मासिक संग्रह: नोव्हेंबर, २०१३

पत्रसंवाद

आसु जुलै २०१३ मधील तारक काटे यांचा लेख वाचला.

आज जगभरात… २,८६,००० प्रजाती सपुष्प वनस्पतींच्या आहेत…. नवी प्रजाती (species) किंवा वाण तयार होतो…. जगात आज गव्हाच्या १४००० वाणांची नोंद झाली आहे. भारतात तांदळाचे जवळपास दोन लाख वाण अस्तित्वात असावेत. असे ते पहिल्या-दुसऱ्या परिच्छेदात लिहितात. २,८६,००० प्रजातींपैकी भारतातील २,००,००० तांदळाचे आणि जगातील १४००० गव्हाचे वाण वगळले तर इतर जगातील तांदळाच्या, मका, पालेभाज्या, फळभाज्या, फळफळावळ, कंदमुळे, शोभेची फले अशा असंख्य सपष्प वनस्पतींचे फक्त ७४,००० च वाण आहेत असा निष्कर्ष येतो.

मला वस्तुस्थिती माहीत नाही.

पुढे वाचा

मुस्लिम मनाचा उत्कट आविष्कारः अजीम नवाज राही यांची कविता

मराठी कवितेत मुस्लिम कवींचे योगदान प्राचीन काळासूनच राहिलेले आहे. शेख मोहंद, शेख सुलतान, अल्लाखान, याकूब हुसेनी इ. मुस्लिम कवींनी संत कवितेत सुफी पंथाच्या मानवताधर्माची मांडणी केली आहे, तर तंत कवितेच्या काळात मराठी शाहिरी काव्य लिहिणारे सगनभाऊ, दादू पिंजारी, शेख कलंदर ह्यांची नावे आपल्यासमोर येतात. आधुनिक काळात शाहीर अमरशेख, प्रा. नसीमा पठाण, खलील मो नि, अल्लाउद्दीन आणि रफीक सूरज हे नामांकित कवी आहेत. मध्ययुगीन काळातील सुफी कवींच्या कवितेतून सुफी तत्त्वज्ञानांच्या औदार्याचे दर्शन तर शाहिरांच्या कवितेतून लावण्याच्या विविध छटा आविष्कृत होत गेल्या. आधुनिक कवितेतून मुस्लिम समाजातील आर्थिक अनिश्चितता, अल्पसंख्यकपणाची जाणीव यांसह बंधुभावासाठीचे उमदे मन हे विषय अभिव्यक्त झाले.

पुढे वाचा

विज्ञान आश्रमाची कथा – लेखांक २

आघाडीचा अभ्यासक्रम मूलभूत ग्रामीण तंत्रज्ञानाची पदविका (DBRT)

‘ग्रामीण तंत्रज्ञान पदविका’ हा विज्ञान आश्रमाने विकसित केलेला मुख्य अभ्यासक्रम आहे. मागच्या अंकात म्हटल्याप्रमाणे निसर्ग हाच अभ्यासक्रम मानून सोईसाठी या अभ्यासक्रमाचे – अभियांत्रिकी, ऊर्जा-पर्यावरण, शेती डु पशुपालन आणि गृह आरोग्य हे चार विभाग केले आहेत. ज्यांना कोणाला हे तंत्रज्ञान शिकायचे आहे, त्यांना थोडे फार गणित आणि लिहिणे-वाचणे येते ना, म्हणजे सर्वसाधारणपणे आठवीपर्यंतचे शिक्षण आहे ना, वय चौदा वर्षांपुढे आहे ना, त्यांना एकट्याने घराबाहेर वर्षभर राहता येईल ना याची खात्री केली जाते. बाकी हिंदी – मराठीचे व्यवहारापुरते ज्ञान असले की मार्काची काही अट नसते.

पुढे वाचा

अनवरत भंडळ (६)

आध्यात्मिक साधनाः सुंदर जगण्यासाठी योगी श्री अरविंदांनी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आध्यात्मिक तत्त्वज्ञानाची जी पुनर्मांडणी केली, तिचा सारांश आपण मागील लेखांकात पाहिला. विशातील मूळ सत्य हे आनंदस्वरूप व एकमेवाद्वितीय असे चैतन्य असून तेच असंख्य रूपे, आकार व सामर्थ्य धारण करून क्रमाक्रमाने विविध पातळ्यांवर अवतीर्ण झाले आहे. भौतिक पातळीवर त्या चैतन्याने संपूर्ण जडतत्त्वाचे आवरण घेतले व आंधळ्या/अज्ञानी प्रकृतीच्या/निसर्गाच्या गर्भातून गुप्तपणे त्या प्रकृतीच्या विकासाला आधार देत राहिले. सृष्टीचा विकास धडपडत/चाचपडत झाल्यासारखा दिसतो कारण बाह्यतः हा जड/अचेतन ऊर्जेचा/पदार्थाचाच प्रवास आहे. आणि तरीही त्या प्रवासाला एक दिशा दिसते कारण त्या दिशेकडे प्रकृतीला पडद्याआडून घेऊन चालणारे चैतन्यही तिच्याच उदरात आहे.

पुढे वाचा

स्त्री-द्वेष, बलात्कार आणि औषधविज्ञान

आपण बलात्काराबद्दल बोलतो तेव्हा कशाबद्दल बोलतो? आता आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारायची वेळ आली आहे. १६ डिसेंबर २०१२ नंतर भीतीचे एक राष्ट्रीय शोकनाट्य सादर झाले. स्त्रीद्वेषाचे सहसा दिसणारे परिणाम-भीती, जखमा आणि असुरक्षितता सगळीकडे व्यक्त झाले. विरोधाभास असा की, किंवा कदाचित विरोधाभास नाहीच, की दिल्लीतल्या त्या भयंकर रविवारनंतर जास्त विनयभंग, जास्त बलात्कार आणि जास्त खून घडले. या प्रश्नाच्या उत्तरातून कृती (अॅक्ट) आणि धारणा (अटिट्यूड) यातला फरक शोधण्याचा मी प्रयत्न करतो. या दोन्हीचा काही संबंध आहे का? मला माहीत नाही. पण आपण कृती आणि धारणा समांतर आहेत असे मानतो.

पुढे वाचा

विचार तर कराल

डॉ.नरेंद्र दाभोलकरांचा आणि माझा परिचय साधारणपणे १९९४-९५ च्या दरम्यान झाला. आम्ही सारे त्यांना डॉ. दाभोलकर वा नुसते डॉक्टर म्हणत असू पण त्यांच्या पुस्तकांवर दाभोलकर असे लिहिले जाते. त्यावेळी वास्तुशास्त्रावर दादरला एक सभा होती. एक वास्तुशास्त्रावर बोलणारे वकील, एक प्रतिवाद करणारे आर्किटेक्ट, दाभोलकर आणि अध्यक्ष एक निवृत्त न्यायमूर्ती अशी ती सभा होती. दाभोलकरांचे भाषण विनोदी आणि वास्तुशास्त्राची खिल्ली उडवणारे होते. मुद्दे इतके बिनतोड होते की प्रतिवाद करण्याची संधी मिळूनही वकील महाशयांना फारसे काही बोलता आले नाही.

ह्याच दरम्यान माझा ‘आजचा सुधारक’शी परिचय झाला.

पुढे वाचा

विज्ञान व वैज्ञानिक दृष्टी

विज्ञान व वैज्ञानिक दृष्टी
विज्ञान हेच एकमेव असे मानवी ज्ञानाचे स्वरूप आहे असा आक्रमक विवेकवाद (सायंटिसिझम) आणि अतीत तत्त्व माणसांतच अंतर्भूत असते हे मानणारा विवेकवाद यांत फरक आहे. हे न जाणल्याने विज्ञान व आत्मज्ञान यांची एकता तर सोडाच, पण शांततामय सहजीवन मान्य करणे अनेक पुरोगाम्यांना जड जाते. मुळात नीतिनिरपेक्ष असलेल्या विज्ञानाला आत्मज्ञानच योग्य ते सामाजिक वळण लावू शकते. या आत्मज्ञानाचा मंत्रतंत्रसिद्धी, गूढविद्या, पारलौकिक विश्व यांच्याशी तिळभरही संबंध नाही हे परत एकदा सांगितले पाहिजे. विज्ञान जेवढे वाढेल, तेवढे वाढवले पाहिजे. त्याची विनाशशक्ती रोखून विधायक शक्ती जोपासण्याचे काम आपण सांभाळले पाहिजे.

पुढे वाचा