माहिती तंत्रज्ञानात मराठी

मराठीचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने मराठीतून संगणकीय व्यवहार करता येणे अत्यावश्यक आहे. परंतु ह्या कामात मुख्यतः दोन अडचणी येत आहेत. एक म्हणजे संगणक सुरू केल्यावर इंग्रजीतील शब्द/सूचना दिसतात. त्यामुळे, ‘संगणकाला मराठी समजत नाही’ असा समज होतो. मग संगणकावर मराठीतून काम करण्याचा मुद्दाच बाद ठरतो. संगणक ही तर अत्यंत प्रगत, आधुनिक अशी गोष्ट. संगणक म्हणजे तंत्रज्ञानाची परमावधी. आणि मराठी तर स्वयंपाकघरात, फार फार तर म्युन्सिपाल्टीच्या प्राथमिक शाळेत बोलली जाणारी भाषा! मग या दोहोंची सांगड कशी घालता येईल?
दुसरी अडचण यापेक्षा थोडी अधिक वास्तव आहे. ती अशी, की मी लिहिलेले दुसऱ्याला वाचता येईल का? मराठीतून काम करण्यासाठी वेगवेगळी सॉफ्टवेअर्स विकत घ्यावी लागतात. उदा. आकृती, श्रीलिपी. ही सर्व सॉफ्टवेअर्स वेगवेगळ्या कंपन्यांनी तयार केली असल्यामुळे ती परस्परांहून पूर्णतः भिन्न आहेत. त्यांनी मराठी भाषेतील वर्ण संगणकाला त्याच्या भाषेतून सांगण्यासाठी विभिन्न पद्धती वापरल्या आहेत. त्यामुळे ‘लिहिणाऱ्याने’ ज्याचा उपयोग केला, तेच सॉफ्टवेअर ‘वाचणाऱ्याकडे’ असणे आवश्यक आहे. ते नसेल तर फॉण्ट कितीही सुंदर असला तरी दुसऱ्या सॉफ्टवेअर मध्ये त्याचा कचरा होऊन जातो, आणि ‘आप लिखे खुदा पढे’ अशी वेळ येते.
ह्या दोन्ही अडचणींवर एकच उपाय आहे, आणि तो आहे ‘युनिकोड’चा. युनिकोड प्रणालीद्वारे संगणकावरील मराठीचे प्रमाणीकरण अगोदरच झालेले आहे. केंद्र-शासनाने ह्याला अधिकृत मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्र शासनानेही युनिकोड वापराचे परिपत्रक दि. 10 सप्टेंबर 2008 रोजी काढले आहे. युनिकोडच्या सहाय्याने मराठी लेखन (DTP), मराठीतून इ.मेल पाठवणे, ब्लॉग रचणे, संकेतस्थळे तयार करणे, फायलींना/फोल्डर्सना नावे देणे इ. कामकाज मराठीतून करता येते. तेही इंग्रजीसारखे सहजतेने. (MS-WORD, EXCEL, POWER POINT, PageMaker ह्या नित्य वापरातील सॉफ्टवेअरमध्ये मराठी वापरता येते. इंटरनेटवर Google च्या माध्यमातून मराठी माहिती शोधता येते. मराठी वर्णक्रमानुसार मांडणी (sorting) करता येते. युनिकोडमध्ये प्रमाणित अनेक भाषांचा एकाच वेळी उपयोगही करता येतो.
‘सगळं खरं, पण हे युनिकोड म्हणजे नेमकं आहे तरी काय?’
ही एक संकेतप्रणाली आहे. ह्या प्रणालीमध्ये, जगातील सर्व भाषांमधील प्रत्येक वर्णाला एकच एक आकडा त्याचा ‘कोड’ म्हणून नेमून देण्यात आला आहे. अशा रीतीने जगातील नव्वद भाषांमधील सर्व वर्णांचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे. एखादा कोड (आकडा) संगणकाला दिला/सांगितला, की अमुक भाषेमधील अमुक वर्णच (character) आपल्याला काढायचा आहे, हे संगणकाला नक्की कळते. त्यामध्ये गोंधळ होऊच शकत नाही. युनिकोड हे मानक 1992 मध्ये तयार करण्यात आले. अधिक माहितीसाठी पहा : http://www.unicode.org
युनिकोडचा प्रसार मात्र अद्याप म्हणावा तसा झालेला नाही. वास्तविक, युनिकोड ही प्रणाली संगणकात घालूनच दिलेली असते; बाहेरून विकत घ्यावी लागत नाही. फक्त कार्यरत करून घ्यावी लागते. असे असले तरी संगणक विक्रेते, शासन आणि वापरकर्ते ह्या सर्वांच्या मराठीप्रति असलेल्या अनास्थेमुळे ह्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचलीच नाही. वैश्विकीकरणामुळे इंग्रजीतून अनेक गोष्टी आपल्याला ‘रेडिमेड’ मिळाल्या. तंत्रज्ञानाच्या भारतीय आवृत्तीसाठी आपल्याकडच्या तंत्रज्ञांनी कष्ट घेतले नाहीत. हे इंग्रजाळलेले तंत्रज्ञान तळागाळातील लोकांचे प्रबोधन घडवून आणू शकणार नाही हे आपल्या ध्यानातच आले नाही. त्यामुळे दाराशी आलेल्या ‘तंत्रक्रांती’चा लाभ आपल्याला करून घेता आलेला नाही. विंडोज XP मध्ये मराठीचा पर्याय सुरू करण्यासाठी कृती
vistaarc या कंपनीने तयार केलेल्या iComplex (Complex Script In staller) नावाच्या सॉफ्टवेअरने ही प्रक्रिया पूर्ण करता येते.
• http://www.omicronlab.com/tools/icomplex-full.html या लिंकवरील संकेतस्थळावर जा.
• तेथे IComplex 3.0.0 (Full Edition) असे लिहिलेल्या पानावर खाली Download : Click here to download अशी लिंक दिसेल.
• येथून सॉफ्टवेअर तुमच्या संगणकाच्या हार्डडिस्कमध्ये उतरवून घ्या. आता या exe फाईलवर दोनदा क्लिक करा. हे सॉप्टवेअर रन करावे का अशी विचारणा होईल. Run च्या बटणावर क्लिक करा.
• ते सुरू केल्यावर अशी चौकट दिसेल.

Xl Complex Scripts Installer
Install Complex Scripts
Read Carefully
This software is for licenced Windows
Remove Complex Scripts users. Copying this software with fonts
and other items may or may not vinlata
About Microsoft EULA.
• यातील Install Complex Scripts या बटणावर क्लिक करा. यानंतर Copy ing Files ची प्रक्रिया सुरू होईल.
• ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर Restart computer अशी सूचना येईल.
• त्याप्रमाणे संगणक बंद करून पुन्हा सुरू करा.
आता वरीलपैकी कोणत्याही प्रकारे संगणक पुन्हा सुरू केल्यावर पुढीलपैकी एकेका खुणेवर क्रमाने क्लिक करीत चला :
Start> Control Panel> Regional and Language options
• Regional and Language options मध्ये असलेल्या Language मधील Details ह्या खुणेवर क्लिक करा.
• Text services and Input Language नावाची चौकट उघडेल. ह्या चौकटीतल्या Add ह्या खुणेवर क्लिक करा.
• Add Input Language खूण असलेली लहान चौकट उघडेल. त्यातील Input Language मधील भाषांच्या सूचीतून Marathi निवडा व OK या खुणेवर क्लिक करा.
काही आवृत्त्यांमध्ये Marathi सोबत Marathi Indic IME असाही पर्याय . उपलब्ध आहे. आपण नुसता Marathi लिहिलेला पर्याय निवडावा.
• आधीच्या Text services and Input Languages मध्ये Installed Services च्या भागात MA Marathi दिसेल. हाच मराठीचा पर्याय आहे.
• आता Text services and Input Languages च्या तळाशी असलेल्या Apply आणि OK या बटणांवर त्याच क्रमाने क्लिक करा.
• संगणकाच्या उजव्या बाजला कोपऱ्यात EN अशी खण येईल. संगणकावर बहुभाषिक पर्याय सुरू झाल्याची ती खूण आहे.
• EN ह्या खुणेवर क्लिक केल्यावर English असे लिहिलेले दिसेल. त्याखालीच MA Marathi असेही लिहिलेले दिसेल.
• संगणकावर मराठीचा पर्याय सुरू करून घेण्याची प्रक्रिया या पायरीवर पूर्ण होते. ही प्रक्रिया एकदाच करावी लागते. यामुळे आपल्या संगणकात कोणतेही बदल होत नाहीत. MA ही खूण म्हणजेच मराठी वापरण्याचा पर्याय. तो क्लिक करून निवडल्यावर मराठीतून काम करता येते. तो बदलून इंग्रजी वापरायचे असेल तर पुन्हा EN चा पर्याय निवडा. Alt व Shift ह्या कीज् एकाच वेळी दाबून MA व EN चे पर्याय बदलतात. (अधिक माहितीसाठी पाहा – Text services and Input Languages>Preferences>Key settings)
विंडोज VISTA/7 मध्ये मराठी सुरू करण्याची कृती
विंडोज VISTA/7 मध्ये मराठीचा समावेश करूनच दिला आहे. त्यासाठी XP प्रमाणे सीडी अथवा Complex Scripts Installer वापरण्याचा खटाटोप करावा लागत नाही.
• संगणक सुरू करा आणि पुढील एकेका खुणेवर क्रमाने क्लिक करा. विंडोज VISTA साठी
Start> Control Panel> Regional and Language Options
विंडोज 7 साठी
Start> Control Panel> Clock, Language and Region> Regional and Language options
• एक चौकट उघडेल. त्यात वरच्या Keyboards and Language या खुणेवर क्लिक केल्यावर Change Keyboards हा पर्याय दिसेल.
• त्यावर क्लिक केल्यावर Text Services and Input Languages नावाची चौकट उघडेल.
• त्यातील General या चौकटीतील Add या खुणेवर क्लिक करा.
• Add Input Language अशी खूण असलेल्या एका चौकटीत भाषांची यादी दिसेल (हे पर्याय XP ला मिळते-जुळते आहेत)
• या चौकटीतल्या भाषांच्या सूचीमधून Marathi ही खूण निवडून त्यावरील ‘+’ च्या चौकटीत दोनदा क्लिक करा.
• त्यात Keyboard चा पर्याय दिसेल. त्यावर ‘+’ च्या चौकटीत दोनदा क्लिक केल्यावर विविध कीबोर्ड पर्यायांच्या छोट्या चौकटीत दिसतील. त्यातील Marathi च्या चौकटीत खूण करा व OK म्हणा.
इतर पर्याय वापरायला हरकत नाही. पण त्यात अंक रोमन लिपीतून (म्हणजे 1,2,3..) दिसतात. फक्त Marathi या पर्यायामुळे अंकदेखील देवनागरी लिपीतून (म्हणजे १,२,३..) दिसतात.
• Text Services and Input Languages ची चौकट परत येईल. या चौकटीत Apply व OK ह्या खुणांवर याच क्रमाने क्लिक करा.
• आता संगणकाच्या उजव्या बाजूला EN अशी खूण दिसेल. त्यावर क्लिक करून MA Marathi सुरू झाले आहे ना याची खात्री करा.
मराठीतून टंकलेखनासाठी कळफलकाची माहिती (Keyboard) .
• मराठीचा पर्याय (MA) सुरू करून घेणे ही संगणकावर मराठी वापरण्याची पहिली पायरी झाली. प्रत्यक्षात मराठी अक्षरे संगणकावर टंकलिखित करण्यासाठी कळफलकाचाच वापर करावा लागतो. जसा भाषेचा पर्याय संगणकात मुळातच दिलेला असतो. तसाच या भाषा वापरण्यासाठीच्या कळफलकाचाही पर्याय असतो. आपण ज्या कळफलकावर इंग्रजीतून काम करतो तोच कळफळक मराठीसाठी वापरायचा असतो. त्यांतील कोणत्या इंग्रजी कीज वर मराठीची कोणती अक्षरे व चिह्न आहेत हे पाहून सरावाने तो शिकून घ्यावा लागतो. आपल्याकडच्या कळफलकांवर केवळ इंग्रजी अक्षरे दिसत असल्याने त्यावरील मराठी अक्षरांचे स्थान कळत नाही.
कळफलकावर मराठी अक्षरे दिसण्यासाठी कृती :
विंडोज (XP) साठी
MA असताना पुढील पर्यायावर क्रमाने क्लिक करा
Start> All Programs> Accessories> Accessibility> On-Screen Keyboard
विंडोज-VISTA व विंडोज 7 साठी
Start> All Programs> Accessories> Ease of Access> On-Screen Keyboard
On-Screen Keyboard चा पर्याय सुरू केल्यानंतर टंकलेखनासाठी एखादी वर्ड फाईल उघडा. खाली MA पर्याय सुरू आहे याची खात्री करून घ्या. समोरच्या कळफलकाच्या चित्रावर तुम्हाला पुढीलप्रमाणे मराठी अक्षरे दिसतील.
मराठी कळफलकाची प्रतिमा
JURLINES DAIL
21 F2 EL FSF 7 R F F F F pe alte trek
del and po
मराठी अक्षरे इंग्रजीपेक्षा अधिक असल्याने काही अक्षरांसाठी Shift की चा वापर करावा लागतो.
Shift की दाबल्यावर
DaD AIEER Rs.
स्वल्पविराम, चौकोनी कंस यासारख्या काही बाबींसाठी ctrl आणि alt या दोन्ही कळ दाबून ठेवून संबंधित कळ दाबावी लागते.
Ctrl आणि Alt की दाबल्यावर O
EL F2 F3
FG FT FBF9FO EN F12
Bah
On-Screen Keyboard चा पर्याय बहूपयोगी आहे. तुम्ही इ-मेल वापरत असा वा वर्ड, हा पर्याय सुरू कगेल्यावर जे कळफलकाचे चित्र समोर येते ते माऊसच्या साहाय्याने खेचून हवे तिथे नेता येते. शक्यतो माऊसने ते खेचून समोरील स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी ठेवावे. तो बघून सराव करणे सोपे जाते. कळफलक हा दोन भागांमध्ये विभागलेला असतो. डावा भाग व उजवा भाग. डाव्या व उजव्या हातांच्या हालचालींची सांगड या दोन भागांशी घातली आहे. ह्या कळफलकात उजवा हात व्यंजने तर डावा हात स्वर टाईप करण्यासाठी वापरला जातो, हे आपल्या लक्षात येईल. प्रत्येक हाताची फक्त चारच बोटे टंकलेखनासाठी वापरली जातात. उजव्या हाताचा अंगठा हा स्पेसबार (Ctrl व Alt च्या ओळीतील मधली आडवी पट्टी) दाबण्यासाठी वापरला जातो. डाव्या हाताचा अंगठा टंकलेखनात अजिबात वापरला जात नाही. टंकलेखनामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्येक बोटाने त्याला ठरवून दिलेली अक्षरेच टाईप करावीत.त्यामुळे टंकलेखनातील गती येते. इनस्क्रिप्ट कळफलकावरचे सर्व मराठी टंकन हे नेहमीच्या मराठी टंकनासारखेच करायचे आहे. आधी ‘अ’ हा स्वर वा अन्य कोणताही वर्ण टंकित करावयाचा, व नंतर त्याला काना, मात्रा, वेलांटी द्यायची. जोडाक्षरे टंकित करण्यासाठी मात्र आधी संबंधित वर्ण (जोडाक्षरामध्ये प्रथम उच्चारला जाणारा वर्ण लिहून त्याला हलन्त चिह्न द्यायचे व नंतर उच्चारला जाणारा वर्ण टंकित करायचा. आधीचा वर्ण हलन्त (पायमोडका) असल्यामुळे पुढील वर्ण त्यालौ आपोआपच जोडला जातो.
‘र’ ह्या वर्णाच्या जोडाक्षरांबद्दल थोडे विस्ताराने लिहावे लागेल. मराठीत एखाद्या वर्णाच्या नंतर आलेला ‘र’ तीन प्रकारांनी (उदा. ड्रम, प्रकार, पुऱ्या) तर अगोदर आलेला ‘र’ एका प्रकाराने (उदा. – कर्म) असा एकूण चार प्रकारांनी जोडला जातो. पैकी ड्रम, प्रकार आणि कर्म हे तीन प्रकार इंग्रजी (J) ह्या स्थानावर शिफ्ट न दाबता जो ‘र’ वर्ण आहे, त्यानेच टंकित केले जातात. ‘पुऱ्या’ मधील ‘य’ मात्र (J) ह्या स्थानावर शिफ्ट कळ दाबून मिळणाऱ्या ‘र’ ह्या वर्णाने टंकित केली जाते. (कृपया हायफन टाकून -य लिहिण्याचा दळभद्रीपणा करू नका.)
मराठीतून टंकलेखनासाठी फोनेटिक, टाईपरायटर असे विविध पर्याय आहेत. पण वर सांगितल्याप्रमाणे मराठीचा इन्स्क्रिप्ट कळफलक जो मुळातच ऑपरेटिंग सिस्टमचा भांग म्हणून उपलब्ध आहे तोच वापरण्याची सवय करावी. वेगाने टंकलेखन करता येणे हे कौशल्य आहे व ते प्रशिक्षणानेच प्राप्त होते. जर मराठीतून प्रदीर्घ व सातत्यपूर्ण संगणकीय लिखाण ही तुमची गरज असेल तर ‘टंकलेखन’ शिकण्याला पर्याय नाही.
मराठी टंकांबद्दल (फाँट) थोडेसे
आपल्याकडे मराठीतून संगणकावरचे काम (म्हणजे शिवाजी, कृतिदेव, डीव्हीटीटी सुरेख) हे टंक हा समज बरोबर व चुकीचा दोन्ही आहे. बरोबर, कारण अक्षरांच्या लिखाणासाठी जशी कळफलकाची गरज असते तशीच या अक्षरांच्या वळणासाठी टंकांची आवश्यकता असते. चुकीचा कारण एखाद्या टंकाद्वारे केलेले काम प्रमाणित असेलच असे नाही. हे टंक युनिकोड प्रमाणित व MA चा पर्याय सुरू केल्यावर वापरता येणारे आहेत का, हा कळीचा प्रश्न आहे. ते जर नसले तर ते आपल्या प्रमाणीकरणाच्या तत्त्वाविरुद्ध जाणारी आहे. युनिकोड नसलेल्या टंकांमुळे मराठी वापरताना (विशेषतः इंटरनेटवर) अनेक मर्यादा येतात. म्हणूनच यापुढे कोणताही टंक वापरताना तो युनिकोड-प्रमाणित आहे का हे तपासून पाहावे. मुळात तुम्हाला कोणी टंक विकत देत असेल तर तो युनिकोड नाही असेच समजावे. युनिकोड व्यवस्था संगणकाचाच भाग असल्यामुळे ते वापरण्यासाठीचे टंकदेखील ऑपरेटिंग सिस्टममध्ये असतात. काही टंक हे इंटरनेटवरून मोफत उतरवून घेता येतात.
एखादा टंक युनिकोड प्रमाणित आहे की नाही हे ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे त्या टंकात कोणताही एखादा अर्थपूर्ण शब्द वा वाक्य गुगलच्या चौकटीत टाईप करून Enter ची की दाबा. जर गुगलने त्यानुसार मराठीतून माहिती शोधून दिली तर तो टंक युनिकोड प्रमाणित आहे, जर गुगलकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तर तो नाही. तो टंक युनिकोड प्रमाणित नसेल तर मराठीतून टंकलेखनासाठी निरुपयोगी
आहे.
जेव्हा MA-Marathi चा पर्याय आपण सुरू करतो तेव्हा वर्डमध्ये टाईप करायला घेतल्यावर वरच्या टंकांतील चौकटीत Mangal (मंगल) नावाचा टंक आपसूक येतो. मंगल हा टंक मायक्रोसॉफ्टच्या विन्डोज् या ऑपरेटिंग सिस्टममधील default टंक आहे. तरी तो वापरू नये. याचे कारण तो दिसायला बेढब व अनाकर्षक आहे, तसेच मराठी जोडाक्षरांसाठी त्यात काही त्रुटी आहेत. पारंपरिक वळणांनुसार मराठीची सर्व अक्षरे अचूक व आकर्षक दिसण्यासाठी Arial Unicode MS किंवा Sanskrit 2003 यांपैकी कोणत्याही एका टंकाचा वापर करावा. Arial Unicode MS हा टंक Microsoft Office सोबत येतो. टंकांच्या चौकटीत जिथे Mangal आहे तिथे बदलून Arial Unicode MS निवडता येतो. बहुतांश वेळा या टंकाचा समावेश केलेलाच असतो. मात्र काही कारणास्तव तो येत नसल्यास दुसऱ्या टंकाचा वापर करण्याखेरीज पर्याय नसतो. Sanskrit 2003 हा सध्या उपलब्ध असलेल्या युनिकोड-प्रमाणित मराठी टंकांपैकी सर्वोत्कृष्ट टंक आहे. हा टंक इंटरनेटवरून मोफत डाऊनलोड करता येतो. पुढील वेबलिंकवरून हा टंक आपण विनामूल्य उतरवून घेऊ शकता.
http://omkarnanda-ashram.org/Sanskrit/itranslator2003.htm#dls पैकी ही लिंक कॉपी करून आपल्या इंटरनेट ब्राऊजरमध्ये पेस्ट करा. .
1) वरील संकेतस्थळावर तुम्हाला Sanskrit 2003 ची लिंक पुढीलप्रमाणे दिसेल.
2) Sanskrit 2003 वर क्लिक करा. Sanskrit 2003.zip असे लिहिलेली फाईल उघडेल. ती संगणकाच्या हार्ड डिस्कवर एका स्वतंत्र फोल्डरमध्ये सेव्ह करा.
3) ही झिप फाईल माऊसच्या राईट क्लिकने extract केल्यावर टंक दिसेल. हा टंक तुमच्या C Drive\Windows\Font या डिरेक्टरीत सेव्ह करा. आता तुम्ही जेव्हा वर्ड फाईलमध्ये पुन्हा टाईप कराल तेव्हा टंकांच्या चौकटीतून Sanskrit 2003 निवडून घ्या म्हणजे यापुढील तुमचे सर्व काम Sanskrit 2003 टंकाने होईल.
इंटरनेटवर मराठी वापरण्यासाठी आपल्या संगणकावरील ब्राऊजरमध्ये (उदा. Enternet Explorer, Mozilla Firefox इ.) मराठीचा पर्याय असतो. तो सुरू करून घेण्यासाठी पुढील कृती करा —
ब्राऊजरच्या वरच्या पट्टीवरील Tools मधून Internet Options चा पर्याय शोधा. त्यातील Languages च्या पर्यायात मराठीचा पर्याय (Marathi-mr IN) निवडा तसेच पुढील कृती करा – ब्राऊजरच्या वरच्या पट्टीवर पुढील खुणांवर क्रमाने क्लिक करा –
View> Encoding> Unicode (UTF-8) यामुळे तुम्हाला युनिकोड वापरून मराठीतून आलेली सर्व इ-मेल वाचता येतील.
मराठीतून मेल कसे पाठवाल?
इ-मेल (उदा. Gmail. Yahoo, Hotmail, Rediffmail वगैरे) मराठीत वापरतानाची पद्धत वर्डमध्येच सांगितल्याप्रमाणेच आहे. म्हणजे इ-मेल पाठवण्यासाठीदेखील आधी MA मराठीचा पर्याय सुरू करून घ्यायचा आहे. जसे वर्डमध्ये आपण मराठी कळफलकाद्वारा टंकलेखन करू तसेच इ-मेलसाठीही करायचे आहे. म्हणजेच इ-मेल मराठीतून पाठवण्यासाठी तुम्हाला दुसरी कोणतीही सुविधा वापरण्याची गरज नाही. तुम्ही मराठीतून शिकलेले टंकलेखन इ-मेलपासून ब्लॉग्जपर्यंत व वर्डपासून ते फेसबुकपर्यंत सर्वत्र चालते.
आपण युनिकोड मराठीतून वर्डमध्ये टंकलेखित केलेली फाईल इ-मेलने पाठवली तर ज्याला पाठवायची त्याला ती दिसेल का हा प्रश्न सर्वांनाच भेडसावतो. त्यामुळेच मग आपण त्या फाईलचे PDF मध्ये रूपांतर करतो. पण त्याने ती फाईल लॉक होते व वाचकाला त्यात बदल करता येत नाहीत.
MA मराठीचा पर्याय सुरू करून टंकलेखित केलेल्या पाईलमधील मजकूर तुम्ही इ-मेलने पाठवता तेव्हा त्याचे रूपांतर default टंक Mangal मध्ये होते. Mangal हा default टंक ऑपरेटिंग सिस्टिमचाच भाग असल्याने तो सर्व संगणकांत असतोच. त्याऐवजी संस्कृत 2003 निवडावा असे मी वर म्हटलेच आहे. युनिकोडमध्ये काम केल्याने मराठीचा मजकूर सार्वत्रिकरीत्या संचार करू शकतो.
मातृभाषेतून संगणकावर काम करा – नवसाक्षर, अल्पशिक्षित यांनाही तंत्रज्ञानाच्या कवेत घ्या.
ठाणे,
भ्रमणध्वनी, 9820040066, इ-मेल : ram.research@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.