कोणत्याही वस्तूला. मूल्य येते. ते तिला असलेल्या मागणीमुळे. ज्या वस्तूला मागणी नाही, तिला किंमत नाही. ही मागणी एकतर गरजेपोटी किंवा हावेपोटी असते. गरज लवकर पुरी होते आणि हाव कधीच संपत नाही. ज्या वस्तूची गरज लवकर संपेल, तिला किंमत असली तरी ती अत्यल्प असते. उदाहरणार्थ, तर अन्न! …..
सोन्याला व रजांना जी किंमत असते ती त्यांच्याविषयी माणसाला वाटणाऱ्या हावेमुळे प्राप्त झाली आहे.
सध्या पैसा म्हणून जी वस्तू वापरली जाते. ती म्हणजे कागद! कागदाची उपलब्धता विपुल आहे. त्याला किंमत कमी असते; पण त्या क्यगदावर सरकारकडून विशिष्ट पद्धतीने आकदा कापला गेला की त्या कागदाविषयी प्रत्येकाच्या मनाव व उत्पन्न होते आणि त्या हावेमुळे केवळ त्या कागदाचा उपयोग चलन म्हणून होऊ शकतो. ज्या सापळ्या गरजेच्या वस्तू आहेत. जसे धान्य — त्यांच्या साड्याला मर्यादा असते. परंतु हे मानवाने निर्माण केलेले चलन दीर्घकाळपर्यंत वापरात येऊ शकत असल्यामुळे ते साठवता येते आणि ते अधिकाधिक साठविण्याचा मोह होतो .
कोणत्याही वस्तूची किंमत वाढत असते. ह्याचे कारण अनेकांच्या मनात त्या वस्तूविषयी हाव असते. एवढ्यामुळेच ही-जी हाव आहे ती फक्त मानवी मनाच्या आत असते, बाहेर नाही. ती अमूर्त आहे. पैशाची किंमतः ही माणसाच्या मनातच वागत असल्यामुळे आपण जेव्हा एखादी वस्तू मूल्यवान आहे असे म्हणतो. तेव्हा आप्रपा त्या वस्तूवर मूल्याचा आरोप करीत असतो. त्या वस्तूच्या मूल्याचा गुण त्या वस्तूत नसतो हर तो माणसाच्या मनात असतो. पैसा नाही असे मी ज्यावेळी म्हणतो, त्यावेळी मला असे म्हणावयाचे असते की मुळात मूल्य असलेल्या वास्तूवर आपण मूल्याचा आरोप केलेला असतो. हे चलन जे.पैसा म्हणून वापरले जाते, वे त्या त्या देशातच स्वीकारले जाते. त्या देशाच्या सीमेबाहेर त्या चलनाची किंमत शूचा असू शकते. पूर्वी,चलन म्हणून धातूचे तुकडे वापरले जात होते. त्या धातूंचा अन्यत्र उपयोग करणे शक्य होते. म्हणून जो धावूचा तुकझ वापरला जातो त्याची किंमत बाजायत धातू म्हणून जेवढी असेल त्यापेक्षा जास्त ठेवण्यात येते. ह्या सगळ्याचा अर्थ असा की, येथेसुद्धा माझ्यावर किंमतीचा
आरोपच होत असतो .
आरोप केल्याशिवाय जर-कोणत्याही वस्तूला मल्या येत नसेल तर वस्तूच्या ठिकाणी मलय नसून त्यावर केलेल्या आरोपाच्या ठिकाणी मूल्य असते. ह्या जगातल्या वस्तूंना उपयोगिता असते. मूल्य नसते. सध्याच्या परिस्थितीत पैशाविषयी प्रत्येकाच्या मनात हाव असल्याकारणाने त्याच्या (पैशाच्या) ठिकाणी उपयोगिता आली आहे. ही उपयोगितासुद्धा खाजगी मालकीच्या ज्या संकल्पना मानवाच्या मनात दृढ झालेल्या आहेत त्यामुळे. मानवी मनाला खाजगी मालकीकडून सार्वजनिक मालकीकडे प्रवास करता आला तर पैशाची उपयोगिता कमी होत जाऊन पुढे नाहीशी होईल.
सुरुवातीला पैसा अस्तित्वात नाही असे मी म्हटले त्याचे कारण, पैशाच्या ठिकाणी असलेले मूल्य मानवाने कल्पिलेले आहे हे आहे. नास्तिक मंडळी जेव्हा ‘देव नाही’ असे म्हणतात, तेव्हा त्यांना असे म्हणावयाचे असते की देवाच्या ठिकाणी कल्पिलेले सामर्थ्य किंवा गुण हे आपण त्यांवर आरोपित केल्यामुळे त्याला प्राप्त झाले असतात आणि आपल्या श्रद्धेमुळे ते आपल्याला भासमान होतात. ही श्रद्धा सार्वत्रिक असल्याकारणाने देवाच्या अस्तित्वाला कोणी आह्वान देत नाही; आणि देवाचे अस्तित्व सत्य मानले जाते. पैसा आणि देव दोन्हीमधले हे साम्य लक्षात घेण्यायोग्य आहे. पैसा नाही हे मान्य केले तर त्याचे इतर व्यवहारावर काय परिणाम होतील?
पहिला मोठा फरक असा पडण्याची शक्यता आहे की वस्तूंच्या किंमती पैशात न मोजल्या जाता, त्यावर जितके मानवी श्रम लागले असतील त्यावरून ठरवण्यात येतील, म्हणजे हिशेब पैशात न होता कार्य-तासामध्ये होईल.
शरीरश्रम कमी करत जाण्याची मानवाची सहजप्रवृत्ती आहे. त्या सहजप्रवृत्तीतून त्याने सुरुवातीला काही सोपी यन्त्रे निर्माण केली आणि पुढे जास्त गुंतागुंतीची म्हणजे ज्यामध्ये अनेक लोकांच्या बुद्धिमत्तेचा संगम झालेला आहे, अशी यन्त्रे बनविण्यात तो समर्थ झाला. सोपी यन्त्रे कोणती तर 1) तरफ (lever puly) 2) पाचर (Wedge) 3) मळसूत्र (Screw) 4) कप्पी (खिराडी) 5) चाक (Wheel) – श्रम कमी करतीत जाण्याच्या मानवाच्या स्वभावामुळे अनेक लहान मोठ्या यन्त्रांचा शोध लागला आहे.
यन्त्रांच्या जोडीला श्रमविभाजन केल्यानेही माणसाचे एकूण श्रम कमी होतात हेही त्याच्या लक्षात आले आहे. जितके श्रमविभाजन जास्त, तितके वस्तूंचे उत्पादन व वस्तूंमधील वैविध्य वाढत जाऊन प्रत्येक माणसाच्या उपभोगात भर पडत जाते. (हा उपभोग प्राप्त करण्यासाठी माणूस पैसा खर्च करीत असतो) पैसा खर्च केल्यामुळेच माणसाला हे सारे उपभोग प्राप्त होतात, हा त्याचा भ्रम आहे. पैशाविषयीची सर्वांना वाटणारी हाव कोणत्याही कारणाने कमी झाली तर पैशाचे प्रयोजनच उरणार नाही आणि त्याचे अनेक सुपरिणाम दिसू लागतील.
पैशाचा वापर बंद झाल्यास सगळ्यात महत्त्वाचा फरक असा पडेल की शिल्लक टाकण्याची आणि नफा मिळविण्याची गरज राहणार नाही. कारण शिल्लक टाकण्यासारखे काही शिल्लकच राहणार नाही; अर्थात् हे सारे घडण्याआधी प्रत्येक माणसाला ह्यांची जाणीव झाली पाहिजे की इतरांच्या क्षमता कमी जास्त असल्या तरी सगळ्या उत्पादनावर सर्वांचा समान हक्क आहे. आज ह्या जगात कोणी उपाशी मरू नये इतपत समज लोकांना आली आहे. ह्याचा परिणाम म्हणून पुष्कळशी सरकारे वेलफेअर स्टेट्स (कल्याणकारी राज्ये) झाली आहेत. पण अजून ती कागदोपत्री तशी आहेत, प्रत्यक्षात नाहीत. ज्या ठिकाणी कल्याणकारी राज्ये अस्तित्वात येऊ शकलेले नाही, त्या ठिकाणी ती तशी का झाली नाहीत, ह्याची कारणे शोधता असे लक्षात येते की, त्या प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींना अजून माणूस संघशः काय करू शकतो, ह्याचा प्रत्यय आलेला नाही. संघशः केलेल्या प्रयत्नामळे माणसांची अभावाकडून विभवाकडे वाटचाल झाली आहे. अजन त्यांच्या मनातील अभावाची धास्ती कमी झालेली नाही; आपण सर्वांच्या पुरते उत्पादन करू शक असा विश्वास त्यांच्या मनात नाही, तो विश्वास नसल्याचा परिणाम असा होतो की प्रत्येक जण उत्पन्नात स्वतः भर टाकण्याऐवजी दुसऱ्याचे ओरबाडून, लुबाडून स्वतःच्या सुरक्षिततेकडे जाण्याचा प्रयत्न करतो. परिणामी नवनिर्मिती फार थोडी होते आणि जे उत्पादन होते, त्याचा जास्तीत जास्त वाटा आपल्याला मिळावा आणि आपला संचय वाढावा, एवढाच प्रत्येकाचा प्रयत्न असतो.
वस्तूंच्या निर्मितीच्या आणि वाटपाच्या पद्धतीमुळे आणि तीच अंगवळणी पडली असल्यामुळे, नफा मिळविण्याची गरज प्रत्येक उद्योगाला वाटते. नफा मिळविण्यासाठी आजवर केलेल्या कामांमुळे उत्पादनात सतत भर पडत आलेली आहे, हे खोटे नाही; पण त्यामुळे विषमता फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे आणि त्यायोगे दुःखही अपरिमित प्रमाणात निर्माण झाले आहे.
विषमता राखल्याशिवाय नफा मिळू शकत नाही. नफा मिळत राहावा ह्यासाठी भांडवलाची गरज आहे. आणि भांडवल निर्माण करण्यासाठी शोषणाची म्हणजे श्रमिकाला त्याचा न्याय्य हिस्सा न देता, तो स्वतःकडे ठेवायचा अशी गरज असते. म्हणजेच भांडवल-निर्मितीचा आणि नफ्याचा मूलाधारच शोषण हा आहे.
पैशाविषयीचे माझे म्हणणे जर बरोबर असेल, त्यात कुठलाही तर्कदोष नसेल (आणि मला तर तो मुळीच दिसत नाही) तर आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी . लागतील.
पैसा हा केवळ मानवाच्या मनातच वागतो तर आपण सगळ्यांच्या जवळ तो सारख्या प्रमाणात आहे अशी कल्पना का करू शकत नाही? वास्तवात पैसा नाहीच तर भांडवल म्हणून आम्ही काय वापरतो? केवळ भांडवलच नव्हे तर, आज नफा, शेअर बाजार कर्जबाजारीपणा किंवा सावकारी ह्यांचा मूलाधारच ‘पैसा’ आहे. हा मूलाधार मृगजळासारखा खोटा आहे काय?
आपल्या व्यवहारात पूर्ण सेमंता व त्याचबरोबर बंधुता असणे आवश्यक आहे ही बाब तत्त्वतः पुष्कळांना मान्य असली तरी ती प्रत्यक्षात येत नाही. पैशाचे वास्तव स्वरूप सर्वांना समजले तर समता आणणे सोपे होईल काय? शीषणहीम समाज निर्माण करण्यास भांडवलाची नवी व्याख्या करणे आवश्यक आहे. ही व्याख्या अधिकाधिक लोकांचे एकमेकांना वाढत्या उपभोगांचा लाभ देण्यासाठी केलेले ‘बुद्धिपूर्वक सामूहिक प्रयत्न’ अशी केल्यास आपले पैशावरचे अवलंबन कमी होईल काय?
गौरीवंदन, 123. शिवाजीनगर, नागपर 4400108:….