भारतातील सर्व धार्मिक अल्पसंख्यकांच्या मनावर ओरखडे उमटलेले आहेत. फक्त मुस्लिमच नव्हे तर पश्चिम पंजाबमधून विस्थापित झालेले हिंदू व शीख तसेच काश्मीरी पंडितही असे ओरखडे बाळगून आहेत. खऱ्याखुऱ्या किंवा घडवून आणलेल्या चिथावणीमुळे अचानक दंगली भडकण्याचे व त्याचा अनेकपटीने, सूड घेण्यासाठी महिलांना लक्ष्यित केले जाईल ह्याचे भय सगळ्यांच्या मनात आहे. दलित, आदिवासी व विशेषतः स्त्रिया त्यांच्या आयुष्यातील मिनिटामिनिटाला अवहेलना व शोषण ह्यांचाच अनुभव घेत आहेत. अवमान, भेदाभेद आणि दडपशाही ह्यांच्यामुळे सतत मानगुटीवर बसणारी अस्वस्थता ही नागरिक म्हणून द्यावयाचा साधा सन्मान, नीतिमत्ता आणि माणुसकी हिरावून घेणारीच असते. ह्या -अस्वस्थतेकडे थोडे लक्ष द्या, श्रीयुत मोदी. शब्दांनी व दृष्टीने संबोधित करा तिला, आणि मग पहा, त्यांच्या हितसंबंधाचे पहिले प्रवक्ते म्हणून तुम्ही त्यांचा विश्वास जिंकता की नाही ते ! गोपालकृष्ण गांधी