मासिक संग्रह: जून, २०१४

पाचवा धर्म, धर्मनिरपेक्षता, आणि त्यांमधून उद्भवणारे काही प्रश्न

नुकताच 16 मे रोजी निवडक निकाल जाहीर होऊन भारताची सोळावी लोकसभा सत्तेवर आली. भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमत मिळून तो निवडून आला. कोणत्याही एका पक्षाला इतके स्पष्ट बहुमत अनेक वर्षांनी मिळाले असेल. भारतासारख्या अनेक धर्मांचे नागरिक राहत असलेल्या आणि निधर्मी संविधान असलेल्या राज्यात तर हे प्रथमच घडले आहे. हे कशामुळे घडून आले व राजकीय परिप्रेक्ष्यात ह्याचा अर्थ काय होतो वगैरेबद्दल प्रसार माध्यमांमध्ये अनेक ठिकाणी लिहिले – बोलले वर्षात गेलेले आहे. आम्हाला मात्र त्यावरून आजचा सुधारक च्या दुसऱ्या 1991 मध्ये प्रकाशित झालेल्या दिवाकर मोहनी ह्यांच्या लेखाची आठवण झाली.

पुढे वाचा

प्राचीन भारतीय कल्पना

प्राचीन भारतीयांनी इतिहासलेखन असे फारसे केलेच नाही. तथापि इतिहासाविषयी, कालप्रवाहाविषयी, स्थित्यंतरे आणि त्यामागील सूत्रे ह्या अनुरोधाने पुष्कळ विवेचन ऋग्वेदकालापासून पुढे कित्येक शतके केलेले दिसते. इतर प्राचीन संस्कृतींप्रमाणे भारतातही दैवी शक्तीवर विश्वास होताच. निसर्गात बदल घडविणाऱ्या देवता मानवी जीवनाच्याही नियंत्रक होत्या. तेव्हा कर्ताकरविता परमेश्वर, माणसे म्हणजे त्याच्या हातातील बाहुली ही कल्पना आलीच. आपण काहीतरी करतो आणि त्यामुळे काहीतरी घडते असे माणसांना उगीच, अज्ञानामुळे वाटत असते. वस्तुतः परमेश्वरच सर्व करवितो. परमेश्वर हे जे करतो, ते अज्ञ मानवांना धडे शिकवण्याच्या हेतूने असेल; ते त्याच्या वैश्विक योजनेचा केवळ एक लहानसा भाग असेल किंवा त्या सगळ्या नुसत्या त्याच्या लीला असतील- काहीही असेल परंतु सर्व गोष्टींमागे परमेश्वरी सूत्र असते हा विचार प्राचीन भारतीय साहित्यात अनेक ठिकाणी, अनेक प्रकारे व्यक्त झालेला दिसतो.

पुढे वाचा

ओळख अर्थशास्त्रज्ञांची (३) – डेविड रिकार्डो (१८ एप्रिल १७७२ – ११ सप्टेंबर १८२३)

अॅडम स्मिथ ने मांडलेल्या आशावादाला जेव्हा माल्थसने सुरुंग लावले तेव्हा बहुतांश लोकांना डेविड रिकार्डो च्या आशावादाने तारले. घरातून व समाजातून बहिष्कृत केलेल्या त्याच्या आयुष्यात त्याने एक अत्यंत यशस्वी उद्योजक, उत्तम गुंतवणूकदार व नंतर मोठा जमीनदार, ख्यातनाम अर्थशास्त्र- पंडित होण्याचा व आयुष्याच्या शेवटी शेवटी तर ब्रिटिश संसदेमध्ये जागा मिळवण्याचा मान मिळवला होता. अर्थशास्त्राचा प्रकांड पंडित म्हणून त्याचा इतका मान होता की इंग्लंडच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांनी त्याला अर्थशास्त्रावरील त्याचे विचार मांडण्यासाठी बोलाविले होते. त्याकाळी व आजसुद्धा अॅडम स्मिथनंतर सर्वात प्रभावशाली अर्थशास्त्री म्हणून त्याचे नाव घेतले जाते..

पुढे वाचा

पत्रसंवाद

अॅड. अतुल सोनक, दिवाकर मोहनी यांचा ‘जातिभेद आणि निवडणूक’ हा लेख वाचला. त्यांनी सुचवलेल्या निवडणूकपद्धतीसाठी घटनेतील आणि निवडणूक कायद्यातील अनेक कलमे बदलवावी लागतील. असे होण्याची मुळीच शक्यता नाही. त्यांच्या लेखातील इतर अनेक बाबींवरील आक्षेप न नोंदवता सरळ निवडणूक प्रक्रियेत त्यांनी सुचवलेल्या दुरुस्त्या अंमलात का येऊ शकणार नाहीत याबद्दल मला काय वाटते ते इथे नोंदवतो.

समजा चार प्रमुख पक्ष आहेत, अशी सुरुवात करून त्यांनी काही उपाय सुचवले आहेत. आपल्या इथे लोकशाही आहे आणि अनेक पक्ष आहेत, त्यात अजून नवी भर पडतेच आहे.

पुढे वाचा