मातृहस्तेन भोजनं – मातृमुखेन शिक्षणम्
चर्चा चालली आहे की शिक्षणाचे माध्यम काय असावे? शिक्षण मातृभाषेद्वारा द्यावे की इंग्रजीद्वारे? परंतु मला तर हा प्रश्नच विचित्र वाटतो. ह्यात विचारण्यासारखे काय आहे? डात दोन मते कशी असू शकतात हे मला समजत नाही. गाढवाच्या बछड्याला जर विचारले की तला गाढवाच्या भाषेत ज्ञान देऊ की सिंहाच्या भाषेत? तर तो काय सांगेल? तो म्हणेल की सिंहाची भाषा कितीही चांगली असो; मला तर गाढवाची भाषाच समजेल, सिंहाची नाही. हे तर नर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे की मनुष्याचे हृदय ग्रहण करू शकेल अशी भाषा फक्त मातृभाषाच आहे आणि तिच्याद्वारेच शिक्षण दिले जावे ह्यात शंकेला कोणतीही जागा नाही.
कृष्णाने सांदीपनी ऋषींच्या आश्रमात राहून विद्या प्राप्त केली. त्यानंतर घरी परत देताना गुरू म्हणाले, “वर माग.” कृष्णाने सांगितले, “मातृहस्तेन भोजनम्.” म्हणजे मरेपर्यंत मला मातेच्या हातून भोजन मिळो..
मी विचार करतो की ज्या बालकांना आईच्या हातचे जेवण खाण्यास मिळत नाही बांची परिस्थिती काय होत असेल? काही हॉटेलात खातात तर काही भोजनालयात. आईच्या भोजनात केवळ भाकरीच नसते तर प्रेमही असते. ह्यासाठी कृष्णाने “आईच्या हातून भोजन नावे” असा वर मागितला. अशाच रीतीने मी मागतो की, “मातेच्या मुखातून शिक्षण मो. मातृमुखेन शिक्षणम्.” हीच गोष्ट मातृभाषेलाही लागू पडते. बालकांना मातृभाषेतच न मिळाले पाहिजे. शिक्षणाचे माध्यम तर मातृभाषाच असले पाहिजे. पहिल्यापासून पर्यंतचे सर्व शिक्षण मातृभाषेतूनच दिले पाहिजे. शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची गोष्ट करणे हे शंभर टक्के मूर्खपणाचे आहे.
– विनोबा