मासिक संग्रह: नोव्हेंबर, २०१२

पत्रसंवाद

वृन्दाश्री दाभोलकर, 57, प्रतापसिंह कॉलनी, बारावकरनगर (संभाजीनगर), सातारा 415004. (मोबा.9881736366)
बंधुभाव हा शब्द आपण वापरतो. आसुच्या अलीकडील दोन्ही अंकांत तो अनवधानाने असावा-वापरलेला आढळला. हा शब्दप्रयोग अतिशय आक्षेपाहे आहे हे कुणीही विवेकवंत मान्य करेल.
‘बंधुभाव’ यात भगिनीभाव अध्याहृत/गृहीत धरलेला आहे. पण ही समावेशकता या शब्दात वस्तुतः अजिबात नाही. परंपराझापड असल्यामुळे त्यातील आक्षेपार्हता कुणाच्या सहजी लक्षातही येत नाही.
आपण सभेत बोलताना कायम ‘बंधुंनो व भगिनींनो’ (भगिनींनो असे स्वतंत्रपणे) संबोधतो. त्याच जातकुळीतील हा प्रकार असल्याने आपण त्याच धर्तीवर बंधुभाव ऐवजी बंधुभगिनीभाव हा शब्द वापरणे युक्त आहे.

पुढे वाचा

मी अश्रद्ध का आहे? (प्रश्नकर्ते पॉल क्रूझ यांना श्रद्धांजली)

अमेरिकेतील निधर्मी, मानवतावादी तत्त्वचिंतक पॉल कुर्झ ह्यांचे नुकतेच निधन झाले. विविध प्रकारच्या विज्ञानातील निराधार अपसमज, गूढवाद, बुवाबाजी, प्रसारमाध्यमांतील भोंदूगिरी आणि सर्व रूपांतल्या सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा व धर्मभोळेपणा ह्यांचा बीमोड करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. परमेश्वराच्या संकल्पनेशिवाय निकोप सामाजिक व नैतिक आयुष्य जगण्यासाठी युप्रैक्सोफी नामक विज्ञानाधिष्ठित पर्याय त्यांनी लोकांसमोर ठेवला.
पॉल कुर्झ हे नामांकित लेखकदेखील होते. त्यांनी 1973 साली मानवाधिकारांचा जाहीरनामा तयार केला. हा जाहीरनामा म्हणजे 1933 साली तयार करण्यात आलेल्या धर्मविषयक जाहीरनाम्याची नवी आवृत्ती होती, परंतु त्यामध्ये आण्विक शस्त्रास्त्रे, लोकसंख्या : नियंत्रण, वंशवाद आणि लैंगिकता यांसारख्या नव्या युगातील मुद्दयांची भर घालण्यात आली होती.

पुढे वाचा

शेतीच्या पाण्याचा व्यापार

[ पाण्याचा बाजार किंवा व्यापार म्हटले की समोर येते ते बाजारात सर्वत्र दिसणारे बाटलीबंद पाणी. पण आता पाण्याच्या व्यापाराचे नवीन – आणि सरकार – पुरस्कृत स्वरूप महाराष्ट्रात पुढे येत आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने (मजनिप्रा) शेतीच्या आणि शेतकऱ्याच्या पाण्याचा व्यापार उभा करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. एकीकडे राज्यातील सिंचन विभागात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराने गदारोळ माजविला असताना, जलक्षेत्रातील या अत्यंत महत्त्वाच्या बदलांकडे काहीसे दुर्लक्ष झाले आहे. किंबहुना, या बदलांची माहिती अजून पूर्णपणे लोकांसमोर आली नाही. सिंचनक्षेत्राची सफाई एकीकडे सुरू असताना (थोडे आशावादी असायला हरकत नाही) पाण्याच्या व्यापारीकरणाच्या आणि बाजारीकरणाच्या या प्रक्रियेवरसुद्धा आपली नजर राहावी हे या लेखाचे मुख्य उद्दिष्ट.

पुढे वाचा

ही स्त्री कोण? (भाग-३)

धर्म आणि बाईजात

‘धर्म आणि धर्मजात’ या शब्दप्रयोगात उघडपणे दोन शब्द किंवा संकल्पना आहेत, असे दिसते. पहिली धर्म आणि दुसरी बाईजात. आता शब्द दोनच असले तरी संकल्पना चार आहेत. धर्म, बाई आणि जात अशा मूळ तीन परस्पर भिन्न सट्या अलग करता येणाऱ्या संकल्पना आणि ‘बाईजात’ ही चौथी संमिश्र संकल्पना.
बाईजात’ ही एकच एक संकल्पना नाही. तिच्यात बाई आणि जात अशा दोन भिन्न संकल्पना दडलेल्या आहेत. म्हणजे तीन सुट्या संकल्पना आणि एक संमिश्र संकल्पना, अशा चार संकल्पना मिळून ‘धर्म आणि बाईजात’ दोन संकल्पनांचे शीर्षक बनते.

पुढे वाचा

भारतातील लोकशाहीकरण – एक समस्या

भारत हा जगातील, लोकशाही स्वीकारलेला एक मोठा देश, म्हणून ओळखला जातो. सरंजामशाहीतून पारतंत्र्यात गेलेल्या व कालांतराने स्वतंत्र झालेल्या देशांना उपलब्ध पर्यायांतून तसा नवीन व फारसा वादग्रस्त नसलेला लोकशाहीचा पर्याय निवडावा लागल्याने अनेक देशांनी तो स्वीकारला देवील. यापूर्वीच लोकशाही स्वीकारलेल्या व नांदवणाऱ्या देशांची उदाहरणे समोर असतानाच लोकांची, लोकांसाठी, लोकांकरवी हे लोकशाहीचे ब्रीदवाक्यच साऱ्या नागरिकांना लुभावणारे व आश्वासक वाटल्याने आता आपली सत्ता आली म्हणजे नवराष्ट्र हे सर्वांना हितकारी ठरेल हा भाबडा आशावादही त्यामागे होता. मात्र लोकशाही स्वीकारणे व ती अंगीकारणे यातली तफावत लक्षात न आल्याने व केवळ लोकशाही स्वीकारल्याने सारे प्रश्न सुटतील असे गृहीत धरल्याने आज आपल्याला लोकशाही असून देखील एक सर्वव्यापी जनअसंतोषाला सामोरे जावे लागते आहे.

पुढे वाचा

आत्मा आणि पुनर्जन्म : सत्य की कपोलकल्पित? (भाग-१)

भारतामध्ये आणि त्यांत प्रामुख्याने हिंदूंमध्ये आत्मा, पुनर्जन्म या गोष्टी अगदी रोमारोमांत भिनल्या आहेत. श्रीमद्भगवद्गीतेतील ‘वसे देहांत सर्वांच्या आत्मा अमर नित्य हा’ ‘मारोत देहास परी मरेना’ आणि त्याचबरोबर
‘सांडुनिया जर्जर जीर्ण वस्त्रे, मनुष्य घेतो दुसरी नवीन।
तशींचि टाकूनि जुनी शरीरें आत्माहि घेतो दुसरी निराळीं।
आणि म्हणूनच ‘जन्मतां निश्चयें मृत्यु मरतां जन्म निश्चयें।
असे भगवंतांनी आणि हजारो वर्षांपूर्वीच्या आपल्या थोर ऋषिमुनींनी सांगून ठेवले असल्यामुळे अनादि काळापासून हे तत्त्वज्ञान खरेच असले पाहिजे अशी जनसामान्यांचीच नाही तर अगदी उच्चशिक्षित डॉक्टर्स, इंजीनिअर्स, व शास्त्रज्ञांचीही खात्री आहे.

पुढे वाचा

मानवी अस्तित्व (६)

माझ्यात जाणीव आली कुठून?

आपण कालकुपीत बसून आपला जन्म होण्यापूर्वीच्या काळात जायचे ठरविल्यास आपण त्यावेळी कुठे होतो, हे सांगता येईल का? पुन्हा एकदा कालकुपीत बसून आपल्या मृत्यूनंतरच्या भविष्काळातील फेरफटका मारण्याचे ठरविल्यास आपण कुठे आहोत, हे तरी सांगता येईल का? स्पष्ट सांगायचे तर आपण कुठेही नाही. एके दिवशी आपल्या तुटपुंज्या आयुष्याची काही कारण नसताना सुरुवात होते व विनाकारण समाप्तही होते. किती गुंतागुंत व गोंधळ? फक्त आयुष्याचा विचार करण्यासाठी जाणीव नावाची चीज असल्यामुळे असले भंपक प्रश्न आपल्याला सुचत असावेत, असेही वाटण्याची शक्यता आहे.

पुढे वाचा

सरंजामशाहीकडून भांडवलशाहीकडे

सरंजामशाहीकडून भांडवलशाहीकडे
आधुनिक भांडवलशाहीचा जन्म झाला आणि आधुनिक औद्योगिकीकरण उदयास आले, त्यावेळी, ज्यांना पाश्चात्त्य संस्कृतीचे प्रतिनिधी म्हणता येईल, असे काही विचारवंत निर्माण झाले. त्यांनी व्यक्तीच्या पराक्रमावर सरकारचे कसलेही बंधन असू नये, असे प्रतिपादन करण्यास सुरुवात केली. ‘प्रायव्हेट एन्टरप्राईजेस’ (खासगी उद्योगा)मुळे सर्वांनाच संधी मिळते. प्रत्येकाने आपापले हित पाहावे, म्हणजे सर्वांचेच हित साधेल, व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राहील, ‘ग्रेटेस्ट गुड ऑफ दि ग्रेटेस्ट नंबर’ (जास्तीत जास्त लोकांचे हित) याच मार्गाने साधू शकेल, अशा प्रकारचे त्यांचे तत्त्वज्ञान होते.
सरंजामशाहीच्या जमान्यात सर्वसामान्य व्यक्तीला फारच थोडे स्वातंत्र्य असे.

पुढे वाचा