मासिक संग्रह: मे, 2012

पाणी मागतात… च्यायला

लोकं उद्धट व्हायला लागली आहेत
पाणी मागतात – पिण्याकरता शेतीकरता
ठोकून काढलं पाहिजे साल्यांना
साहेबांनी म्हटलं – अहो जलनीती घ्या
कायदे करू, नियम करू
येगळं प्राधिकरनच देतो की
पन ह्यांचं आपलं येकच
पाणी मागतात… च्यायला
सायबांनी असंबी म्हटलं
नदीजोड व्हायला पायजेल आहे
कोर्टाचा आदेशच आहे तसा
पश्चिमेच्या नद्या फिरवू की पूर्वेला
ह्ये अशी वळवायची नदी अनं ह्यो उचलायची
पन ह्यांचं आपलं येकच
पाणी मागतात… च्यायला
कान इकडं करा. तुमाला म्हणून सांगतो
साहेब म्हनाले-इनटरनल शिक्युरिटिला लै धोका आहे
आता टँकरवर काम भागणार नाही.

पुढे वाचा

मध्यमवर्ग : स्वप्न आणि काळजी

आपल्या देशातील मध्यमवर्गाने गेल्या शतकात सर्व क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी केली. शास्त्रीय शोधांपासून तर स्वातंत्र्य चळवळीपर्यंत सर्व क्षेत्रांत नेतृत्व पुरवले. वैचारिक क्रांतीच्या उंबरठ्यावर समाजाला ह्या मध्यमवर्गानेच नेऊन ठेवले. मात्र पुढे अचानक काय झाले… मध्यमवर्गीय सुखवस्तू झाले, केवळ व्यावहारिक यशाच्या मागे लागले आणि ते मिळताच आपली जबाबदारी पार पाडेनासे झाले. सामाजिक नीतिमत्तेच्या कालातीत मूल्यांना ते विसरले की काय? उच्चशिक्षणाचे भाग्य लाभलेल्या ह्या वर्गाने मिळकतीचे सोपे पण लबाडीवर आधारलेले मार्ग शोधून काढले, आणि त्यातच त्यांच्या अस्मितेची आहुती पडली. नामदार गोपाळ कृष्ण गोखले ह्यांनी राजकारणाचे अध्यात्मीकरण होण्याची गरज प्रतिपादन केली होती.

पुढे वाचा