पण जर स्त्रीने स्वःतःला मोकळे सोडलेच नाही, तर ती कोठवर जाऊ शकते हे तिला कसे कळेल ? जर तिने आपल्या पायातले उंच टाचांचे बूट काढले नाहीत तर ती कोठवर चालू शकते किंवा किती जोरात पळू शकते, हे तिला कसे बरे कळणार ? मरणाला टेकलेले सर्व समाज पुरुषी आहेत. केवळ एक पुरुष असणारा समाज जगू शकतो, पण स्त्रियांचे दुर्भिक्ष असणारा समाज टिकाव धरू शकणार नाही.
— जर्मेन ग्रीअर
स्त्रियांना सु ार पुरुष हवे असतात, आणि पुरुष अधिकाधिक सु र बनण्यासाठी प्रयत्नशील आहेत. — मागरिट मीड
जखडलेय जखडलेय जखडलेय. जखडलेय. जखडलेय हे कळल्याने जे तू केले आहेस. जखडलेय या भयाने जे तू करू शकतोस. जखडलेय ह्या तुझ्या भयाने जे आता झालेय माझे. जखडलेय. मी जखडलेय. मी घाबरतेय कभिन्न काळोखाला. मी घाबरतेय माझ्या भावभावनांना. मी अधीन झालेय वासनाविकारांना. मी घाबरतेय पैपैशाला. मी अवलंबून आऽहे प्रेमावर. मी घाबरतेय माझी मलाच. जखडलेय. घरात जखडलेय. कदाचित जर मी घरी राहिले आज रातीला, तर तू फिरकणार नाहीस. कदाचित जर मी जागी राहिले, तर तू मला दुखावणार नाहीस. कदाचित जर मी अशी राहिले, तर तू तसे करशील. कदाचित जर मी तशी राहिले, तर तू असे करशील. कदाचित जर मी……. परंतु मार आदळतोच असाही आणि तसाही जखडलेय. मी जखडलेय. रतिसुखांतिकेच्या अनिवार्यतेपोटी. घाबरतेय सारं सोडून देण्यासाठी. घाबरतेय गाडी पकडण्यासाठी, रस्ता ओलांडण्यासाठी, माझं घर सोडण्यासाठी. घाबरतेय नक्कीच मी मरून जाईन. घाबरतेय नसतेपणात मी विरून जाईन. जखडलेय. मी जखडलेय. मी जखडलेय आणि निश्चयाने सरसावलेय बदलायला जो तू आहेस बदलायला जे तू केलेयस बदलायला जी मी आहे. जखडलेय. मी जखडलेय. तुझे हात फकडताहेत माझा गळा.
तुझे दात आवळताहेत माझी छाती. तुझे क्रूर आणि खुनशी शब्द लुटताहेत माझे हृदय.
आणि तुझे डोळे उचलून नेताहेत माझा आत्मा. जखडलेय. मी जखडलेय.
अॅन मेरिडिथ (न्यूयॉर्क, यू.एस.ए.) (अनुवाद – राजीव कालेलकर, मोबा.९००४६१४५९४)
पत्रसंवाद अनामिक
(आसु कडे हे मुद्रित इंग्रजी पत्र टपालाने आले. विषय खरोखरीच गंभीर आहे. एका नैसर्गिक घटिताचा बळी पडणाऱ्या ह्या माणसाने स्वतःच आपली कर्मकहाणी सांगितली आहे. अनुवादित करून प्रकाशित करीत आहोत. अनुवादात काही त्रुटी राहिली असल्यास पत्रलेखकाने पुन्हा पत्र लिहून ती निदर्शनास आणून द्यावी असे आवाहन करीत आहे. पत्रातील एक गोष्ट मात्र मला खटकली आहे. पाचव्या प्रकारात उभयलिंगींचे वर्णन करताना भिन्नलिंगी संबंधांना लेखकाने नैसर्गिक असे संबोधले आहे. सर्व प्रकारचे संबंध जन्मजात असतात असे सांगण्यासाठी लिहिलेल्या पत्रात त्यांनी असा निर्देश करायला नको होता. तसेच, गे म्हणजे नक्की काय व ते असणे सर्वांत क्लेशकारक कशामुळे, हेही स्पष्ट करायला हवे होते. असो.
हे पत्र वाचून आपण सर्वजण ह्या बाबतीत अधिक जागरूक व संवेदनशील बनण्याचा प्रयत्न करू या. व ह्या विषयावरील चर्चाही पुढे सुरू ठेवू या. लेखांचे स्वागत आहे. – कार्यकारी संपादक.)
प्रिय संपादक,
आजचा सुधारक, नागपूर,
माझ्या एका मित्राने मला आजचा सुधारक मध्ये आलेला डॉ. प्रदीप पाटकर ह्यांचा लेख वाचून दाखविला. माझ्या मते तो गोंधळ व संभ्र निर्माण करणारा लेख आहे. लेखकाने समलिंगी व हिजडे ह्यांच्यात गल्लत केली आहे. जणु काही ते एकाच वर्गातील आहेत. वस्तुतः ते तसे नाहीत. हिजडे ह्या उभयलिंगी व्यक्ती आहेत. त्यांच्यात जन्मतःच लिंगदोष असतो. काही वेळा लहान मुलग्यांचा शिश्नोच्छेद करून भीक मागण्याच्या उद्देशाने त्यांना हिजडे बनविले जाते. त्यांना कदाचित तृतीयलिंगी म्हणता येईल, परंतु समलिंगी मात्र ह्या वर्गात येत नाहीत. ह्या दोन वर्गांत एकच समान घटक आहे, तो म्हणजे समाजाकडून बहिष्कृत होणे. उभयलिंगी व्यक्तींध्ये मात्र कोणताच जन्मजात दोष नसतो. त्यांच्यामध्ये नेहमीच स्त्रियांचे गुणधर्म, त्यांच्यासारखी वेषभूषा व वर्तन करण्याची इच्छा असेलच, असेही नाही. (स्त्रीप्रमाणे वेषभूषा करण्याची इच्छा धरणाऱ्याला व्यस्तवेषी असे म्हणतात.) मी स्वतःच समलिंगी असल्यामुळे मी हे ठामपणे सांगू शकतो की माझ्या अनेक समलिंगी मित्रांप्रमाणे मलाही स्त्री बनण्याची कधीच इच्छा झाली नाही. आपल्या शारीरिक बळासाठी प्रसिद्ध असलेला मी एक उत्तम टेनिस खेळाडू आहे. माझ्या कॉर्पोरेट जगामध्येही मी फार वरचे स्थान व पद प्राप्त केले आहे. माझे काही समलिंगी मित्र पोलिसांत तर काही लष्करातही आहेत. लिंग व रतिकर्म ह्या दोन गोष्टी सोडल्या, तर इतर कोणत्याही निकषांनुसार आम्ही माणसेच आहोत. आम्ही फक्त एकाच बाबतीत वेगळे आहोत, ते म्हणजे आम्ही स्त्रीबरोबर नाही तर पुरुषाशी रत होतो. आमच्यापैकी काहींनी स्त्रैण गुणधर्म दाखविले आहेत हे खरे, पण म्हणून काय झाले! मला तर काही सरळ माणसे अशी माहीत आहेत की ज्यांच्यात स्त्रैण गुण आहेत, परंतु म्हणून काही ते पुरुषांशी रत होत नाहीत. समलिंगी संबंधांतही आम्ही रतिकर्मापेक्षा प्रे व बांधिलकी ह्यांचीच अपेक्षा करीत असतो, ह्याकडे समाज नेहमीच कानाडोळा करीत आला आहे. प्रेमाबरोबर ओघाने रतिकर्म येते, पण मूळ प्रेरक घटक प्रेम हाच असतो.
आमच्यातही काही अघळपघळ मंडळी असतात, परंतु तशी ती भिन्नलिंगींमध्येही असत नाहीत का? सामाजिक दृष्टीने आमच्यात जी त्रुटी आहे, ती आम्हाला जन्मजात मिळालेली आहे, व तीविषयी कोणीच काही करू शकत नाही. लोक समजतात तसा तो काही प्राधान्य किंवा निवड ह्यांचा भाग नाही. भयग्रस्तता, लज्जा, सामाजिक अवहेलना ह्यांनी भरलेले एखाद्या कुष्ठरोग्यापेक्षा हीनदीन असे आयुष्य निवडून कोण घेईल ? सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अलिकडच्याच एका न्यायनिवाड्यात आम्हाला जन्मजात गुन्हेगार ठरविण्यात आले आहे. ह्याचा अर्थ, भारतात ढोबळ मानाने सात कोटी जन्मजात गुन्हेगार आहेत असा करायचा काय ?
बरे मग उभयलिंगी व्यक्तींचे काय ? पाटकर त्यांचा विचार करीतच नाहीत. मार्लोन बँडो पुरुषीपणाचा शिरोणि मानला जातो. त्याचे अनेक समलिंगी संबंध आहेत. अशी अनेक उदाहरणे देता येतील. स्पष्टपणे स्त्री वा पुरुष नसलेल्यां ध्ये पुढील वर्ग आहेत. १. जन्मजात हिजडे – त्यांना स्त्री व पुरुष दोन्ही जननेंद्रिये असतात. हा जन्मजात व जैविक दोष असतो. २. बनावट हिजडे – काही वेळा त्यांना शिश्नोच्छेद करून त्यांना तसे बनविले जाते. काही गे तर काही मध्यमलिंगीही असू शकतात. (स्त्रीप्रमाणे वेशभूषा किंवा एखाद्या भौतिक कृतीत स्त्रीची भूमिका करणारी व्यक्ती. ३. पुं-समलिंगी – (गे हा योग्य शब्द नाही. गे बनणे सर्वात क्लेशकारक आहे) हे असे पुरुष असतात, जे शारीरिक व भावनिकदृष्ट्या पुरुषांकडेच आकर्षिले जातात. ४. स्त्री-समलिंगी – ह्या अशा स्त्रिया असतात, ज्या शारीरिक व भावनिकदृष्ट्या स्त्रियांकडेच आकर्षिल्या जातात. परंतु गे व स्त्रीसमलिंगी ह्यांच्यात शारीरिक व्यंग असे काही नसते. त्यांची जननेंद्रिये ठाकठीक असतात. मात्र त्यांचे भावविश वेगळे असते, एवढेच. ५. उभयलिंगी – ह्या अश्या व्यक्ती असतात, ज्या समलिंगी व्यक्तींबरोबर रतिकर्म करीत असतानाच, निसर्गनियमानुसार भिन्नलिंगी व्यक्तींबरोबरही ते सुरू ठेवू शकतात.
ह्या पत्राखाली मी सही केलेली नाही. कारण उघड आहे. तरीही आपण विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन हे पत्र आपल्या नामांकित मासिकात प्रकाशित कराल अशी आशा आहे. तुमच्या मार्गदर्शकांना तुम्हाला अजाण व संभ्रमित अवस्थेत सोडता येणार नाही. अर्थात त्यांचे उद्बोधन करून ही परिस्थिती फार बदलेल अशातला काही भाग नाही. मी तर अगदीच आशा सोडली आहे. सर्व प्रकारच्या संगाचा परित्याग करून मी एकाकी, व्यथित आयुष्य जगत आहे. ते माझा काटा काढतील अशी भीती वाटते मला. मी एका काळोख्या बोगद्यात प्रवेश केला आहे, ज्याला अंत नाही, प्रकाशाचा किरण नाही. निदान ह्या देशात तरी नाही.
दिवाकर मोहनी, मोहनी भवन, धरमपेठ, खरे टाऊन, नागपूर ४४००१०.
आपल्या देशातील शिक्षणाची परिस्थिती चिंता करण्याजोगी आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. सध्याच्या शिक्षणपद्धतीतून काही बुद्धिमान मुले पुढे येतात हे खरे; पण सामान्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जात विशेष फरक पडलेला दिसत नाही. ह्याची कारणे पुष्कळ आहे; तथापि एकमेकांवर दोषारोप करण्यापलीकडे काहीच घडत नाही. आपल्याला त्यावर उपाय शोधायचे असल्यास थोडा वेगळा विचार करणे आवश्यक आहे असे मला वाटते. आज सर्वांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला असून तो अंमलात आणण्यासाठी आज अस्तित्वात असलेल्या किंवा नव्याने सुरू होणाऱ्या आणि एकाच पद्धतीने शिक्षण देणाऱ्या शाळां धून सर्वांनाच सरधोपट मार्गाने शिक्षण घ्यावे लागते. पण असे एकत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची व्यक्तिशः पात्रता व घरचे वातावरण यांत खूपच तफावत असते. त्या तफावतीचा विचार करून अभ्यासक्रम व शिक्षणपद्धती ह्यांत फरक करण्याची गरज आहे. ह्या गरजेला अनेक बाजू व अनेक कारणे आहेत. त्यांपैकी काही खाली देत आहे –
१) घरात स्थानिक बोली बोलणाऱ्या, ज्यांच्या कानावर प्रमाणभाषा क्वचित पडते अशा मुलांना प्रमाणभाषा शिकविण्याच्या नव्या पद्धतींचा विचारच आजवर झालेला नाही. तो होणे अत्यावश्यक आहे. तो न झाल्याने प्रमाणभाषेपर्यंत ती पोचतच नाहीत. व सर्व विषयांची पुस्तके व सर्वच ज्ञान प्रमाणभाषेत असल्यामुळे सर्वच विषयांत अशी मुले कच्ची राहतात.
२) निरक्षराने साक्षर होणे हे एका संस्कृतीतून दुसऱ्या संस्कृतीत प्रवेश करणे आहे. त्यातही निरक्षर प्रौढांना साक्षर करणे हे अत्यन्त कठीण काम आहे. माणूस एकमेकांशी बोलू लागला त्याला लाखो वर्षे झाली; पण तो लिहू लागला त्याला जमेते पाच हजार वर्षे झाली, असतील. तोंडाने बोललेले शब्द (आवाजाचे संकेत/सांकेतिक आवाज) कानांनी ऐकून त्यातील भाव/अर्थ समजून घेणे आणि हाताने लिहिलेले शब्द (लेखनाचे संकेत/सांकेतिक लेखन) डोळ्यांनी वाचून त्यातील भाव/अर्थ समजून घेणे ह्यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. हे कुणीही सहज समजू शकेल. एवढ्याचसाठी त्या प्रक्रियेला ‘संस्कृत्यन्तर’ असे वर म्हटले आहे. कानांचे काम डोळ्यांनी करण्याची सवय करणे हे सरसकट सगळ्या मुलांना सहजपणे जमत नाही. म्हणून ते शिकविताना ह्या प्रक्रियेला पुरेसा वेळ देऊन अत्यंत हळुवारपणे ते केले पाहिजे. आजच्या पद्धतीत ते तसे होत नाही. नवीन अभ्यासक्रमाचा तपशील व पद्धती ठरविण्यासाठी शिक्षणशास्त्रज्ञांनी ताबडतोब सुरुवात करावी, असे मला वाटते. आजचा सुधारक ह्या बाबतीत काय करू शकेल ?