प्रा. प्रवीण घोडेस्वार, नाशिक gpraven 18feb@gmail.com
बंजारा समाजातील ढावलो गीते हा सुनंदा पाटील यांचा लेख आजचा सुधारक च्या डिसेंबर २०१२ च्या अंकात प्रसिद्ध झालेला आहे. मी गेल्या काही वर्षांपासून आजचा सुधारकचा नियमित वाचक आहे. माझं अत्यंत नम्र आणि प्रामाणिक मत आहे की, आजचा सुधारकमध्ये असं लेखन प्रसिद्ध झालेलं नाही. त्यामुळे अंकात हा लेख बघून थोडासा धक्का बसला. काहीतरी चुकल्यासारखं वाटलं. या लेखाच्या गुणवत्तेबद्दल मत अथवा अभिप्राय व्यक्त करण्याचा माझ्यापाशी अभ्यास नि अधिकार नाही. पण गेल्या काही वर्षांचा वाचक म्हणून माझ्याकडे असलेल्या अनुभवाच्या आधारे हे मत मी मांडत आहे. आपण कदाचित माझ्या मताशी सहमत होणार नाहीत. अतिशय विचारप्रवण, चिकित्सक आणि विषयांची प्रगल्भ मांडणी करणारे मासिक, अशी आजच्या सुधारकाची प्रतिमा आहे. त्या प्रतिमेला या लेखामुळे कुठेतरी छेद गेल्याची भावना निर्माण झाली आहे. माझ्या मते वर उल्लेखलेला लेख मराठी साहित्याशी निगडित असलेल्या कोणत्याही नियकालिकात प्रसिद्ध होऊ शकतो. आजचा सुधारक मध्ये या लेखासाठी जागा देणं चुकीचं वाटतं. विवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी मासिक असं आपलं ब्रिदवाक्य आहे. या लेखाच्या निमित्तानं आपल्या ह्या ब्रिदाला तडा गेला एवढं मात्र नक्की!
समज वाढविण्याची आवश्यकता
भांडवली शेतीमध्ये जमीनधारणा वाढत जाणे हे साहजिकच असते कारण ह्या शेतीतंत्रात वापरली जाणारी खते, जंतुनाशके इत्यादी साधने वापरणे, अल्पभूधारकांना परवडत नाही. त्यामुळे लहान शेतकरी कंगाल व कर्जवाजारी होत जातो आणि अखेर परिणाम असा होतो की अल्पभूधारकांकडून जमिनी बड्या शेतकऱ्यांच्या ताब्यात जातात. भारतात ऐंशी कोटी लोक आहेत, ज्यातील साठ कोटी लोक अजूनही आपल्या उपजीविकेसाठी शेतीतील व्यवसायांवर अवलंबून आहेत. (इ स ची आकडेवारी) भारताने आधुनिक शेतीतंत्र अंगिकारले तर (त्या दिशेने जोरात वाटचाल सुरू आहेच) तर देशातील शेतकऱ्यांची किमान जमीनधारणा पाचशे एकर होईल. त्यातील केवळ टक्के लोक सर्व लोकसंख्येला पुरेल इतके अन्न उत्पादित करतील. त्यासाठी त्यांना केवळ दोन कोटी श्रमिकांची गरज लागेल. पण मग आजच्या व्यवस्थेतील उरलेल्या कोटी लोकांनी काय करायचे किंवा त्यांचे काय करायचे त्यांना गोळ्या घालायच्या का खरे तर हाच उपाय प्रामाणिकपणाचा व माणुसकीचा होईल. पण तसे अर्थातच होणार नाही. त्याऐवजी त्यांना शहरातील झोपडपट्ट्यांध्ये ढकलले जाईल. दक्षिण जगातील शेतकऱ्यांच्या मनात असा भ्र निर्माण केला जात आहे की ह्या आधुनिक शेतीतंत्रांचा वापर केल्याने ते औद्योगिक जगतातील लोकांसारखे समृद्ध, सुखी जीवन जगू शकतील. येथे दोन प्रकारे फसवणूक केली जात आहे. एकतर, औद्योगिक जगापुढे ज्या गंभीर स्वरूपाच्या समस्या उभ्या आहेत, त्यांचा उल्लेख करणे जाणीवपूर्वक टाळले जाते. दुसरी गोष्ट म्हणजे ते मांडत असलेले गणित येथे लागूच होत नाही, हेही लपवले जाते. आज उत्तर जगातील लोक ज्या प्रकारे व ज्या गतीने नैसर्गिक संसाधनांचा उपभोग घेऊन जगाला प्रदूषित करीत आहेत, त्या त-हेने जगातील सर्व माणसांनी जगायचे ठरविले तर आपली वान लोकसंख्या लक्षात घेता, इतक्या प्रमाणारा संसाधने उपलब्ध होण्यासाठी पृथ्वीसारख्या आणखी तीन चार ग्रहांची गरज लागेल.
यापेक्षा अधिक टिकाऊ व समाधानकारक जीवनपद्धती आकारात आणण्यासाठी आपल्याला निसर्गाशी आपले नाते काय ह्याची समज वाढवायला हवी. आज ह्या नात्याविषयी आपली यांत्रिक समज आहे, त्यातून मुक्त होऊन सर्वांगसंपूर्ण अशी समज विकसित व्हायला हवी…निसर्गात नवनिर्मिती करण्यासाठी एकाच प्रकारचे साचे वापरले जात नाहीत. प्रत्येक झाड, प्रत्येक नदी, प्रत्येक ठिकाणची माती ही एकमेवाद्वितीय असते. हे समजून घेण्यासाठी गरज आहे नम्रतेची, लीनतेची. आजच्या औद्योगिक संस्कृतीचा स्थायीभाव आहे सामूहिक गर्विष्ठपणा व अहंन्यता. ह्या गर्विष्ठपणाने जेव्हा आपण निसर्गावर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न सोडून देऊ व त्याऐवजी निसर्गाच्या संगीतात आपले सूर मिळवू, तेव्हा ह्या विश्वाची आपल्याला किती कमी माहिती आहे ह्याचा साक्षात्कार आपल्याला होईल. तसेच हेही लक्षात येईल की अशा प्रकारे अडाणीपणाची, अनिश्चिततेची शिदोरी घेऊनच आपण प्रवास करीत आलो आहोत, पुढेही प्रवास करायचा आहे. आपल्या दुबळेपणाची वास्तव जाणीव आपल्याला झाली तर आपली ही उद्दाम चाल बदलून आपण जरा जपून, सावध पावले टाकायला लाग.