नियंत्रणाच्या हेतूबद्दलची शिक्षकाची कल्पना काय, यावर बरेच काही अवलंबून असते. नियंत्रणाची गरजच नसल्याचे लक्षात आणून देणे हाच त्याचा अंतिम हेतू असेल; मुलांनी ठाम, समर्थ, जबाबदार बनावे असे शिक्षकाला वाटत असेल आणि ती तशी बनू शकतात असा त्याला विश्वास असेल, तर शिकण्याला मुलांनी नकार देण्याचा असा धोका खूपच कमी होईल याची मला खात्री आहे. शिक्षक मुलांची कदर करतात का आणि मुलांना त्याची जाणीव आहे का, या मुद्द्याकडेच आपण पुन्हा एकदा येतो. एवढी एक गोष्ट सांभाळली गेली तर बांधीव वातावरणात शिकण्यास मार्गदर्शन करणे तुरुंगरक्षकाच्या कामासारखे भयावह वाटणार नाही.
( Children’s Minds : Margaret Donaldson भाषांतर: वर्षा सहस्रबुद्धे )