संपादकीय विवेकवाद व्यापक करू या!
रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला एक महिना उलटून गेला. अद्याप त्यांच्या खुन्याबद्दल कोणताही महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हातात लागलेला नाही. ‘पोलिस तपास जोरात सुरू आहे’ ह्यापलीकडे शासन काहीही बोलायला तयार नाही. आतापर्यन्तच्या पोलिस तपासाचा निष्कर्ष – दाभोलकरांचा खून सुपारी देऊन करण्यात आला-एव्हढाच आहे. हे सांगायला पोलिस कशाला हवेत ? दाभोलकरांचे विरोधक स्वतः हातात पिस्तुल घेऊन त्यांचा भर रस्त्यात खून करणार नाहीत, तर कोणा गुंडाकरवी तसे घडवून आणतील हे येथील सर्वसामान्य माणसालाही कळते. एकूण दाभोलकरांचा खुनी सापडणार नाही ; सापडलाच तर त्यामागील मेंदू (व अर्थातच उद्देश) कधीच समोर येणार नाही अशा निष्कर्षाला येणे चुकीचे ठरणार नाही. ह्याहून वेगळे काही घडले तर त्याचे स्वागतच आहे.
ह्या विशेषांकामागील भूमिका समजून घेण्यापूर्वी गेल्या महिन्याभरात काय घडले त्याचा अर्थ लावणे आवश्यक आहे. दाभोलकरांची हत्या ही सर्व पुरोगाम्यांना लगावलेली सणसणीत चपराकच होती. देवाधर्मावर हल्ला न करता संयत ठामपणे विवेकवादी भूमिका मांडणारे दाभोलकरही आम्हाला चालणार नाहीत. किंबहुना हिंदू धर्माच्या आम्ही करीत असलेल्या संकुचित व्याख्येपलीकडे कोणी विचार मांडत असेल तर ते आम्ही चालवून घेणार नाही असा इशाराच ह्या खुनातून देण्यात आला होता. ह्याविषयी आम्ही मागच्या अंकाच्या संपादकीयात लिहिले होते. दाभोलकरांच्या खुनाबद्दल कोणी काय प्रतिक्रिया दिली हे पाहिले तर महाराष्ट्राच्या वैचारिक विशाची उभी फाळणी झाल्याचे दिसून येते. माओवादी ते सर्वोदयी अशा सर्व छटांचे पुरोगामी एकीकडे व अन्य दुसरीकडे असे हे चित्र आहे. बाबरी मशीद पडल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिकूल वास्तवाच्या प्रखरतेचे भान येऊन महाराष्ट्रातील पुरोगामी जागे झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. कदाचित, दाभोलकरांनंतर पुढचा क्रमांक आपलाही असू शकतो ही जाणीव त्यांना प्रकर्षाने झाली असावी. फुले-शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी वारशाच्या वल्गना आता महाराष्ट्राला करता येणार नाहीत, हेही ह्या निमित्ताने स्पष्ट झाले. एरवी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कोणत्याही मुद्द्यावर धर्मांध शक्तींनी ‘धार्मिक भावना दुखावल्याची’ आवई उठवून दहशतीचे वातावरण निर्माण करून सर्व सामाजिक-सांस्कृतिक अवकाश व्यापून टाकावा व उरलेल्यांनी हतबुद्ध होऊन गप्प राहावे असेच प्रातिनिधिक चित्र महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे दिसत होते. ह्यात हस्तक्षेप करून कोणी येथील स्मशानशांतता भंग करू शकणार नाही अशी हतबलतेची भावना विवेकवाद्यांच्या अकर्मण्यते ळे निर्माण झाली होती. दाभोलकर हत्येच्या निमित्ताने त्याला छेद गेला. म्हणूनच महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यातून ह्या घटनेचे पडसाद उमटले. आंबेडकरवादी , गांधीवादी, सर्व छटांचे मार्क्सवादी व समाजवादी तसेच लिबरल मंडळी निषेध कार्यक्रमात उस्फूर्तपणे सहभागी झाली. सर्वसामान्य माणसालाही ह्या हत्येळे धक्का बसल्याचे जाणवले. ह्याउलट हिंदुत्ववादी मंडळी त्यामुळे बचावात्मक भूमिकेत गेली. शिवसेना-भाजपने ह्या कृत्याचा निषेध केला, पण तेवढेच. आमचे दाभोलकरांशी मतभेद होते, पण आम्ही त्यांच्या खुनाचे समर्थन करीत नाही ही त्यांची भूमिका होती. परंतु स्वतःला धर्माचे कैवारी म्हणविणाऱ्यांपैकी कोणीही दाभोलकर हे महत्त्वाचे सामाजिक काम करीत होते व त्यांचा खून हा समाज-प्रबोधनाच्या, हिंदू धर्मासह सर्व धर्मांच्या उन्नयनाच्या कामातील प्रतिरोध आहे असे मांडले नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवे. त्यापलीकडे जाऊन सनातन धर्म व हिंदू जागृती समिती ह्यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसते. सनातन संस्थेचे प्रमुख दाभोलकरांच्या मृत्यूबद्दल ‘प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ मिळते’ असे बोलले व संस्थेच्या वेबसाईटवर दाभोलकरांच्या प्रतिमेवर काट मारलेली दिसली अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. दाभोलकरांच्या मृत्यू ळे घडलेले वैचारिक ध्रुवीकरण, सर्व पुरोगामी संघटनां ध्ये आलेली सक्रियता व समाजाच्या सर्व थरातून झालेला झालेला हत्येचा निषेध ह्या गोष्टी स्वागतार्ह आहेत, पण पुरेशा नाहीत. कारण ह्या सर्व तात्कालिक भावनिक प्रतिक्रिया आहेत. जनसामान्यातली सहानुभूती थोडा काळ टिकेल नंतर ही घटनाही विस्मृतीत जाईल. वैचारिक आधार नसेल तर पुरोगाम्यामधले ऐक्य टिकणार नाही. प्रागतिक विचार करणाऱ्यामधील वैचारिक व मानसिक मतभेद व मनभेद हा अतिशय आवश्यक पण गुंतागुंतीचा विषय आहे. त्याचा उहापोह करण्यास अनेक व्यासपीठे आहेत. पण ‘आजचा सुधारक’च्या दृष्टीने विवेकवादावरील अस्तित्त्वाचे संकट हा कळीचा मुद्दा आहे. किंबहुना ते ह्या वैचारिक व्यासपीठाच्या अस्तित्वाचे प्रयोजनच आहे. म्हणूनच आम्ही दाभोलकरांच्या हत्येच्या पोर्शभूीवर आ.सु.चा ‘अंधश्रद्धा निर्मूलन: कायदा व व्यवहार’ विशेषांक काढण्याचे ठरविले.
ह्या संदर्भात आम्हाला खालील निरीक्षणे महत्त्वाची वाटतात:
१. दाभोलकरांच्या मृत्यूनंतर जनमानसात उसळलेला प्रक्षोभ शमला नव्हता तेव्हा, म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांत जादूटोणाविरोधी अध्यादेशाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना हिंदुत्ववादी संघटनातर्फे निवेदने देण्यात आली. म्हणजे प्रस्तावित कायद्याला संघटितरीत्या विरोध करण्याची प्रक्रियाही तेव्हाच सुरू झाली.
२. बंडातात्या कराडकर व अन्य मान्यवर वारकरी नेते गेली दोन वर्षे प्रस्तावित अंधश्रद्धाविरोधी विधेयकाला पाठिंबा देत आहेत. तरीही वारकऱ्यांचा त्याला विरोध असल्याचे चित्र माध्यमांद्वारे सातत्याने रंगविण्यात येत आहे. यासाठी ते निवेदन/आवाहन या अंकात मुद्दाम प्रसिद्ध करीत आहोत.
३. उजव्या पक्षाचे नेते अध्यादेशाच्या बाजूने जाहीर भूमिका घेत असले तरी ह्या विचारांचे गाव-वस्ती पातळीवरील कार्यकर्ते मात्र ‘हा अध्यादेश हिंदू धर्माच्या विरोधातले आहे’ असेच मानतात व सर्वसामान्य हिंदू जनतेला त्यात तथ्यही वाटते असे चित्र आजही कायम आहे. ते पुसण्यासाठी अंधश्रद्धा-निर्मूलन कार्यकर्त्यांना बरीच मेहनत करावी लागणार आहे.
४. जादूटोणाविरोधी कायद्याच्या समर्थनार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दोन्ही संघटनाद्वारे वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. आजच्या परिस्थितीतही किमान काही कार्यक्रमांपुरते तरी आपण एकत्र यावे अशी प्रेरणा दोन्ही समूहांना झालेली नाही. कोणी त्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही दिसत नाही.
५. ‘अंधश्रद्धा’ ह्या विषयावर महाराष्ट्रात गेल्या शंभर वर्षांत बरीच चर्चा झाली आहे. ‘प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धा असते’ ह्यापासून तर ‘खऱ्या धर्मात अंधश्रद्धेला स्थान नाही’ ह्यापर्यंत मतमतांतरे आढळतात. परंतु गेल्या अनेक वर्षांत ह्या विषयावरील वैचारिक मंथन थंडावले आहे. प्रत्येक समूह आपापल्या वर्तुळात चर्चा करतो, किंबहुना आपापल्या भूमिकांवर ठाम राहून तिची उजळणीकरतो. ह्या हवाबंद कप्प्यांधून खुल्या विचाराचे, देवाण-घेवाणीचे मोकळे वारे वाहताना दिसत नाही. आज विवेकवाद व विवेकवादी कार्यकर्ता दोघांचे अस्तित्व धोक्यात आल्यावरही अशी गरज त्यांना भासू नये ही बाब खचितच चिंताजनक आहे.
६. मुख्य म्हणजे ज्या सामान्य माणसासाठी हे सारे करायचे त्याच्यापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार फारसा पोहचत नाही, पण परिवर्तनविरोधी विचार मात्र येथील वातावरणातच भिनला असल्याने तो अनेक धार्मिक-सांस्कृतिक- सामाजिक-राजकीय व्यासपीठांद्वारे लोकांपर्यंत पोहोचतो आहे. वारकरी परंपरेला संकुचित धर्माच्या विरोधात केलेल्या व्यापक बंडखोरीचा वारसा लाभला आहे. आज ही परंपरा परिवर्तनाभिमुख आहे की नाही ह्या विषयी मतभेद होऊ शकतात.
पण वारकरी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा राजकीय घटक आहे व त्यातील काहींनी सातत्याने अंधश्रद्धाविरोधी कायद्यास विरोध केला होता. अशा वेळी त्या समूहास आपली भूमिका पटवून देणे, त्याच्या मनातील गैरसमज दूर करणे महत्त्वाचे आहे असे ह्या कायद्याच्या समर्थकांना जाणवायला हवे व त्यानुसार कृतीही त्यांच्याकडून घडायला हवी. कायद्याचे विरोधक अनेक प्रकारे वारकऱ्यांचा बुद्धिभेद करताना दिसतात. पण त्यांचाशी संवाद साधण्याची प्रक्रिया कायद्याच्या समर्थकांच्या बाजूने घडताना दिसत नाही. महाराष्ट्र अंनिसची तर वेब साइटच इंग्रजीत आहे.
थोडक्यात म्हणजे अंधश्रद्धेला खरापाणी घालणाऱ्या शक्ती संघटित आहेत, त्यांची उद्दिष्टे स्पष्ट आहेत, ते सक्रिय आहेत, आक्रमक आहेत व समाजातील मोठ्या वर्गाचा त्यांना पाठिंबा आहे. ह्याउलट अंधश्रद्धेविरुद्ध लढणारे विविध कप्प्यात विभाजित आहेत, त्यांच्यात परस्पर संवाद नाही, काय करायचे ह्याविषयी संभ्र आहे व जनमानसाशी संवाद साधण्याची प्रेरणा व क्षमता त्यांच्यात दिसत नाही असे हे विदारक चित्र आहे. प्रस्तुत अंक ही वैचारिक कोंडी फोडण्यासाठी टाकलेले पहिले नम्र पाऊल आहे.
ह्या अंकाचे तीन विभाग आहेत.
पहिला विभाग आहे ‘कायदा.’ त्यात जादूटोणाविरोधी अधिनियम, त्याची अर्थउकल, गैरसमजांचे निराकरण, त्याच्या अंलबजावणीसाठी काय करता येईल, काय केले पाहिजे, पूर्वी मांडलेल्या अधिनियमातील गाळलेल्या तरतुदी ह्यांची चर्चा आहे.
दुसरा विभाग आहे ‘व्यवहार’. ह्यात अंधश्रद्धेचे मानसशास्त्रीय/समाजशास्त्रीय मूळ, आधुनिक अंधश्रद्धा, ग्रामीण भागातील अंधश्रद्धा, देव-धर्माच्या बाजारीकरणातून फोफावणाऱ्या अंधश्रद्धा ह्यांविषयक विमर्श आहे.
तिसरा विभाग आहे- ‘चिंतन’. ह्यात श्रद्धा-अंधश्रद्धा- धर्म-अध्यात्म ह्या परिघावरील मत-मतान्तराचा मागोवा घेण्यात आला आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन करणाऱ्या दोन्ही संघटनातील कार्यकर्ते, विचारक तसेच वारकरी संप्रदायातील विधेयकाचे समर्थक ह्या सर्वांनी ह्या अंकात लेखन केले आहे. किंबहुना त्यांच्या मांडणीतील ‘महत्तम साधारण विभाजक’ पहिल्यांदाच ह्या अंकाच्या रूपाने आ.सु.च्या वाचकांपर्यंत, किंबहना विवेकवादाविषयी आस्था असणाऱ्या सर्व मराठी वाचकांपर्यंत पोहचतो आहे, ह्याचे आम्हाला समाधान आहे.
दि. य. देशपांडेंच्या लेखांशातून विवेकवाद ही संकल्पना किती प्रगल्भ व व्यापक आहे, अंधश्रद्धा विरोध हे त्याचे केवळ अंग आहे हे भान जागे होईल. प्रस्तुत कायदा केवळ जादूटोणाविरोधी आहे,
प्रगल्भ व व्यापक आहे, अश्रद्धा विरोध हे त्याचे केवळ अग आहे हे भान जागे होइल. प्रस्तुत कायदा केवळ जादूटो अंधश्रद्धेची अनेक रूपे त्यात समाविष्ट झालेली नाहीत. किंबहना कितीही व्यापक अधिनियम मांडला तरी केवळ कायद्याद्वारे अंधश्रद्धा-निर्मलन होणे अशक्य आहे, कारण त्याची पाळेळे येथील आर्थिक-सामाजिक राजकीय संरचनेत, तसेच येथील माणसांच्या मानसिकतेत गुंतलेली आहेत. ही बाब डॉ. प्रदीप पाटकर व कॉ. विलास सोनवणे ह्यांच्या लेखांवरून स्पष्ट होईल. असे असले तरी ह्या कायद्याची अंलबजावणी होणे, त्यानिमित्ताने जनमानसाचे प्रबोधन होणे ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. ह्या प्रक्रियेत जेव्हढा राजकीय-सामाजिक अवकाश आपल्याला व्यापता येईल, तितकेच आपण विवेकवादाच्या दिशेने पुढे जाऊ. श्याम मानव, नरेंद्र दाभोलकर व सदानंद मोरे ह्या तिघांच्या भूमिका वाचकांसमोर आहेत. त्या वेगवेगळ्या आहेत, पण परस्पर-संवादाची संभावना घेऊन आहेत, हे आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो. दिवस कसोटीचे आहेत, त्यात आपला सर्वांचा कस लागणार आहे, हे निश्चित. आतापर्यंत आपण सारेच आपापल्या भूमिकांच्या प्रे ात होतो. त्या सोडून द्याव्या, किंवा सर्वानी पॉप्युलिस्ट पद्धतीने राजकीय दृष्ट्या सोयीस्कर गोलमोल भूमिका घ्यावी असे आमचे म्हणणे नाही. पण बदलत्या काळाप्रमाणे विवेकवादाची संकल्पनाही प्रवाही असली पाहिजे. मुख्य म्हणजे विवेकवादी असणे कठीण असले तरी तो परग्रहावरील प्राणी, किंवा असामान्य गुणांनी युक्त मानव आहे ह्या भ्राचे निरसन आपण केले पाहिजे. नामदेव-तुकारामासारखे संत कित्येक शतकांपासून अंधश्रद्धेवर प्रहार करीत आहेत. त्यांच्यापासून ते थेट फुले आंबेडकर- गाडगे हाराजांपर्यंतची ओजस्वी परंपरा आपल्याला लाभली आहे. विवेकवाद व विवेकवादी ह्यांच्यावरील अस्तित्वाचे संकट दूर करायचे असेल तर विवेकवादाला व्यापक केलेच पहिजे. त्याची नाळ सर्व सामान्य माणसाशी बांधली पहिजे. हे आपण केले नाही तर येणारा काळ आपल्याला क्षमा करणार नाही.
अतिशय कमी कालावधीत हा अंक मला अभिप्रेत असलेल्या संकल्पनेनुसार संपन्न करण्याची परवानगी व स्वातंत्र्य दिल्याबद्दल मी आ.सु.चा आभारी आहे. ह्या अंकात लेखन सहकार्य करणाऱ्या सर्व लेखकांचे मनापासून आभार. घाईघाईत काढलेल्या ह्या अंकात ह्या चुका राहिल्या असतील, त्यांची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे. ह्या अंकाद्वारे सुरू झालेली संवादाची प्रक्रिया सर्व संबंधित कार्यकर्ते, विचारक, नेते पुढे चालवतील अशी आशा आपण करावी काय ?
ravindrarp@gmail.com भ्र.ध्व. 9833346534.
जादूटोणाविरोधी अध्यादेश (मूळ पाठ)
सन २०१३ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.१४ अज्ञानावर पोसल्या जाणाऱ्या अनिष्ट व दुष्ट प्रथांपासून समाजातील सर्वसामान्य लोकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने आणि समाजातील सर्वसामान्य लोकांचे शोषण करण्याच्या व त्याद्वारे समाजाची घडीच विस्कटून टाकण्याच्या दुष्ट हेतूने भोंदू लोकांनी सर्वसामान्यत: जादूटोणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तथाकथित अलौकिक शक्तीच्या किंवा अद्भुत शक्तीच्या किंवा भूतपिशाच्च यांच्या नावाने निर्माण झालेल्या नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, दुष्ट व अघोरी प्रथांचा मुकाबला करून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने, समाजामध्ये जनजागृती व सामाजिक जाणीव निर्माण करण्याकरिता तसेच समाजात निकोप व सुरक्षित वातावरण निर्माण करण्याकरिता आणि त्यांच्याशी संबंधित किंवा तदनुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता अध्यादेश. ज्याअर्थी नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, दुष्ट व अघोरी प्रथा आणि भोंदू लोकांकडून केले जाणारे जादूटोण्याचे व भूतपिशाचाचे प्रयोग यामुळे समाजातील सर्वसामान्य लोकांचे शोषण होण्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत असून त्यांचे प्रमाण अत्यंत भयावह आहे. आणि ज्याअर्थी, अशा नुकसानकारक प्रथा, चालीरिती, जादूटोणा आणि इतर अमानुष, अनिष्ट, दुष्ट व अघोरी प्रथा व त्यांचे अनिष्ट परिणाम आणि त्यांचा प्रसार यांना परिणामकारक रीतीने प्रतिबंध घालण्यासाठी व त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि जादूटोणा करणाऱ्या व्यक्ती, भोंदू लोकांच आपल्याकडे अद्भुत किंवा चमत्कारी उपाय किंवा शक्ती असल्याचा खोटा दावा आणि त्यांची समाजविघातक व नुकसानकारक कृत्ये यांळे समाजाची घडीच विस्कटण्याचा आणि अधिकृत व शास्त्रीय वैद्यकीय उपाय व उपचार यांवरील सर्वसामान्य लोकांच्या विशासाला तडा जाण्याचा धोका निर्माण झाला आहे आणि ज्ञानामुळे ते अशा भोंदू लोकांचा व जादूटोणा करणाऱ्या व्यक्तींचा आश्रय घेत आहेत, अशा परिस्थितीत अशा जादूटोणा करणाऱ्या व्यक्ती व भोंदू लोक यांच्या कुटिल कारस्थानाना बळी पडण्यापासून सर्वसामान्य लोकांना वाचविण्यासाठी उचित व कठोर सामाजिक व कायदेविषयक उपाययोजना करणे शासनाला अत्यावश्यक झाले आहे; आणि ज्याअर्थी राज्यविधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही; आणि ज्याअर्थी उपरोक्त प्रयोजनासाठी कायदा करण्याकरिता महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबदद्दल त्यांची खात्री पटली आहे. त्याअर्थी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत. ०१. (१) या अध्यादेशास, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अध्यादेश, २०१३ असे म्हणावे. (२) तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू असेल. (३) तो तात्काळ अं लात येईल. ०२. (१) या अध्यादेशात, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर – (क) “संहिता” याचा अर्थ, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ असा आहे. (ख) “नरबळी” आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने या अध्यादेशाला जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या किंवा वर्णन केलेल्या कृतींपैकी कोणतीही कृती स्वत: करणे किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडून करवून घेणे किंवा त्या कृती करण्यास इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवृत्त करणे, असा आहे. (ग) “विहित’ याचा अर्थ, या अध्यादेशाखाली केलेल्या नियमांद्वारे विहित, असा आहे. (घ) “प्रचार करणे” याचा अर्थ, नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांच्याशी संबंधित किंवा त्याविषयी जाहिरात, साहित्य, लेख किंवा पुस्तक यांचे वितरण करणे किंवा ते प्रसिद्ध करणे, असा आहे आणि त्यामध्ये, नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांच्या संबंधातील कोणतेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपातील सहाय्य, अपप्रेरणा, सहभाग किंवा सहकार्य देणे यांचा समावेश होतो. (ङ) “नियम’ याचा अर्थ, या अध्यादेशान्वये केलेले नियम, असा आहे. (२) यात वापरलेल्या परंतु व्याख्या न केलेल्या शब्दांना व शब्दप्रयोगांना, औषधिद्रव्ये व जादूटोण्याचे उपचार (आक्षेपार्ह जाहिराती) अधिनियम,१९५४ व संहितेध्ये जे जे अर्थ नून देण्यात आले आहेत, ते ते अर्थ असतील. ०३. (१) कोणतीही व्यक्ती एकतर स्वत: किंवा इतर कोणत्याही व्यक्तीमार्फत या अध्यादेशास जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद किंवा वर्णन केलेल्या, नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा करणार नाही किंवा त्यांचे प्रचालन किंवा प्रचार किंवा आचरण करणार नाही किंवा प्रचालन, प्रचार किंवा आचरण करावयास लावणार नाही. (२) हा अध्यादेश अंलात आल्याच्या दिनांकापासून कोणत्याही व्यक्तीने स्वतः किंवा इतर कोणत्याही व्यक्तीमार्फत नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा अशा स्वरूपाची कोणतीही कृती केली असेल आणि या अध्यादेशांच्या तरतुदींचे उल्लंघन करून, नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांची जाहिरात, आचरण, प्रचार किंवा आचरण करणार नाही किंवा प्रचालन, केले तर तो या अध्यादेशाच्या तरतुदींखाली अपराध ठरेल आणि अशा अपराधासाठी दोषी असलेली व्यक्ती, दोष सिद्ध झाल्यानंतर सहा महिन्यांहून कमी नसेल परंतु सात वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावसाच्या आणि पाच हजार रुपयांपेक्षा कमी नसेल, परंतु पन्नास हजार रुपयांपर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल. (३) जी कोणतीही व्यक्ती, पोट-कलम (२) अन्वये शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही कृतीस किंवा अपराधास अपप्रेरणा देईल किंवा कोणतीही कृती किंवा अपराध करण्याचा प्रयत्न करील, तिने तो अपराध केला असल्याचे मानण्यात येईल आणि दोष सिद्ध झाल्यानंतर, तिला पोट-कलम (२) मध्ये अशा अपराधासाठी जी शिक्षा असेल तीच शिक्षा करण्यात येईल. (४) पोट-कलम (२) खालील शिक्षापात्र अपराध हे दखलपात्र व अजामीनपात्र असतील. ०४. कलम ३ अन्वये शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही अपराधाची न्याय चौकशी, महानगर अपराधाची दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या न्यायालयापेक्षा कनिष्ठ दर्जाच्या न्यायालयात चालविण्यात येणार नाही. ०५. (१) राज्यशासनास, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे आणि त्या अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा अटी व शर्तीना अधीन राहून, त्या अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा राज्याच्या कोणत्याही एक वा अनेक पोलिस ठाण्यांत, दक्षता अधिकारी म्हणून ओळखले जाणारे एक किंवा अनेक पोलीस अधिकारी नियुक्त करता येतील. परंतु असा पोलिस अधिकारी हा पोलिस निरीक्षक, गट ‘ब’ यांच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसेल. (२) दक्षता अधिकाऱ्याची कर्तव्ये पुढीलप्रमाणे असतील- (एक) त्याच्या अधिकारितेच्या क्षेत्रामध्ये या अध्यादेशाच्या आणि त्याखाली केलेल्या नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन किंवा भंग यांचा तपास करणे व त्यास प्रतिबंध करणे, आणि त्याच्या अधिकारितेच्या क्षेत्रामधील जवळच्या पोलिस ठाण्याकडे अशा प्रकरणांची तक्रार दाखल करणे आणि (अशा कृत्यास) बळी पडलेल्या कुणाही व्यक्तीने अथवा तिच्या वतीने अन्य कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही पोलिस ठाण्याकडे तक्रार दाखल केली असता, त्यावर योग्यरित्या व वेगाने कार्यवाही होईल याची खातरजमा करणे व आवश्यक तो सल्ला, मार्गदर्शन आणि मदत संबंधित पोलिस ठाण्याला करणे: (दोन) या अध्यादेशाच्या तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींचा खटला परिणामकारकपणे चालविण्यासाठी पुरावा गोळा करणे; आणि ज्या क्षेत्रामध्ये असे उलंघन झाले आहे किंवा केले जात आहे त्या क्षेत्रातील पोलिस ठाण्यात त्याबाबतची तक्रार दाखल करणे; (तीन) यासंबंधात राज्यशासनाकडून, वेळोवेळी, सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे त्याला नेन देण्यात येतील अशी इतर कर्तव्ये पार पाडणे. (३) पोट-कलम (१) अन्वये नियुक्त करण्यात आलेला दक्षता अधिकारी आपली पदीय कर्तव्ये किंवा कामे पार पाडत असताना त्यात अडथळे आणणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस, दोषसिद्धी झाल्यानंतर, तीन महिन्यांपर्यंत असू शकेल एवढ्या मुदतीच्या कारावासाची किंवा, पाच हजार रुपयांपर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील. (४) दक्षता अधिकारी, भारतीय दंड संहितेच्या कलम २१ च्या अर्थांतर्गत लोकसेवेत असल्याचे मानण्यात येईल. ०६.(१) राज्यशासनाने, याबाबत वेळोवेळी दिलेल्या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशांना अधीन राहून, दक्षता अधिकाऱ्याला, त्याच्या अधिकारितेतील क्षेत्राच्या स्थानिक मर्यादेत, त्याच्या क्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्याच्या सहाय्याने (एक) या अध्यादेशाखालील अपराध केला आहे किंवा करण्यात येत आहे असे त्यास सकारण वाटत असेल तर, अशा कोणत्याही ठिकाणी, सर्व वाजवी वेळी, त्यास आवश्यक वाटेल अशा सहाय्यांसह, कोणतेही असल्यास, प्रवेश करता येईल व झडती घेता येईल. (दोन) या अध्यादेशाच्या तरतुदींचे उल्लंघन करून कोणतीही कृती किंवा गोष्ट करण्यासाठी जे वापरण्यात आले होते किंवा वापरण्यात येत आहे असे त्यास सकारण वाटत असेल तर, असे कोणतेही साहित्य, उपकरण किंवा जाहिरात जप्त करता येईल. (तीन) खंड (एक) मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही जागेत आढळलेल्या कोणत्याही अभिलेखाची, कागदपत्राची किंवा इतर महत्त्वाच्या वस्तूची तपासणी करता येईल आणि जर ती या अध्यादेशाखाली शिक्षापात्र असलेला अपराध केल्याचा पुरावा म्हणून सादर करता येईल असे त्यास सकारण वाटत असेल तर, ती जप्त करता येईल. (२) संहितेच्या तरतुदी, संहितेच्या कलम ९४ अन्वये काढलेल्या अधिपत्राच्या प्राधिकाराखाली केलेल्या कोणत्याही झडतीस व जप्तीस जशा लागू होतात, तशाच त्या, त्या अध्यादेशान्वये केलेल्या कोणत्याही झडतीस किंवा जप्तीस, शक्य होईल तेथवर, लागू होतील. (३) जर एखाद्या व्यक्तीने, पोट-कलम (१) च्या खंड (दोन) किंवा तीन अन्वये काहीही जप्त केले असल्यास, ती व्यक्ती, शक्य तितक्या लवकर, त्याबाबत दंडाधिकाऱ्यास कळवील व त्याच्या अभिरक्षेसाठी दंडधिकायाचे आदेश घेईल. ०७. मुंबई पोलिस अधिनियम १९५१ ची कलमे १५१ व १६० च्या तरतुदी, दक्षता अधिकाऱ्याने या अध्यादेशांतर्गत सद्भावनापूर्वक केलेल्या कृतींना, असा अधिकारी हा जणु काही उक्त अधिनियमांतर्गत पोलिस अधिकारी असल्याचे समजून लागू असतील. ०८. या अध्यादेशाखालील अपराधांच्या अन्वेषणाला व न्यायचौकशीला संहितेच्या तरतुदी लागू असतील. ०९. या अध्यादेशाच्या तरतुदी, त्या त्या वेळी अंलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यास पूरक असतील व त्यांचे न्यूनीकरण करणाऱ्या नसतील. १०. (१) कोणतीही व्यक्ती, या अध्यादेशान्वये शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही अपराधाबद्दल सिद्धापराध ठरली असेल त्याबाबतीत, अशा अपराध्याला सिद्धापराध ठरविणारे न्यायालय, असा अपराध जेथे घडला असेल तेथील स्थानिक वृत्तपत्रांध्ये अशा व्यक्तीचे नाव व निवासाचे ठिकाण आणि अशा अपराध्यास या अध्यादेशाखालील अपराधाबद्दल सिद्धापराध ठरविण्यात आले आहे, ही वस्तुस्थिती तसेच, जो तपशील प्रसिद्ध करण्याची परवानगी देणे न्यायालयास योग्य व उचित वाटेल असा अन्य तपशील, पोलिसांकडून प्रसिद्ध करण्याची व्यवस्था करण्यास सक्षम असेल. (२) अशा आदेशाविरुद्ध दाखल केलेले अपील, कोणतेही असल्यास, अंतिमत: निकाली काढण्यात येईपर्यंत, पोट कलम (१) अन्वये अशी कोणतीही प्रसिद्धी करण्यात येणार नाही. नियमः (१) राज्यशासनास, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, आणि पूर्वप्रसिद्धीच्या शर्तीस अधीन राहून या अध्यादेशाची प्रयोजने पार पाडण्यासाठी, नियम करता येतील. (२) या अध्यादेशाखाली करण्यात आलेला प्रत्येक नियम, तो करण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर, राज्य विधानमंडळाचे अधिवेशन चालू असताना, एकाच अधिवेशनात किंवा लागोपाठच्या दोन किंवा त्यांहन अधिक अधिवेशनांत, मिळून एकूण तीस दिवसांचा होईल इतक्या कालावधीकरिता, राज्यविधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहापुढे ठेवण्यात येईल, आणि ज्या अधिवेशनात तो अशा रीतीने ठेवण्यात आला असेल, ते अधिवेशन किंवा त्याच्या लगतनंतरचे अधिवेशन किंवा अधिवेशने समाप्त होण्यापूर्वी, त्या नियमात कोणताही फेरबदल करण्यास दोन्ही सभागृहे सहमत होतील किंवा तो नियम करण्यात येऊ नये म्हणून दोन्ही सभागृहे सहमत होतील आणि असा त्यांचा निर्णय, राजपत्रात अधिसूचित करतील तर, असा निर्णय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्याच्या दिनांकापासून, तो नियम अशा फेरबदल केलेल्या स्वरूपातच अं लात येईल किंवा यथास्थिति, अं लात येणार नाही; तथापि असा कोणताही फेरबदल किंवा विलोपन यांळे त्या नियमान्वये पूर्वी करण्यात आलेल्या किंवा करण्याचे वर्जिलेल्या कोणत्याही गोष्टीच्या विधिग्राह्यतेस बाधा येणार नाही.
अनूसूची (कलम २ (१) (ख) पहा) ०१. भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला, दोराने किंवा साखळीने बांधून ठेऊन तिला मारहाण करणे, काठीने किंचा चाबकाने मारणे, तिला पादत्राणे भिजवलेले पाणी प्यायला लावणे, मिरचीची धुरी देणे, त्या व्यक्तीला छताला टांगणे, त्याला दोराने किंवा केसांनी बांधणे किंवा त्या व्यक्तीचे केस उपटणे, व्यक्तीच्या शरीरावर किंवा अवयवांवर तापलेल्या वस्तूचे चटके देऊन इजा पोहचविणे, व्यक्तीला उघड्यावर लैंगिक कृत्य करण्याची जबरदस्ती करणे, व्यक्तीवर अमानुष कृत्य करणे, व्यक्तीच्या तोंडात जबरदस्तीने मूत्र किंवा विष्ठा घालणे किंवा यासारख्या कोणत्याही कृती करणे. ०२. एखाद्या व्यक्तीने तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करून, त्यांद्वारे आर्थिक प्राप्ती करणे आणि अशा तथाकथित चमत्कारांचा प्रचार व प्रसार करून लोकांना फसवणे, ठकवणे आणि त्यांच्यावर दहशत बसविणे. ०३. अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याच्या हेतूने, ज्यामुळे जिवाला धोका निर्माण होतो किंवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात अश्या अमानुष,अनिष्ट व अघोरी प्रथांचा अवलंब करणे आणि अशा प्रथांचा अवलंब करण्यास इतरांना प्रवृत्त करणे, उत्तेजन देणे किंवा सक्ती करणे. ०४. मौल्यवान वस्तू, गुप्त धन आणि जलस्रोत यांचा घेण्याच्या बहाण्याने वा तत्सम कारणाने करणी, भानामती या नावाने कोणतेही अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्य आणि जादटोणा करणे आणि जारणमारण अथवा यांच्या नावाने व अन्य कारणाने नरबळी देणे, किंवा देण्याचा प्रयत्न करणे किंवा अशी अमानुष कृत्ये करण्याचा सल्ला देणे, त्याकरिता प्रवृत्त करणे, अथवा प्रोत्साहन देणे. ०५. आपल्या अंगात अतीन्द्रिय शक्ती असल्याचे भासवून अथवा एखाद्या व्यक्ती अतीन्द्रिय शक्ती संचारली असल्याचा आभास निर्माण करून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे किंवा त्या व्यक्तीचे सांगणे न ऐकल्यास वाईट परिणाम होतील अशी इतरांना धमकी देणे, फसवणे व ठकवणे. ०६. एखादी विशिष्ट व्यक्ती करणी करते, जादूटोणा करते किंवा भूत लावते किंवा मंत्रतंत्राने जनावरांचे दूध आटवते असे सांगून त्या व्यक्तीबाबत तसा संशय निर्माण करणे, किंवा त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती अपशकुनी आहे किंवा रोगराई पसरण्यास कारणीभूत ठरणारी आहे असे भासवणे, अशा व्यक्तीचे जगणे मुश्किल करणे, त्रासदायक करणे वा कठीण करणे, एखादी व्यक्ती सैतान असल्याचे किंवा ती सैतानाचा अवतार असल्याचे जाहीर करणे. ०७. जारणमारण, करणी किंवा चेटूक केल्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीला मारहाण करणे, तिची नग्नावस्थेत धिंड काढणे, किंवा तिच्या रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणे. ०८. गंत्राच्या सहाय्याने भूतपिशाचांना आवाहन करून, किंवा भूतपिशाचांना आवाहन करीन अशी धगकी देऊन सर्वसागान्य जनतेच्या गनात घबराट निर्गाण करणे. एखाद्या व्यक्तीला शारीरिक इजा होण्यास भुताचा किंवा दैवी शक्तीचा कोप असल्याचा समज करून देणे, आणि तिला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून, त्याऐवजी तिला अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्य वा उपाय करण्यास प्रवृत्त करणे, अथवा मंत्रतंत्र (चेटूक), जादूटोणा अथवा अमानुष कृत्ये करून किंवा तसा आभास निर्माण करून एखाद्या व्यक्तीला मृत्यूची भीती घालणे, शारीरिक वेदना करण्याची किंवा तिचे आर्थिक नुकसान करण्याची धमकी देणे. ०९. कुत्रा, साप किंवा विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे किंवा यांसारखे उपचार करणे. १०. बोटाने शस्त्रक्रिया करून दाखवतो असा दावा करणे किंवा गर्भवती स्त्रीच्या गर्भाचे लिंगबदल करून दाखवतो असा दावा करणे. ११. (क) स्वत:त विशेष अलौकिक शक्ती असल्याचे अथवा कुणाचा तरी अवतार असल्याचे वा स्वत:च पवित्र आत्मा असल्याचे भासवून किंवा त्याच्या नादी लागलेल्या पूर्वजन्मी तू माझी पत्नी, पती वा प्रेयसी, प्रियकर होतास असे सांगून, अशा व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे. (ख) मूल न होणाऱ्या स्त्रीला अलौकिक शक्तीद्वारा मूल होण्याचे ओशासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे. १२. एखाद्या मानसिक विकलांग व्यक्तीमध्ये अलौकिक शक्ती असल्याचे भासवून त्या व्यक्तीचा वापर धंदा किंवा व्यवसाय यासाठी करणे.
निवेदन
नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, भोंदू लोकांकडून केले जाणारे जादूटोण्याचे व भूतपिशाच्याचे प्रयोग यां ळे समाजातील सामान्य लोकांचे शोषण होण्याच्या घटना उघडकीस येत असून हे प्रमाण अत्यंत भयावह आहे. २. अशा अनिष्ट आणि अमानुष प्रथा इत्यादीबाबत एक विशेष व कठोर कायदा करून त्याद्वारे, या नुकसानकारक व अमानुष प्रथा, जादूटोणा आणि इतर अमानुष, दुष्ट व अघोरी प्रथा व त्यांचे अनिष्ट परिणाम आणि त्यांचा प्रसार यांना परिणामकारक रीतीने प्रतिबंध घालण्यासाठी व त्यांचे मूळ उच्चाटन करण्यासाठी, आणि जादूटोणा करणाऱ्या व्यक्ती व भोंदू लोकांची समाजविघातक व नुकसानकारक कृत्ये यांळे समाजाची घडीच विस्कटण्याचा आणि अधिकृत व शास्त्रीय वैद्यकीय उपाय व उपचार यांवरील सर्वसामान्य लोकांच्या विशासाला तडा जाण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. आणि ते अशा जादूटोणा करणाऱ्या व्यक्तींचा व भोंदू लोकांचा आश्रय घेत आहेत, अशा परिस्थितीत, अशा जादूटोणा करणाऱ्या व्यक्ती भोंदु लोकांच्या कुटिल कारस्थांनांना बळी पडण्यापासून सर्वसामान्य लोकांना वाचवण्यासाठी अध्यादेश प्रख्यापित करून उचित व कठोर सामाजिक कायदेविषयक उपाययोजना करणे शासनाला अत्यावश्यक झाले आहे. ३. याकरिता, राज्य विधानमंडळाच्या सन २०११ च्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत विधेयक, २०११ (सन २०११ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४१), दिनांक १० ऑगस्ट २०११ रोजी विधानसभेत पुरःस्थापित करण्यात आले होते व ते प्रलंबित आहे. तथापि, अंलबजावणीच्या दृष्टीने, उक्त विधेयकाच्या विवक्षित तरतुदींमध्ये सुधारणा करून कायदा करण्याकरिता अध्यादेश प्रख्यापित करणे शासनास इष्ट वाटते. ४. प्रस्थापित अध्यादेशाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :– (एक) “नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा” या शब्दप्रयोगाची व्याख्या देऊन, नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांच्या आचरणावर, प्रचालनावर व प्रसारावर, आणि भोंदू लोकांकडून केले जाणारे अनधिकृत व बेकायदेशीर वैद्यकीय उपचार यांवर बंदी घालण्यात आली आहे. या अध्यादेशान्वये, अशा कृतीस अपराध ठरविण्यात आले आहे. आणि जरब बसण्यासाठी असे अपराध दखलपात्र व अजामीनपात्र ठरविणअयात आले असून अशा अपराधांकरिता कठोर शिक्षेच्या तरतुदी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे; (दोन) या अध्यादेशाच्या व त्याखाली केलेल्या नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन होत आहे किंलवशा कसे, याचा तपास करणे आणि त्याला प्रतिबंध करणे, तसेच या कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर परिणामकारक खटला भरण्यासाठी साक्षीपुरावे गोळा करणे, यांकरिता एक दक्षता अधिकारी असेल, अशी तरतूद करण्यात आली आहे; (तीन) या अध्यादेशाच्या तरतुदींखाली अपराध केल्याबद्दल एखाद्या व्यक्तीच्या दोषसिद्धीसंबंधातील तपशील प्रसिद्ध करण्यासंबंधीचे अधिकार न्यायालयाला प्रदान करू शकेल अशी समर्थकारी तरतूद करण्याचे प्रस्तावित केले आहे; आणि (चार) इतर अनुषंगिक व संबंधित बाबी. ५. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही आणि उपरोक्त प्रयोजनांकरिता, एक विशेष व कठोर कायदा करण्याकरिता महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तातडीने कार्यवाही करणे. जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे, म्हणून हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे. मुंबई, के. शंकरनारायणन्, दिनांक : २४ ऑगस्ट २०१३ महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
आर.डी.शिंदे, शासनाचे सचिव