मेंदू-विज्ञानाचा तत्त्वज्ञानावर झालेला किंवा होऊ घातलेला परिणाम या विषयावरील ‘आजचा सुधारक’चा विशेषांक वाचकांच्या हाती देताना आम्हाला आनंद होत आहे. या विशेषांकामध्ये लेखनसाहाय्य करणाऱ्या लेखकांचे मनःपूर्वक आभार.
गेल्या काही वर्षांत मेंदू-विज्ञानात लागलेल्या शोधांमुळे मेंदूचे कार्य कसे चालते त्याबद्दल अधिकाधिक माहिती जमा होत आहे. आत्तापर्यंत जे फक्त तर्काने जाणणे शक्य होते त्याचे प्रत्यक्ष प्रमाण मिळू लागले आहे. पूर्वापार चालत आलेल्या काही समजांना बळकटी मिळू लागली आहे, तर काही कल्पना मोडीत निघाल्या आहेत. या उलथापालथीचा परिणाम तत्त्वज्ञानाच्या संकल्पनांवर होणे स्वाभाविक आहे. अश्या संकल्पना कोणत्या?