आजपर्यंत स्त्रीने समर्पण पुरुषाच्या निष्ठेसाठी केले आहे हेच दिसते. मग ती रामाची सीता असो, हरिश्चंद्राची तारामती असो, की गांधींची कस्तुरबा असो. ह्यांच्यापैकी कुणाचेही जीवन स्वायत्त नव्हते. स्त्रीच्या आदर्शासाठी प्राण देणारा पुरुष जर निघाला असता कुणी, तर तो स्त्रैण मानला गेला असता. समाजामध्ये त्याला प्रतिष्ठा मिळाली नसती. आपल्या समाजाने स्त्री निष्ठेला लंपटता मानले आणि पुरुष निष्ठेला पातिव्रत्य. ही दोन अलग-अलग मूल्ये समाजामध्ये प्रचलित झाली आहेत.
दादा धर्माधिकारी स्त्री-पुरुष सहजीवन या पुस्तकातून