पाव नाही? केक खा!
आजकाल एक गैरसमज प्रचलित झाला आहे, की विज्ञान-तंत्रज्ञानाचे गतकाळातील यश पाहता पुढेही सर्व प्रश्न नेहेमीच विज्ञान-तंत्रज्ञानाने सुटत राहतील; भलेही पृथ्वीची लोकसंख्या कितीही वाढो. विज्ञानाबाबतच्या अपुऱ्या आकलनातून हा गैरसमज विश्वव्यापी झाला आहे. जसे, सिक्युरिटी अॅण्ड ग्रोथ या पुस्तकाचे लेखक बार्नेट व मोर्स हे थर्मोडायनॅमिक्सचा दुसरा नियम थेट उलटा करून ही भूमिका मांडतात. ते लिहितात, “संसाधनांमध्ये फरक असतो आणि सर्व संसाधने सारखीच नसतात, हे विज्ञानाने खोटे पाडले आहे. आजच्या जगात तुम्ही कोणत्या संसाधनापासून सुरुवात करता याला महत्त्व उरलेले नाही.”
(पॉल व अॅन एर्लिच यांच्या 1984 : पॉप्युलेशन अॅण्ड एन्व्हायर्नमेंट या लेखातील हे अवतरण. लेख ऑन नाइन्टीन एटी फोर या पुस्तकाचा भाग आहे (स्टॅन्फर्ड अॅलम्नाय असोसिएशन, डब्ल्यू.एच. फ्रीमन अॅण्ड को, 1983).
थोडक्यात म्हणजे, वीज लोखंडाच्या तारांमधून पाठवता येईल, काँक्रीटमध्ये सोन्याच्या सळ्याही टाकता येतील; पण पाण्याला पर्याय सापडणार नाही! – संपादक ]