मासिक संग्रह: फेब्रुवारी, २०१४

पत्रसंवाद

धनंजय मुळी, बी-१, विशभारती सोसायटी, प्लॉट नं.आर.एम.-३७, संभाजीनगर, एमआयडीसी, चिंचवड, पुणे ४११०१९.

किशोर देशपांडे यांची एप्रिल २०१३ ते नोव्हेंबर २०१३ या कालावधीत आसु मध्ये प्रकाशित झालेली अनवरत भंडळ ही मालिका वाचली. ती वाचल्यानंतर तिच्यात जीवशास्त्रीय उत्क्रांतीबद्दल अनेक चुकीची किंवा दिशाभूल करणारी विधाने आढळून आली. तसेच त्यांच्या लेखां ध्ये विज्ञानाचे सार्वत्रिक स्वरूप पुरेशा स्पष्टतेने पुढे आलेले नाही. या दोन मुद्द्यांच्या दृष्टीने देशपांडे यांच्या लिखाणाचा प्रतिवाद करणे आवश्यक वाटले. देशपांडे यांच्या लेखमालेध्ये ते अनेक विषयांना स्पर्श करतात. प्रस्तुत लेखनात मात्र विज्ञानाचे सार्वत्रिक स्वरूप, जडवाद आणि अध्यात्मवाद यांतील फरक, आणि उत्क्रांती या संदर्भातील मांडणी एवढीच चर्चा केली आहे.

पुढे वाचा

मार्क्सवाद आणि संस्कृती

मार्क्सवाद म्हणजे खरे तर शास्त्रीय समाजवाद. त्याचा आणि संस्कृतीचा घनिष्ठ संबंध आहे. मार्क्सने माणसाची व्याख्याच स्वतःला आणि जगाला निर्माण करणारा, अशी केली आहे. निर्मिती ही सर्जनशील गोष्ट आहे. त्यामुळे मार्क्सवादात किंवा शास्त्रीय समाजवादात माणूस सर्जनशील आहे हे गृहीतकच आहे. दि. के. बेडेकर म्हणतात, माणूस हा केवळ समाज-क्रांतिकारक किंवा तर्कशास्त्र- निर्माता नाही तर तो दिव्यकथा-निर्माता, प्रतीक-निर्माताही आहे. नंतरच्या मार्क्सवादयांनी मात्र या दोन पैलूंकडे दुर्लक्ष केले. म्हणून युरोपातला मार्क्सवाद जडवादासारखा झाला. मुळात मार्क्सचे तत्त्वज्ञान माणसातील चैतन्यालाच आवाहन करते. यातून हे स्पष्ट होते, की मार्क्सवाद किंवा शास्त्रीय समाजवाद हा मानुषकेंद्री अध्यात्माशी सुसंगत आहे.

पुढे वाचा

भविष्यकालीन शेती – साठ मजली !!!

आजतागायतच्या इतिहासात शेतीबद्दलचा एकही कायदा शेतकऱ्यांच्या सहमतीने झालेला नाही. भारतात कोणत्याही राजकीय व्यवस्थेने, कायदाव्यवस्थेने शेतीची व्याख्या आजतागायत केलेली नाही. आजची संपूर्ण कायदाव्यवस्था, न्यायव्यवस्था, शासकीय यंत्रणा आणि समस्त शहरी/महानगरी-बिगरशेती-सत्ताधारीसगळे सगळे ठार कृषिनिरक्षरच नव्हे तर कृषिकृतघ्नही आहेत. यांतील एकालाही ‘शेतीसंस्कृती म्हणजे काय’ हे नेके वैज्ञानिकदृष्ट्या सांगता येणार नाही. तथाकथित विकासकार्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करणाऱ्या कोणालाही ही व्याख्या विचारून पहा. त्याची ‘त-त-प-प’ होते की नाही ते बघाच.

शेतीची वैज्ञानिक व्याख्या
Agriculture means cultured photosynthesis. निसर्गात होत असणाऱ्या सूर्यप्रकाशसंश्लेषणाचे निरीक्षण करून मानवाने मानवी श्रमाने (बौद्धिक आणि शारीरिक) हिरव्या पानांद्वारे जाणीवपूर्वक घडवून आणलेले सूर्यप्रकाशसंश्लेषण म्हणजे शेतीसंस्कृती.

पुढे वाचा

मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख (Introduction to Basic Technology- IBT)

विज्ञानाश्रम ही शिक्षणाची प्रयोगशाळा आहे. तीमधील प्रयोग हे विविध चाचण्या, परीक्षण केल्यानंतरच स्वीकारले जातात. विज्ञानाश्रमातल्या एका वर्षाच्या DBRT (Diploma in Basic Rural Technology) अभ्यासक्रमातून मुले चांगली विकसित होतात, करियर घडवू शकतात असे लक्षात येत होते. मग मुलांनी नापास होऊन शाळेबाहेर पडूच नये यासाठी आश्रमाची अध्यापनपद्धत शाळेतच वापरता यावी आणि सर्व शालेय मुलांना तिचा फायदा व्हावा; अशा इच्छेने १९८७ पासून पाबळ गावातल्या शाळेत आठवी, नववी व दहावीच्या मुलांबरोबर काम करायला विज्ञान आश्रमाने सुरुवात केली. पुढच्या दोन वर्षांत आणखी दोन गावांत प्रयोग सुरू झाले.

पुढे वाचा

लैंगिक धर्म — व्यक्त आणि अव्यक्त

[सातत्याने घडणारे लैंगिक गुन्हे ही आपल्या समाजातील तीव्र समस्या बनली आहे. दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर हे वास्तव अधिकच विदारकपणे आपल्यासमोर आले. त्या घटनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र गेल्या वर्षांत अशा गुन्ह्यांची वा प्रसारमाध्यमांनी दखल घेतलेल्या गुन्ह्यांची संख्या कमी न होता वाढली आहे. दिल्लीतील पीडित युवतीने अत्यंत धीराने व कणखरपणे त्या प्रसंगाच्या परिणामांना तोंड दिले. ह्याचा आपणा सर्व संवेदनशील स्त्री-पुरुषांना अभिमान आहे. म्हणूनच आपण तिला ‘निर्भया’ म्हटले. परंतु आपण कुणी तिला वाचवू मात्र शकलो नाही. आणखी किती युवतींवर असे अत्याचार होत राहणार आहेत.

पुढे वाचा

स्त्री आणि समर्पण

आजपर्यंत स्त्रीने समर्पण पुरुषाच्या निष्ठेसाठी केले आहे हेच दिसते. मग ती रामाची सीता असो, हरिश्चंद्राची तारामती असो, की गांधींची कस्तुरबा असो. ह्यांच्यापैकी कुणाचेही जीवन स्वायत्त नव्हते. स्त्रीच्या आदर्शासाठी प्राण देणारा पुरुष जर निघाला असता कुणी, तर तो स्त्रैण मानला गेला असता. समाजामध्ये त्याला प्रतिष्ठा मिळाली नसती. आपल्या समाजाने स्त्री निष्ठेला लंपटता मानले आणि पुरुष निष्ठेला पातिव्रत्य. ही दोन अलग-अलग मूल्ये समाजामध्ये प्रचलित झाली आहेत.

दादा धर्माधिकारी स्त्री-पुरुष सहजीवन या पुस्तकातून