मासिक संग्रह: ऑक्टोबर , २०१३

शहाणपण

हिंदु धर्मात बरीच व्यंगें आहेत म्हणून यहुदी, महं दी, क्रिस्ती किंलवा अशाच प्रकारच्या दुसऱ्या एखाद्या धर्माचा अंगीकार करणाऱ्या मनुष्यास विचारी ही संज्ञा सहसा देता येणार नाही. तसेंच, आमचे कांहीं रीतीरिवाज मूर्खपणाचे आहेत, म्हणून प्रत्येक गोष्टींत परकीयांचे अनुकरण करणे हेही कोणत्याही दृष्टीने त्याचे त्याला किंवा इतरांला परिणामी विशेष सुखावह होण्याचा संभव नाही, असे आम्हांस वाटते. उदाहरणार्थ, कित्येक प्रसंगी धोतरें नेसणे सोईस्कर नाही म्हणून युरोपियन लोकांप्रमाणे दिवसभर पाटलोण घालून बसणे, किंवा ते लोक विशेष कामाकडे कागदांचा उपयोग करतात म्हणून आपणही तसे करणें हें केवढे मूर्खपण आहे बरें?

पुढे वाचा

अंधश्रद्धा निर्मूलन हा वारकऱ्यांचा धर्मच!

(अंधश्रद्धा निर्मूलन-विधेयक आणि वारकरी या मुद्द्यावरून काही जण वाद निर्माण करायचा प्रयत्न करत असले तरी वारकरी ज्याला अनुसरतात त्या भागवत धर्मात कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला थारा नाही. उलट समाजातल्या अशा अपप्रवृत्तीवर घाला घालण्याचे कामच या धर्माने शतकानुशतके केले आहे. त्या संदर्भातले विवेचन. )
राज्यातील अंधश्रद्धेचा मुद्दा कायद्याच्या कक्षेत यावा, या चांगल्या उद्देशाने अंधश्रद्धा-निर्मूलन समितीने कायद्याचा मुद्दा लावून धरला. सुरुवातीस त्याचे नाव अंधश्रद्धा निर्मूलन-विधेयक असेच होते. मात्र नंतर ते महाराष्ट्र नरबळी व अन्य अमानवीय अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम या नावे आणण्यात आले.

पुढे वाचा

माझे आध्यात्मिक आकलन

दोन महिन्यापूर्वी मी पुणे येथे माझे विज्ञान : माझे अध्यात्म या विषयावर भाषण दिले. कार्यकर्त्यांना व नागरिकांना ते आवडले. नवीन वाटले. यापूर्वी मी महाराष्ट्रात काही ठिकाणी ‘आम्हीच खरे धार्मिक’ या विषयावरही बोललो होतो. विषयाचे शीर्षक थोडे चकवा देणारे होते हे खरेच. धर्म न मानणाऱ्या व्यक्तीने मी खरा धार्मिक आहे असे उच्चारवाने सांगणे यात अंतर्विरोध वाटतोच. असे असतानाही हा विषय घेतला होता याचे कारण होते. एकतर धर्मभावनेचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण व राजकारण करण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न चालू होता. महाराष्ट्रात व दिल्लीतही त्याच मंडळींच्या हातात सत्ता होती.

पुढे वाचा

आधुनिक अंधश्रद्धा ०२

हातरुमाल : हातरुमाल खाली पडल्यास स्वतः उचलणे अशुभ समजले जाते. घडी केलेला रुमाल सतत बाळगणे संकटांना आमंत्रण देऊ शकते. एखाद्याचा/एखादीचा रुमाल उसना घेणे म्हणजे त्याचे/तिचे दु:ख/ अश्रू मागून घेणे. रुमालाला गाठ बांधून ठेवल्यास भूतबाधा होत नाही.
सुईदोरा : काळा दोरा ओवलेली सुई रस्त्यावर दिसणे अशुभ समजले जाते. गर्भिणीने अशी सुई बघितल्यास तिला मुलगी होणार. दिवसाची सुरुवात सुई या शब्दाने केल्यास दिवस वाईट जाणार. मित्राला सुई देणे हे मैत्री तोडल्याचे लक्षण आहे. शिवत असताना सुई मोडल्यास तो शुभशकुन मानला जातो.
फोटो : भिंतीवर टांगलेली फोटोची फ्रेम अचानक पडल्यास संकट कोसळणार.

पुढे वाचा

श्रद्धा आणि अंधश्रद्धा

धर्माचा पाया श्रद्धा आहे हे खुद्द धार्मिकच मान्य करतात. फक्त त्याचे म्हणे असे असते की ती श्रद्धा अंधश्रद्धा नव्हे, डोळस श्रद्धा असते. पण हे म्हणणे अनाकलनीय आहे. श्रद्धा म्हणजे ज्या गोष्टीच्या सत्यत्वाचा कसलाही पुरावा नाही तिच्या सत्यत्वावरील अढळ विशास. धर्मावरील श्रद्धा याच जातीची आहे. ईशर, पापपुण्य, स्वर्गनरक, परलोक, पुनर्जन्म, इत्यादि कोणत्याही गोष्टीचा कसलाही पुरावा उपलब्ध नाही. या सर्व गोष्टींची साधक प्रमाणे देण्याचे असंख्य प्रयत्न मी-मी म्हणणाऱ्यांकडून आजवर केले गेले आहेत. परंतु त्यांपैकी एकही अंशतः देखील निर्णायक नाही हे असंख्य वेळा दाखवून झाले आहे.

पुढे वाचा

वैद्यकीय क्षेत्रांतील कॉम्प्युटराईज्ड बुवाबाजी

सध्या अनेक छोट्या-मोठ्या गावांत खालील प्रकारची पत्रके वाटली जात आहेत. ‘न्यू संजीवनी हेल्थ केअर’ द्वारा संपूर्ण शारीरिक तपासणी… ‘निरोगी निरामय सफलतेचे रहस्य’… १०० टक्के उपचार होऊ शकतो. आपण निराश आहात का? दीर्घकालीन आजाराने? आपण हरले आहात का? आपल्या स्वास्थ्यामुळे ? आपण हैराण आहात का? दवाखान्यामुळे ? आपणास चांगले आरोग्य पाहिजे का? तर या! ।
आपल्या आजाराला रशियन इव्हीए मशीन (किंवा दुसऱ्या नावाच्या मशीन)द्वारा तपासून घ्या. ही तपासणी शरीराच्या ३० विविध अंगाची होते. त्यांत मेंदूच्या रक्तपुरवठ्यापासून तर हृदय, किडनी, हाडे, सांधे इत्यादी सर्व आजारांचे आणि पूर्ण शरीरांत असलेल्या कोणत्याही आजाराची माहिती दिली जाते.

पुढे वाचा

ग्रामीण जीवनातील अंधश्रद्धा

मागील सोळा वर्षांपासून या चळवळीत काम करत असताना अंधश्रद्धा निर्माण होण्यामागे भीतीची भूमिका सातत्याने जाणवत राहिली आहे. थोडीशी भीती, शिकलेल्या व अज्ञानी माणसांना सारख्याच वेगाने अंधश्रद्धेच्या गर्तेत नेते. लहानपणापासून एक गोष्ट मनावर बिंबविली जाते की, ज्या ज्या गोष्टींची भीती समाजाने, कुटुंबाने दाखविली त्या गोष्टींची तपासणी करू नये. भीतिदायक आठवण कधीच नाहीशी होत नाही. ह्या लेखात भीतीच्या दुष्परिणामांची चर्चा करूया.
१) भांडणातील भूमिकाः जादूटोण्याच्या नावावर गोंदिया जिल्ह्यात मागील साडेतीन वर्षांच्या काळात १९ खून झालेले आहेत. त्या खून करणाऱ्या १९ केसेसपैकी १५ केसेसमधील आरोपींशी मी प्रत्यक्ष भेट घेतली, मुलाखत घेतली, चर्चा केली.

पुढे वाचा

अंधश्रद्धेचे मानसशास्त्र

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निघृण हत्येनंतर त्यांनी पुढाकाराने चालविलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य पुढे कसे चालू राहील हा प्रश्न अनेक पुरोगामी सुधारक हितचिंतकाना थोडा चिंताग्रस्त करतो आहे, हे त्यांच्याबरोबर झालेल्या संभाषणातून दिसून येत आहे. अपार दु:खात बुडालेले असतानाही आम्हा कार्यकर्त्यांना हा मोठा दिलासा तर आहेच. त्याचबरोबर अंनिसचे कार्य जनमानसात किती आत्मीयता पाऊन आहे तेही आम्हाला पुन्हा एकदा जाणवत आहे. प्रथम या समयोचित पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे उचित ठरेल. महाराष्ट्रासोबत इतर राज्यातून देखील असा प्रतिसाद व पाठिंबा मिळत आहे. केंद्र व राज्य शासनही या प्रसंगी सुधारक पुरोगामी पावले उचलेल अशी आशा आहे.

पुढे वाचा

आधुनिक अंधश्रद्धा ०१

विमान: विमानप्रवासात फुलाचा गुच्छ नेणे अशुभ समजले जाते. रिकाम्या आसनांचे सीट बेल्ट्स क्रॉस करून ठेवतात. तसे न ठेवल्यास भूत त्या सीटवर बसून प्रवास करते म्हणे! ग्रेलिन नावाच्या भुतामुळे विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड होतो, असा समज आहे. त्यासाठी बीअरचा नैवेद्य दाखविला जातो.
अॅम्ब्युलन्स : घाईगर्दीच्या वेळी अम्ब्युलन्समधून लिफ्ट घेणे अशुभ समजले जाते. वाटेत अम्ब्युलन्स दिसल्यास ती नजरेआड होईपर्यंत शास रोखून धरला जातो. तसे न केल्यास अम्ब्युलन्समधील रुग्णाचा मृत्यू अटळ आहे, असे समजतात.
कॅलेंडर: वर्ष, दिवस वा महिना संपायच्या आत कॅलेंडरचे पान बदलणे अशुभ समजले जाते.

पुढे वाचा

देवा-धर्माचे व्यापारीकरण आणि अंधश्रद्धा

आपल्या देशातील बुवा-बाबा-अम्मा यांच्या संख्येत गेल्या काही दशकात वेगाने वाढ झाली आहे. पुटपाथीच्या सत्यसाईबाबांचा तर विशेषच बोलबाला होता. त्या बाबाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीची आतापर्यंत झालेली मोजदाद त्यांच्या नजीकच्या कोंडाळ्यातल्या लोकांनी त्यांच्या मृत्यू दरम्यान व मृत्यू पश्चात केलेल्या लुटा-लुटीनंतर देखील कित्येक लाख कोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. अलीकडेच बलात्काराच्या आरोपाखाली अटक झालेल्या आसाराम नावाच्या बापूची संपत्ती देखील अशीच कित्येक लाख कोटी असल्याचे बोलले जाते. अलिकडच्या काळात आस्था, साधना, संस्कार इत्यादी टीव्ही चॅनल्स वरून जे नवे-नवे बाबा-अम्मा प्रकट होत आहेत त्या सगळ्यांची संपत्ती अशीच कित्येक कोटी असल्याचे बोलले जाते.

पुढे वाचा