जनुक – संस्कारित अन्न किंवा जेनेटिकली मॉडिफाईड फूड (जीएम अन्न) ह्या विषयावरील हा विशेषांक ‘आजचा सुधारक’ च्या वाचकांपुढे सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. आजच्या माध्यमांच्या भाऊगर्दीत व त्यात खेळल्या जाणाऱ्या विवादांच्या गदारोळात ‘आजचा सुधारक’मध्ये विविध प्रासंगिक विषयांवर वडणाऱ्या वैचारिक विमर्शाचे स्थान आगळेवेगळे आहे. संपादक व लेखक आपापल्या वैचारिक भूमिकेशी प्रामाणिक राहूनही खुलेपणे विचारांचे आदान-प्रदान करतात हे विवेकावादाचे वैशिष्ट्यच नव्हे, तर ती त्याची एक कसोटीही आहे. असे आम्ही मानतो. मराठीत विविध कारणांनी दुर्लक्षित असणाऱ्या विषयांवर अशी चर्चा घडविणे हा ‘आ.सु.’
मासिक संग्रह: ऑगस्ट, २०१४
शेतीची भावी दिशा
श्रीमंत तसेच गरीब देशातील शेतीमध्ये एकलपीक पद्धतीऐवजी बहुपीक पद्धतीचा स्वीकार, रासायनिक खते व शेतीतील अन्य निविष्टे ह्यांचा कमी वापर, लहान शेतकऱ्यांना अधिक साह्य आणि उत्पादन व वापर ह्यांच्या बाबतीत स्थानिक बाबींवर भर, असे परिवर्तन करणे आता अपरिहार्य झाले आहे. त्यासाठी छोट्या शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविणाऱ्या आणि ग्रामीण विकासास चालना देणाऱ्या, शेतीचे पुनरुज्जीवन करणाऱ्या शाश्वत उत्पादनपद्धतींचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात यावा असे आम्ही सुचवितो. एकलपीक पद्धत व औद्योगिक शेतीमुळे गरज आहे तेथे पुरेसे अन्न लोकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे शक्य होत नाही.
बीटी आणि जी.एम. वाणांना देशी वाण पर्याय
ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांची मुलाखत. प्रश्न : सध्या अनेक कंपन्या जी. एम. वाण बाजारात आणत आहेत. या वाणांमुळे पर्यावरणदृष्ट्या काय फायदे तोटे होत आहेत?
उत्तर : जी.एम. वाण पर्यावरणीयदृष्ट्या हानिकारक आहेत. त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे. सरकार पर्यावरणीय आणि शेतकऱ्यांचे हित जोपासण्याऐवजी कंपन्यांचे हितसंबंध जोपासण्यात मश्गुल आहे. बीटी कॉटनमुळे फायदा झाला असे म्हणतात, मात्र हे खरे नाही. बीटी कॉटनवर बोंड अळी येणार नाही असा दावा करण्यात येतो; मात्र आता बीटी कॉटनच्या बोंडातील विषाचे शोषण करणाऱ्या अळ्या निर्माण होत आहे. सरकारने मध्यंतरी बीटी वांगे आणण्याचा प्रयत्न केला होता.
जी. एम. चे राजकारण
जनुक संस्कारित म्हणजेच जेनेटिकली मॉडिफाइड बियाणे, त्यातून उगवणारी पिके व ह्या साऱ्याच्या परिणामस्वरूप जी. एम खाद्यान्न हा आजच्या युगातील एक महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. आपल्या अन्नाशी संबंधित असल्यामुळे तर तो कळीचा आहेच, परंतु शेती, शेतकरी, मातीचा कस, पीक राशी (यील्ड) ह्या साऱ्या बाबींशी निगडित असल्यामुळे शेतकऱ्याच्या जगण्याच्या व्यवहार्यतेशी तो सरळ जोडलेला आहे. काय आहे ही जी एम नामक भानगड ?
सर्वसाधारणपणे लोक जी. एमला आधुनिकता व त्याला विरोध म्हणजे मागासलेपण असे समजताना दिसतात. जनुक-संस्कारित बियाण्याच्या तंत्रज्ञानाला विरोध म्हणजे विज्ञानाला विरोध, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान, असली विधाने आपल्याला त्या तंत्रज्ञानाविषयी चर्चा सुरू झाली की सर्रास ऐकू येतात.
जनुक-संस्कारित अन्नापासून सावधान: डॉक्टरांचा इशारा
अमेरिकन अॅकॅडमी ऑफ एन्व्हायरन्मेंटल मेडिसिन (एएईएम) ह्या संघटनेने एकोणीस मे दोन हजार नऊ रोजी सर्व फिजिशियनना आवाहन केले की, त्यांनी आपले पेशंट, अन्य वैद्यकीय व्यावसायिक व सर्वसाधारण जनता ह्यांचे, जनुक -संस्कारित (जी एम) अन्न, शक्य तेव्हढे टाळण्याविषयी प्रबोधन करावे व जी एम अन्नाच्या आरोग्यावरील दुष्परिणामाबद्दल शैक्षणिक साहित्य त्यांना उपलब्ध करून द्यावे. ह्या संघटनेने अशीही मागणी केली की जी एम अन्नाच्या परिणामांबद्दल केल्या जाणाऱ्या दीर्घकालीन चाचण्या व त्याचे लेबलिंग अधिस्थगित करण्यात यावे. त्यांनी ह्या विषयावर प्रकाशित केलेल्या आपल्या भूमिकापत्रात असे मांडले आहे की, जी एम अन्नामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असे प्राण्यांवर करण्यात आलेल्या अनेक चाचण्यांतून सिद्ध झाले आहे.
जी एम शेतकऱ्यांच्या हिताचे
आज जे लोक जी. एम. मक्याला विरोध करीत आहेत, तेच लोक यापूर्वी जी. एम. कापूस (बी.टी. कापूस) भारतीय शेतकऱ्यांना दिला जाऊ नये म्हणून प्रयत्नशील होते. या लोकांच्या प्रचंड विरोधामुळे आणि दहशतीमुळे बी. टी. कापूस तब्बल ६ वर्षे (१९९६ ते २००२) भारतीय शेतकऱ्यांना मिळू शकला नाही. मध्येच बी. टी. कापसाची मोठ्या प्रमाणात चाचणी होऊन त्याचे शेतकऱ्यांना होणारे फायदे स्पष्ट झाले होते. तरीही त्या विरोधात जी. एम. मक्यासारखाच धादांत खोटा, विषारी प्रचार करून काही लोकांनी सदर बियाणे भारतात येऊ देण्यास विरोध केला होता.
मुक्त अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि विदर्भातील शेतकरी – आत्महत्या
संसदेच्या कृषि स्थायी समितीने जनुकांतरित पिकाच्या विरोधात सादर केलेला भक्कम पुरावा निष्प्रभ करण्यासाठी बरेच प्रयत्न सुरू आहेत. ‘हरित कार्यकर्त्यांचे काम’ असे म्हणून त्याची हेटाळणी होत आहे. हा साडेचारशे पानांचा अहवाल हे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा समावेश असलेल्या खासदारांनी मिळून दोन ते अडीच वर्षे केलेल्या अभ्यासाचे फळ आहे. ह्या खासदारांमध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षाचे, डावे आणि उजवे अशा सर्वांचा समावेश होता, ज्यांचे सर्वसाधारणपणे एकमेकांशी मतैक्य होत नाही. त्या अर्थाने ते, जनुकांतरित बियाणे बनविणाऱ्या कंपन्या, त्यांनी प्रायोजित केलेल्या स्वयंसेवी संस्था, जनसंपर्काची अभिकरणे आणि तथाकथित शेतकरी नेते ह्यांनी प्रसारमाध्यमे, जनता आणि धोरणकर्ते ह्यांच्याकडे केलेल्या एका खोट्या प्रचाराचे खंडन होते.
जनुक – संस्कारित बियाणे : कोणासाठी, कशासाठी?
मी गेल्या तीन दशकांपासून सेंद्रिय / नैसर्गिक शेती करीत आहे. माती, पाणी, वातावरणाचे जतन आणि विषमुक्त/सुरक्षित आहार हे प्रमुख उद्देश मनात ठेवून मी दीर्घकाळ काम केले. आरंभी देशात माझ्यासारखे मोजकेच लोक होते. नंतर हळूहळू सेंद्रिय शेतीपद्धती रुजत गेली. आज या क्षीण प्रवाहाचे मोठे पात्र होत असताना सेंद्रिय शेती तगेल की नष्ट होईल असा मला प्रश्न पडला आहे.
सेंद्रिय शेतीपद्धती नुसतीच पर्यावरणस्नेही नाही तर भूमी आणि जल ह्यांचे संवर्धन साधून जैवविविधतेत भर घालणारी आहे. याउलट जनुक-संस्कारित बियाण्यामुळे या सर्वांवर विपरीत परिणाम होऊन माणसांचे आणि पशूंचे भोजनसुद्धा प्रदूषित होत असल्याचे अनुभव आहेत.
लढवय्या शेतकरी
वॉर ऑन हंगर आणि एफिशियंट मार्केट्स ‘अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूळ गरजा आहेत” हे घासून गुळगुळीत, बुळबुळीत झालेले वाक्य; पण प्रगतीचे घोडे अजून पहिल्याच पायरीवर अडलेले आहे. अर्थात, अनेकांच्या मनात पुढचे वळण घेतले की आलेच नंदनवन आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण तिथे लवकरच पोहचू हा विश्वास अटळ आणि अढळ आहेच. माणूस सर्वसुखी होण्यात अनेक नैसर्गिक अडचणींचा मोठा अडथळा आहे आणि त्यासाठी माणसाला अनेक पातळीवर युद्ध करावे लागते. त्यापैकीच एक आहे वॉर ऑन हंगर.
जगाची लोकसंख्या आज सात अब्ज आहे आणि त्यातले एक अब्ज लोक उपाशी आहेत.
जैवविविधता व जनुक – संस्कारित पिके
आपल्या पृथ्वीवरील सजीवांचे अस्तित्व म्हणजे मुळातच एक नवलाईची बाब आहे. त्यातही जास्त विस्मयकारक आहे ती या सजीवांची विविधता. अंदाजे ९०० कोटी प्रकारच्या वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव या पृथ्वीवर वास्तव्य करून आहेत. येथे जवळपास ७०० कोटी लोकसंख्या आहे माणसांची व त्यात सतत भर पडतेच आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या असंख्य प्रकारच्या गरजा पुरविण्यासाठी मात्र निसर्गातील जैवविविधतेचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणेबळी दिला जात आहे. जैवविविधतेच्या -हासाला खरा वेग आला तो जगात औद्योगिक क्रांतीला सुरवात झाल्यानंतर. औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात मानवी समाजाचा एकूण ऊर्जावापर वीस पटीने तर प्रति माणशी वापर शंभर पटीने वाढला आहे.