प्राचीन ग्रीक लोकांनी विश्वाविषयी आणि मानवी जीवनाविषयी अनेक अंगानी व अनेक दृष्टींनी विचार केला. अनेक ज्ञानशाखांच्या क्षेत्रांत ग्रीकांचे विचार तर्कशुद्ध, मूलभूत आणि पुरोगामी असे होते. रोमन लोक हे ग्रीकांइतके ज्ञानपिपासू नव्हते. ते अधिक व्यवहारी होते, तथापि रोममध्येही अनेक वचारवंतांनी ग्रीकांचे विविधा विचार आत्मसात करून पुढे त्यांचा विस्तार केलेला आढळून येतो.