मेंदूनीतिशास्त्र (Neuroethics) ही अगदी अलिकडे, म्हणजे एकविसाव्या शतकात उदयाला आलेली नवीन ज्ञानशाखा. ही इतकी नवीन आहे की ‘मेंदूनीतिशास्त्र’ या शब्दाची सर्वमान्य अशी औपचारिक व्याख्यासुद्धा अजून तयार झालेली नाही. नीतीनियमांशी निगडित असलेले मेंदू-विज्ञानातले प्रश्न, मेंदूवरील संशोधनातून उद्भवणाऱ्या समस्यांची कायदेशीर अंगे आणि त्यांचा समाजावर होऊ शकणारा परिणाम या सर्वांचा विचार मेंदूनीतिशास्त्रात केला जातो. मेंदूच्या रोगांवर उपचार करताना आणि मेंदूसंबंधात संशोधन करत असताना काय पथ्ये पाळायची, कुठल्या थराला जायचे, भलेबुरे कसे ठरवायचे, काय उचित आणि काय अनुचित याचा निवाडा कसा करायचा, या सगळ्याचा उहापोह या शास्त्रशाखेत केला जातो.
मासिक संग्रह: जून, २०१२
आरामखुर्ची आणि प्रयोगशाळा
श्रद्धा, मूल्ये, कर्मकांडे, परंपरा यांचे मूळ व कूळ शोधणे त्यातून ज्ञानाची निर्मिती करणे ही विश्लेषणात्मक फिलॉसॉफीची पद्धती आहे. (पाश्चात्त्य तत्त्वज्ञान या अर्थाने फिलॉसॉफी हाच शब्द सोयीसाठी लेखभर वापरला आहे). फिलॉसॉफीच्या विश्लेषणाच्या पद्धती विकसित होऊ लागल्यामुळे फिलॉसॉफी मानव्यविद्यांपासून दूर जाऊ लागली. संस्कृती व इतिहास यांतून फिलॉसॉफीचा उगम झालेला आहे. या उगमाचा फिलॉसॉफीला विसर पडला की काय असे बऱ्याच जणांना वाटते. फिलॉसॉफीने विज्ञानाच्या पद्धतीला पसंती दर्शविली आहे. वस्तुनिष्ठ सत्याच्या शोधात विज्ञानाकडे जो आत्मविश्वारस आहे त्यात फिलॉसॉफी सहभागी होऊ इच्छिते. खरे पाहता विज्ञान व फिलॉसॉफी यांचे संबंध काही नवीन नाहीत.
मनाची संकल्पना आणि गिल्बर्ट राईल
गिल्बर्ट राईल (1900-76) हे एक ब्रिटिश विश्लेषणवादी तत्त्वचिंतक. ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी तत्त्वज्ञानाच्या अध्यापनाचे कार्य केले. ‘Mind’ या जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानाशी निगडित जर्नलचे संपादक जी.ई.मूर या विश्लेषणवादी तत्त्वचिंतकानंतर त्यांनी भूषविले. तत्त्वज्ञानावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. विशेषतः 1949 साली त्यांनी लिहिलेल्या ‘Concept of Mind’ या पुस्तकामुळे त्यांचे नाव आणि विचार चर्चेत आले. साधारणपणे 1950-60 या दशकात ब्रिटिश तत्त्वज्ञानावर त्यांचा प्रभाव राहिला. विश्लेषणवादी तत्त्वज्ञान हे 20 व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात रसेल आणि मूर या दोन तत्त्वचिंतकांच्या प्रभावातून चळवळीच्या स्वरूपात उदयास आले. या तत्त्वचिंतकांवर मुख्यतः वैज्ञानिक ज्ञान व पद्धती याचे स्वरूप आणि त्यामुळे वैज्ञानिक ज्ञानाला प्राप्त होणारी नि:संदिग्धता, ही अचूकता, नेमकेपणा या गुणांचा प्रभाव होता आणि तत्त्वज्ञानालाही असे स्वरूप प्राप्त कसे करता येईल या दृष्टीने हा विचारप्रवाह प्रयत्नशील होता.
शोध जाणिवेचा : मानसप्रत्ययशास्त्र आणि मेंदू
मानसप्रत्ययशास्त्राची उभारणी त्याचा प्रणेता जर्मन तत्त्वज्ञ एडमंड हुसर्ल (1859 ते 1938) यांच्या तात्त्विक भूमिकेमधून आणि विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून झालेली आहे.
ज्ञानाच्या शक्यतेबद्दलच शंका बाळगणारा संशयवाद, ज्ञान स्थलकालानुरूप बदलते असे मानणारा सापेक्षतावाद यांना हुसर्लचा तीव्र विरोध होता. ज्ञान वस्तुनिष्ठ (objective), निश्चित (certain) आणि शंका घेणे शक्यच होणार नाही (indubitible) असेच असले पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. आधुनिक विज्ञानच काय, पण गणित आणि भूमिती या अत्यंत प्रतिष्ठा असलेल्या ज्ञानशाखाही ज्ञानाच्या या कसोटीला उतरत नाहीत कारण या प्रत्येक ज्ञानशाखेची आपापली गृहीते असतात, आणि त्या गृहीतांना त्या-त्या ज्ञानशाखेत आह्वान दिले जात नाही.
मन, मेंदू आणि सर्ल
‘न्यूरोसायन्स’ किंवा ‘मेंदू-विज्ञान’ ह्या क्षेत्रात झपाट्याने जे नवे शोध लागत आहेत, त्यांची दखल तत्त्वज्ञान घेते का, असा प्रश्न जेव्हा ऐकला, तेव्हा नजरेसमोर नाव आलेते सर्ल यांचे. अर्थात जे. जे. सी. स्मार्ट, डेनेट, चर्चलन्ड, डेव्हिडसन, नागेल ही नावेही नजरेआड करता येणारी नाहीत; पण ‘चायनीज रूम आर्युमेंट’ मांडणाऱ्या सर्ल यांचे नाव ठळकपणे नजरेत भरते. वैज्ञानिक दृष्टी ढळू न देता त्यांनी मनाविषयी ज्या सर्वसाधारण समजुती आहेत, त्यांचीही दखल घेतल्याने सर्ल यांचा दृष्टिकोण मोलाचा ठरतो.
वैज्ञानिक दृष्टिकोणाचा वारसा सर्लना मिळाला, तो आई-वडिलांकडून. वडील इंजीनिअर तर आई डॉक्टर.
अभिजात भारतीय दर्शनांतील शरीर-मन समस्येचे स्वरूप
उपोद्धात
शरीर-मन-समस्या ही तत्त्वज्ञानातील अनेक मूलभूत समस्यांपैकी, प्राचीन काळापासून चर्चेत असलेली आणि आजही मेंदू-विज्ञानाच्या प्रगतीमुळेच निराळेच वळण घेतलेली अशी समस्या आहे. आणि ती बहुपेडी आहे. म्हणजे, त्या समस्येचे उत्तर शोधता-शोधता तिच्या अवतीभवतीच्या अनेक समस्या-उपसमस्या एकदम सामोऱ्या येतात व त्यांची उकल केल्याशिवाय शरीर-मन-समस्येची सोडवणूक करणेही अशक्य होते. अर्थात तत्त्वज्ञानातील प्रत्येक समस्येसंदर्भात हीच परिस्थिती आढळते, व तरीसुद्धा त्या समस्येचे ढोबळमानाने वर्णन करता येते. त्यानुसार शरीर-मन समस्येच्या अनुषंगाने उद्भवणारे काही प्रश्न पुढीलप्रमाणे –
0 चैतन्याचे वास्तव्य कुठे असते, देहात, मनात की आणखी कोठे? चैतन्य हे स्वतंत्र तत्त्व आहे की परतंत्र?
आपण मेंदूचे गुलाम नव्हे, तर मालक!
[निर्णयस्वातंत्र्याचा प्रश्न आणि मेंदू-विज्ञान]
मेंदू-विज्ञानामुळे जे अवघड प्रश्न पुढे आणलेले आहेत त्यांतला सर्वांत कठीण प्रश्न आहे तो फ्री विलसंबंधीचा. फ्री विल म्हणजे स्वेच्छा किंवा मुक्त इच्छा. आपण आपला स्वतःचा म्हणून, स्वायत्तपणे काही निर्णय घेऊ शकतो की मेंदूतल्या पेशींच्या जुळण्या आणि मेंदूतली रसायने मिळून आपण काय करायचे, कसे करायचे, केव्हा करायचे, ते सगळे ठरवत असतात?
याची सुरुवात झाली पंचवीस वर्षांपूर्वी. मेंदूसंबंधी सुरू असलेल्या संशोधनामुळे फ्री विल या संकल्पनेला हादरे बसू लागले. 1983 साली बेंजामिन लिबेट (Benjamin Libet) याने काही प्रयोग केले होते.
मेंदू-विज्ञान – तत्त्वज्ञान सामाईक सीमारेषा
शास्त्रज्ञ हो असती ज्ञाते बहुत / परि नाहीं चित्त हातां आलें – तुकाराम
हे शतक मेंदू-विज्ञानाचे आहे असे मानले जाते. मेंदू-विज्ञानाने इतर ज्ञानशाखांमध्येही प्रवेश केला आहे. न्यूरोइकॉनॉमिक्स,सोशल न्यूरोसायन्स, न्यूरोसायकॅट्री, न्यूरो एथिक्स अश्या उपशाखा सुरू होत आहेत. समाजावरही मेंदू-विज्ञानाचा प्रभाव वाढता आहे. लोकविज्ञानात मेंदूवरची पुस्तके, लेख तसेच वृत्तपत्रातील मेंदूसंशोधनाच्या बातम्या वाढत्या आहेत; हे त्याचेच द्योतक आहे. मेंदू-विज्ञानातील शोध, नव्या संकल्पना आपल्याला उत्तेजित करतात, प्रभावित करतात. आपण हरखून जातो. मानवी स्वभावाबाबत, समजाबाबत काही तरी वेगळे किंवा जास्त शिकवण्याचे अधिकार आपण मेंदू-विज्ञानाला बहाल करतो.