मासिक संग्रह: जून, २०११

संपादकीय

आजचा सुधारक चा पाण्यावरचा हा विशेषांक वाचकांपुढे ठेवताना मी जरा बेचैन झालो आहे. पाणी हा विषय इतका मोठा आणि आपल्या जिव्हाळ्याचा आहे की एकट्यादुकट्या माणसाने त्याला न्याय देणे अवघड आहे. तरीदेखील हे धारिष्ट्य आसु वरील प्रेमापोटी आणि वाचकांच्या उदारपणावर विश्वास ठेवून करत आहे.
पाणी हा पदार्थ मोठा विचित्र आहे. घन, द्रव आणि वायुरूप (बर्फ, पाणी, वाफ) अशा तिन्ही अवस्थेत तो आढळतो. त्याला स्वतःची ना चव ना रंग. पाण्यात जेवढे पदार्थ विरघळतात तेवढे आणि तितके विविध (रसायने, खनिजे -) पदार्थ इतर कुठल्याच द्रवात विरघळत नाहीत.

पुढे वाचा

लेखक परिचय

चिं.मो.पंडित : स्थापत्य विशारद, सल्लागार म्हणून निवृत्तीनंतर शेती व त्यासंबंधी प्रश्न सोडवू पाहणाऱ्यांशी संपर्क राखून असतात.
आसुचे जुने लेखक पत्ता : 6, सुरुचि, संत जनाबाई पथ, विलेपार्ले (पूर्व), मुंबई 400 057 दूरध्वनी – 26147363
सुहास परांजपे : मुंबई आय.आय.टी.मधून केमिकल इंजिनिअरिंग चे पदवीधर. नोकरी न करता अनेक वर्षे स्वयंसेवी संस्थांत कार्य.
SOPPECOM (Society for Peoples Porticipatory Ecosystem Management) चे संस्थापक सभासद, K. Joy यांचेबरोबर कार्यरत. पाणी व्यवस्थापनावर पुस्तक, अहवाल.
पत्ता : 9, सर्वेष को.सो. India Hume Pipe Co. शेजारी, ठाणे (पूर्व), 400 603, दूरभाष 25324538
सीमा कुलकर्णी : SOPPECOM बरोबर कार्यरत.

पुढे वाचा

पाव नाही? केक खा!

पाव नाही? केक खा!
आजकाल एक गैरसमज प्रचलित झाला आहे, की विज्ञान-तंत्रज्ञानाचे गतकाळातील यश पाहता पुढेही सर्व प्रश्न नेहेमीच विज्ञान-तंत्रज्ञानाने सुटत राहतील; भलेही पृथ्वीची लोकसंख्या कितीही वाढो. विज्ञानाबाबतच्या अपुऱ्या आकलनातून हा गैरसमज विश्वव्यापी झाला आहे. जसे, सिक्युरिटी अॅण्ड ग्रोथ या पुस्तकाचे लेखक बार्नेट व मोर्स हे थर्मोडायनॅमिक्सचा दुसरा नियम थेट उलटा करून ही भूमिका मांडतात. ते लिहितात, “संसाधनांमध्ये फरक असतो आणि सर्व संसाधने सारखीच नसतात, हे विज्ञानाने खोटे पाडले आहे. आजच्या जगात तुम्ही कोणत्या संसाधनापासून सुरुवात करता याला महत्त्व उरलेले नाही.”

पुढे वाचा

गावगाडा : सहकार (भाग-२)

शेतीसारखा व्यवसाय करणारा समाज हा, हा व्यवसाय करण्याइतका सक्षम असला पाहिजे. कारण दर १-२ वर्षांनी त्याच्यावर काहीतरी अस्मानी संकट येत असते. कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी, तर कधी बेमोसमी पाऊस, तर एखादी कीड, तर कधी कमी पिकलेल्या धान्याची परदेशातून आयात. सरकारच्या सर्व विभागांकडून, म्हणजे नियोजन खाते, अर्थखाते, पाणी-पाटबंधारे, वीज या सर्व विभागांकडून त्याच्याविषयीचा दृष्टिकोन हा योग्य असा नसतो. कशासाठी? जर धान्य महाग झाले तर नागरी मतदार नाराज होतात म्हणून! धान्याचे भाव कमी करण्यासाठी धान्य आयात करण्यात येते. मध्यंतरी कांद्याचे भाव खूप वाढले होते तेव्हा टी.व्ही.वर

पुढे वाचा

पूर्व विदर्भातील परंपरागत पाणी-व्यवस्थापन

पाण्याला आपण जीवन म्हणतो. पण त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही म्हणूनच त्याला जीवन म्हणायचे काय? आपल्या देशात जेथेजेथे पाणी-व्यवस्थापनाच्या परंपरागत पद्धती विकसित झाल्या आहेत त्या पाहिल्या, तेथील लोकाचे त्या पद्धती विकसित करण्यामागील विचार आणि तंत्रे पाहिली, पाण्याचा वापर करण्याचे नीतिनियम पाहिले, तर पाण्याला जीवन का म्हणतात ते जास्त चांगल्या प्रकारे लक्षात येते. अशीच पाणी व्यवस्थापनाची एक परंपरागत पद्धत आपल्या विदर्भाच्या झाडीपट्टीच्या भागात अस्तित्वात आहे. असा सर्वसामान्य समज असतो की जेथे पाण्याचे दुर्भिक्ष्य असते त्या भागातील लोकांनी पाण्याचे व्यवस्थापन करणे ही त्यांची अत्यंत तातडीची गरज असते.

पुढे वाचा

प्रशिक्षणातून क्षमता-संवर्धन

केरळ राज्याची ख्याती दाट लोकवस्तीसाठी आहे (दर चौ.किमी.ला साडेआठशे माणसे). यामुळे पाण्यासकट सर्वत्र नैसर्गिक संसाधनांवर अपार ताण येतो. केरळ राज्याच्या नियोजन-मंडळाने पाणी-वापराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी पुढील निर्णय घेतले –
1) नियोजनाचे एकक तालुका, जिल्हा वगैरे न ठेवता एकेक पाणलोट क्षेत्र (watershed) ठेवले गेले. प्रशासनासाठीचे एकक बाद करून भौगोलिक एकक घडवले गेले.
2) प्रत्येक पाणलोट क्षेत्रासाठी एक पाणलोटविकास समिती (पाविस, Watershed Development Council) घडवली गेली. निवडून आलेले लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व स्थानिक तज्ज्ञांमधून घडवलेल्या या समितीला आपापल्या क्षेत्रासाठी पाणलोट विकासाचा संपूर्ण आराखडा (मास्टर प्लॅन) रचण्यास सांगितले गेले.

पुढे वाचा

आणि नदी वाहती झाली

गोळप, सह्यगिरीच्या निसर्गरम्य अशा परिसरात विसावलेले हे गांव रत्नागिरी शहराला अगदी जवळ, भाट्याची खाडी ओलांडली की सहा मैल अंतरावर, पावस पूर्णगड मार्गावर श्री स्वामी स्वरूपानंदांचे जन्मस्थान व समाधिक्षेत्र असलेले पावसगाव, त्या गावाच्या जवळ असलेले हे गोळप गाव. गावाच्या चहू बाजूला समाधी लावून बसलेले हिरवेगार डोंगर. त्यावर विहार करण्यास येणारे निरनिराळे पशुपक्षी, गावातून वाहणारी नदी. नारळी-पोफळी यांच्या बागा, आमराईत डौलाने डोलणारा हापूस, कोकणातील माणसांचे स्वभाव दर्शन घडविणारा फणस, हरत-हेची फुले, फळे यांच्या बागा. असा नयनरम्य परिसर म्हणजे गोळप. साडेतीन हजार लोकवस्तीचा हा गाव समृद्ध आहे.

पुढे वाचा

निर्झरगान

पेण-खोपोली रस्त्यावरचे छोटसे गाव ‘वावोशी’. गाव पुष्कळ जुने. पुणे-मुंबई रस्त्याजवळ असल्याने पुष्कळ बदललेले, मुख्य रस्त्यापाशी पुष्कळ दुकाने, बसगाड्या, आणि फाट्यापासून आत जावे तसे 20-25 वर्षे एकदम मागे नेणारे गाव-दर्शन. खास कोकणी घरे-अंगणे, अबोलीची झाडे. आणि दुतर्फा घरांच्या मधून जाणारा चिमुकला रस्ता. हा रस्ता जिथे संपतो तिथे डोंगरांचीच सुरवात होते. डोंगरातही वस्त्या आहेत, धनगरांच्या, कातकऱ्यांच्या. तिथपर्यंतचा रस्ता पायी. 30-40 वर्षांपूर्वीपर्यंत इथे मजबूत भात होत असे. डोंगरावर चांगली झाडी. त्यामुळे जगण्यासाठीची सगळी सामग्री पंचक्रोशीतच होती. पण मुंबई जवळ असणे म्हणजे काय हे या गावाने पुरेपूर अनुभवले.

पुढे वाचा

मुंबईचे सिंगापूर : पाणीवापराची किंमत

सिंगापूर हे बेट आहे. त्याच्या 699 चौ.कि.मी. क्षेत्रात अडतीस लक्ष माणसे राहतात. (तुलनेसाठी : पुण्याच्या 430 चौ.किमी. क्षेत्रात 2010 साली पंचावन लक्ष माणसे राहत असत), सिंगापूरला भरपूर पाऊस पडतो, 2,400 मि.मि. (सुमारे पंच्याण्णव इंच). तरीही सिंगापूरला आपली 40% गरज पाणी आयात करून भागवावी लागते, कारण त्यांच्या स्वतःच्या पाण्याची उपलब्धता दरडोई दरसाल 1,000 घ.मी.पेक्षा कमी आहे.
पाणी आयातीची गरज कमी राखण्यासाठी चार स्रोत धोरण (Four Taps Strategy) वापरले जाते.
1) पहिला स्रोत म्हणजे पावसाचे पाणी. पूर्वी जवळजवळ सर्व पावसाचे पाणी समुद्रात वाहून जात असे.

पुढे वाचा

नागरी जलपुरवठ्याचे आव्हान

जलव्यवस्थापनेचा आढावा
पुणे, औरंगाबाद, नाशिक इत्यादी शहरांमध्ये पुढील आठवड्यापासून (एप्रिल 2011) पाणी-कपात सुरू होत आहे. पाणी-कपात ही नेहमीच चिंतेची बाब असते. घरातील पाण्याच्या गरजा पुरवताना सर्वांचीच तारांबळ उडते. या वर्षीची पाणी-कपात आणखीनच चिंताजनक आहे. कारण अगदी नोव्हेंबरपर्यंत आपण याच विश्वासात होतो की आपल्याकडील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. या वर्षी पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील दुष्काळीक्षेत्रावरसुद्धा सरासरी एवढा अथवा सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला. असे असतानादेखील पाणी-कपातीची वेळ आली, यामागे दोन मोठी कारणे आहेत. 1. सर्व शहरांतील वाढती लोकसंख्या, 2. वाढत्या लोकसंख्येच्या दरासमोर नतमस्तक झालेली जलव्यवस्थापनाची यंत्रणा.

पुढे वाचा