[सातत्याने घडणारे लैंगिक गुन्हे ही आपल्या समाजातील तीव्र समस्या बनली आहे. दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर हे वास्तव अधिकच विदारकपणे आपल्यासमोर आले. त्या घटनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र गेल्या वर्षांत अशा गुन्ह्यांची वा प्रसारमाध्यमांनी दखल घेतलेल्या गुन्ह्यांची संख्या कमी न होता वाढली आहे. दिल्लीतील पीडित युवतीने अत्यंत धीराने व कणखरपणे त्या प्रसंगाच्या परिणामांना तोंड दिले. ह्याचा आपणा सर्व संवेदनशील स्त्री-पुरुषांना अभिमान आहे. म्हणूनच आपण तिला ‘निर्भया’ म्हटले. परंतु आपण कुणी तिला वाचवू मात्र शकलो नाही. आणखी किती युवतींवर असे अत्याचार होत राहणार आहेत. त्यांपैकी किती ‘निर्भया’ असू शकणार आहेत आणि निर्भया असूनही त्यांचे काय होणार आहे. हे प्रश्न आपल्याला सतावीत आहेतच. ह्या विषयावरचे मूलगामी शास्त्रीय चिंतन करणारा हा लेख आम्ही पुनर्मुद्रित करीत आहोत. ‘बलात्कार’ नामक घटिताचे (हिशपोशपेप) आकलन एक अत्यंत हिंस्र, निंद्य सामाजिक गुन्हा असेच बहुशः होत आले आहे. जेत्यांच्या विकृत मानसिकतेतून त्यांच्या पराभूत शत्रूच्या स्त्रियांवर, मालकांकडून बटीक स्त्रियांवर, जो केला जातो, तो बलात्कार. दुसरा प्रकार म्हणजे एखादी स्त्री आपले वाईट(?) कपडे घालून वा अन्य प्रकारे आपले स्त्रीत्वाचे आह्वान जर फारच जाहीर करीत असेल तर तिच्यावर जो केला जातो तो बलात्कार. यांपैकी पहिल्या प्रकारात जेत्यांकडून तर दुसऱ्या प्रकारात समाजाकडून ‘बरी अद्दल घडली!’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जाते. पण ह्या सर्वांध्ये पुरुषाचीही काही अगतिकता असू शकेल असे आता आतापर्यंत मानले जात नव्हते. प्रस्तुत लेखात ह्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला असून त्याचे शास्त्रीय विश्लेषण केले आहे. बलात्कार ही पुरुषी लैंगिकता व आक्रमकता ह्यांचा एकत्रित तिढा असून ती टेस्टास्टेरॉन नामक संप्रेरकाची किमया आहे. आणि ज्या बौद्धिक (मेंदूच्या) पातळीवर बलात्काराचा जन्म होतो, तेथेच त्याला अटकाव करण्यासाठी ह्या संप्रेरकाचे संतुलन राखणे कसे आवश्यक आहे, ते बिघडवण्यासाठी आपण मानवी इतिहासात आधीच कश्या चुका करून बसलो आहोत, ह्याचे विस्तृत विवरण ह्या लेखात केले आहे. पुरुषांना हिंसा करण्यास उद्युक्त करणारी परिस्थिती आज अनेक बाबतीत दिसते आहे. स्त्री-पुरुषांचे बिघडलेले गुणोत्तर (स्त्रियांचे कमी होत जाणारे प्रमाण) हेही त्याचे एक महत्त्वाचे कारण मानले जाते. आजच्या बालकांध्ये तर हे गुणोत्तर अधिकच बिघडलेले आहे. म्हणजे येणारा त्यांच्या तारुण्याचा काळ किती भयानक असेल ह्याची कल्पना करावी. ह्या विषयावरील एक विस्तृत लेख ‘आसु’च्या डिसेंबर १२ च्या अंकात प्रकाशित झाला होता.
विवाह आणि नीती ह्यांची गल्लत केल्यामुळेही बऱ्याच भानगडी उपस्थित होत आहेत. वर म्हटल्याप्रमाणे मानवी इतिहासातील ती एक घोडचूक आहे. त्यावरही पुन्हापुन्हा विचार करणे गरजेचे आहे. आसु ने पूर्वीपासूनच हा विषय हाताळला आहे. बलँड रसेल ह्यांच्या विवाह व नीति ह्या पुस्तकाचा म.गं.नातू ह्यांनी केलेला अनुवाद, तसेच दिवाकर मोहनी ह्यांचे ह्या विषयावरील विपुल, तलस्पर्शी लिखाण हे सारे आमच्या जुन्या वाचकांच्या स्मरणात असेलच. जैविक आणि मानवी उत्क्रान्ती हा देखील ‘आसु’च्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या दृष्टीने मेंदू-बुद्धी मन ह्यांचा परस्परसंबंध, त्यांना कृत्रिमतेने लावलेले वळण, त्याचा मेंदूच्या रसायनशास्त्रावर झालेला परिणाम ह्या सर्वांचे जे विश्लेषण लेखात केले आहे, त्याने मानवी उत्क्रान्तीच्या एका अंगावर प्रकाश पडावा. असे वळण जबरदस्तीने वा वारंवार लावले गेल्यास ते पक्के होत जाते. त्याचा गुणसूत्रांवर परिणाम होत जाऊन ते पुढच्या पिढ्यांध्येही उतरते असे लेखात म्हटले आहे. परंतु विवाहसंस्थेला कितीही प्रतिष्ठा वा उदातता बहाल केली. तरी पातिव्रत्य किंवा पात्नीव्रत्य हे अद्याप जैविक/शारीरिक पातळीवर उतरलेले नाही. परपुरुषाचे शुक्राणु जर विवाहित सधवा स्त्रीच्या गर्भाशयात शिरले, तर त्यांना झिडकारण्याची कोणतीही सोय वा यंत्रणा तेथे नसते असे जे त्या म्हणतात. ते सत्य आहे. शेवटी, स्त्रियांवरील अत्याचाराचा व त्या अनुषंगाने स्त्री व पुरुष समानतेचा विचार निसर्ग, उत्क्रान्ती, वंशवृद्धीची मूलभूत प्रेरणा (instinct) शरीराची जडणघडण (मेंदू त्यातच येतो) ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन शास्त्रीय अंगानेच करावा लागेल. आमच्या वाचकांनी तो करावा, लेखरूपात आम्हाला लिहून पाठवावा आणि ही चर्चा आपल्या सर्वांच्या तत्त्वबोधासाठी पुढे न्यावी ह्यासाठी हे नम्र आवाहन. — कार्यकारी संपादक ]
चार्ल्स डार्विनने ‘नॅचरल सिलेक्शन’चा सिद्धान्त मांडला. त्यातून ‘सेक्शुअल सिलेक्शन’चा मुद्दा पुढे आला. निसर्ग ‘सेक्शुअल सिलेक्शन’मधून ‘नॅचरल सिलेक्शन’ साधत असतो. असा त्याचा एक अर्थ! पाश्चात्त्य संशोधक ‘सेक्शुअल सिलेक्शन’ याकडे नराने व मादीने एकमेकांना ‘लैंगिक संबंधासाठी निवडणे’ इतक्या संकुचित अर्थाने पाहत नाहीत. तर एकूण पुनरुत्पत्तीच्या आणि सर्वोत्तम निर्माणासाठीच्या कल्पनेतून निसर्ग ‘सेक्शुअल सिलेक्शन’चा कसा उपयोग करून घेतो? या पद्धतीने ते त्याकडे पाहतात. म्हणजे, झाडावरच्या आकर्षक फळांकडे प्राणी-पक्षी आकर्षित होतात. ती फळे खाल्ल्यावर, त्या फळांच्या बिया त्यांच्या पचनमार्गातून प्रवास करत विष्ठेतून बाहेर पडून अनेक ठिकाणी रुजतात. अशा रीतीने आकर्षक फळा- फुलांची निर्मिती करून वनस्पतींनी पशु-पक्ष्यांना आकर्षित करून आपली पुनरुत्पत्ती साधणे. यालासुद्धा संशोधक ‘सेक्शुअल सिलेक्शन’ संबोधतात. प्राणी, पशू व पक्षी ह्यां ध्ये मात्र, या सिलेक्शनसाठी नर व मादीमध्ये एकमेकांसाठी संकेतावली असते. त्यामध्ये, विशेष करून प्राण्यां ध्ये नर असतो, ज्याचा रंग, आवाज, डोक्यावरचा तुरा, पिसारा हे त्यांच्या प्रजोत्पादनाच्या हंगामात आकर्षक बनतात. ह्या त्याच्या वैशिष्ट्यांधील सर्वोत्तमता ओळखून त्याची निवड करण्याचे जीन्स मादीमध्ये असतात. त्याप्रमाणे ती त्या नराकडे आकर्षित होत असते. मध्य अमेरिकेतील बेडकाच्या एका जातीत, बेडूकमादी जितक्या हर्ट्स (—) तीव्रतेचा आवाज ऐकू शकते तितक्या हट्ट ध्ये साद घालण्याचे स्वरयंत्र बेडूकनराचे असते. त्यामुळे एकमेकांची ठिकाणे ती दोघे शोधून काढू शकतात. सहचरांपैकी एकाने कोणीतरी रंग, गंध, स्वर, रुबाब अशी खूण (इंडिकेटर) धारण, करायची, तर दुसऱ्याने तो संकेत हेरून, तिकडे आकर्षित करणारी त्याच्या मेंदूची रिसेप्टर क्षमता धारण करून सर्वोत्तम खूणधारक सहचराची निवड करायची, याला ‘सेक्शुअल सिलेक्शन’ म्हटले जाते आणि त्याकरता नर व मादी दोघांनाही व्यक्त होणे भाग पडते, प्रतिसाद देणे किंवा निवड करणे त्यांतून साध्य होते. मनुष्यप्राण्यागध्ये मात्र बुद्धी, विचार, भावना फार प्रगत आहेत. पुरुषाने सुंदर तरुण स्त्री हेरणे आणि स्त्रीने पुरुषाचे शारीरिक सागर्थ्य हेरणे, हा गाणसागधील ‘सेक्शुअल सिलेक्शन’चा बेसिक निसर्गनियम आहे. तरी उत्क्रान्तीच्या ओघात बुद्धीच्या विकासामुळे या निसर्गनियमावर मानवी प्रगतीचे थर चढत गेले आणि आज, आपला व्यवसाय-नोकरी, आपले शिक्षण, आपल्या गरजा, आवडी-छंद, आपली कुटुंबकल्पना, आपली सांपत्तिक स्थिती, आपली संस्कृती, आपली असुरक्षिततेची भावना यांबाबत पूरक ठरणाऱ्या अनेकविध मुद्द्यांवर स्त्री व पुरुष आपापले ‘सेक्शुअल सिलेक्शन’ ठरवतात आणि म्हणून संशोधक त्याला ‘सोशल सिलेक्शन’ म्हणतात. जे पशुपक्ष्यां ध्ये असू शकत नाही. माणसामध्ये, सहचर-निवडीमध्ये अशा रीतीने कौटुंबिक व सामाजिक हस्तक्षेप येत गेला, तरी पशु-पक्ष्यांप्रमाणे एकमेकांमध्ये ‘लैंगिक व्यक्त’ होण्याची नैसर्गिक ऊर्मी माणसामध्येसुद्धा (बुद्धिपातळीवर) तशीच टिकून राहिली, हजारो वर्षे, अगदी विवाहप्रथा येईपर्यंत ! हे व्यक्त होणे अतिप्राचीन काळात प्रगल्भ भाषेअभावी चित्र आणि शिल्प यांधून होत होते. मनुष्यजीवनात भाषामाध्यमाचा प्रवेश झाल्यावर मात्र, स्त्री व पुरुष अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या लैंगिक कामनेबाबत एकमेकांकडे व्यक्त होऊ लागले. असे अनेक पुराव्यांवरून, साहित्यावरून लक्षात येते. आनंद, दुःख, वेदना, भूक यांना जितक्या सहजतेने भाषेतून व्यक्त करता येत होते, तितक्याच सहजतेने आपापली कामभावना व्यक्त करणे, हे स्त्री-पुरुष शरीरसंबंध मुक्त असतानाच्या काळात, अत्यंत स्वाभाविक आचरण होते. ‘व्यक्त लैंगिकतेच्या’ आधुनिक कालखंडाची सुरुवात ही अशा रीतीने मानवी जीवनात भाषेनंतर आली. त्याचे वेदाकाळातील पुरावे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आपल्या भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या पुस्तकातून देतात, ते असे, “अग्नीभोवती हे रानटी लोक रतिकर्म संपादीत. मनाला वाटेल त्या स्त्रीला त्या पुरुषाने रत्यर्थ धरून न्यावे! ज्या स्त्रीला कुणीच धरून न नेई, ती स्त्री हिरमुसली होई व रडे, की आपणास कुणी धरून नेत नाही. हे रानटी ऋषिपूर्वज यज्ञभूीवर म्हणजे अग्निकुंडाभोवती धगधगीत उबेसाठी जमत! लिंग व योनी यांचा वाचक-शब्द एकमेकांना उद्देशून हरहमेशा बोलत आणि नाका डोळ्यांप्रमाणेच हे दोन्ही अवयव त्या रानटी टोळ्यांत उघडे असल्यामुळे या अवयवांचे वाचक-शब्द उच्चारण्यात त्यांना कोणताच विपरीतपणा वाटत नसे.” ‘यज्+न’ म्हणजे ‘ते जमून प्रजोत्पादन करतात’ असा यज्ञ या शब्दाचा मूळ अर्थ रानटी ऋषिपूर्वजांच्या भाषेत होता, असे इतिहासाचार्य राजवाडे लिहितात. तसेच गर्भ, योनी, रेत, इंद्रिय, वृष, वृषण, वीर्य, ज्यांचा उच्चार आपल्याला अश्लील वाटतो, ते सर्व शब्द यजुःसंहितेत अग्नीच्या सहाय्याने पदोपदी आढळतात असे वि. का. राजवाडे नोंदवतात. मधो ध अग्नी पेटवून, त्याभोवती समागम, रतिकर्म खुलेआम करणारे आपले पूर्वज स्त्री-पुरुष हे एकमेकांना लिंगवाचक शब्द उच्चारून कामोत्तेजित करत असत. भाषुळे स्त्री-पुरुषांचे लैंगिक व्यक्त होणे, जसे अधिक स्पष्टपणे विकसित होत गेले, तसे लैंगिक व्यक्त होण्यामुळे भाषासुद्धा त्या विषयात समृद्ध होत गेली. जसे, एखाद्याचा जन्म, ‘अयोनिज’ असे प्राचीन काळी म्हटले जाई. इथे ‘योनी’ या शब्दांचा अर्थ ‘गृह’ असा आहे ‘अयोनिज जन्म’ म्हणजे घरामध्ये न झालेल्या (घराबाहेरच्या) समागमातून जन्मलेले मूल ! अग्नीभोवती जमून केलेल्या सामुदायिक समागमातून द्रौपदी व सीता यांचे जन्म झाले म्हणून त्यांचा ‘अयोनिज’ असा उल्लेख आढळतो. म्हणजे समागम कुठे झाला ? ते स्थलनिर्देशक संबोधन भाषे ध्ये आले, त्याचबरोबर एखादा पुत्र किंवा कन्या ‘अयोनिज’ आहे असे सहज म्हणण्याचा एक प्रांजळ धीटपणासुद्धा इथे लक्षात येतो. या रानटी ऋषिपूर्वजांचे वंशज म्हणता येईल असा आजचा समाज म्हणजे अंतर्भागात वस्ती करून राहणारे आदिवासी लोक! ट्रायबॅलिझम इन इंडिया या पुस्तकात लेखिका कमला चट्टोपाध्याय या आदिवासींबद्दल लिहितात, “सेक्स हे ट्रायबल समाजात अत्यंत नैसर्गिक मानले जाते. प्रत्येक वस्तूला लैंगिक सहकारी असतो अशी त्यांची समजूत आहे. त्यामुळे लैंगिकता ही दाबून टाकण्याची, लपवण्याची वा लाज वाटण्याची बाब ते समजत नाहीत. स्वतःच्या दिसण्या वा असण्याबाबत ते कधीच जागरूक नसतात. लिंग अवयव इतर अवयवांप्रमाणे ते समजतात. त्यामुळे तारुण्यात, विवाहपूर्वी ते मोकळेपणाने लैंगिक जीवनाचा आनंद घेतात. लैंगिकतेला ते नैतिक बनवत नाहीत. दोन तरुण माणसांना संबंधासाठी एकत्र आणणे, हा त्यांच्या लग्नाचा हेतू नसतो, तर लग्न म्हणजे दोघांच्याही मुक्त लैंगिक जीवनाचा शेवट असतो.”
ज्या भाषामाध्यमातून प्राचीन स्त्री-पुरुष कामेच्छा व्यक्त करण्याबाबत अधिक मोकळे झाले, त्याबाबतचे आणखी काही पुरावे आपल्या प्राचीन वाययातून सापडतात. जसे, रामाला ‘तू मला आवडलास’ असे मोकळेपणाने सांगून त्याला शरीरसंबंधाविषयी विचारणारी शूर्पणखा आपण पाहतो. चित्रांगदा आणि उलूपीने अर्जुनास तर हिडिंबेने भीमास, स्वतःला पुत्रप्राप्ती होईपर्यंत स्वगृही वास्तव्यास राहण्याचा केलेला आग्रह आपल्याला माहीत आहे. प्राचीन काळात ऋषी वामदेव्य व्रते करत असत आणि ही व्रते यज्ञभू वर करत असताना, कोणत्याही स्त्रीने संभोगेच्छा दर्शवणे, ही स्वतःची कामभावना व्यक्त करण्याची अगदी स्वाभाविक वाटणारी कृती होती. विश्रवाऋषी तपःसाधना करत असताना, त्यांच्यावर भाळलेल्या कैकसी नामक स्त्रीने आपली संभोगेच्छा ऋषीला सांगितली. विश्रव्याने ती पुरी केली आणि त्या संबंधातून रावणाचा जन्म झाला (संदर्भ-कथाकल्पतरु). स्त्री-इच्छेने होणारे हे सर्व समागम असल्याने त्यांना बलात्कार म्हणता येत नाही. अशा प्रकारे पराशर ऋषीबरोबर स्वच्छेने संबंध ठेवणारी सत्यवती व विवाहापूर्वी सूर्याशी स्वेच्छेने संबंध करून कर्णाला जन्म देणारी कुंती आपल्याला ठाऊक आहेत. एकूणच भारतीय उपखंडात, मुक्त लैंगिक आचरण आणि व्यक्त लैंगिक विचारांबाबत कोणताही संकोच दिसत नाही आणि चोरटेपणा आढळत नाही. कारण तत्कालीन लैंगिक धारणा (धर्म) आजच्यासारखी सदोष दृष्टिकोनातून निपज झालेली धारणा नव्हती. पुरुषापासून स्त्रीला गर्भ राहतो, हे जैविक सत्य शेकडो शतके स्त्री-पुरुषांना ज्ञात नसल्यामुळे, स्त्रीचा तो चमत्कार मामला जात होता. मानवी संघर्षात झालेली जीवितहानी भरून काढणाऱ्या स्त्रीच्या शरीरधर्माला त्यामुळे मोठा मान होता. ‘जनन’ (जन्म) करणाऱ्या स्त्री-जननेंद्रियांचे पूजन होत होते. जसे, स्त्रीच्या गर्भाशयाला ‘घट’ संबोधून घटपूजनाची परंपरा आजही टिकून आहे. भू तेचे फळणे, फुलणे आणि स्त्रीमातेचा गर्भारपणा या एकच क्रिया प्राचीन भारतीय संस्कृतीत मानल्या जात होत्या. जमिनीतून कोंब फुटतो तद्वत स्त्री-शरीरातून मूल बाहेर येते, या तत्कालीन समजुतीतून नापीक जमिनीवर रजस्वला स्त्रियांनी स्नान करावे, नांगर धरावा, पर्जन्यनृत्य करावे अश्या पद्धती होत्या. त्रावणकोरमध्ये ‘त्रिपुरवत्तु’ नावाचा देवीचा रजःस्रावविधी पाळला जातो. या काळातील देवीच्या वस्त्रास फार महत्त्व असते व प्रसाद म्हणून त्याचा स्पर्श प्राप्त करून घेण्यास भक्तजनांची धडपड असते. यावरून स्त्री-शरीरधर्मास सन्मानाचे असणारे प्राचीन स्थान लक्षात येते.
मात्र, त्यानंतर विवाहामुळे उदयास आलेल्या पितृसंस्कृतीने पितृत्वाचे महत्त्व जनमानसावर ठसवण्याच्या भरात, स्त्री-शरीरधर्माचा सन्मान मातीमोल केला गेला, असे म्हणावे लागते. कामभावनेबाबत इतका स्वच्छ, निकोप आणि मुक्त दृष्टिकोन भारतीय समाजात प्रचलित असताना, असे कोणते वादळ आले, की ही सुदृढ समाजव्यवस्था पूर्ण १८० अंशातून उलटी फिरली, आणि कामभाव व्यक्त होण्याचे सर्व मार्ग बंद होऊन स्त्री-पुरुषांचा लैंगिक धर्म जखडला गेला! हे वादळ होते, विवाहप्रथेच्या आगमनाचे! नांगराच्या तंत्रानंतर मोठमोठी जमीनक्षेत्रे लागवडीखाली आली. जमीनदारशाही उदयास आली. जमीनदारांचे व शेतमजुरांचे वर्ग उदयास आले. आपल्या जमिनीचा आणि शेतीउत्पन्नाचा वारस कळण्यासाठी स्त्रीच्या अनेक पुरुषांबरोबरच्या संबंधावर बंदी आणण्याकरता विवाहसंस्कार स्वीकारून स्त्री-शरीराचे खाजगीकरण पहिल्याप्रथम वास्तवात आणले गेले. प्रत्येक स्त्रीची कामेच्छा ही तिच्याशी विवाह करणाऱ्या पुरुषाची स्वतःची खाजगी बाब झाली आणि तेव्हापासून विवाहितेबरोबर अविवाहित मुलीलासुद्धा त्याच दृष्टीने पाहिले जाऊ लागले आणि येथून ‘अव्यक्त लौगिक धर्माचा’ कालखंड सुरू झाला. विवाहाला दोषी ठरवण्यासाठी प्रस्तुत मुद्दा नाही, हे प्रथम, थोडे विषयांतर करून समजून घेऊया,. वास्तविक विवाहप्रणीत कुटुंबरचना ही एका मर्यादित अर्थाने आदर्श व्यवस्था म्हणावी लागते. कारण अपत्याला मातेबरोबर जैविक पित्याचाही लाभ होतो. त्याचबरोबर आई-मुलगा किंवा भाऊ-बहीण या मातृकुळातील स्त्री-पुरुष नातेसंबंधात, “पिता-कन्या’ या आणखी एका स्त्री-पुरुष नात्याची भर, ही विवाहाची मोठी देणगी आहे. शिवाय ‘माता-मूल’ या मूळच्या नैसर्गिक कुटुंबात, विवाहामुळे पुरुषाचा पिता म्हणून प्रवेश झाल्यापासून, गेल्या तीन-चार हजार वर्षांत पुरुष त्याच्या नरमांसभक्षक आणि हिंस्र अशा रानटी मनोऽवस्थेतून, या सुसंस्कृत स्थितीला येण्यास विवाहामुळे हातभार लागला. बायॉलाजिकली, पुरुषामध्ये काही हार्मोनच्या पातळ्यासुद्धा विवाहानंतरच्या तीन-चार वर्षांत बदललेल्या दिसतात. उदाहरणार्थ – ऑक्सिटोसीन हे प्रे, ममत्व, वात्सल्याचे हार्मोन एकांड्या पुरुषापेक्षा,पिता-पुरुषामध्ये वाढलेले असते, असे आधुनिक संशोधक नोंदवतात. त्यामुळे विवाहाचा स्वीकार ही चूक नाही. चूक आहे ती, विवाह-चौकटीतले स्त्री-पुरुष शरीरसंबंध तेवढेच फक्त नैतिक आणि पवित्र मानण्याची! विवाहाविना होणारे शरीरसंबंध आणि त्यामुळे होणारी संतती म्हणजे पाप असे ठरवणे, इथे ती चूक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विवाहाचा प्रथमपासूनचा उद्देश हा ‘पुरुषाचे पितृत्व समजणे’ असा होता. प्रत्येक अपत्याला पिता मिळवून देणे, असा तो कधीच नव्हता. म्हणूनच तर विवाहबाह्य संततीचे पितृत्व, पुरुष सहजपणे नाकारत राहिले. या वस्तुस्थितीचे फार अघोरी परिणाम स्त्रियांच्या व पुरुषांच्या मानसिकतेवर झाले. विवाहप्रथुळे पुरुषाची स्त्रीविषयीची मानसिकता आणि दृष्टी कशी क्रमाक्रमाने बदलत गेली, त्याचे बोलके पुरावे भारतीय वाययातून भरपूर मिळतात. मुक्त शरीरसंबंध बंद पाडल्यामुळे त्या पायावर उभ्या असलेल्या मातृसंस्कृतीची पिछेहाट होऊ लागली आणि पितृसंस्कृतीचे मातृगणांवर हल्ले सुरू झाले. कौटुंबिक, सामाजिक कलह आणि राजकीय युद्धेसुद्धा या संस्कृतिसंघर्षातून सुरू झाली. रामायण आणि महाभारत ही युद्धे म्हणजे मातृप्रधान विरुद्ध पितृप्रधान संघर्ष असल्याचे आजचे संशोधक मानतात. मातृसंस्कृतीच्या रिवाजानुसार शूर्पणखा रामाला शरीरसंबंधाबाबत मोकळेपणाने विचारते, तेव्हा पितृसंस्कृती मानणारा राम तिला विवाहाचे महत्त्व सांगतो. त्यावर शूर्पणखा प्रतिवाद करते, म्हणून राम, लक्ष्मणाकरवी तिचा चेहरा विद्रूप करतो. विवाहाच्या सक्तीसाठी स्त्रीवर झालेला भारतीय संस्कृतीतला दहशतीचा हा पहिला ज्ञात हल्ला! त्यावर रावण लगेच युद्ध छेडत नाही, तर विवाहाचे दर्दभरे परिणाम रामाला भोगायला लावण्यासाठी, तो रामपत्नीसीतेला पळवतो. रामाच्या मनातील सीतेविषयीच्या चारित्र्याच्या संशयातून राम व सीतेचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झाल्याचे सिद्ध होणे आणि विवाहाच्या पावित्र्याचे पितळ उघडे पाडणे, म्हणजे राम-रावण युद्ध! महाभारतातही पांडव मातृसंस्कृतीतले तर कौरव हे पितृसंस्कृती मानणारे! त्यामुळे कुटुंबात कलह होऊन, तो युद्धापर्यंत पोहोचला. इथेसुद्धा आपण पाहतो की पतीचा पत्नी-शरीरावरचा मालकी हक्क डिवचणे म्हणजे द्रौपदीचे वस्त्रहरण!
विवाहप्रथेच्या पुरस्कर्त्या कौरवांची ती मानसिकता होती. थोडक्यात, विवाहामुळे प्रथमतः राज्यकर्त्या आणि धर्मसत्तेवरच्या पुरुषाची मानसिकता बदलत गेली. त्याची पहिली बळी शूर्पणखा धरून पुढे सीता, अहिल्या, रेणुका, सत्यवती, कुंती, द्रौपदी, अंबा, अंबिका, अंबालिका वगैरे उच्च वर्गातील स्त्रिया पुरुषांच्या या वैवाहिक मानसिकतेच्या बळी झाल्या. विवाह जसजसा सामान्य लोकां ध्ये झिरपत गेला. तसतसा सामान्य स्त्री-वर्गसुद्धा जो एकेकाळी मुक्त- शब्दांतून आपल्या कामवासनेला वाट करून देत होता, तो मूक, निःशब्द, अव्यक्त होऊन गेला. विवाहामुळे मूल्ये इतकी बदलत गेली, की स्त्रीचे जणू लैंगिक धर्मांतरच झाले, तिने कामभाव व्यक्त करणे म्हणजे स्वतःची मर्यादा ओलांडणारी, वाईट चालीची स्त्री अशा नव्या नैतिक (?) समजुतीने समाजव्यवस्था बदलत गेली.
दुसरीकडे पिता दाखवता न येणारी ‘माता-मूल’ ही कुटुंब छळित झाली. विवाहचौकटीलाच फक्त नैतिक ठरवण्यातून असंख्य मुले, माता असूनसुद्धा अपमानित झाली; तर काही बेघर, अनाथ झाली आणि इथेच गुन्हेगारी, सूड, विकृती आणि कुटुंबाविना निष्प्रे निपजलेली हिंसाखोर पिढी अशी अनिष्टता समाजात कायम उगवून आली.
दुसरा मानसिक धक्का बसला तो विवाहाच्या ‘शरीर-संबंधा’च्या नियमामुळे ! विवाहाने नियम सांगितला, की स्त्रीने पतीचीच मुले जन्माला घालावीत. पण म्हणून, स्त्रीच्या गर्भाशयात परपुरुषाचे शुक्राणू झिडकारले जातील अशी कोणतीही शरीरयंत्रणा किंवा स्त्रीच्या मेंदूची तशी आदेश-यंत्रणा निसर्गाने उत्क्रान्त केलेली नाही. अर्थात, मनुष्यनिर्मित विवाहनियम आपल्या शरीर यंत्रणेशी विसंगत आहे, तसेच मानवाच्या शारीरिक-मानसिक घटनेत हस्तक्षेप करणारा आहे. परंतु आपल्या मनाने मात्र ‘पतीपासूनचेच मूल पवित्र’ हा वैवाहिक संस्कार गेल्या सुारे तीन हजार वर्षांत आपलासा केलेला आहे. आता हे मन म्हणजे काय ? तर विशिष्ट विचारपद्धतीने मेंदूच्या समजुतीचे घडवलेले वळण! मेंदू हे एक असे वरदान आहे की भोवतालातून आलेला संस्कार किंवा बदललेला संस्कार यातून तो स्वतःला अॅडजस्ट आणि अपडेट करत असतो. स्त्रीला फक्त ‘पतीपासूनच मूल व्हावे’ हे मेंदूला दिले गेलेले वळण असले तरी मेंदूला स्वतःची कृती मात्र निसर्गनियमानुसार ‘कोणत्याही पुरुषापासून स्त्रीला मूल’ या पद्धतीने करावी लागते. याचा अर्थ असा, की मेंदूचा मानसिक लैंगिक धर्म हा त्याच्या जैविक लैंगिक धर्मापेक्षा वेगळा करून टाकण्याचा प्रयत्न माणसाने विवाहनियमांद्वारे केला आणि हा प्रयत्न यशस्वी व्हावा म्हणून, लैंगिकता व्यक्त करण्याची माणसाची सहज ऊर्मी अनैतिक म्हणून दाबून व दडपून टाकण्याचे घोर-अघोर उपाय पुरुषप्रधान सत्तेने स्त्रियांवर व पुरुषांवर अनेक शतके लादले. विवाह-नियमाने स्त्रीच्या बायॉलॉजीचा विचार जसा केला नाही, त्याप्रमाणे पुरुषाच्या बायॉलॉजिकडेही दुर्लक्ष केले. स्त्री व पुरुषाची कामवासनेची उत्तेजना आणि त्याची पूर्ती याकरता दोघांच्या शरीरांतर्गत काम करणारे अवयव म्हणजे मेंदू आणि हार्मोन्स ग्रंथी! टेस्टास्टेरॉन, इस्ट्रोजन, ऑक्सिटोसीन, सेराटोनीन, डोपामीन वगैरे हार्मोन्स तसेच मेंदूचे हायपोथेलमस, अमिग्डल हे भाग आणि पिच्युटरी ही मास्टर ग्लँड मिळून स्त्री-पुरुषाची कामभावना उत्तेजित करणे व शमन करणे, अशा दोन्ही कामांत भाग घेतात आणि त्यावर स्त्री व पुरुषाला नियंत्रण ठेवणे सहज शक्य नसून, प्रयत्नातून त्यावर मर्यादित ताबा मिळवता येतो, हे लक्षात घेतले पाहिजे. कामभावनेवर ताबा मिळवणे, हे त्या भावनेला प्राथमिक वाट (outlet) मिळवून दिल्यास, सुलभ होऊ शकते. त्या भावनेची जमू पाहिली वाफ मुक्त होत असते. परंतु विवाह-संस्काराने प्राचीन नैतिक मूल्ये बदलून टाकली आणि मग स्त्रीने कामपूर्तीसाठी अनुकूल असणे, ही तिची चारित्र्यहीनता, अकुलीनता किंवा सहज उपलब्धता, या दृष्टीने पाहू जाऊ लागली, तर पुरुषाने कामभाव व्यक्त करणे, ही असभ्यता किंवा गुन्हा ठरवला गेला. त्यातून वर उल्लेखल्याप्रमाणे माणसामध्ये मानसिक लैंगिक धर्म आणि जैविक लैंगिक धर्म यां ध्ये पहिल्याप्रथम विसंगती आली. स्त्रीप्रमाणे पुरुषांचेसुद्धा त्यामुळे लैंगिक धर्मांतर झाले. मग कुटुंबाप्रमाणे संस्कार वेगळे, माणसागणिक त्याचा स्वीकार वेगवेगळा! त्याप्रमाणे घडलेल्या प्रत्येक व्यक्तीची कामवृत्तीमागील मानसिकता वेगवेगळी आणि त्यातून पुनश्च व्यक्तीच्या मानसिक आणि जैविक लैंगिक धर्मातील विसंगतीसुद्धा कमी-अधिक आणि वेगवेगळी! अश्या रीतीने स्वतःच्या लैंगिक गरजेबाबत वेगवेगळे संभ्र (कन्फ्यूजन) असणाऱ्या व्यक्तींचा समाज जगभर तयार झाला. लैंगिकतेबाबत स्त्री पुरुषांधील नैतिक भावनेच्या एकजिनसीपणाला मानवी-प्राण्यात यामुळे मोठाच धक्का बसला. लैंगिक आचरणाचा आपल्या शरीरघटनेशी आणि जैविकतेशी काही संबंध असतो, हे पूर्णपणे विसरून जो तो लैंगिकता दाबून टाकण्याची आपापली ब्रह्मचर्याची गौरवशाली (?) परंपरा सांगू लागला. विवाह हेसुद्धा एक मर्यादित ब्रह्मचर्यच!
आपल्यापाशी लैंगिक भावना आहे हे लपवण्यात जेवढे आपण यशस्वी, तेवढी आपली संस्कृती उच्च, अशी आणखी एक मनाची समजूत, म्हणजेच मेंदूच्या विचारपद्धतीचे वळण बदलू लागले. त्यातून स्त्रीच्या ड्रेसकोडपासून बुरख्यापर्यंत आणि सतीप्रथेपासून पुरुषांनी अनेक लग्ने करण्यापर्यंत बरेच प्रयोग पुरुषांच्या सोयीने होत राहिले आणि स्त्रीची कामेच्छा अधिकाधिक अव्यक्त आणि पुरुषी जुलमाखाली बंदिस्त केली गेली. त्यातून स्त्रीवर सत्ता मिळवण्याचे सुख जरी पुरुषांनी मिळवले, तरी त्यामुळे मग व्यक्ती, कुटुंब, समाज आणि संस्कृती या पातळ्यांवर अनाकलनीय समस्या उभ्या राहिल्या, हे लक्षात घेतले गेले नाही. प्रत्येक राष्ट्राची संस्कृती, तिथली लोकसंख्या, धार्मिक पगडा, आधुनिकता, विषमतेचे प्रमाण जितके असेल, त्यानुसार तिथल्या स्त्री व पुरुषांचे प्रश्न किंवा गुन्हे हे कमी-अधिक संख्येने किंवा गंभीरतेने असलेले आढळतात. जगातल्या ज्या राष्ट्रांनी समाजातल्या लैंगिक गुन्ह्यांची उत्तरे आधुनिक विज्ञानातून शोधली, त्या राष्ट्रातील हे गुन्हे गेल्या २०-२५ वर्षांत कमी झालेले दिसतात. पण ज्या राष्ट्रांनी या लैंगिक घुसमटीला आऊटलेट म्हणून देवधर्म, मांत्रिकोपचार, आध्यात्मिक प्रवचने यां ध्ये आधार शोधला, तिथे फक्त त्या उपायांचा गैरफायदा उठवणाऱ्या एका बाजूला धर्मांध शक्ती तर दुसरीकडे त्यांचे हस्तक बुवा, बाबा, बापू अशी नवी संकटे उगवली; ज्यामुळे अधिक गोंधळ आणि लैंगिक छळ निर्माण होऊन, हव्या त्या घुसमटीला उत्तरच मिळाले नाही. अर्थात, मग लैंगिक असमाधानावरील उपायांचा मार्ग हा देवधर्म, अध्यात्म यांधून जात नसून तो ‘सायन्स’मधून जातो, हे सत्त्य प्रथम स्वीकारता आले पाहिजे. त्याला अनुसरून विज्ञान जाणून घेताना हे लक्षात घेतले पाहिजे, की स्त्रीपुरुषाच्या शरीरात टेस्टास्टेरॉन हे महत्त्वाचे सेक्स हार्मोन आहे. कामपूर्ती होण्यासाठी आणि होताना हे हार्मोन उच्च पातळीवर असते आणि इतर हार्मोन्स टेस्टास्टेरॉन हार्मोनप्रमाणे आपली पातळी राखतात. टेस्टास्टेरॉन हार्मोन हे पृष्ठरज्जुधारक प्राण्यांपासून उत्क्रांत होत मनुष्यप्राण्यात आलेले अतिप्राचीन हार्मोन आहे. टेस्टास्टेरॉन हार्मोनचे ताबडतोबीचे लक्षण म्हणजे माणसाने आक्रमक आणि कामातुर म्हणून व्यक्त होणे.
आक्रमकता आणि कामवासनेबरोबरच कणखरपणा, धाडस, आत्मविशास, महत्त्वाकांक्षा, स्पर्धावृत्ती, सूडबुद्धी, अहंकार, सत्ताकांक्षा, बेपर्वाई, उताविळी, डावपेचात्मक वृत्ती, धोका व आह्वान पत्करण्याची वृत्ती अशा अनेक गुणदोषांचे पॅकेज, टेस्टास्टेरॉन त्याच्या रक्तातील प्रमाणानुसार स्त्री-पुरुषांना बहाल करते. पुरुषांध्ये हे हार्मोन स्त्रीपेक्षा वीस पटीने किमान जात असते. म्हणून पुरुषांध्ये वरील गुणदोष प्रकर्षाने दिसतात. स्त्रीमध्ये जर टेस्टास्टेरॉन हार्मोनचा डोस वाढवला तर तीसुद्धा आक्रमक आणि जास्त कामातुर होते, असे नवे संशोधन सांगते. आधुनिक विज्ञान टेस्टास्टेरॉन या रसायनाविषयी आपल्याला एक सावधगिरीचा इशारा देत असल्याचे आपल्या इथे लक्षात येते. टेस्टास्टेरॉन हे अत्यंत संवेदनशील हार्मोन आहे. त्याची पातळी सतत खाली-वर होत असते. या हार्मोनची पातळी फार खाली जाणे जितके वाईट आहे, त्यापेक्षा ती वर जाणे अधिक धोक्याचे आहे. आता, टेस्टास्टेरॉन हार्मोनची पातळी कोणकोणत्या कारणाने ‘हळसह’ होऊ शकते, ते पाहायला लागेल. मुख्य म्हणजे, सामाजिक भोवताच्या परिस्थितीप्रमाणे, त्या परिस्थितीला सामोरे जाता यावे म्हणून शरीरातल्या विविध हार्मोन्सच्या पातळ्या वर-खाली करण्याचे आदेश मेंदूकडून, त्या त्या ग्रंथींना मिळतात. त्यांत टेस्टास्टेरॉन हार्मोन ज्या वरील गुणदोषांशी संबंधित आहे, त्या गुणदोषांची जीवन जगताना आवश्यकता असल्यास, ते हार्मोन मेंदूकडून जास्त प्रमाणात रक्तात सोडले जाते. प्रक्षुब्ध किंवा हिंसक दृश्ये सतत पाहण्यानेसुद्धा टेस्टास्टेरॉनची पातळी उंचावते. मॅट रिडले या संशोधकाच्या मते, माणसाचे जीन्स हे हार्मोन्सना रिस्पॉन्स देणारे असतात, शिवाय ते सेसेक्सचे अनुकरण करणारे असतात. अर्थात चित्रपट, टीव्हीवर हिंसा करणारे पुरुष पाहून प्रेक्षक-पुरुषाचे टेस्टास्टेरॉन हार्मोन उंचावते आणि बरोबरीने से सेक्सचे अनुकरण या तत्त्वाने तरुण पुरुष ही हिंसा करण्यास प्रवृत्त होतात. पुरुषाची तीच हिंसा स्त्रियासुद्धा पाहत असतात. पण त्या तश्या हिंसेला क्वचितच प्रवृत्त होतात. टेस्टास्टेरॉनची वाढलेली पातळी ही आक्रमकता स्पर्धा, अहंकार, सूडबुद्धी यांस बळ देत असते. त्यामुळे मुळात अधिक मात्रेने टेस्टास्टेरॉन हार्मोन बाळगणारा पुरुषवर्ग, स्त्रीवर्गाच्या तुलनेत जास्त संख्येने हिंसेत व कारस्थानांत गुंतलेला दिसतो. म्हणून टेस्टास्टेरॉन हार्मोनची पुरुषांध्ये असणारी साधारण उच्च पातळी अतिरेकाने वाढणे, हे केव्हाही कुटुंबाला व समाजाला धोकादायक असते! हा एक सर्वसाधारण जैविक-सामाजिक सिद्धान्त म्हटला पाहिजे. प्रसारमाध्यमांतून प्रदर्शित होणारी पुरुषांची आक्रमकता आणि सततची हिंसा, जसे प्रेक्षक-पुरुषांधील टेस्टास्टेरॉनची पातळी वाढवण्यास कारणीभूत ठरते, तसेच या हार्मोनची पातळी वाढण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे अत्यंत प्रतिकूल, संघर्ष य परिस्थितीत माणसांना जगावे लागणे! तश्या स्थितीत माणसाला जिवंत राहण्यासाठी लागणारा कणखरपणा आणि धाडस प्राप्त होण्यासाठी, मेंदूकडून टेस्टास्टेरॉनचे रक्तातले प्रमाण वाढवले जाते. आता या बायॉलॉजिकल घटनेतून सोशॉलॉजिकल गुन्ह्यांची कारणे स्पष्ट होतात. आपल्या देशात दारिद्रयरेषेखालचा वर्ग, गरीब वर्ग आणि गरीब मध्यमवर्ग सर्व मिळून सु ारे ७० टक्के जनता ही जगण्यासाठी तीव्र संघर्ष करावा लागणारी जनता आहे. आक्रमक होऊन हाणामारी करणे हाच अनेक वेळा त्यांच्यासमोर मार्ग असतो. प्रामाणिक आणि अतिरेकी कष्ट करूनही मिळणारे तुटपुंजे वेतन, घराचा निवारा हिरावला जाणे, चांगले शिक्षण, आरोग्यसेवा आणि किमान न्याय मिळवतानासुद्धा अपमान, अवहेलना, फसवणूक याला सतत तोंड द्यावे लागणे, अशा परिस्थितीत मनाने न खचता टिकून राहून जिवंत राहता येण्यासाठी लागणारी ऊर्जाशक्ती ही नेहमीच टेस्टास्टेरॉन हार्मोनकडून माणसाला मिळते. म्हणून असा संघर्ष कराव्या लागणाऱ्या स्त्री-पुरुषांध्ये हे हार्मोन जास्त वरच्या पातळीत असते. ते स्त्रीमध्येसुद्धा वाढलेले असते, तरी मुळात हे हार्मोन स्त्रीमध्ये पुरुषांपेक्षा बरेच कमी असल्यामुळे, वाढीव टेस्टास्टेरॉनमुळे स्त्रीमध्ये वाढलेल्या आक्रमकतेचा उपयोग ती विधायकपणे वापरून कणखरपणाने कुटुंबाला संकटातून बाहेर काढते. परंतु पुरुषां ध्ये आधीचेच उच्च पातळीत असणारे टेस्टास्टेरॉन, परिस्थितीच्या कारणाने जेव्हा अतिरेकी प्रमाणात पाझरते, तेव्हा पुरुषाची आक्रमकता हिंसकतेचे वळण घेऊ पाहते. त्यात, टेस्टास्टेरॉनच्या विरोधी असणारे हार्मोन-सेराटोनीन जे मेंदूला स्वस्थचित्त करणारे, सारासार विचार देणारे हार्मोन आहे, त्याची पातळी टेस्टास्टेरॉन हार्मोन वर चढल्यामुळे खालावते. त्यामुळे पुरुषां धला अविचार अधिकच बळावतो. इथे टेस्टास्टेरॉन हे मुळात सेक्स हार्मोन आहे हेही विसरून चालणार नाही. अशा रीतीने संघर्षाच्या परिस्थितीमुळे पुरुषाचे टेस्टास्टेरॉन हार्मोन उंचावणे; त्यातून आक्रमकता, कामवासना आणि अविचार हे सर्व एकत्रित वाढते आणि त्यामुळे पुरुषाचे मानसिक संतुलन अस्थिर होऊन राहते. टेस्टास्टेरॉन हार्मोन जणू अशा स्थितीत एखाद्या स्फोटकापेक्षा कमी नसते.
अनेक गरीबवर्गीय तरुण देशात बेकार आहेत. लग्न करण्याची अनेकांची आर्थिक स्थिती नाही. तर अनेक पुरुषांना विवाह करूनही नोकरीसाठी, पत्नीला बाहेरगावी वर्षानुवर्षे ठेवावे लागून, शहरात राहावे लागते. या वस्तुस्थितीचे विपरीत परिणाम पुरुषांवर दिसून येऊ लागतात. परिस्थितीने सर्व बाजूंनी जगण्याच्या केलेल्या कोंडीमुळे ह्या पुरुषांवरचा मानसिक ताण व अस्वस्थता सामान्य पुरुषांपेक्षा जास्त असते. त्यातून मोकळे व हलके होण्यासाठी शरीरसंबंधाची त्याची गरज तीव्र झालेली असते. चित्रपटातील सेक्स पाहून तो आपल्या वासनेचा निचरा करू पाहतो. परंतु चित्रपटातले त्याला आदर्श वाटणारे हिरोज आणि अँटीहिरोज नायिकेची छेडछाड, विनयभंग, बलात्कार या पद्धतीने छळित सेक्स पुरुषांसमोर ठेवतात आणि तीच मर्दानगी अशा हिरोइझमच्या विकृत कल्पना समाजात प्रस्थापित करतात. त्यातून प्रेक्षक-पुरुषाच्या मनातील कामपूर्तीची तगमग शांत न होता, ती अधिक प्रक्षुब्ध स्वरूप धारण करते. अशा रीतीने मग पुरुषाचे जीवन जितके खडतर आणि अपमानित, वंचित त्या प्रमाणात चित्रपटातील गुन्हे वास्तवात घडत राहतात. सध्या घरोघरी आलेले टीव्हीसुद्धा गुन्ह्यांबाबत सतत ब्रेकिंग न्यूजचा मारा करून, त्यांची नाट्यरूपांतरे दाखवून गुन्हे हा जणु मनोरंजनाचा भाग असल्याची समजूत समाजमनात करून देतात, ज्यामुळे एकूण सर्व समाज बधिर होतो. गरीब, श्रीमंत, मध्यम अशा कोणत्याही वर्गातील पुरुष लैंगिक गुन्हे करत असतात. तरी ‘गरिबी’ या संदर्भात किती ‘अहम्’ भूमिका बजावते, हे आपल्या समाजात तरी आपण प्राधान्याने लक्षात घेतले पाहिजे, कारण ‘गरिबी’ हा आपल्या देशातील फार मोठ्या लोकसंख्येचा प्रश्न आहे. म्हणून गुन्हा घडला, की गुन्हेगाराच्या शिक्षेबरोबरच त्याच्या आर्थिक, कौटुोबिक व सामाजिक स्तराच्या पोर्शभूीचा अभ्यास झाला तर उपाय आपल्या समजण्याच्या टप्प्यात येतील. जगण्यासाठीची जीवघेणी लढाई, विशिष्ट वर्गा ध्ये जेव्हा पिढ्यानपिढ्या चालू राहते, तेव्हा या वर्गातील पुरुषांची बिघडलेली मनःस्थिती आणि त्यांचे हार्मोन्स असंतुलन जेनेटिकली पुढील पिढीत जाते, आणि पुरुषांच्या तश्या पिढ्या जन्म घेऊ लागतात, तेव्हा ती त्या देशाची संस्कृती समजली जाते. असा समाज पुनश्च मानसिक तंदुरुस्त होण्यास सर्व बाजूंनी दीर्घकाळ प्रयत्न करावे लागतात. स्त्री-पुरुषांधील हार्मोनचे असंतुलन, हे क्वचितच बायॉलॉजिकल कारणाने होत असते आणि जास्त करून ते सामाजिक-भोवतालिक परिस्थितिजन्य संस्कारातून होत असते. समाजातील विविध लैंगिक गुन्ह्यामध्ये पुरुषामधील सेक्स हार्मोनचे असंतुलन कारणीभूत आहे. म्हणून आपल्या समाजातील ही परिस्थिती बदलायची असेल, तर असे असंतुलन घडवणाऱ्या कारणांवर आपण प्रथम काम केले पाहिजे. म्हणजे, उदाहरणार्थ, गरीब समाजाचा संघर्ष कसा कमी होईल, हे पाहिले पाहिजे. हे फक्त सरकारचे काम नाही. वास्तविक ते जनतेचेच काम आहे. कारण जनतेतून सरकार बनत असते. म्हणून आपण, प्रत्येक सुस्थितीतल्या माणसाने आणि कुटुंबाने गरीब जनतेवर अन्याय होणार नाही, अशी दक्षता व भूमिका प्रत्येक क्षेत्रात घेतली पाहिजे. मग डॉक्टर, वकील, शिक्षक, शेजारी, पोलीस, सरकारी कर्मचारी वगैरे प्रत्येकाची ती जबाबदारी आहे, की आपल्या समाजात कुणालाही अवहेलनेचे जीवन जगावे लागू नये आणि जीवनावश्यक गरजा त्याला रास्तपणे मिळाल्याच पाहिजेत. गरिबाच्या कष्टाचा, कामाचा सन्मान आपल्याला ठेवता आला पाहिजे. जनतेत पहिल्याप्रथम निर्माण झालेली ही जाणीव आपोआपच पुढे सरकारमध्ये आलेली दिसेल.
शेवटी मुद्दा येईल तो लैंगिक व्यक्त होण्याचा! आज कुणी म्हणेल की, काही पुरुष स्त्रियांना उद्देशून लैंगिक शब्द वापरतात, हावभाव करतात, ते व्यक्त होणे नाही का ? खरे तर ते एका अर्थी व्यक्त होणेच आहे, तरी पुरुषाचे हे आजचे वर्तन, त्याच्या निकोप लैंगिक दृष्टिकोणाचा परिणाम म्हणून होत नसून, त्याच्या दडपलेल्या लैंगिक इच्छेची प्रतिक्रिया म्हणून होत असते. ना त्या पुरुषाकडे त्यासंबंधी खिलाडू मानसिकता असते आणि ना त्या स्त्रीला पुरुषाच्या या व्यक्त होण्यावर खिलाडूपणे प्रतिक्रिया देण्याची मुभा असते. मग पुढचा विचार येतो, की पुरुषाची मानसिकता बदला! आधी उल्लेखल्याप्रमाणे मानवी मेंदूवर बाहेरून होणाऱ्या सर्व प्रकारच्या संस्कारांळे मेंदूच समज आणि विचारांना मिळणारे वळण म्हणजे मानसिकता! ही मानसिकता बदलायची म्हणजे मेंदूचे वळण बदलायचे आणि वळण बदलायचे म्हणजे संस्कार बदलले पाहिजेत. मग सुरुवातीलाच ‘विवाहाविना शरीरसंबंधाची इच्छा होणे ही भयंकर वाईट भावना आहे, गुन्हा आहे’ हा, मेंदूचे मूळ वळण बदलण्यास कारणीभूत झालेला जुना संस्कार प्रथम बदलावा लागेल. त्यातून आपोआप गरज निर्माण होईल ती समाजाला लैंगिक साक्षर बनवण्याची! एकमेकांच्या शरीराचा आणि शारीरिक गरजेचा आदर हा या साक्षरतेचा गाभा हवा. त्यामुळे समाजाचा सेक्सविषयीचा, तसेच स्त्रीविषयीचा दृष्टिकोण बदलेल. साहजिकच प्रसारमाध्यमांवर ताबा असणारे पुढील पिढीतील पुरुष हे स्त्रीविषयी निकोप दृष्टिकोण प्राप्त झालेले असतील. त्यातून चित्रपट आणि टीव्हीवरील स्त्रीच्या शरीरमनाची अवहेलना कमी होत जाईल, ज्याचा चांगला परिणाम प्रेक्षक-पुरुषांवर होईल आणि समाजव्यवस्था असा रीतीने एकेका विकृत वर्तनातून मुक्त होत हळूहळू बदलत जाईल. मुक्त समागमाच्या काळातून विवाहबंधनाच्या काळात पाऊल ठेवताना, आपल्या पूर्वजांनी मधल्या पिढ्यांसाठी, जुन्या सवयीचा भाग म्हणून, फाल्गुन पौर्णिला अग्नीचा जाळ पेटवून, त्याभोवती स्त्री-पुरुषांनी उभे राहून लैंगिक शब्दोच्चारण, अंगविक्षेप करण्याची मुभा ‘होळी’ सणांधून कायम ठेवली होती, ज्याला नंतरच्या काळात अश्लील शिव्या म्हणून बंदी आली. पण इथे महत्त्वाचे आहे ते, लैंगिक व्यक्त होण्याची माणसाची गरज समजण्याचे, आपल्या पूर्वजांना असलेले भान ! आजच्या काळात, त्याकरता होळीऐवजी अन्य सन्माननीय मार्ग नक्कीच असू शकतात, सायकॉलॉजीच्या अभ्यासाने ते शोधले पाहिजेत. उदाहरणार्थ, ‘व्हॅलेंटाईन डे’ ला आपल्याला जवळिकतेसाठी प्रिय वाटणाऱ्या व्यक्तीला फूल देणे किंवा ‘आय लव्ह यू’ असे म्हणणे, ग्रीटिंग किंवा भेटवस्तू देणे, यामुळे मुले-मुली सेक्शुअली खूप मोकळी होतात. मनातले एकदाचे व्यक्त केले, ही भावना त्यांना रिलॅक्स करते. असे मित्र-मैत्रिणीचे चर्चागट असू शकतात, जे सेक्सवरही बोलतात. त्याचप्रमाणे विविध कार्यक्रमांतून मुला-मुलींनी एकमेकांत मिसळणे, हातात हात घालून फिरणे, एकत्र नृत्य करणे, एकमेकांना नेहमी सोबत करणे, विशेष प्रसंगांत एकमेकांना आलिंगन देणे, प्रोचा स्पर्श देणे वगैरे मनाच्या चांगल्या वाढीसाठी (ग्रोथ) खूप आवश्यक आहे. पब्स, रेव्ह पार्टीज, डान्सबार यांसारख्या ठिकाणी स्त्री व पुरुष दोघे सेक्शुअली रिलॅक्स होण्याकरता जमतात. पण आपला संकुचित वृत्तीचा समाज ते वाईट समजत असल्याने, या गोष्टी तरुण मंडळी चोरून, गुपचूप करतात, ज्यामुळे ते अधिकच आक्षेपार्ह वाटू लागते. डान्सबारसारखा एखादा मार्ग, पोट भरण्यासाठी जेव्हा वापरावा लागतो, तेव्हा तिथे मग (विशेषतः स्त्रीचा सन्मान नसणाऱ्या देशात) त्या त्या स्त्रियांचा गैरफायदा घेणारी कृत्य वा गुन्हे घडून तो मार्ग असभ्य, अनैतिक म्हणून विनाकारण शिक्कामोर्तब होत असते.
जगातील कोणत्याही राष्ट्रात मग तिथे विवाह असो वा मुक्त संबंध असोत, स्त्री-पुरुष शरीबसंबंध दाखवणाऱ्या फिल्म्स, ज्यांना बहुधा ब्ल्यू फिल्म्स वा पोर्नफिल्म संबोधले जाते, त्या फिल्म बहुसंख्येने जगातला पुरुषवर्ग पाहतो. अशा फिल्म तयार करणे, त्याची विक्री करणे आणि पाहणे यांध्ये ९० टक्क्यांहून जास्त पुरुष गुंतलेले असतात आणि त्यामध्ये अब्जावधी रुपयांची वार्षिक उलाढाल असते. आश्चर्य म्हणजे, फ्री सेक्स असणाऱ्या देशातले पुरुषसुद्धा, त्यांच्या कामपूर्तीला अटकाव नसूनही, या फिल्म मोठ्या संख्येने पाहतात, याचा अर्थ पुरुषांची ती मानसिक गरजच आहे का ? तो एकप्रकारचा सहज आऊटलेट त्यांच्यासाठी आहे का? याचा अभ्यास व्हायला हवा; आणि मग अश्या फिल्म्सना अश्लील का म्हटले जाते, तेसुद्धा तपासायला पाहिजे. माझ्या मते, अशा फिल्म्समधून हिंसक सेक्स दाखवणे, स्त्री भावनेची अवहेलना वा तिच्यावरचा अत्याचार ‘फोकस’ करणे ही अनैतिकता आहे, अश्लीलता आहे. पण ही दृश्ये टाळून, स्त्री व पुरुषांचा आनंददायक सेक्स दाखवला, स्त्रियासुद्धा त्या सेक्समधून आनंद घेताना दाखवल्या, तर मग त्या फिल्म्सना अश्लील म्हणून बंदी का आणायची? फार तर १५ वर्षांखालील मुला-मुलींनी या फिल्म पाहण्यावर बंदी योग्य ठरेल. पण एरवी तरुण स्त्री-पुरुषांसाठी, तो एक लैंगिक व्यक्त होण्याचा चांगला मार्ग बनवता येऊ शकतो. स्त्री-पुरुषांनी एकत्रित बसून ती फिल्म पाहण्याची कृती अधिक निकोप व निर्दोष होऊ शकते. जेव्हा प्राचीन काळात पडदा-माध्यमे अस्तित्वात नव्हती, तेव्हा आपण पाहिलेच, की स्त्री-पुरुष हे भाषाउच्चार, लेखन, काव्य, चित्र, शिल्प यांधून व्यक्त होत होते. पण त्या काळात कधी ही माध्यमे अश्लील मानली गेली नाहीत, किंवा कालिदासाने शकुंतलेचे केलेले शरीरवर्णन अश्लील म्हणून ‘शाकुंतलम्’ शिकवण्यावर बंदी आली नाही; किंवा खजुराहो शिल्पे अश्लील म्हणून पाडली गेली नाहीत किंवा वात्स्यायनाने कामसूत्रातून वर्णिलेल्या संभोग-आसनांना कधी कुणी अश्लील म्हटले नाही. उलट आमची प्राचीन भारतीय संस्कृती म्हणून कामसूत्राचा अभिमानाने उल्लेख केला जातो. प्रत्येक काळातील व्यक्त होण्याची माध्यमे वेगवेगळी असतात. आजचे माध्यम ‘फिल्म’ आहे. या माध्यमातून स्त्रीचा ‘वापर’ करण्याची कृती विकृत आहे; ते माध्यम विकृत, अश्लील कसे म्हणता येईल ? अश्लीलतासुद्धा एक संस्कार आहे. गेल्या शतकात आपल्याकडे स्त्रीच्या डोक्यावरचा पदर ढळला तरी अश्लील दृश्य पाहिल्यासारखे वाटत होते. त्या आधीच्या शतकात, राणी व्हिक्टोरियाच्या काळात, टेबलाचे कमनीय पाय दिसणेसुद्धा युरोपात अश्लील वाटायचे! मग हे झाकण्यासाठी टेबलक्लॉथची पद्धत १८८५ पासून रूढ झाली. याउलट आता सॅन्फ्रान्सिस्कोच्या बीचवर, स्त्री व पुरुष व्हॉलीबॉल एकत्र खेळतात, तेव्हा पुरुषांची टीम हाफ पँट व बनियन घालून असते, तर विरोधी टीममधील सर्व स्त्रिया ब्रा व निकरमध्ये असतात, तेव्हा कुणाला काहीही अश्लील वाटत नाही. याचाच अर्थ, स्त्रीपुरुषांना एकमेकांच्या शरीराकडे पाहता येण्याचे मानसिक धैर्य म्हणजे खरा लैंगिक धर्म! जो आपल्या आदिवासी स्त्री-पुरुषां ध्ये असतो. हा लैंगिक धर्म, संयमाने व्यक्त व्हावा, हे अगदी खरे! पण कामवासनेवरील संयम हा, विविध नियम-बंधनांनी मुला-मुलींना जखडून ठेवणे ; त्यांच्या भेटण्यावर, पोशाखावर, चॅटिंगवर बंदी घालणे यामुळे निर्माण होत नसतो. उलट अशा अडवणुकीमुळे कामवासना अधिक उफाळून अविचाराने बाहेर पडू पाहते, कारण शेवटी ती शारीरिक घडामोड आहे.
त्याशिवाय, टेस्टास्टेरॉन हार्मोनचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे, माणसामध्ये ते आह्वान घेण्याची वृत्ती निर्माण करणारे हार्मोन आहे. अर्थात, मुला-मुलींच्या भेटण्यामध्ये आणलेला अडथळा, मुलींवरचे पहारे, शिक्षा, संरक्षण वगैरे बंदोबस्त हे टेस्टास्टेरॉन वाढलेल्या स्थितीमध्ये तारुण्यात त्यांना एक आह्वान वाटते. त्यात हे हार्मोन नेहमीच उच्चपातळीत असणाऱ्या पुरुषांध्ये विविध आह्वाने स्वीकारण्याची वृत्ती आधीचीच वसलेली असते. म्हणून कामभावनेवरील बंदीचे आह्वान तरुण पुरुष सहजस्वीकारतो आणि पहारे तोडून, बंदी व संभाव्य शिक्षेची पर्वा न करता बऱ्यावाईट मार्गांनी स्त्री-संबंध साधणे, ही त्याची महत्त्वाकांक्षा बनते; ज्याला आपण गुन्हा म्हणतो. आपण पाहिले, की दिल्ली रेप-घटनेनंतर कायदा कडक होणार या बातमीने किंवा तो झाला तरी, देशातल्या रेपच्या घटना अजिबात कमी झाल्या नाहीत. उलट त्या वाढलेल्या दिसतात. याचा अर्थ स्पष्टच आहे, की कामभावनेच्या होत असणाऱ्या कोंडीबद्दल कुणी काहीही न बोलता, निव्वळ शिक्षा ठोठावणची भाषा करणाऱ्यांना, कामप्रक्षुब्ध झालेल्या पुरुषांनी त्यांच्या बलात्कार-कृतीतून हे आह्वान दिल्यासारखे आहे.
कायदे कडक हवेतच, शिक्षेची अंमलबजावणीसुद्धा हवी. पण गुन्हे थांबवण्याचा तो एकमेव समर्थ मार्ग नाही. जोपर्यंत समाजामध्ये पुरुषांना आह्वान वाटण्याजोगे वातावरण तयार होत राहील, तोपर्यंत पुरुष ते आह्वान घेत राहतील आणि गुन्हे घडत राहतील. म्हणून कायदे होण्याबरोबरच, त्यातून आह्वानात्मक स्थिती समाजात निर्माण होणार नाही, अशी दक्षता घ्यावी लागेल. त्याकरता शेवटी एकच उपाय हाताशी राहतो आणि तो म्हणजे कामेच्छेबाबत व्यक्त होण्याची पारंपरिक नकारात्मक भूमिका आणि बंधने रद्द करणे! जे व्यक्त होणे प्राणिमात्रापासून चालू आहे, ते पुनश्च खुले करणे. आपल्याला जे वाटते की बंदी आणि बंधने लातून कामवासना काबूत राहत असते, ते आजच्या काळात अजिबात शक्य नाही. एका जमान्यात कुटुंबात सांगितल्या जाणाऱ्या लैंगिक मर्यादा आणि त्याच्याशी सुसंगत मर्यादा दाखवणारे चित्रपट होते. तेव्हा ते शक्य होते, तसेच आपल्या देशाची लोकसंख्या जेव्हा मर्यादित ४० कोटी होती आणि गरिबी खूप तीव्र नव्हती, शिवाय लग्नेसुद्धा २० ते २५ वर्षांपर्यंत होत होती, तेव्हाही ते शक्य होते. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. लग्नाचे वाढणारे वय, आक्रमक प्रसारमाध्यमे, वाढती लोकसंख्या आणि गरिबी याबाबत जर आपण काहीही बदल आणू शकणार नसू, तर आपल्यालाच बदलावे लागेल. याचा अर्थ, लैंगिक धर्म नीट समजून घ्यावा लागेल. भारतात आज उच्चशिक्षितां ध्ये विवाहपूर्व शरीरसंबंधाचे प्रमाण ‘लिव्ह इन’ नावाने वाढत चाललेले आहे. आता त्यापुढील पायरी म्हणजे ‘विवाहापूर्वी माझे शरीरसंबंध होते’ असे सहज सांगता येणे आणि मग ‘त्यात काय विशेष आहे’ अशी त्यावर प्रतिक्रिया येणे म्हणजे खऱ्या अर्थाने लैंगिक धर्म आपल्याला समजला. ही नवी समज, हाच पुढेसंस्कार म्हणून स्वीकारला, तर आपल्या मेंदूचे वळण बदलेल. या संस्काराशी तो स्वतःला अॅडजस्ट करेल, म्हणजेच स्त्री-पुरुषांची मानसिकता बदलेल, तसेच सध्या ‘लैंगिकग्रस्त’ म्हणून लौकिक प्राप्त झालेला आपला देश, या मनोविकारातून बाहेर येत जाईल आणि आपली समाजव्यवस्था लख्खपणे बदलताना दिसेल.
डी/४५, पार्थ एन्क्लेव्ह, काकडे प्लाझामागे, हिंगणे संस्थेजवळ, कर्वेनगर, पुणे-५२.
फोन : ९३७१३२५४११, B©ob … mangala_samant@yahoo.com