सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण ह्या सूत्राभोवती ह्या विशेषांकातील लेख गुंफलेले आहेत. हा विशेषांक एरवीच्या अंकांपेक्षा काहीसा वेगळा आहे.
बालकांना निःशुल्क आणि अनिवार्य शिक्षणाचा हक्क देणारा अधिनियम एप्रिल 2010 पासून लागू झाला. ह्या अधिनियमाच्या कलम 8 व कलम 29 नुसार भारतातील प्रत्येक मुलाला आता चांगल्या गुणवत्तेच्या शिक्षणाचा हक्क मिळाला आहे. मात्र, हा अधिनियम लागू होऊन 18 महिने झाले असले तरी त्यात उल्लेख असलेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या उद्दिष्टाबाबत राज्यात पुरेसे विचारमंथन होताना दिसत नाही. अशाप्रकारचे मंथन व्हावे ह्या हेतूने 14 व 15 जानेवारी 2012 रोजी ‘सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण’ हे दोन दिवसांचे निवासी संमेलन सेवाग्राम, वर्धा येथे आयोजित केले गेले होते.