अठराव्या शतकात राजकीय अर्थशास्त्राचे जनक मानले गेलेले अॅडम स्मिथ (Adam Smith) (१७२३-१७९०) यांच्या विचारांचा पगडा होता. जे काही बदल समाजात घडत आहेत, जी काही औद्योगिक प्रगती समाजात होत आहे ती सर्व मनुष्यजातीला वरदान ठरेल ही भावना जनसामान्यांत आणि विचारवंतां ध्ये रुजू लागली होती. हे सर्व बदल समाजाला एका आदर्श सामाजिक व्यवस्थेकडे घेऊन जातील हा विशास मूळ धरू लागला होता. अशातच मे १७९८ मध्ये जोसेफ जोहन्सन (Joseph Johnson) या लेखकाच्या नावाने इंग्लंडमध्ये एक निबंध प्रकाशित झाला. विषय होता जनसंख्या. आणि या एका छोट्याशा निबंधाने तत्कालीन अर्थकारण आणि राजकारण ढवळून काढले. असे काय होते त्या निबंधात ? आणि त्याचा खरा लेखक होता तरी कोण ?
लहानपण व शिक्षणः
जोसेफ जोहन्सोन या टोपणनावाने लिहिणारा लेखक होता थामस रॉबर्ट माल्थस. डेनियल (डॅनिएल) आणि हेन्रीएटा (क्शपीळशीर) माल्थस यांचे सातवे अपत्य. त्याचे लहानपण वेस्टकॉट, सरे येथे गेले. लहानपणापासून त्याला दुभंगलेला ओठ व टाळूचा आजार होता. त्याचे शिक्षण बॅकॉट नॉटिंगहॅम्पशायर येथे घरीच झाले. १९७२ ला तो वॉरिंग्टन् ॲकॅडी मध्ये शिकण्यासाठी आला; पण डबघाईला आलेली ती संस्था लगेच १७८३ ला बंद पडली. त्याचे पुढील शिक्षण गिल्बर्ट वेक्फील्ड मार्फत पुन्हा घरी सुरू झाले. पुढे १७८४ ला त्याने जीझस् कॉलेज, केंब्रिज येथे प्रवेश घेतला व १७९१ मध्ये चअ ची पदवी घेऊन बाहेर पडला. दोनच वर्षांत तो fellow म्हणून निवडून आला. याआधीच त्याने १७८९ मध्ये दीक्षा घेऊन ओक्वूड, सरे येथे चर्चध्ये काम करणे सुरू केले होते.
त्या काळात इंग्लंडमधील खालच्या मजूर वर्गाची स्थिती अत्यंत बिकट होती. नेपोलियनसोबत युद्धाची सुरुवात होणार होती. इंग्लंडवर, जो आधी धान्य निर्यात करणारा देश होता, आता धान्य आयात करण्याची पाळी आली होती. एक बुशेल (साधारण २४ किलो गह) धान्यासाठी ११८ शिलिंग (१ पौंड = २० शिलिंग) खर्च करावे लागत होते. ही रक्कम कामगाराला मिळणाऱ्या २ आठवड्याच्या पगाराएवढी होती. जनसंख्या प्रचंड वाढली होती. परंतु इतर देशाचे सैन्य आणि उत्पादनक्षमता बघून इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान पिट (Pitt) यांनी वाढलेली लोकसंख्या ही राष्ट्राची प्रगती आहे हा निष्कर्ष काढला. त्या काळात इंग्लंडमध्ये poor’s law सुरू होता. त्यांनी या कायद्याचा विस्तार करण्यासाठी विधिमंडळात कायदा सुधारणेचे विधेयक मांडले. जास्त मुले असलेल्या गरीब कुटुंबांना जास्त पैसे देऊन राष्ट्रनिर्माणात अशीच मदत करत राहण्याबद्दल प्रोत्साहित करण्याची त्या कायद्यात तरतूद केलेली होती. दुसरीकडे वाढती महागाई लक्षात घेऊन व्यापारी व भांडवलदार ह्यांनी धान्य आयात करणे सुरू केले. ज्यामुळे धान्याच्या वाढलेल्या किंमती कमी होऊन व्यापाऱ्यांनासुद्धा मोठा नफा होऊ लागला; परंतु यामुळे प्रस्थापित जमीनदार वर्ग नाराज झाला. कारण धान्याची वाढलेली किंमत त्यांना मोठा नफा मिळवून देत होती. जवळपास सर्व धान्य हे जमीनदारांकडूनच बाजारात येत होते. व्यापाऱ्याना आळा घालण्यासाठी जमीदारांनी संसदे ध्ये धान्यआयातीवर जादा कर लावण्याचा कायदा केला. यामुळे धान्याच्या किंमती वाढल्या. यावर उपाय म्हणून बहुसंख्य जमीनदार असलेल्या त्या संसदेत चर्चा करण्यात आली. खूप चर्चा करून शेवटी असा निर्णय घेण्यात आला की आयात केलेल्या धान्यावर आणखी जास्त कर लावावा व धान्याच्या किंमती वाढू द्याव्या. असा युक्तिवाद करण्यात आला की वाढलेल्या वाढळेल्या धान्यकिंमतींमुळे भविष्यकाळात शेतीला प्राधान्य मिळेल आणि जास्तीत जास्त लोक शेती करून धान्यनिर्मिती करू लागतील. आणि अशा प्रकारे इंग्लंड धान्यनिर्मितीबाबत स्वावलंबी होईल. त्यामुळे आजचे थोडे नुकसान सोसून भविष्यकालासाठी हा त्याग करुया !!!! त्यानंतर तर धान्यआयातीवर कायद्याने बंदीच आणली. या कायद्याला उीप कुरु असे नाव दिले गेले. ह्या कायद्यामुळे नागरिकांचे अत्यंत हलाखीचे दिवस सुरू झाले.
लोकसंख्या ह्या विषयावर माल्थसचा निबंधः
एकीकडे हे सर्व सुरू असताना इंग्लंडमध्ये एका लेखाने खळबळ उडवून टाकली होती. तो वाचल्यानंतर प्रगती आणि मानवी भविष्याचे उदात्त स्वप्न पाहणाऱ्या लोकांच्या पायाखालची वाळूच सरकून गेली होती. त्याकाळच्या प्रसिद्ध अर्थशास्त्री विल्यम् गॉड्विन् यांनी “या लेखाने प्रगतीसाठी आशावादी असलेल्या मित्रांना परत हजारोंच्या संख्येने निराशावादी बनविले व चिंतन करण्यास भाग पाडले’ अशी तक्रारच केली.
इ.स.१७९८ मे मध्ये माल्थसने आपले लोकसंख्यावाढीबद्दलचे प्रसिद्ध विचार, प्रथम मांडले होते. माल्थसचे वडील अर्थशास्त्री डेव्हिड ह्यू आणि तत्त्वचिंतक ज्याँ जॅक्स रूसो (Jean-Jacques Rosseau यांचे चांगले मित्र होते. अॅडम स्मिथ (Adam Smith) यांनी तर आपल्या अर्थशास्त्रीय लेखात मान्य केले होते की त्याच्यावर डेव्हिड ह्यू (David Hume) च्या अर्थशास्त्रीय विचारांचा पगडा आहे. त्या काळात अॅडम स्मिथ, डेव्हिड ह्यू यांच्या विचारांची चर्चा बुद्धिजीवी वर्गात सुरू असे. त्यात डॅनियल माल्थसचे घरही आलेच. परंतु थाँ स माल्थसला हे पटत नव्हते. शेवटी त्याने आपल्या वडिलांना (आणि त्यांच्या मित्रांना) सविस्तर उत्तर द्यायचे म्हणून ५० हजार शब्दांचा निबंध लिहिला आणि वडिलांना सुपूर्द केला. त्यात लोकसंख्यावाढ व त्याचे अर्थशास्त्र ह्यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम याची मौलिक चर्चा करण्यात आली होती. त्यात अॅडम स्मिथ, डेव्हिड ह्यू, गोल्डविन, काँडॉर्सेट यांच्या विचारांचीसुद्धा समीक्षा करण्यात आली. आणि या लेखाचा थाँ स माल्थसच्या वडिलांवर इतका प्रभाव पडला की त्यांनी तो निबंध ‘An Essay on the Principle of Population’ छापण्यासाठी पाठवून दिला. माल्थसच्या मताप्रमाणे कोणत्याही देशाची लोकसंख्या, नेहमी भूमितीय (Geometric, १, २, ४, ८, १६, ३२, ६४, १२८, २५६) गुणोत्तराने वाढत जाते तर या लोकसंख्येची भूक भागू शकेल अशा अन्नपदार्थांची त्या देशातील निर्मिती फक्त अंकगणितीय (Arithmetically – १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९) या गुणोत्तरानेच वाढू शकते. सोप्या शब्दांत सांगायचे तर लोकसंख्यावाढीचा वेग हा अन्नपदार्थ उत्पादनाच्या वेगापेक्षा, नेहमीच जास्त असतो. माल्थस पुढे म्हणतो की असे जरी असले तरी निसर्गाने असे काही अडथळे (दुष्काळ, वातीला मत हाच राग, दुष्काळ यांच्याद्वारे मृत्युदर वाढतो तर संततीप्र रोगराई, युद्धे, पूर) या लोकसंख्यावाढीच्या मार्गात निर्माण केले आहेत, ज्यायोगे माणसाने या बाबतीत काहीच केले नाही तरी जगातली लोकसंख्या आपोआप मर्यादित राहील. माल्थसने इतिहासाचा दाखला दिला की कोणत्याही कालखंडात असा एक मोठा वर्ग राहिला आहे जो गरिबीतच खितपत पडून आहे आणि वेगवेगळ्या कारणां ळे अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे. याची पाळे ळे अनियंत्रित लोकसंकख्यावाढीत आहेत. ज्या ठिकाणी आणि ज्या कालखंडात मुबलक साधनसंपत्ती उपलब्ध असते तेथे लोकसंख्यावाढीला पूरक वातावरण असते. कारण उपलब्ध साधनसंपत्तीत त्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण होत असतात. त्यामुळे लोकसंख्या एवढी वाढते की साधनसंपत्ती कमी पडू लागते. अश्या वेळेस गरिबीत वाढ होते. लोक परत हलाखीचे जीवन जगू लागतात. वातावरण लोकसंख्यावाढीला पूरक नसते. कमी जन्म, जास्त मृत्यू, गरिबी यामुळे परत एकदा लोकसंख्या स्थिर होत होत उपलब्ध साधनसंपत्तीत सर्व गरजा भागतील इतकी होते. चांगले दिवस येतात. हे चक्र असेच सुरू राहते. जर लोकसंख्यावाढ नियंत्रणापलीकडे गेली तर निसर्गात पूर, युद्धे (साधनसंपत्ती कमतरता), साथीचे रोग, आणि दुष्काळ यांच्याद्वारे लोकसंख्यानियंत्रण होऊन परत लोकसंख्यावाढीसाठी पूरक परिस्थिती निर्माण होते. माल्थसने वर्तविले की लोकसंख्यावाढीसाठी निसर्गात काही नैसर्गिक संरोध अथवा अडथळे असतात तर काही प्रतिबंधात्मक अडथळे असतात. नैसर्गिक संरोध, पूर, युद्धे, साथीचे रोग, दुष्काळ यांच्याद्वारे मृत्युदर वाढतो तर संततीप्रतिबंध, गर्भपात, उशिरा लग्न, वेश्याव्यवसाय, समलिंगीसंबंध, ब्रह्मचर्य यांसारख्या प्रतिबंधात्मक संरोधांद्वारे जन्मदर कमी होतो. लोकसंख्यावाढीची क्षमता ही नेहमीच नवीन साधनसंपत्ती व अन्नधान्यनिर्मिती ह्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त असते. शेतीची निर्मितिक्षमता ही वाढवता येते पण तिलाही काही मर्यादा आहेत असे माल्थसचे मत होते. त्यावेळच्या तंत्रज्ञानामुळे काही प्रमाणात शेती विकसित होईल अशीही त्याची धारणा होती.
अर्थशास्त्रातील इतर विषयांवर माल्थसचे मतः
माल्थस यांनी तत्कालीन अर्थशास्त्राच्या विषयांवर तर भाष्य केलेच परंतु भविष्यात येणार्या काही संकटांचा वेधसुद्धा घेतला. ठशपी (आर्थिक खंड) यावर माल्थस यांनी Principles of Political Economy या आपल्या पुस्तकात भाष्य केले होते. डेव्हिड रिकार्डो (David Ricardo) ह्यांनी माल्थसच्या या भाष्याचे जोरदार खंडन केले. आर्थिक खंड म्हणजे उत्पादनाकरता वाढीच्या जोखमीपेक्षा प्रदान करण्यात आलेला जादा मोबदला. रिकार्डोच्या मते जमिनी कमी असल्यामुळे त्यावर उत्पादनाचा घेतला जाणारा अतिरिक्त पैसा जमीनदाराकडे जातो आणि व्यापारी आणि शेतमजूरांनी कितीही कष्ट केले तरी त्यांच्या स्थितीत काहीच सुधारणा होत नाही. परंतु माल्थसच्या मते ही रक्कम आर्थिक अतिरिक्तता आहे आणि याचे कारण पूर्वजांनी दाखवलेले गुंतवणूकीमधले शहाणपण आहे.
माल्थसने मंदीवरसुद्धा भाष्य केले होते. त्याला General Glut असे नाव दिले. तेव्हाच्या Soy’s Law नुसार मंदी ही अशक्यप्राय गोष्ट होती. डेव्हिड रिकार्डोने याच नियमाचा आधार घेत बाजारपेठांत कधी मंदी येऊ शकत नाही असा निर्वाळा दिला होता. परंतु माल्थसने स्पष्ट केले की बाजारपेठांत जर मागणी कमी झाली, खरेदीची क्षमता कमी झाली किंवा बचत करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली तर ही बाजारपेठेतील तेजी आणि मंदी शक्य आहे. तत्कालीन अर्थशास्त्र्यांनी या विषयावर माल्थसवर खुप टीका केली. पन्नास वर्षांनंतर केरनेसने याच तत्त्वावर सिस्मोंडी व माल्थसचा आधार घेत जागतिक मंदीवर त्याचे प्रसिद्ध भाष्य केले. जनसंख्या आणि अर्थशास्त्रः
लोकसंख्यावाढ झाली की गजुरांची संख्या वाढते, परंतु त्याच प्रगाणात अन्नधान्यात वाढ होत नाही. कागापेक्षा गजूर जारत असल्यामुळे त्यांना गिळणारी गजुरी कगी होते. उपलब्ध अन्नधान्याची लोकसंख्येच्या प्रमाणात कमतरता असल्यामुळे किंमती वाढतात. वाढलेल्या किंमती व कमी मजुरी यामुळे गरिबीत आणखी वाढ होते. कुटुंब चालवण्यात येणार्या अडचणीमुळे जनसंख्यावाढ थांबते आणि हळूहळू जसे मजूर कमी होऊ लागतात तशी मजुरी पुन्हा वाढू लागते. हे चक्र असेच चालू राहते.
Poor Law बद्दल मतः
खालच्या वर्गातील लोकांसाठी इंग्लंड शासनाने Poor Law चा विस्तार करायचे ठरवले. त्यायोगे गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करण्यासंबंधी नवे निकष ठरवले होते. ज्या कुटुंबात जास्त मुले त्यांना जास्त आर्थिक मदत देण्याचे ठरले होते. याला माल्थसने विरोध केला. त्याच्या मते हा कायदा जास्त मुले असलेल्या कुटुंबाला मदत करून जास्त मुले असण्याला प्रोत्साहन देतोय. जास्त मुले म्हणजे जास्त लोकसंख्या — कमी अन्न — जास्त मजूर — कमी मजुरी — आणि शेवटी विषमतेत वाढ. सोबतच जर प्रत्येक गरिबाला शासन आर्थिक मदत करेल तर अन्नधान्याच्या किंमती वाढतील आणि चलनाचे मूल्य बदलेल. कारण लोकसंख्या ही अन्नधान्य उत्पादनापेक्षा जास्त गतीने वाढेल. प्रचंड मागणीच्या तुलनेत पुरवठा तेवढाच राहील किंवा कमी होईल – मागणी आणखी वाढेल व त्याचबरोबर किंमतीही. माल्थसने या कायद्याचे वर्णन गरिबांना गरिबीतच ठेवणारा कायदा’ असे केले. यामुळे गरिबाला गरिबीतच राहण्याची सवय लागते व तो आपली स्थिती सुधारण्यासाठी काहीच प्रयत्न करीत नाही. परंतु त्याने हेसुद्धा नमूद केले की जेव्हा पुरवठा अगदी कमी असतो तेव्हा त्या कालावधीपुरता हा कायदा जनतेच्या उपयोगी पडतो.
Corn कायद्याबद्दल मतः
वाढती महागाई आणि किमती कमी करणे ह्या मागण्यांसाठी जेव्हा व्यापार्यांनी अन्नधान्य आयात करायला सुरुवात केली तेव्हा किंमती कमी झाल्या आणि व्यापार्यांगना नफा मिळू लागला. परंतु यामध्ये स्थानिक जमीनदारांचे लाभ घटू लागले. शेवटी त्यांनी संसदेत कायदा पास करून आयातीवर भरमसाठ कर लावला. किमती पुन्हा वाढल्या. तत्कालीन सर्व अर्थशास्त्र्यांनी या कायद्याचा विरोध केला. मात्र माल्थसने केला नाही. त्याचा युक्तिवाद असा होता की किंमती वाढल्यामुळे जास्तीत जास्त अन्नधान्य-उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल, जास्त जमीन लागवडीखाली येईल, जास्त मजुरांना मजुरी मिळेल आणि जास्त उत्पादन झाल्यामुळे इंग्लंड अन्नधान्याच्या बाबतीत स्वायत्त होईल. त्याच्या मते दीर्घकालीन पल्ला गाठण्यासाठी हा टप्पा आवश्यक आहे. परंतु १८१४ पर्यंत या कायद्यामुळे पसरलेली महागाई आणि अराजक बघून त्याने १८१४ पासून या कायद्याचा विरोध केला. शेवटी नेपोलियन युद्ध संपल्यावर १८१५ मध्ये ह्या कायद्याचा अंल संपुष्टात आला.
लेखावर तत्कालीन प्रतिक्रियाः
या लेखावर अनेक प्रतिक्रिया उठल्या व आजही उठत आहेत. अनेकांनी याचे समर्थन केले, तर काहींनी विरोध केला. बर्युच लोकांनी या लेखापासून प्रेरणा घेतली. William Godwin आणि ऊ डेव्हिड रिकार्डो यांनी माल्थसच्या तकऱ्यांना अनेक वेळा उत्तरे देऊन अनेक नवे मुद्दे उपस्थित केले. विशेषतः डेव्हिड रिकार्डो आणि माल्थसचे द्वंद्व बरेच गाजले. माल्थसने १८०३ ते १८२६ या कालावधीत लोकसंख्या निबंधाच्या एकूण ५ सुधारित आवृत्त्या काढल्या. त्यात त्यांनी विरोधकांकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. fastern: William Godwin, David Ricardo, Robert Owen, William Hazlit, Engels, Karl Marx, Economist Julian Lincoln Simon. समर्थन : Charles Darwin and Alfred Russel Wallace, Ronald Fisher, John Stuart Mill, Paul R. Ehrlich, Francis Place, Raynold Kaufgetz, Garrett Hardin, John Maynard Keynes, Mao Zedong. JHTC … Charles Darwin, Alfred Russel Wallace, Paul Ehrlich, John Maynard Kaynes यांनी माल्थसच्या विचारांचे जोरदार समर्थन केले आहे. K Eric Drexler, Ted Robert Gurr, Albert Allen Bartlett, President of the United States of America Jimmy Carter, Science-fiction author Isaac Asimov यांनीसुद्धा माल्थसच्या विचारांचे समर्थन केले आहे.
माल्थसच्या निबंधाचे परिणामः
* इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान Pitt ho Poor’s कायद्याचे विस्तार करणारी दुरुस्ती संसदेत आणण्याच्या विचारात होते. माल्थसच्या निबंधानंतर त्यांनी तो निर्णय स्थगित केला.
* इंग्लंडची पहिली जनसंख्या गणना १८०१ ला सुरू झाली आणि दर १० वर्षांनी ती करायचे ठरले.
* १९३४ ला Poor’s कायद्यामध्ये सुधारणा केली गेली.
* Francis Place याने माल्थसकडून प्रेरणा घेऊन संततिनियमनाचा पहिला पुकार केला.
* Charles Darwin, Alfred Russel Wallace या दोघांनी माल्थसच्या निबंधाची मदत घेऊन आपले प्रसिद्ध संशोधन मांडले आहे.
* Paul Ehrlich व John Maynard Kaynes यांनी आपापले तत्त्वचिंतक व अर्थशास्त्रीय विचार माल्थसच्या निबंधाला पाया ठेवून पुढे मांडले आहेत. माल्थसचे पुढील आयुष्यः
निनावी निबंध गाजल्यानंतर लवकरच माल्थस हा त्याचा लेखक आहे हे लोकांना कळले. त्यासाठी त्याला प्रसिद्धीइतकीच टीकाही सहन करावी लागली. पहिला निबंध त्याने Godwin, Condorcet व इतर असा विशेष उद्देशून लिहिला होता. त्यानंतर माल्थस १७९९ मध्ये जर्मनी, रशिया, Scandinavia येथे फिरला. सोबतच त्याने १८०२ मध्ये फ्रान्स, स्वित्झर्लंड येथील दौरे केले. यात त्याने जनसंख्येबद्दल आणखी माहिती गोळा केली. इ.स. १८०३ मध्ये त्याने दुसरा सुधारित निबंध प्रसिद्ध केला. हा निबंध आधीच्या तुलनेत बराच सविस्तर होता आणि त्यात इतर देशाची तुलनात्मक माहिती, वेगवेगळ्या कालखंडात घडलेल्या घडामोडी, युद्धे, विकसित व विकसनशील देशांची तुलनात्मक स्थिती, निसर्गाचे प्रकोप इत्यादी विषयांवर सखोल विवेचन दिले होते. सोबतच त्यात जुने Adam Smith, Wallace, David Hume चे दाखले आणि त्यावरील टीकाटिप्पणी होतीच. इ.स. १८०४ मध्ये हर्रिएत (Hariet) हिच्याशी त्याचे लग्न होऊन त्याला २ मुले झाली. इ.स. १८०५ ला तो East India Company College, Hertfordshire येथे इतिहास आणि राजकीय अर्थशास्त्र या विषयाचा प्राध्यापक म्हणून नियुक्त झाला. विद्यार्थ्यांनी त्याचे टोपणनाव ‘पोप’ असे ठेवले होते. १८१८ ला तो Royal Society Mm Fellow म्हणून नियुक्त झाला. १८२१ ला Royal Associate of Royal Society of Literature म्हणून निवडला गेला. १९३४ ला तो Statistical Society चा पहिला Fellow म्हणून निवडला गेला. डिसेंबर १८३४ ला हृदयविकाराने थाँ स रॉबर्ट माल्थसचे निधन झाले. मृत्युसमयी ते ६८ वर्षांचे होते.
आजच्या युगात माल्थसच्या विचारांचे महत्त्वः
माल्थसने सांगितलेले निसर्गाचे अडथळे आज अस्तित्वात नसल्यासारखे वाटत आहेत. हरितक्रांतीने अन्नधान्याची कमतरता तात्पुरती तरी दूर केलेली आहे. परंतु आजही विकसनशील आणि अविकसित देशां ध्ये लोकसंख्या विस्फोटचा प्रश्न ऐरणीवर दिसतो आहे. आजही ३.६ सेकंदाला एक मूल कुपोषणाने मरते आहे. दररोज २४०८४ लोक भुकेने मरतात. अन्नाची टंचाई जेथे जेथे आहे तेथे अराजक, युद्धे, दुष्काळ, मृत्यू हे सुरूच आहेत. अश्या ठिकाणी राहणे अतिशय असुरक्षित झाले आहे. लुटमार, टोळ्या, माफिया, अमली पदार्थांची तस्करी, अवैध धंदे हे अशा ठिकाणीच जास्त फोफावतात. आज अन्नटंचाईसोबतच पाणी टंचाई, नैसर्गिक साधनसंपत्ती, तेल, सोने-हिन्याच्या खाणी, नैसर्गिक वायू यामुळे चालू शतकात युद्ध व्हायची स्थिती सतत बनलेली असते. समुद्री चाचे, नक्षलवादी, दहशतवादी हे प्रामुख्याने अशाच ‘नाही रे’ प्रदेशातून येत असतात. या सर्वांचे कारणसुद्धा अवास्तव आणि अनिर्बंध लोकसंख्या हेच दिसते. वाढलेला भ्रष्टाचारसुद्धा याचे एक मूर्तित उदाहरण आहे. प्रत्येकाला वाटते की आपण पुढे जावे, संधी आपल्याला मिळावी. कारण वाढलेल्या लोकसंख्ये ळे संधी कमी आणि स्पर्धा जास्त आहे. त्यामुळे लोक इतरांना कोणत्याही रीतीने मागे टाकून पुढे जाऊ बघतात. सोबतच सरकारी कार्यालयांत इतके काम असते की कुणाचे काम आधी करण्यासाठी पैसे मोजावे लागतात. ह्यालाही कारण वाढलेली लोकसंख्या, वाढलेली कामे आणि काम करणार्यांवची कमतरता हेच दिसते. यालाच माल्थसच्या शब्दांत परत सांगायचे झाल्यासः “Yet in all societies, even those that are most vicious, the tendency to a virtuous attachment is so strong that there is a constant effort towards an increase of population. This constant effort as constantly tends to subject the tower classes of the society todistress and to prevent any great permanent amelioration of their condition.” – Malthus T. R. 1798. An Essay on the Principle of Population. Chapter II, p 18 in Oxford World’s Classics reprint.
प्रत्येक समाजात एकमेकांसोबत प्रेाचे बंध प्रस्थापित करण्याची प्रवृत्ती इतकी बळकट असते की लोकसंख्यावाढीचे काम अविरतपणे सुरू असते. त्यामुळे समाजाचा एक मोठा वर्ग कायम दुःखात लोटला जातो आणि त्याला मदत करणारे कोणतेही प्रयत्न लोकसंख्यावाढीमुळे निष्फळ ठरतात.” हे माल्थसचे सूत्र आहे. लोकसंख्यावाढीवर ब्रह्मचर्य हा उपाय आहे असा विचार मांडणारा माल्थस हा मुळात समाजशील व्यक्ती होता. आणि विशेषत: David Ricardo आणि Mill या तिघांची मैत्री अतिशय घट्ट होती. आणि सोबतच ते अर्थशास्त्रातील बऱ्याच तत्त्वांवर एकमेकांचे कट्टर विरोधक होते. माल्थस हा समकालीन लेखकांध्ये आधी बराच प्रसिद्ध झाला. मग अनेकांनी त्यावर खूप टीका केली. लोक परत परत त्यांनी लिहिलेल्या निबंधातील मुद्दे शोधून आजही नव्याने टीका करत असतात. माल्थसने खूप मार्मिक मुद्द्याला हात घातला होता. जेव्हा सर्व आलबेल असल्याची धारणा सर्वांना दिलासा देत होती आणि वातावरणात आशावादी सूर होता तेव्हा माल्थस आणि डेविड रिकार्डोने वेगळेच सत्य जगासमोर आणले. त्यांनी दाखवून दिले की आपण आभासी जगात जगतो. स्थिती तेवढी समाधानकारक नाही. मनुष्यजात स्वतःच्याच ओझ्याखाली दबत चालली आहे. त्याने पूर, नैसर्गिक आपत्ती, साथीचे आजार, दुष्काळ यांना योग्य कारणे दिली. सामाजिक आणि वैयक्तिक बंधने पाळावी असे आवाहन केले. स्वतःवर नियंत्रण ठेवल्यानेच आपण जगाचे दुःख आणि गरिबी दूर करू शकतो ही क्लेशकारक जाणीव त्याने प्रत्येकाच्या माथी दिली. आलबेल मनोवृत्तीतून जबाबदारीच्या मनोवृत्तीत ढकलणारा म्हणून माल्थस त्याच्या काळात सर्वांत जास्त टीकेचा धनी होता व आजही आहे. परंतु त्याने जगाला एका दुःस्वप्नातून जागवले आणि प्रवाह कुठे चालले आहेत हे निष्पक्षपातीपणे, जसे त्याला दिसले तसे सांगितले. ही सत्यस्थिती समाजाला सांगून सर्वांना जागरूक करणे हा त्याचा दोष कधीच म्हणता येणार नाही.
मेडिकल ऑफिसर, पीएचसी कटकुम्भ, ता. चिखलदरा, जि. अमरावती
या प्रथेला वेश्याव्यवसाय म्हणणे सर्वथैव चुकीचे आहे. स्त्रीचे लैंगिक स्वातंत्र्य हिरावून व तिच्यावर एकपतित्व लादूनच स्त्रीजातीच्या सतीत्वाचे व स्त्रीजातीच्या एका विभागाच्या वेश्यावृत्तीचे विरोधी ऐक्य अस्तित्वात आलेले आहे. तिबेटी लोकांत जोपर्यंत समूहविवाह प्रचलित होता, तोपर्यंत तिबेटमध्ये एकही वेश्या आढळत नव्हती; परंतु त्याच काळात खालचे प्रदेश व काश्मीर व्यक्तिगत विवाहाकडे वळल्यामुळे तेथे वेश्यांचा सुळसुळाट झाला. म्हणून जो समाज स्त्रीपुरुषांच्या स्वैरसंभोगाची प्रथा पाळतो त्यात वेश्यावृत्ती असू शकत नाही. – शरद पाटील (दास-शूद्रांची गुलामगिरी मधून)