मानवी दु:खे, मानवी हक्क, आधुनिक विज्ञान, सामाजिक न्याय व नीतिमूल्ये लक्षात घेऊन वेळोवेळी पुरोगामी कायदेकानून बनवावे लागतात.’ आधुनिक पुरोगामी राष्ट्र असल्याचा अभिमान बाळगणाऱ्या भारताच्या संविधानाने नागरिकांना बहाल केलेले अधिकारः अनुच्छेद १४ : सर्व नागरिक समान आहेत. अनुच्छेद १५ : नागरिकांध्ये लिंगावरून (अर्थात लिंगभावावरूनही) भेदभाव करता येणार नाही. अनुच्छेद २१ : सर्व भारतीयाना स्वतःचे खाजगी आयुष्य प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार आहे.
मानवी संस्कृतीच्या उत्कर्षात न्याय व नीती हातात हात घेऊन वावरत असतात. अज्ञान व त्यातून उद्भवणारा अन्याय नव्या ज्ञानाच्या आधारे दूर करीत जावे लागते. दुःखितांचे हाल, त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी कायदे असतात. प्रसंगी न्यायसंस्थेचा आदर राखीत समाजासमोर अन्यायग्रस्तांचे, पीडितांचे दुःख मांडावे लागते. आजचे लिखाण हे त्यासाठी आहे. समलिंगी संबंधाबाबत सर्वोच्च भारतीय न्यायव्यवस्थेने नुकताच दिलेला निकाल तंत्रशुद्ध असणारच. त्यांच्यासमोर जे मांडले गेले त्या आधारे हा निकाल असणार हे स्पष्ट आहे. समलिंगी व्यक्तींच्या अस्तित्व-संघर्षात, त्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्याबाबत मात्र समाज पुन्हा अनेक पावले मागे जाईल अशी त्यातील संघर्षरत व्यक्तींना भीती वाटते आहे व ती रास्त आहे. आपल्या संस्कृतीत, इतिहासात, आजवरच्या साहित्यात (लोककथांत, पुराणांत), शिल्पांध्ये, चित्रकलेत, काही कर्मकांडांत समलिंगी संबंध, स्त्रीपुरुष व्यतिरिक्त अन्यलिंगी यांचे उल्लेख व काही प्रमाणात त्यांच्या वेगळेपणाचा स्वीकार दिसून येतो. आधुनिक वैद्यकशास्त्रातील संशोधनाच्या आधारे समलिंगी व्यक्तींध्ये असलेला वेगळा लिंगभाव समजून घेणे आता शक्य झाले आहे. जगभरातील व्यापक सर्वेक्षणातून तृतीयपंथीयाविषयीचे सत्य सामोरे आले आहे. मानवी हक्क व्यक्तिस्वातंत्र्य व सामाजिक न्यायाच्या या संघर्षात भारतीय संसदेने आता आपले योगदान द्यायला हवे. कायद्यात योग्य दुरुस्त्या करून आपण तृतीयपंथीयाचे जगणे अधिक सुसह्य करायला हवे.
इंटर्नशिप करताना (१९७७) व त्यानंतर १९७८ ते ८० या काळात मनोविकारशास्त्र शिकत असताना लिंगभाव व प्रत्यक्ष लिंगरचना यांतील फरकामुळे व्यथित मुले मुली, मी पाहिली, तपासली होती. आधीच आजूबाजूला स्त्री व पुरुष या दोघा वेगळ्या लिंगाच्या व लिंगभावनांच्या व्यक्तीतील नाते-व्यवहार- विचार या सर्वांत नैसर्गिक निरागसता, मोकळीक नसल्याचे, संकोच व कुचंबणा अधिक असल्याचे दिसत होते. एकमेकांतील फरक समजून घेणे दूरच, उलट त्याही वेळी त्याविषयी समाजात गुप्तता व मनात गूढ असल्याचे पहात होतो. अश्यावेळी रूढार्थापासून वेगळे जगू लागल्यामुळे संभ्रान्त, अस्वस्थचित्त तृतीयपंथीयांची, त्यात हिजड्यांची भेट झाली की मनातला गोंधळ उफाळून यायचा. वैद्यकीय ज्ञानाने त्यांच्या विषयीची भीती, दडपण दूर करून मनात कुतूहल पेरले होते एवढे खरे. मानसशास्त्रही माणसाचे मन व मेंदू जाणण्यात वेगाने प्रगती करीत होते. त्यामुळे हिजड्यांना जाणून घेण्यासाठी मनात शास्त्रीय जिज्ञासा, डॉक्टरी आत्मविशास व त्यांच्या दुःस्थितीविषयी कणव जागी होती. जे अजून स्वतःच्या लिंगभावाविषयी संभ्रान्त होते त्यांच्याशी संवाद साधून त्यांना ही जाणीव अॅबाल नाही, फक्त लिंगभावातले वेगळेपण आहे, हे पटवून देण्याचा मी प्रयत्न करीत होतो. मनोविकारशास्त्राने १९७३ मध्येच समलिंगी संबंधाविषयी निरोगी भूमिका घेतली होती. मात्र समलिंगीइतकेच लिंगभावातील वेगळेपण व त्यातून येणारी अस्वस्थता हा रोग नसल्याची जाणीव व्हायला १९७३ ते २०१३ एवढा ४० वर्षांचा काल लागला. मे ध्ये प्रसिद्ध झालेल्या Diagnostics Statistics Manual DSMV मध्ये मानसिक विकारांवरील वर्गीकरणात GID – जेन्डर आयडेंटीटी डिसऑर्डर ही disorder रद्द करून, त्या जागी लिंगभावातील वेगळेपण हा मनोविकार समजू नये असे नमूद केले आहे. उलट त्याबाबत समाजाची प्रतिकूल प्रतिक्रिया व अवहेलना भोगावी लागल्यामुळे अशा व्यक्तींना वाटणारी अस्वस्थता व त्यांच्या मनात निर्माण होणारी उदासीन, ‘कटू भावना’ – — Gender Dysphoria — लक्षात घ्यावी, असे नमूद केले आहे. या व्यक्तींशी बोलताना, मानसशास्त्रीय तपासणी करताना १९७७ सालीही मला हा रोग वाटत नव्हता. त्यामुळे अशा व्यक्तींच्या मनातील गोंधळ दूर करण्यासाठी मदत करतानाच त्यांची अस्वस्थता, नैराश्य, कधी आत्महत्येच्या प्रयत्नांपर्यंत पोहोचलेली विषादव्यथा यांच्यावर उपचार करावे लागत होते. त्याचबरोबर याला नीट दुरुस्त करा, असा ठाम आग्रह धरणाऱ्या आईवडिलांनाही उपचारात सामील करून घ्यावे लागत होते. अश्या मुलांचा वेगळा लिंगभाव समजून न घेतल्यामुळे अनेक पालकांनी ‘आम्हाला कसले समजावताय, त्याला ठीक करा’ असे मला रागाने ठणकावून सांगितले. दुसऱ्या बाजूला काही तृतीयपंथीयांनी मला लिंगबदल सर्जरी करायचीय, सर्टिफिकेट द्या लौकर असा लकडा लावीत मानसशास्त्रीय तपासाला लागणाऱ्या वेळाबद्दल मला खडसावलेही. त्यात पुन्हा मानसतज्ज्ञांध्ये संभ्राचे वातावरण असल्याने त्यांच्याशी चर्चा करताना उलटसुलट विचारप्रवाह मला अस्वस्थ करीत. ‘हे मानसशास्त्रज्ञ या एवढ्या सरळसोट मेंटल पेशंटांना पेशंट म्हणून ट्रीट करायचे सोडून त्यांना समजून घेण्याचे उपद्व्याप कसले करताहेत ? असले कसले लाड करताहेत हे? कोणाही (गाढवाला) कळेल हे छक्के आहेत, अबनॉ ल आहेत!’ अशी समाजातील इतरेजणांची शेरेबाजी असायची. एकूण काय त्यावेळचे समलिंगी, त्यांचे नातेवाईक व इतर समाज या सर्वांचा रोष आमच्या वाट्याला यायचा. असे रुग्ण (?) टाळणे त्या मानाने सोपे होते. पण तसे करणे शहाणपणाचे नव्हते, माणुसकीचे तर नव्हतेच नव्हते. लिंग हा शरीररचनेचा भाग, तर लिंगभाव ही मनाची आंतरिक जाणीव हे लक्षात घेऊन लिंगजाणीव व त्या विषयीचा संभ्र समजून घेणे योग्य ठरेल. हिजड्यांध्ये पुरुषांचे लिंग व स्त्रीचा लिंगभाव हे सत्य सामोरे येते. गर्भधारणेनंतरचे सहा आठवडे स्त्रीची गुणसूत्रे दद व पुरुषांची दध असतात. त्यानंतर ध वरील sry जीन कार्यरत होऊन टेस्टोस्टेरॉन हा संप्रेरक पुरुषी लिंग तयार करावयाचे कार्य सुरू करतो. यांच्या कार्यपद्धतीतील दोषाने व कधी गुणसूत्रातील गडबडीमुळे लिंगनिश्चितीचा गोंधळ अस्तित्वात येतो. टेस्टोस्टेरॉनचा प्रभाव कमी झाल्यामुळे लिंग पुरुषाचे, तर लिंगभाव स्त्रीचा असे ‘हिजडा’ स्वरूप जन्माला येते. तेथे पुरुषाला स्त्रीप्रमाणे राहायला, वागायला आवडते. हावभाव, वर्तन, पेहराव, जोडीदाराची निवड, स्वजाणीव हे सारे, अशा पुरुषाला स्त्रीप्रमाणे होत असते. पुरुषांचे आकर्षण वाटत रहाते. काहीना पुरुषी लिंगही नकोसे वाटते व स्त्रीप्रमाणे शरीर — निदान छाती व जननेंद्रिय — असावेसे वाटते. मग ते उपचारात स्त्रीसंप्रेरकाची मागणी करतात वा लिंगबदल शस्त्रक्रियेचा आग्रह धरतात. लिंगभावावर समाजाच्या अपेक्षांचा खूप प्रभाव पडतो. समाज फक्त स्त्री वा पुरुष लिंगावरूनच तदनुसार लिंगभाव ठरवितो आणि तोच भाव त्या स्त्रीपुरुषा कडून अपेक्षित करतो. निसर्गाने केलेली गडबड समाजाला कळत नाही. लिंगभावाची ओळख कशी व कधी होते? वय वर्षे दोन ते चार या काळातील मुलांचे वागणे, त्यांचे खेळ, हे त्यांचा लिंगभाव दर्शवीत नाहीत; मात्र त्या काळात मुलगा की मुलगी ही आजूबाजूच्यांनी दिलेली ओळख मुले स्वीकारतात. ही ओळख नंतर नाकारणे मुलांना कठीण जाते. मुलगा व मुलगी वेगळी ओळखणे मुलामुलींना वय वर्षे ३ – ४ मध्ये जमते. ९०% मुलांना, मोठे झाल्यावर मुलगा वडील बनणार व मुलगी आई बनणार हे कळते. आणि लिंगभाव बदलता येत नाही याची अंधुक कल्पनाही येते.
वय वर्षे ३.५ ते ४.५ मध्ये मुलगे मित्र व मुली मैत्रिणी निवडण्याकडे कल दाखवितात. याच वयात खेळही आपापल्या लिंग ओळखीनुसार निवडले जातात. मुली धसमुसळे खेळ निवडतात तर मुली बाहुल्या पसंत करतात. अर्थात आजूबाजूचे जग त्यांना हे सुचवण्यात सतत मदत करीत असते. वय वर्षे ४ ते ६ पर्यंत हा लिंग – लिंगभाव फरक मुलामुलीच्या वागण्याबोलण्यात, आवडीनिवडीत, मैत्र निवडीत, पेहराव-रुचीत दिसून येऊ लागतो. मुलाचे बायकी वागणे वय वर्षे ६ पर्यंत स्पष्ट होते. आपण इतर मुलांपेक्षा वेगळे आहोत हे जाणवल्यावर मनात अस्वस्थता, चिंता वाटते. स्वत:चा रागही येऊ लागतो. तो मुलगा सुरुवातीला ही स्वतःतील वेगळेपणाची जाणीव दडपून टाकीत पुरुषी वागण्याचा प्रयत्न करीत रहातो. मात्र कुमारवयात व पौगंडावस्थेत त्याला आपल्यातला हा फरक तीव्रतेने अस्वस्थ करीत रहातो. त्याला मुलींसारखे जगण्यात आनंद वाटतो, पुरुषी जगणे नकोसे वाटू लागते. मैत्रिणीत मिसळावेसे वाटते व पुरुषांबद्दल काहीना आकर्षण वाटू लागते.
आधीच पौगंडावस्थेत लैंगिक भावनेच्या जबरदस्त प्रभावशाली जाणीवेने मुलांना गांगरल्यासारखे होते. त्यात शरीर वेगळे व लैंगिक भावना वेगळ्या हे द्वैत जगणे अशा मुलास कठीण जाते हे स्वाभाविकच आहे. आपल्यातील हा फरक त्यालाही प्रथम स्वीकारता येत नाही, काही काळाने हा लिंगभाव तो स्वीकारतो. लिंगवर्तनाबाबत समाजाच्या अपेक्षा व ठोकताळे वेगळे असतात, त्याविरुद्ध वागणे सोपे नसते.
आपला लिंगभाव खाजगी असून चालत नाही, तो सर्वान्य व सार्वजनिकच असावा लागतो.
स्त्रीसारखे जगणे त्याला आवडते, नव्हे आपण मनाने स्त्रीच आहोत हे त्याला मनो न पटते. तसे उघड जगून मात्र चालत नाही. आजवर मनातला हा संघर्ष त्याने मनातच दडपलेला असतो. आता मात्र हे असह्य झाल्याने तो हे समाजात व्यक्त करू पहातो. येथे त्याला समाजाच्या प्रचंड दमनशाहीचा अनुभव येतो. बायल्या म्हणून कुचेष्टा झालेली असतेच, आईवडील, आप्तस्वकीय, मित्रमंडळी सारे त्याच्यावर सक्ती करतात, न ऐकल्यास दम भरतात, प्रसंगी घराबाहेर, दोस्तीबाहेर, समाजाबाहेर फेकून देतात. तसे झाले तर स्वत:चा स्वीकार शोधीत त्याला हिजड्यांच्या पंथात जावे लागते. तेथे होणारा स्वीकार त्याला शांत करतो. आपला लिंगभाव योग्य असल्याची त्याला पावती मिळते. मात्र आता समाज- बहिष्कृत जीवन स्वीकारावे लागते. पंथ/गुरु वागवेल तसे जीवन कंठावे लागते. काही घरांत वडील उपलब्ध नसतील तर व आईला मुलगी हवी असेल तर त्यांना मुलीसारखे पेहराव, केशरचना केली जाते. आजूबाजूला वा घरात मुलीच असल्यास मुलगा त्यांच्या अविर्भावाची, पेहरावाची नक्कल करू लागतो. कधी आई स्वतःच्या आवडीनिवडीनुसार, नवऱ्याबद्दल राग असल्यास वा स्वतःच मनोविकृत असल्यास मुलामध्ये मुलीच्या लिंगभावाचे रोपण कळतनकळत करू लागते. हल्लीच्या घरांत आईवडील दोघेही उपलब्ध नसतील तर मुलांचा लिंगभाव योग्यरीत्या विकसित पावण्यात अडथळे येऊ शकतात. अर्थात हे सर्व अडथळे मानसोपचाराने दूर करणे शक्य असते. गुणसूत्रे व संप्रेरके ह्यांच्यामुळे होणाऱ्या लिंगभावास बदलणे मात्र शक्य होत नाही व तो लिंगभाव स्वीकारणे जास्त योग्य ठरते. मुलींपेक्षा मुलांना त्यांचा स्त्रीलिंगभाव स्वीकारणे व समाजात तो व्यक्त करणे त्रासदायक ठरते. टॉ बॉय मुलीला पुरुषी अविर्भाव, पेहराव, वर्तणूक समाजात फार त्रासदायक ठरत नाही. उलट पुरुषसत्तेच्या दमनाखाली व्यथित स्त्रियांना हा एका स्त्रीमधला पुरुषी जोश सुखावून जातो. लिंगभावातील फरकामुळे मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्या मुलामुलींचे प्रमाण जवळजवळ ९:१ असे आहे, यावरूनही वरील वस्तुस्थिती लक्षात येते.
आजपर्यंत या लिंगानुसार लिंगभावाच्या अस्वीकाराला मनोविकार समजले जायचे. त्यास मनोविकारशास्त्रातील वर्गीकरणामध्ये DSM IV Diagnostics and Statistical Manual _Uo Gender Identity Disorder जी.आय.डी. म्हणून ओळखले जाई. त्यात प्रमुख ४ लक्षणे महत्त्वाची होती. ती पुढीलप्रमाणे: अ) १. अन्य लिंगभावाची सतत प्रखर जाणीव असणे — यात पुन्हापुन्हा आपण भिन्नलिंगी (पुरुष असेल तर स्त्री) असल्याबद्दलची इच्छा प्रकट करणे व तसे रहाण्याचा आग्रह धरणे. २. अन्यलिंगी पेहरावास अधिक प्राधान्य देणे. ३. अन्यलिंगी भूमिकेने वागण्यास तीव्र व सातत्यपूर्ण प्राधान्य ४. अन्यलिंगी खेळ, मित्र वा मैत्रिणी, मनोरंजन वा दिवास्वप्न यात विशेष रुची. ब) स्वतःच्या लिंगाबाबत अस्वस्थता व त्यानुसार वर्तणाचा अस्वीकार, पौगंडावस्थेत होणारे शरीरातील बदल न आवडणे, ते बदलण्याची तीव्र इच्छा (संप्रेरकाद्वारे वा सर्जरीद्वारे) व्यक्त करणे. क) ही मनोऽवस्था इतर कुठल्याही लिंगविषयक शारीरिक दोषामुळे नसणे. ड) या दोषामुळे मानसिक त्रास होणे व त्यामुळे सामाजिक, व्यावसायिक वा इतर कार्यपद्धतीत अडथळे येणे.
मे ध्ये आलेल्या नव्या अडच् मध्ये वरील दोषांना ‘डिसॉर्डर’ न म्हणता केवळ Gender Dysphoria असे म्हटले आहे. ही रोगाची लक्षणे न समजता लिंगभावाचा स्वीकार व देहातील विरुद्ध लिंगाचा हा अस्वीकार समजून घेऊन त्यातील मानसिक त्रासाबद्दल/अस्वस्थतेबद्दल मानसशास्त्राची, मनोविकारशास्त्राची मदत दिली जावी असा उद्देश यात आहे. अशा व्यक्तींना मनोरुग्ण समजले जाऊ नये, सर्वसाधारण, नॉल, निरोगी व्यक्तींपासून त्यांना वेगळे समजू नये व त्यांना लिंगबदलासाठी आवश्यक ती वैद्यकीय मदत मिळावी, असे आज या DSM2 बदलातून अपेक्षित आहे. मानसिक रोगनिदानामुळे स्वतःतील वेगळेपणाची लाज वाटून स्वतःची अस्वस्थता लपवली जाते, स्वत्वाच्या निरोगी जाणिवेला अडथळा येतो, तसे होऊ नये यासाठी मनोविकारशास्त्राने हे बदल केले आहेत. मनोविकार शास्त्रातील मानसोपचार, सायकोथेरपी व औषधे यांची प्रभावी मदत हिजड्यांना होऊ शकते. मुलांबाबत, सर्वप्रथम त्याची स्वतःची मानसिक आंदोलने स्थिर करावी लागतात. त्याला जाणवणारी चिंता, मनातील गोंधळ, बधिरता, निराशा, स्वतःचा अस्वीकार या सर्व लक्षणांची दखल घ्यावी लागते. ‘तू निरोगी आहेस, तुझा लिंगभाव तुझ्या लिंगाहून वेगळा आहे, आणि हा तुझा दोष नाही’ हे त्याला संवेदनशीलतेने, सहज सोप्या शब्दांनी व आपुलकीने समजून द्यावे लागते. त्याला समजून घेणे, त्याच्या भिन्न लिंगभावासहित त्यास स्वीकारणे आणि ओशासक शब्द आणि कृती ह्यांद्वारे घरात, कुटुंबात, समाजात त्याचे स्वतःचे स्थान निर्माण करणे, इतर मुलांप्रमाणे स्वतःचा विकास घडवण्यात, त्याला लागेल ती मदत देणे ही कामे डॉक्टर, कुटुंब व समाज या तिघा समाजघटकांनी आवर्जून करायला हवीत. लैंगिक छळापासून-अत्याचारापासून त्याचे रक्षण करायला हवे. त्याला व्यक्त होण्यासाठी अवकाश व संधी मिळायला हवी. त्याच्या व्यक्तिमत्त्वातील गुण शोधून त्यांचा विकास घडविण्यासाठी त्यास प्रोत्साहन, मार्गदर्शन व मदत द्यायला हवी. खेळ, कला, संगणक, थिएटर आदी क्षेत्रां धील त्याला क्षमतेनुसार संधी मिळेल असे करायला हवे. त्याला दोष देणे, त्याच्यावर दडपण आणणे, त्याची कुचेष्टा/अवहेलना अपमान/निंदा करणे थांबवायला हवे. मनाच्या दुखापतीपासून, नैराश्यापासून सावरण्यासाठी आज मनोविकारशास्त्रात प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. ठराविक काळ, योग्य मात्रेनुसार औषधोपचार करण्याने मूळ/व्यक्ती सावरण्यास मदत होते. ही औषधे हानिकारक, अमली, सवय लावणारी, लिवर, हार्ट किंवा किडनीला दुखापत करणारी अशी नसून, योग्य त्या अनुभवी मनोविकारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने ती घेण्याने लाभ होतो. ज्यांना लिंगबदल हवा असतो त्यांच्यासाठी मनोविकारतज्ज्ञांतर्फे सुयोग्य मनश्चिकित्सा, वैद्यकीय तज्ज्ञाद्वारे तपासणी, संप्रेरके व इतर औषधांचा वापर करणे हितावह असते. लिंगबदल शस्त्रक्रियेआधी किमान एक ते दोन वर्षे स्त्री म्हणून समाजात वावरण्याचा ‘खरा जीवनानुभव’ real life mxperience या व्यक्तीने घेणे सुचविले जाते. त्यानंतर या तज्ज्ञांद्वारे योग्य वाटल्यास लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी त्यास त्या विषयातील अनुभवी शस्त्रक्रियातज्ज्ञा(सर्जन)कडे पाठविले जाते. अश्या तपासणीतून मग लिंगबदलशस्त्रक्रिया करून घेतल्यास, त्या हिजड्याचे पुढील आयुष्य आनंददायी जाऊ शकते. अर्थात त्याचे त्यानंतरचे सामाजिक पुनर्वसन यात महत्त्वाचे आहेच. सक्तीने, जबरदस्तीने हिजड्यास स्त्री म्हणून जगण्यात अडथळे आणण्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडू शकते. आयुष्यभर तो कुढत राहतो, वैफल्यग्रस्त होतो, समाज-बहिष्कृत होऊन मिळेल तसे जीवन जगत राहतो वा स्वनाशाकडे वळतो. हे चित्र बदलणे आपणा सर्वांना शक्य आहे. मनोविकारशास्त्राने आपल्या पद्धतीने सखोल संशोधन, प्रचंड वैद्यकीय पुरावे, जगभरातील विशेषज्ञांशी व समाजघटकांशी प्रदीर्घ चर्चा करून तृतीयपंथीयांवरील मानसिक आजाराचा शिक्का काढून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. याचा मला आनंद व अभिमान आहे. भारतीय हिजड्यांच्या आजवरच्या दुःखी अंधाऱ्या क्षितिजाला यापुढे कुठेतरी दूरवर पहाट फुटू शकेल. समलिंगी व्यक्तींना ओळखीच्या समाजात तर स्वघोषित हिजड्यांना अनोळखी गर्दीतही स्थान नाही. अट्टहासाने टाळ्या पिटीत, कारच्या उघड्या काचेकडे धावत जात भीक मागणे, देहविक्रय करीत रोजचे अन्नवस्त्र मिळविणे, रात्री जमेल त्या कोनाड्यात देह पसरणे, आपापल्या पंथाच्या व गुरूच्या आज्ञा विनातक्रार पाळीत आपला तेथला स्वीकार जपणे, आपले तिरस्कृत आयुष्य मरेपर्यंत निमूट ओढग्रस्त अवस्थेत कंठत, मनाचा कोंडमारा करीत समाजासमोर ‘गुप्तता’ सांभाळीत जगणे, संसार मुलेबाळे, आत्मसन्मानाने समाजात वावर या गोष्टी झोपेत स्वप्न म्हणूनसुद्धा न पाहणे, समाजाच्या दृष्टीत रोज दिसणारी कुचेष्टा, संशय, भीती, तिरस्कार पचवीत राहणे, या साऱ्यांत जगण्याची स्वाभाविक रुची कुठे, कशी जपायची ? काही उच्च, संपन्न, मजूतदार, प्रे ळ घरच्यांनी केलेला समलिंगी व्यक्तींचा स्वीकार आणि समाजाने अचंब्याने काही कर्तृत्ववान हिजड्यांचे केलेले कौतुक आज अनेक हिजड्यांना दिलासा देते, आत्मपरीक्षण करायला लावते, अंधारकोठडीची कुलुपे उघडल्याचा आवाज ऐकवते. पण ज्यांच्यापाशी असे कर्तृत्व, कला, रूप, आत्मविशास, सहृदय संपन्न समजूतदार कुटुंब, इंग्लिश भाषा, शिक्षण, समाजातील थोरामोठ्यांकडून मिळणारा आदर, मैत्री, प्रे काहीच नसेल त्या हिजड्यांची काळकोठडी उघडायची कधी, कोणी व कशी? लिंगभाव-भेद-संभ्र ाची त्यांची जन्मठेप संपायची कधी? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहतात. मनाला थकवितात, डोळ्यांतील अश्रू अधिकच खारटतात! जिभेवर रेंगाळते एक विषण्ण कडवट चव! आपण प्राणी, पक्षी, झाडे, फळे, फुले, पर्वतराजी यांची वेगवेगळी रूपे, सृष्टीचे वैविध्य म्हणून अचंबित होत पाहतो, स्त्री-पुरुष, व्यक्तिव्यक्तींतील वैविध्याचे आपल्याला अप्रूप वाटते. मग स्त्री आणि पुरुष यांतील ‘हे तिसरे’ आपल्याला का स्वीकारता येत नाहीत ? सेक्स, लैंगिक भावना, लिंगभाव किंवा लिंगसंभ्र ह्या गोष्टींचा स्वाभाविकपणे विचार व स्वीकार आपल्याला का करता येत नाही? हिजडे समजून घेतले तर त्यांच्यातील माणूसपण, त्यांचे गुणअवगुण, बुद्धिमत्ता, कलाकौशल्य सारे आपल्यासारखेच आहे हे साधे सत्य समजून घ्यायला आपण अजून किती वर्षे घेणार आहोत ? हिजड्यांनी त्यांना नाईलाज म्हणून कराव्या लागणाऱ्या गोष्टी – अंगविक्षेप, देहविक्रय, भीक मागताना अंगावर येत दमदाटी — धाक दाखविणे, गुन्हेगारी ई — सोडल्या तर ते आपल्यात स्वीकारार्ह वाटतील असे बरेचजण म्हणतात. पण या साऱ्या गोष्टी आपण त्यांना समाजात स्थान नाकारल्यामुळे आहेत हेही लक्षात घ्यायला हवे. एकमेकांचा स्वीकार करताना आपापल्या मानसिक भूमिकेत अनेक बदल करावे लागतील! समलिंगी व्यक्तींना ‘सर्वसामान्य माणसाचे जगणे’ मिळायला हवे, हे आज मानवी संस्कृतीला विज्ञानाचे आवाहन आहे! भारतीय संसदेने या प्रश्नाचा गंभीरपणे व सहानुभूतीने विचार करावा, अशी कळकळीची विनंती आहे.
२, वसंत वैभव, छ.शिवाजी महाराज मार्ग, पनवेल – ४१० २०६. Patkar.pradeep@gmail.com, Mobile: ९८६९४७२२१५