सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण संमेलन मुळातच एका अस्वस्थतेतून जन्माला आले. कोठारी आयोग आला-गेला. यशपाल समिती आली-गेली. सर्वशिक्षा अभियान आले गेले. तसेच आता सर्वांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अभियानाचे होणार का? असा प्रश्न महाराष्ट्रातील शिक्षकांच्या मनात आल्याशिवाय राहिला नाही. महाराष्ट्राची परिस्थितीच तशी होती. शिक्षण हक्क अधिनियम राष्ट्रीय पातळीवर पारित केला गेला 2010 च्या एप्रिलमध्ये. त्यानंतर दीड वर्षांनी म्हणजे 2011 च्या सप्टेंबरमध्ये महाराष्ट्राने आपले नियम पारित केले. शिक्षकांना धारेवर धरण्यापलीकडे या अधिनियमामुळे नवीन काही झाले नाही. अशी प्रतिक्रिया सर्व शिक्षकांच्यात उमटलेली दिसत होती.
मासिक संग्रह: एप्रिल, २०१२
पत्रसंवाद :
श्री. दाभोलकरांच्या पत्रांच्या निमित्ताने
श्री दत्तप्रसाद दाभोलकर ह्यांची तीन पत्रे गेल्या दोन अंकांत प्रसिद्ध झाली आहेत. त्याचप्रमाणे गेल्या अंकाबरोबर आपल्या मासिकाची बावीस वर्षे पूर्ण झाली आहेत.
1990 मध्ये नवा सुधारक सुरू झाला तेव्हापासूनच ह्या मासिकात जाहिराती कधीही घ्यायच्या नाहीत आणि हे मासिक एका ‘रिसर्च जर्नल’सारखे चालवावयाचे असे संपादकांच्या मनात होते. इतकेच नव्हे तर विवेकवादाविषयी ज्यांना जिज्ञासा असेल त्यांच्यात बंधुभाव निर्माण होईल आणि त्या मंडळींकडूनच हे मासिक पुढे चालवले जाईल असेही संपादकांना वाटत होते. पहिली दोन वर्षे आजीव वर्गणी स्वीकारण्यात आली नाही.