल असे मानणाऱ्यांची निराशा झाली आहे. सरकारी कचेऱ्या, बाजार कोठेही परिवर्तनाच्या खाणाखुणा दिसत नाहीत. परराष्ट्रधोरणाच्या बाबतीतही नवे सरकार (इस्रायलच्या निषेधास दिलेल्या नकाराचा अपवाद वगळता) पूर्वीचेच धोरण पुढे चालवील अशी चिह्ने दिसत आहेत. निवडणुकीपूर्वी राणा भीमदेवी थाटात जगातील सर्व विषयांवर भाष्य करणारे पंतप्रधान आता बोलण्याच्या बाबतीत मनमोहनसिंगांचा वारसा चालवीत असल्याचा भास होतो. त्यांची अलीकडील भाषणे ऐकून तर ते रोज सकाळी उठल्यावर ते ‘मथ्था टेकायला’ राजघाटावर जात असावेत, अशीही शंका येते.
दोन रस्ते
आजचे जग अशा वळणावर उभे आहे की, जिथून पुढे परस्परविरुद्ध दिशांनी जाणारे दोन रस्ते आहेत. एक रस्ता प्रचंड संपत्तीच्या निर्मितीचा, अमाप उपभोगाचा, परस्परांशी स्पर्धेचा आणि वैराच्या दिशेने जाणारा आहे; दुसरा रस्ता कार्ल मार्क्स म्हणतात तसा अशा ठिकाणी पोहोचणारा आहे की, जिथे मानवी विकासप्रक्रियेतील आनंददायी घटना घडणार आहेत. निसर्गातील सर्व उत्पादकस्रोत माणूस अशा रीतीने विकसित करेल की, माणूस आणि निसर्ग ह्यातील द्वंद्व पूर्ण मिटून जाईल आणि त्याच्या इतिहासाचे नवे युग, ore of खऱ्या मानवी इतिहासाचे युग सुरू होईल. या युगातील अर्थशास्त्रावर भगवान बुद्धांच्या मध्यममार्गाचा प्रभाव असेल आणि त्यातील माणसे त्यांच्या जगण्याच्या प्रक्रियेत बुद्धांचा आर्य अष्टांगिक मार्ग अनुसरतील.
पत्रसंवाद
उत्पल वनिता बाबूराव आजचा सुधारकच्या मे अंकातील बाईमाणूस ह्या पुस्तकावरील लेख वाचला. लेखातील मुद्दे पटले. त्यांनी परखड परीक्षण केले आहे. (मी पुस्तक वाचलेले नाही) काही मुद्द्यांबाबत चर्चा होऊ शकेल असे वाटते. काही मुद्दे नव्याने समोर आले आहेत.
भारतात तरी वर्ग-वर्णाच्या पलीकडे जाऊन स्त्रियांना एक होऊन समष्टिरूप धारण करता आलेले नाही. हो. हा मुद्दा इथल्या बऱ्याच शोषित घटकांना लागू होतो असे वाटते. स्त्री म्हणून एकमेकांशी जोडून घेण्याची प्रेरणाच कुठे दिसत नाही. हे पटले. आजच्या नवबौद्ध स्त्रिया हिंदू दलित स्त्रियांपेक्षा अधिक प्रगत व प्रगल्भ असतात असे पुस्तकात एके ठिकाणी म्हटले आहे.