[द सेकंड सेक्स ह्या स्त्रीवादावरील अग्रगण्य पुस्तकाची लेखिका सिमाँ दि बोवा आणि प्रसिद्ध तत्त्वचिंतक, लेखक जाँ पॉल सार्च ह्यांनी विसाव्या शतकात केलेला सहजीवनाचा प्रयोग अनेक अर्थांनी नावीन्यपूर्ण व वादळी ठरला होता. पुरुषाने वर्चस्व गाजवायचे आणि स्त्रीने त्याच्या छायेप्रमाणे राहायचे ह्या जागतिक गृहीतकाला छेद देत ही दोन स्वतंत्र विचाराची व्यक्तिमत्त्वे विवाह न करता जन्मभर एकत्र राहिली. तो स्त्रीवादी चळवळीच्या सुरुवातीच्या बहराचा काळ होता. तसेच मार्क्सवादाचाही प्रभाव जगभरात होता. बहुतांश स्त्रीवादी लेखन हे स्त्रियांनी केलेले आहे. पुरुषांनी त्यावर सोयिस्कर मौन बाळगले आहे असे मानतात. ह्या पोर्शभू ीवर एका ज्वलंत मुक्तिवादी स्त्रीचा सहचर व विचारवंत सात्र ह्याने स्त्रीवादी चळवळीवर केलेले हे मतप्रदर्शन जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने ह्या अंकात देत आहोत. स्त्रीमुक्तीचा लढा म्हणजे श्रेणीबद्धता, सर्व प्रकारची हिंसा ह्याविरुद्धचा लढा आहे, त्याचे सर्व मानवांच्या मुक्तिलढ्याशी जैविक नाते आहे व असले पाहिजे, स्त्रियां धील अंतर्भेद व तरीही त्यांच्यात शक्य असणारे भगिनीभावाचे नाते व त्यामुळे सर्वंकष स्त्रीमुक्तीची व्यापक शक्यता ड्ड प्रस्तुत चर्चेतील अशा अनेक बाबी आजही स्त्रीविमर्शाच्या दृष्टीने मोलाच्या आहेत.
– कार्यकारी संपादक ]